Solid Joys

Solid Joys

By Alethia4India
Download on the App Store

Solid Joys episodes

  • 23 November : जेव्हा परमेश्वर आपलीच शपथ वाहतो

    त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळें त्यानें ‘आपलीच शपथ वाहून’ म्हटलें कीं, “मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन.” (इब्री 6:13-14)

    एक आत्मा आहे ज्याचे मोल आणि आदर आणि प्रतिष्ठा आणि महानता आणि थोरवी आणि सौंदर्य आणि ख्याती ही इतर सर्व संयुक्त केलेंल्या मूल्यांपेक्षा अमूल्य असें आहे - दहा हजार पटींपेक्षा जास्त – तो म्हणजें स्वतः परमेश्वर. म्हणून, जेव्हा परमेश्वर शपथ वाहतो, तो ती स्वतःची शपथ वाहतो.

    जर तो आणखी उंच जाऊ शकला असता, तर तो आणखी उंच गेला असता. का? यासाठीं कीं त्यानें तुम्हांला तुमच्यां आशेविषयी अधिक बळकटी व उत्तेजन द्यावें. स्वतःची शपथ वाहतांना परमेश्वर असें म्हणतो कीं आम्हांला आशीर्वाद देण्याचे आपलें अभिवचन मोडणें त्याच्यासाठीं तितकेच अशक्य आहे जितके कीं त्याच्यासाठीं स्वतःला तुच्छ मानणें अशक्य आहे.

    या विश्वात देवाचे मोल सर्वाधिक आहे. परमेश्वरापेक्षा अधिक मौल्यवान किंवा अद्भुत असा कोणी नाहीं. म्हणून, परमेश्वर परमेश्वराचीच शपथ वाहतो. आणि असें करतांना तो म्हणतो, “तुमच्यांसाठीं माझा हेतू हा आहे कीं तुम्हीं शक्य होईल तितका माझ्याठायीं विश्वास ठेवावा.” कारण जर यापेक्षा अधिक शक्य असते, तर इब्री 6:13 म्हणते कीं त्यानें आम्हास तेहि दिलें असते. “त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळें त्यानें ‘आपलीच शपथ वाहून’ म्हटलें.”

    लक्षांत घ्या, हा आमचा परमेश्वर आहे, असा परमेश्वर जो तुम्हांला त्याच्याठायीं अढळ आशा ठेवण्यास प्रेरणा देण्यासाठीं जितके उंच जाता येईल तितके उंच जातो. म्हणून, आश्रयाला परमेश्वराकडे धाव घ्या. जगाच्या सर्व बाह्य आणि स्वतःहून अपयशी ठरणाऱ्या आशांपासून दूर व्हा, आणि परमेश्वरावर आपला भाव ठेवा. आश्रय आणि आशेचा खडक म्हणून परमेश्वरासारखा कोणी नाहीं आणि कांहींही नाहीं.

    3 min
  • 22 November : आध्यात्मिक प्रौढपणाची किल्ली

    पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीनें चांगलें आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठीं जड अन्न आहे. (इब्री 5:14)

    पाहा, हे किती अद्भुत आहे. हे समजून घ्यां. हे तुमची वर्षे वाया जाण्यापासून वाचवील. 

    या वचनाचा अर्थ असा आहे कीं जर तुम्हांस प्रौढ व्हावयाचे असेल आणि वचनाची आणखी जड अशी शिकवण समजून तिचे महत्व जाणायचे असेल, तर परमेश्वराच्या सुवार्तेत असलेल्यां अभिवचनांच्या समृद्ध, पोषक तत्वांनी भरपूर, आणि बहुमूल्य दुधामुळें तुमची नैतिक ज्ञानेंद्रिये - तुमचे आत्मिक मन – बदलने गरजेचे आहे- यासाठीं कीं तुम्हांला चांगलें आणि वाईट समजण्याचा सराव व्हावा.

    किंवा, मीं हे दुसऱ्या शब्दांत मांडतो. परमेश्वराच्या सर्व वचनाचा आस्वाद घेण्यास तयार होणें प्रथमतः एक बौद्धिक आव्हान नाहीं; ते प्रथमतः एक नैतिक आव्हान आहे. जर तुम्हांला वचनाचे जड अन्न खावयाचे असेल , तर तुम्हीं तुमच्यां आत्मिक ज्ञानेंन्द्रियांस तसा सरावही दिला पाहिजे, यासाठीं कीं तुमच्यांठायीं असें मन उत्पन्न व्हावे ज्यास बऱ्यावाईटाची ओळख आहे. हे फक्त बौद्धिक आव्हान नसून एक नैतिक आव्हान आहे. 

    उल्लेखनीय सत्य हे आहे कीं, जर तुम्हीं उत्पत्ती आणि इब्रीकरांस लिहिलेंल्या पत्रातील मलकींसदेकास समजून घेण्याविषयी अडखळणत असाल तर त्याचे कारण कदाचित हे असू शकते कीं तुम्हीं दूरदर्शनावरील आक्षेपार्ह कार्यक्रम पाहता. देवानें जगाच्या स्थापनेपूर्वी त्याच्या लोकांची केलेलीं निवड यामुळें जर तुम्हीं अडखळत असाल, तर कदाचित त्याचे कारण हे आहे कीं तुम्हीं अजूनही कुठल्यातरी लबाड टीवी उपदेशाकाला ऐकत आहां. जर तुम्हीं वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या परमेश्वर-केंद्रित कार्याबाबत अडखळत असाल, तर याचे कारण कदाचित हे आहे कीं तुमचे पैशावर प्रेम आहे आणि तुम्हीं जास्त खर्च करता आणि फार कमी देता.

    प्रौढपणाकडे आणि पवित्र शास्त्राच्या जड अन्नाकडे जाणारा मार्ग प्रथमतः बौद्धिक व्यक्ती बनणें नाहीं, तर आज्ञाधारक व्यक्ती बनणें आहे. तुम्हीं दारू आणि यौनसंबंध आणि पैसा आणि फुरसतीची वेळ आणि अन्न आणि कम्प्युटर यासोबत काय करता, आणि तुम्हीं इतर लोकांशी कसे वागता, याचा संबंध तुम्हीं कोणत्या शाळेत जाता किंवा कोणते पुस्तक वाचता यापेक्षा जड अन्न पचविण्याच्या तुमच्यां क्षमतेशी आहे.

    हे अत्यंत महत्त्वाचे आहे याचे कारण आपल्या उच्च तंत्रज्ञानसंपन्न समाजात आपण असा विचार करण्याची शक्यता असते कीं शिक्षण - विशेषेकरून बौद्धिक शिक्षण - प्रौढपणाची किल्ली आहे. असें अनेक पीएच.डी. झालेलें लोक आहेत जे त्यांच्या आध्यात्मिक अप्रौढत्वात परमेश्वराच्या गोष्टींवर अडखळतात. आणि असें अनेंक कमी-शिक्षित पवित्र जन आहेत जे अतिशय प्रौढ आहेत आणि जे परमेश्वराच्या वचनाच्या गहन गोष्टींवर भरण-पोषण पाऊन प्रगती करूं शकतांत.

    3 min
  • 21 November : कृतज्ञतेची गंभीरता

    शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर गर्विष्ठ, निंदक, आईबापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र... (2 तीमथ्य 3:1-2)

    लक्षात घ्या कीं कृतघ्नतेसोबत गर्व, गैरवर्तन, आणि अवमान यांचा प्रादुर्भाव कसा होतो.

    एका ठिकाणी पौल म्हणतो, “तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्यांचाही उच्चार न होवो, ती उचित नाहींत; तर त्यापेक्षा उपकारस्तुती होवो” (इफिस 5:4). म्हणून, असें दिसते कीं कृतज्ञता आणि आभारी असणें ही विद्रपुता आणि हिंसेच्या सर्वथा उलट आहे.

    हे असें असण्याचे कारण हे आहे कीं उपकारबुद्धीची म्हणजें कृतज्ञतेची भावना ही अहंकाराची भावाना नसून नम्रतेची भावना आहे. ही स्वतःचे गौरव शोधणारी नसून, ती इतरांची प्रशंसा करणारी भावना आहे. आणि ती रागीष्ट नसून प्रसन्नचित्त असते. ती कटुत्व बाळगत नाहीं. कटु उपकारशीलता ही जणू शब्दांचा विरोधाभास आहे.

    कृतज्ञतायुक्त अंतःकरणास उघडणारी आणि कटुत्व व कुरूपता आणि अनादर व हिंसा यावर मात करणारी किल्ली म्हणजें आपला उत्पन्नकर्ता आणि प्रतिपालक व प्रदाता आणि आशा देणाऱ्या परमेश्वराठायीं दृढ विश्वास असणें. आम्हीं जर हा विश्वास धरत नाहीं कीं आमच्याजवळ जे कांहीं आहे आणि जे प्राप्त करण्याची आम्हीं आशा धरतो त्या सर्व गोष्टींसाठीं आम्हीं परमेश्वराचे अतिशय ऋणी आहोत, तर मग कृतज्ञतेचा झराच ओसरला आहे.

    म्हणून, मी असें म्हणून शेवट करतो कीं अंतिम समयी हिंसाचार आणि पवित्र वस्तू भ्रष्ट करणें आणि कुरूपता आणि अवज्ञा ही परमेश्वराची समस्या आहे जी तो स्वतः हाताळेल. जर आमची मूळ समस्या जर आहे तर ती आमच्या निर्भरतेच्या उच्च पातळीवर कृतज्ञतेची भावना नसणें ही आहे.

    जेव्हा आपण देवाचे आभार न मानण्याचा कळस पार करतो, तेव्हा आभारपणाचा सर्व तलाव डोंगराखाली जाऊन आणखीच कोरडा होऊ लागतो. आणि जेव्हा आभारपणा नाहींसा होतो, स्वतःचे प्रभूत्व त्याच्या सुखासाठीं भ्रश्टाचाराकडे आणखी डोळेझाक करू लागते.

    विनम्र भावानें आभारी असण्याविषयीं मोठे संजीवन यावे म्हणून प्रार्थना करा.

    3 min
  • 20 November : मरण हे लाभ आहे याची पाच कारणें

    कारण मला तर जगणें हे ख्रिस्त आणि मरणें हा लाभ आहे. (फिलिप्पै 1:21)

    मरणें हे “लाभ” कसे आहे?

    1. आमचे आत्मे सिद्ध केले जातील  (फिलिप्पै 1:21).
    2. पण तुम्हीं सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजें स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे, नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात; 

      आमच्याठायीं आणखी पाप नसेल. आमचे आंतरिक युद्ध आणि ज्याने आमच्यावर प्रीति केली आणि स्वतःस आमच्यासाठीं दिलें त्या प्रभूस दुखविणाऱ्या हृदयविदारक निराशा समाप्त होतील.

      • आम्हास या जगाच्या दुःखापासून सुटका मिळेल (लूक 16:24-25).
      • आम्हांला पुनरुत्थानाचा आनंद जरी त्वरित मिळणार नसला, तरी वेदनांपासून मुक्तीचा आनंद आम्हास लाभेल. मृत्यूच्या वेळी घडून येणारे एक मोठे परावर्तन दाखविण्यासाठीं येशूनें लाजर आणि श्रीमंत माणसाची गोष्ट सांगतली.

        तेव्हा [श्रीमंत माणसानें] हाक मारून म्हटले, ‘हे बापा अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, ह्यासाठीं की त्यानें आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे.’ अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस.

        • आमच्या जीवनास भरपूर विश्रांती दिली जाईल (प्रकटी 6:9-11).
        • डोळ्याखाली एक धीरगंभीरपणा आणि परमेश्वराची जपणूक असेल जी सर्वात शांत जलाशयाजवळील सर्वात कोमल उन्हाळ्याच्या सायंकाळी आम्हांला लाभणाऱ्या कोणत्याही सर्वात मोठ्या आनंदाच्या क्षणापेक्षा श्रेष्ठ असेल.

          त्यानें पाचवा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले; ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहींस आणि पृथ्वीवर राहणार्‍या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहींस?” तेव्हा त्या प्रत्येकाला एकेक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना असें सांगण्यात आले की......तुम्हीं आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या.

          • प्रभूसह गृहवास करणें हे आम्हीं अनुभवू करू (2 करिंथ 5:8).
          • आम्हीं धैर्य धरतो, आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणें हे आम्हांला अधिक बरे वाटते.

            संपूर्ण मानवजातीस परमेश्वराच्या घराची आस लागलेली आहे. जेव्हा आपण ख्रिस्ताकडे घरी जाऊ तेव्हा कधी जाणली नाहीं अशी सुरक्षा आणि शांती यांच्या पलीकडे समाधान असेल.

            • आपण ख्रिस्तासोबत असू (फिलिप्पै 1:21-23). 
            • ख्रिस्त पृथ्वीवरील कोणत्याही व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. तो त्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा अधिक बुद्धिमान, अधिक बलवान, आणि अधिक दयाळू आहे ज्याच्यासोबत वेळ घालविण्यात तुम्हांला आनंद येतो. तो अतिशय चित्तवेधक आहे. त्याच्या निमंत्रित  पाहुण्यांस शक्य तितका आनंद देण्यासाठीं दर क्षणी काय केले पाहिजे आणि काय म्हटले पाहिजे हे तो निश्चितपणें जाणतो. त्याची प्रीति ओसंडून वाहते आणि त्याच्या प्रियजनांनी ती प्रीति जाणावी म्हणून त्या प्रीतिचा कसा उपयोग करावा याचे त्याला अमर्याद ज्ञान आहे. यास्तव पौलाने म्हटले, 

              कारण मला तर जगणें हे ख्रिस्त आणि मरणें हा लाभ आहे. पण जर देहात जगणें हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाहीं. मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे.

              5 min
            • 19 November : आम्हां सर्वांना साहाय्याची गरज असते

              तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साहाय्यासाठीं कृपा मिळावी, म्हणून आपण धैऱ्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. (इब्री 4:16)

              आमच्यापैकी प्रत्येकाला साहाय्याची गरज आहे. आम्हीं परमेश्वर नाहीं. आमच्या गरजा आहेत. आम्हीं सर्व निरनिराळ्या दुर्बळपणाने ग्रस्त आहों. आम्हांला गोंधळलेलें असल्याचे जाणवते. आम्हांला सर्व प्रकारच्या मर्यादा आहेत. आम्हांला साहाय्याची गरज आहे.

              पण आमच्यापैकी प्रत्येकाला एक वेगळाच वारसा आहे  : आमच्याठायीं आमची पापे आहेत. म्हणून आपण आपल्या खोल अंतःकरणात जाणतो की आम्हांला ज्या साहाय्याची गरज आहे त्यांस आम्हीं पात्र नाहीं. म्हणून आम्हांला फसल्यासारखे वाटते.

              मला माझे जीवन जगण्यासाठीं, आणि मृत्यूचे अडखळण दूर करण्यासाठीं आणि अनंतकाळात प्रवेश करण्यासाठीं साहाय्याची गरज आहे - माझे कुटुंब, माझा जोडीदार, माझी मुले, माझा एकाकीपणा, माझी नोकरी, माझे आरोग्य, माझा पैसा, ह्या सर्व बाबतींत मला साहाय्याची गरज आहे. मला साहाय्याची गरज आहे. पण मला ज्या साहाय्याची गरज आहे त्यांस मी पात्र नाहीं.

              तर मग मी काय करावें? मला जर शक्य असते तर मी हे सर्व नाकारण्याचा प्रयत्न करू शकलो असतो आणि सुपरमॅन किंवा सुपरवुमन बनू शकलो असतो, ज्यांना कोणत्याही साहाय्याची गरज भासत नाहीं. किंवा मी हे सर्व बुडवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि माझे जीवन लैंगिक सुखांच्या गारव्यांत ओतून टाकू शकतो. किंवा मी केवळ निराशेच्या आहारी जाऊ शकतो.

              परंतु परमेश्वर या आशारहित परिस्थितीच्या वेळी अशी घोषणा करतो: येशू ख्रिस्त आशेने त्या निराशेचा चुराडा करण्यासाठीं, आणि त्या सुपरमॅन किंवा सुपरवुमनला नम्र करण्यासाठीं, आणि त्या बुडणाऱ्या दुखितास वाचवण्यासाठीं  महायाजक बनला.

              होय, आम्हा सर्वांना साहाय्याची गरज आहे. होय, आपल्यापैकी कोणीही आपल्याला आवश्यक असलेल्या साहाय्यास पात्र नाहीं. पण निराशा आणि गर्व आणि कामुकतेस नाहीं. परमेश्वर काय म्हणतो ते पहा. कारण आपल्याजवळ एक थोर महायाजक आहे, देवाचे सिंहासन हे कृपेचे सिंहासन आहे. आणि कृपेच्या सिंहासनावर आपल्याला जे साहाय्य मिळते ती म्हणजें गरजेच्या वेळी साहाय्य करण्यासाठीं मिळणारी दया आणि कृपा. साहाय्य करण्यासाठीं कृपा! साहाय्यास पात्र नाहीं - कृपापूर्ण साहाय्य. म्हणूनच महायाजक येशू ख्रिस्तानें स्वतःचे रक्त सांडले.

              तुमची फसवणूक झालेली नाहीं. म्हणून त्या फसव्या लबाडीस नाहीं म्हणा. आम्हांला साहाय्याची गरज आहे. आम्हीं त्यास पात्र नाहीं. पण आपल्याला ती मिळू शकते. तुम्हीं ती आताच आणि सदाकाळसाठीं मिळवू शकता. जर तुम्हीं तुमचा महायाजक, देवाचा पुत्र येशू याचा स्वीकार करतां आणि त्याच्यावर विश्वास ठेवतां आणि त्याच्याद्वारे देवाजवळ येतां.

              4 min
            • 18 November : वचनाचे मर्मभेदी सामर्थ्य

              कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असें आहे. (इब्री 4:12)

              देवाचे वचन हीच आमची एकमात्र आशा आहे. देवाच्या अभिवचनांची सुवार्ता आणि त्याच्या न्यायाचे सावधगिरीचे इशारे इतके तीक्ष्ण आणि सजीव आणि सक्रिय आहेत कीं ती माझ्या अंतकरणाच्या तळाशी जातांत आणि मला दाखवतांत की पापाचा खोटेपणा हा खरोखर खोटेपणाच आहे.

               गर्भपात माझ्यासाठीं उज्वल भविष्य निर्माण करणार नाहीं. तसेच फसवणूक, अथवा भडकाऊ वस्त्र घालणें, अथवा माझी लैंगिक शुद्धता धुळीस मिळवणें, अथवा कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणाविषयी शांत राहणें, किंवा सोडचिठ्ठी, किंवा सूड घेणें ह्याही गोष्टींनी माझे कसलेच कल्याण होणार नाहीं. आणि या फसवणुकीपासून जर कोणी मला वाचवत असेल तर ते आहे देवाचे  वचन.

              देवाच्या वचनाचे अभिवचन आमच्या अंतःकरणातील संतोषकारक सुखविलासाप्रमाणें पापाच्या झुरळांवर पहाटेच्या उज्वल सूर्यप्रकाशाची मोठी खिडकी उघडण्यासारखे आहे. परमेश्वराने तुम्हांला तुमचे अंतःकरण कठोर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि तुम्हांस भुरळ पाडून परमेश्वरापासून दूर नेणाऱ्या आणि विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या पापाच्या खोल फसवणुकीपासून तुमचे रक्षण करण्याकरिता त्याची सुवार्ता, त्याची अभिवचने, त्याचे वचन दिलें आहे.

              विश्वासाचे जे सुयुद्ध ते आनंदाने करा. कारण देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आणि कोणत्याही दोधारी तलवारीपेक्षा अधिक तीक्ष्ण आहे. ते पापाच्या कोणत्याही फसवणुकीस भेदून आरपार जाते आणि जे खरोखर मूल्यवान आहे आणि जे खरोखर विश्वास ठेवण्यास पात्र आणि प्रिय आहे ते उघडकीस आणते.

              3 min
            • 17 November : बदल शक्य आहे

              आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. (इफिस 4:24).

              ख्रिस्ती विश्वास म्हणजें बदल शक्य आहे. खोल, मूलभूत बदल. कधीकाळी तुम्हीं निष्ठुर आणि असंवेदनशील होता पण आता अंत:करणाने सौम्य बनणें शक्य आहे. कडूपण आणि राग यांच्या वर्चस्वाखालून बाहेर निघणें शक्य आहे. तुमची पार्श्वभूमी कांहींही असेंना, एक प्रेमळ व्यक्ती बनणें शक्य आहे.

              पवित्र शास्त्र असें गृहित धरते की आम्हांला जसे लोक असायला पाहिजें तसे लोग आम्हांला बनविण्यात परमेश्वराचा विचार निर्णायक आहे. पवित्र शास्त्र अत्यंत स्पष्टपणें म्हणते, “सर्व प्रकारचे कडूपण... तुमच्यांपासून दूर करण्यात येवोत” आणि “कनवाळू व्हा” (इफिस 4:31-32). ते असें म्हणत नाहीं, “जर तुम्हांला करता येत असेल तर . . किंवा, “जर तुमचे आईवडिल अंत:करणाने सौम्य असतील तर . . . ” किंवा, “जर तुमच्यांशी भयंकर दुर्व्यवहार झाला नसेल तर . . . ” ते म्हणते, “कनवाळू व्हा.”

              हे अद्भुतरित्या स्वतंत्र करणारे सत्य आहे. बदल माझ्यासाठीं अशक्य आहे ह्या भयानक नशीबवादातून हे आम्हास मुक्त करते. हे मला त्या मानसिकतेपासून मुक्त करते जी म्हणते कीं माझे भवितव्य माझ्या पार्श्वभूमीवर अवलंबून आहे.

              शिवाय, परमेश्वराच्या आज्ञा ह्या नेहमी स्वतंत्र करणाऱ्या, जीवन बदलणाऱ्या सत्याचे प्रकटीकरण देतांत ज्यांवर आम्हांला विश्वास ठेवायचा असतो. उदाहरणार्थ,

              • परमेश्वराने आम्हास आपली लेकरें म्हणून दत्तक घेतले आहे. आता आमचा एक नवीन पिता आणि आमचे एक नवीन कुटुंब आहे. हे “मूळ-कुटुंबाच्या” दैववादी बळांना पाडून टाकते. “पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे.” (मत्तय 23:9).
              • परमेश्वर आमच्यावर आपल्या मुलांप्रमाणें प्रीति करतो. आम्हीं “प्रिय मुले” आहोत (इफिस 5:1). देवानें जशी तुम्हांवर प्रीति केलीं तशीच तुम्हींही एकमेकांवर प्रीति करा ही आज्ञा हवेत उडून जाणारा भुसा नाहीं, ती सामर्थ्यानें येते: “देवाची प्रिय मुले ह्या नात्यानें तुम्हीं त्याचे अनुकरण करणारे व्हा.“ “प्रीति” आज्ञा आहे आणि देवानें आम्हांवर प्रीति करणें हे सामर्थ्य आहे.
              • देवानें आम्हास ख्रिस्ताठायीं क्षमा केली आहे. तुम्हीं एकमेकांबरोबर कनवाळू व्हा; जशी देवानें ख्रिस्ताच्या ठायीं तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हींही एकमेकांना क्षमा करा. (इफिस 4:32). परमेश्वराने ख्रिस्ताठायीं जे केले ते सामर्थ्यशाली आहे. त्याद्वारे बदल शक्य होतो. सौम्य मनाचे व्हां ह्या आज्ञेचा संबंध तुमच्यां आईने अथवा तुमच्यां वडिलांनी तुमच्यांसाठीं जे कांहीं केले त्यापेक्षा परमेश्वराने तुमच्यांसाठीं जे कांहीं केले त्याच्याशी आहे. या प्रकारच्या आज्ञेचा अर्थ आहे तुम्हीं बदलू शकता.
              • आणि ख्रिस्तानें तुमच्यांवर प्रीति केली आणि स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिलें, “आणि ख्रिस्तानें तुमच्यांवर प्रीति केली त्याप्रमाणें तुम्हींही प्रीतिने चाला” (इफिस 5:2). ही आज्ञा जीवन बदलणारे सत्य घेऊन येते.  “ख्रिस्तानें तुमच्यांवर प्रीति केली.” त्या क्षणी जेव्हा प्रीति करण्याची संधी असते, आणि कुठलातरी स्वर म्हणतो, “तुम्हीं प्रेमळ व्यक्ती नाहीं,” तुम्हीं म्हणू शकता, “माझ्यावरील ख्रिस्ताची प्रीति मला एक नवीन प्रकारची व्यक्ती बनवते. प्रीति करण्याची त्याची आज्ञा माझ्यासाठीं निश्चितच शक्य आहे कारण त्याच्या प्रीतिचे अभिवचन माझ्यासाठीं खरे आहे.”
              • दैववादी नशिबाला मानणारे असू नका. ख्रिस्ती असा. बदल शक्य आहे. परमेश्वर जिवंत आहे. ख्रिस्त मेलेल्यांतून जिवंत झाला आहे. अभिवचने खरी आहेत.

                4 min
              • 16 November : जेव्हां मी चिंताक्रांत असतो

                त्याच्यावर तुम्हीं ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो. (1 पेत्र 5:7).

                तुम्हांला जे जे पाप करण्याचा मोह होतो त्या प्रत्येक पापासाठीं आणि तुमच्यांवर अचानक येऊन पडणाऱ्या आणि तुम्हांला घाबरवून टाकणाऱ्या अविश्वासाच्या प्रत्येक स्वरूपासाठीं एक अभिवचन आहे. उदाहरणार्थ:

                जेव्हा मी आजारी पडण्याविषयी घाबरून जातो, तेव्हा मी स्तोत्र 34:19 मधील अभिवचन घेऊन अविश्वासाला लढा देतो. नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो स्तोत्र 34:19. आणि मी भीत भीत व कापत कापत हे अभिवचन घेतो, “आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते; आणि ‘आशा लाजवत नाहीं;’ कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतिचा वर्षाव झाला आहे” (रोमकरांस 5:3-5).

                जेव्हा मी म्हातारा होत चाललोय याविषयी चिंतातूर होतो, तेव्हा मी यशया 46:4 मधील हे अभिवचन घेऊन अविश्वासाला लढा देतो : “तुमच्यां वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांला वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागवणारा मीच आहे, मी खांद्यांवर वागवून तुमचा बचाव करीन.”

                जेव्हा मला मरणाची भीती वाटते, तेव्हा मी रोमकरांस 14:7-9 मधील हे अभिवचन घेऊन अविश्वासाला लढा देतो : “कारण आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाहीं आणि कोणी स्वतःकरता मरत नाहीं. कारण जर आपण जगतो तर प्रभूकरता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभूकरता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. कारण ख्रिस्त ह्यासाठीं मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की, त्यानें मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.”

                जेव्हा मला चिंता वाटते की माझ्या विश्वासाचे जहाज बुडून जाईल व मी देवापासून मागे फिरून जाऊ शकतो तेव्हा मी फिलिप्पै 1:6 आणि इब्री 7:25 मधील ही अभिवचनें घेऊन अविश्वासाला लढा देतो : “ज्याने तुमच्यां ठायीं चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे.” “ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्‍यांना पूर्णपणें तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठीं मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.”

                म्हणून, चला तर आपण विश्वासाचे जे सुयुद्ध ते लढू या, इतर लोकांशी नव्हे, तर आपल्या स्वतःच्या अविश्वासाशी. हे चिंतेचे मूळ आहे, जे परिणामी इतर पुष्कळ पापांना जन्म देते.

                म्हणून, परमेश्वराच्या बहुमूल्य आणि थोर अभिवचनांवर आपण आपली दृष्टी लावू. पवित्र शास्त्र घ्या, पवित्र आत्म्याचे सहाय्य मागा, ती अभिवचने तुमच्यां अंतःकरणात साठवून ठेवा आणि उत्तम लढा द्या – जेणेंकरून तुम्हीं भविष्यातील कृपेत विश्वास ठेऊन जिवंत असावें.

                4 min
              • 15 November : अभिवचनें घेऊन लढा देणें

                तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. (यशया 41:10)

                जेव्हा मी सेवेच्या एखाद नवीन उपक्रम राबवित असतांना किंवा सार्वजनिक सभेसाठीं जाते वेळी जर मी घाबरलो, तेव्हा मी माझ्या सर्वात जास्त उपयोगात येणाऱ्या  अभिवचनांपैकी एक घेऊन अविश्वासाशी लढा देतो : यशया 41:10.

                ज्या दिवशी मी तीन वर्षांसाठीं जर्मनीत शिकण्यासाठीं निघालो, तेव्हा माझ्या वडिलांनी फार लांबून न्यूयॉर्कवरून फोन केला आणि मला या वचनात असलेलें अभिवचन दिलें. पुढील तीन वर्षे, अतिशय तनावाच्या काळात टिकून राहण्यासाठीं मी ते शेकडो वेळा वाचले असावे.

                जेव्हा माझ्या मनाचे यंत्र निष्क्रिय असते, तेव्हा गीअर्सचा आवाज हा यशया 41:10 चा आवाज असतो. हे वचन मला खूप प्रिय आहे.

                अर्थातच, माझ्या विश्वासाच्या शस्त्रागारात हाच एक खंजीर नाहीं.

                माझी सेवा निरुपयोगी आणि व्यर्थ आहे या विषयीं मी चिंताक्रांत होऊन जातो तेव्हां मी यशया 55:11 मध्ये असलेले अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो. “त्याप्रमाणें माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्यासाठीं मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाहीं.”

                मी माझे कार्य करण्याच्या बाबतीत अशक्त आहे अशी मला चिंता वाटू लागते, तेव्हा मी ख्रिस्तानें दिलेलें हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो, "माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते" (2 करिंथ 12:9).

                मला भविष्याविषयी निर्णय घ्यायचे असतांत आणि मी त्यांविषयी चिंताग्रस्त असतो, तेव्हा मी हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो, “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन” (स्तोत्र 32:8).

                जेव्हां मीं माझ्या विरोधकांना तोंड देण्याविषयीं चिंताक्रांत असतो, तेव्हा मी हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो, “देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?” (रोमकरांस 8:31).

                मी ज्यांच्यावर प्रीति करतो त्यांच्या कल्याणासाठीं मीं चिंताक्रांत असतो, तेव्हा मी हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो की, मीं वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणें मला समजते, “तर तुमच्यां स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून चांगल्या देणग्या देईल!” (मत्तय 7:11).

                यास्तव पवित्र शास्त्रातील प्रत्येक अभिवचन घेऊन अविश्वासाशी सर्वप्रकारे लढा द्या. पण एक केन्द्रिय हत्यार बाळगणें सहायक ठरते. आणि माझ्यासाठीं ते आहे यशया 41:1, “तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.”  अनमोल, बहुमूल्य अभिवचन!

                4 min
              • 13 November : तुमचे अंतःकरण कठोर करू नका

                आणि ‘शपथ वाहून’ तो (परमेश्वर) कोणाला म्हणाला की, ‘तुम्हीं माझ्या विसाव्यात येणार नाहीं’? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाहीं? तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की, अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाहीं. (इब्री 3:18-19)

                जरी इस्राएली लोकांनी तांबड्या समुद्राचे पाणी दुभागतांना पाहिले आणि ते कोरड्या भूमीवरून चालत गेले, तरीही ज्या क्षणी त्यांना तहान लागली, त्या क्षणी त्यांची अंतःकरणें परमेश्वराविरुद्ध कठोर झालीं आणि तो त्यांची काळजी घेईल असा भरवंसा त्यांनी केला नाहीं. ते त्याच्याविरुद्ध आरडाओरड करू लागले आणि म्हणाले की मिसर देशातील जीवन चांगले होते. 

                अंत:करणाच्या अशा कठोरतेवर आळा घालणेंच इब्रीकरांस पत्र लिहिण्या मागचा हेतू होता. किती तथाकथित ख्रिस्ती परमेश्वरावर विश्वासाची सुरूवात करतात. ते ऐकतात की त्यांची पापे क्षमा केली जाऊ शकतात आणि नरकापासून त्यांचा बचाव होऊन ते स्वर्गात जाऊ शकतात. आणि ते म्हणतात: “यांत तर मी काहींच गमावत नाहीं? मग मी विश्वास ठेवायला काय जाते.”

                मग एका आठवड्यात किंवा महिन्यात किंवा वर्षात अथवा दहा वर्षानंतर, परीक्षा येते - अरण्यात पाणी नसण्याचा काळ. मन्ना खाऊन-खाऊन आलेला किळस. आणि मिसर देशातल्या क्षणीक सुखांसाठीं मनांत गुप्तपणें वावरणारी इच्छा, जसे गणना 11:5-6 म्हणते, “मिसर देशात आम्हांला मासे फुकट खायला मिळत असत त्याची आठवण आम्हांला येते. त्याचप्रमाणें काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण ह्यांचीही आम्हांला आठवण येते; पण आता आमचा जीव सुकून गेला आहे; येथे ह्या मान्न्याशिवाय आमच्या दृष्टीस कांहींच पडत नाहीं.”

                या परिस्थितीत राहणें भयावह आहे - ख्रिस्ताठायीं आणि त्याच्या वचनात आणि प्रार्थनेत आणि उपासनेत आणि सुवार्ता प्रचारात आणि परमेश्वराच्या गौरवासाठीं जगण्यात आता तुम्हांला कुठलीही रूचि वाटत नाहीं असें तुम्हांला दिसून येते. आत्म्याच्या गोष्टींपेक्षा या जगाची क्षणिक सुखे जास्त आकर्षक आहेत असें आता दिसून येते.

                जर ही तुमची परिस्थिती असेल, तर मी तुम्हांला विनंती करतो की या वचनात पवित्र आत्मा जे बोलत आहे ते तुम्हीं ऐकावे. “ते अविश्वासामुळे प्रवेश करू शकले नाहींत!” परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. तुमचे अंतःकरण कठोर करू नका. पापाच्या धोक्याबाबत जागृत व्हा. तुम्हीं पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक ख्रिस्त येशू ह्याच्याकडे लक्ष लावा, आणि त्याच्यामध्ये तुम्हीं जो पत्कर केलेला आहे वा जी आशा धरली आहे ते दृढ धरून राहा.

                आणि जर तुम्हीं अजूनही देवावर विश्वास ठेविलेला नसेल, तर त्याच्यावर तुमची आशा धरा. पापापासून आणि स्वतःवर अवलंबून राहण्यापासून मागे फिरा आणि थोर तारणकर्त्यावर तुमचा विश्वास असू द्या. यां गोष्टी यासाठीं लिहिण्यात आल्या आहेत की तुम्हीं विश्वास धरावा आणि धीर धरावा, आणि जिवंत राहावें.

                4 min