Solid Joys

Solid Joys

By Alethia4India
Download on the App Store

Solid Joys episodes

  • 12 November : सैतान हा देवाच्या संकल्पानुसार कसे कार्य करतो.

    पाहा, ‘ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो.’ तुम्हीं ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्हीं पाहिला आहे; ह्यावरून ‘प्रभू फार कनवाळू व दयाळू’ आहे हे तुम्हांला दिसून आले. (याकोब 5:11)

    सर्व रोग आणि अपंगत्वामागे निर्णायक भूमिका ही परमेश्वराची असते. यात सैतानाचा सहभाग नाहीं असें नाहीं - विध्वंसकारक हेतूंमध्ये कुठल्याना कुठल्याप्रकारे तो संभवतः नेहमीच सहभागी असतो (प्रेषित 10:38). पण त्याचे सामर्थ्य निर्णयाक नाहीं. तो परमेश्वराच्या परवानगीवाचून कांहींएक करू शकत नाहीं.

    ईयोबाचा आजारपणाद्वारें ज्यां ज्यां गोष्टीं सूचित होतांत त्यांपैकी एक ही आहे. वचनात हे स्पष्टपणें सांगण्यात आले आहे की जेव्हा ईयोबावर आजारांचा मारा झाला तेव्हा, “सैतानाने ईयोबाला मोठमोठ्या गळवांनी नखशिखान्त अतिशय पिडले” (ईयोब 2:7). त्याच्या पत्नीने त्याला आग्रह केला की त्यानें परमेश्वराला शाप देऊन मरून जावे. पण ईयोब म्हणाला, “देवापासून सुखच घ्यावे, आणि दुःख घेऊ नये काय?” (ईयोब 2:10). आणि पुन्हा या पुस्तकाचा परमेश्वर प्रेरित लेखक असें म्हणून ईयोबाची प्रशंसा करतो (जसे त्यानें 1:22 मध्ये केले), “ह्या सर्व प्रसंगी ईयोबाने आपल्या वाचेने कांहीं पाप केले नाहीं.”

    दुसऱ्या शब्दात सांगायचे तर : सैतानावर परमेश्वराच्या प्रभुत्वाचा हा योग्य दृष्टिकोण आहे. सैतान वास्तविक आहे आणि आमच्या संकटांत त्याचा हात असू शकतो, पण शेवटचा हात नाहीं, आणि निर्णायक हात तर नाहीं. याकोब स्पष्ट करतो की ईयोबाच्या सर्व कष्टांत परमेश्वराचा चांगला हेतू होता: “पाहा, ‘ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो.’ तुम्हीं ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्हीं पाहिला आहे; ह्यावरून ‘प्रभू फार कनवाळू व दयाळू’ आहे हे तुम्हांला दिसून आले” (याकोब 5:11).

    म्हणून जरी इयोबाला पीडण्यांत सैतानाचा हाथ होता, तरी अंतिम हेतू परमेश्वराचा होता, आणि तो “कनवाळू व दयाळू” होता.

    हाच धडा आपल्याला 2 करिंथ 12:7 वरून शिकावयास मिळतो, जेथे पौल म्हणतो की त्याच्या शरीरातील काटा “सैतानाचा एक दूत” होता आणि त्याच्या स्वतःच्या पवित्रतेच्या निमित्ताने तो देण्यात आला होता - त्यानें फार चढून जाऊ नये म्हणून. “प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजें मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे!”

    पण लक्षांत घ्यां, आपण हे क्लेश भोगतो ते आपण क्लेशात नम्र व्हावें हा सैतानाचा हेतू नसतो. म्हणून, हेतू हा परमेश्वराचा असतो. याचा अर्थ येथे हा आहे की परमेश्वराचे उत्तम हेतू पौलाच्या जीवनात साध्य करण्यासाठीं परमेश्वर सैतानाचा उपयोग करीत आहे. खरे म्हणजें, परमेश्वराच्या निवडलेल्यांच्या बाबतींत, सैतान आमचा नाश करू शकत नाहीं, आणि शेवटी परमेश्वर त्याचे सर्व हल्ले आमच्यासाठीं सर्व कल्याणार्थ व्हावें म्हणून त्याच्यावरच उलथून टाकतो.

    4 min
  • 11 November : आपण तर त्याचे घर आहोत

    कारण ज्या मानाने घर बांधणाऱ्याला सबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे त्या मानाने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे. कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्वकांहीं बांधणारा देवच आहे. जे पुढे विदित होणार होते याविषयीच्या साक्षीसाठीं ‘त्याच्या सबंध घरात मोशे सेवक ह्या नात्यानें विश्वासू होता.’ ख्रिस्त तर ‘देवाच्या घरावर’ नेमलेला पुत्र ह्या नात्यानें विश्वासू होता, आणि आपण आपला भरवसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहोत. (इब्री 3:3-6)

    जे लोक येशू ख्रिस्ताठायीं अभिमान बाळगतात आणि त्याची आशा धरतात ते परमेश्वराचे घर आहेत. याचा अर्थ असा की येशू हा  केवळ मोशेच्या काळांत किंवा जेव्हां तो ह्या पृथ्वीवर प्रकट झाला केवळ त्यां दिवसातच नव्हे - तर अगदी आज, म्हणजें संप्रतकाळीही आपला उत्पन्नकर्ता, आपला स्वामी, आपला शासक आणि आपल्याला सर्वकांहीं पुरविणारा आपला प्रदाता (पोशिंदा) आहे.

    येशूला या घराचा “बांधणारा” म्हटलेले आहे. मोशे हा ‘बांधणारा’ नव्हता. तो घराचा सदस्य होता. म्हणून असें म्हटलेले आहे की, “येशू मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे - ज्या मानाने घर बांधणाऱ्याला सबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे त्या मानाने.”  म्हणून मोशे, घराचे नेतृत्व करण्याच्या बाबतींत, आणि घरास परमेश्वराचे वचन देण्याच्या बाबतींत महान असला, तरीही तो घराचा केवळ एक सदस्य होता. पण घर येशूनें बांधले.

    म्हणून जर आपण येशूठायीं अभिमान बाळगतो आणि येशूठायीं आशा धरतो तर आपण घर आहोत, आणि येशू हा आपला घर बनविणारा आणि स्वामी आणि शासक आणि पोशिंदा आहे. तो त्याच्या घराचा नाश होऊ देत नाहीं किंवा ते उध्वस्तही होऊ देत नाहीं.

    मग लेखक आपले कल्पनाचित्र बांधणारा आणि घर या पासून, पुत्र आणि सेवक याकडे वळवतो. ”त्याच्या सबंध घरात मोशे सेवक ह्या नात्यानें विश्वासू होता.’ ख्रिस्त तर ‘देवाच्या घरावर’ नेमलेला पुत्र ह्या नात्यानें विश्वासू होता.” म्हणून ख्रिस्त त्यानें बनविलेल्या घराचा भाग बनला - घराण्याचा भाग बनला. पण तरीही, त्याचा आदर मोशेपेक्षा कितीतरी अधिक वरचा आहे. मोशे सेवक होता. ख्रिस्त पुत्र आहे. वारस आहे.

    आणि आपण या घराचे सदस्य आहोत. इब्री 3:6: “आपण आपला भरवसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहोत.” सर्वप्रकारे, आपण मोशेचा आदर करावा या आणि जे त्याचे आहे ते आपण त्यास द्यावे. परंतु इब्रीकरांस लिहिलेल्या संपूर्ण पुस्तकांचा मुद्दा हा आहे : ख्रिस्त हा अधिक श्रेष्ठ आहे. प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ. तो परमेश्वराच्या लोकांच्या घराचा बांधणारा आहे. परमेश्वराच्या लोकांच्या घरात तो पुत्र आहे. आपण मोशेचा आदर करू या. पण आपण येशूची उपासना करू या - जो आमचा कर्ता, आमचा बंधू आहे.

    4 min
  • 10 November : तुमची भीती दूर करा

    मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन. (स्तोत्र 56:3)

    आपल्यां सर्व चिंता ह्यांचे मूळ आमचा अविश्वास आहे या सत्याचे एक संभाव्य स्पष्टीकरण अशाप्रकारे असूं शकते: “मला जवळजवळ दररोज चिंतेच्या भावनांस तोंड द्यावे लागते; आणि म्हणून मला असें वाटते की परमेश्वराच्या कृपेवर माझा विश्वास पूर्णतः अपुरा आहे. म्हणून माझे खरोखर तारण झालें आहे याची मला खात्रीच पटत नाहीं.”

    या भीतीला माझे हे उत्तर आहे : समजा तुम्हीं कारस्पर्धेत भाग घेतला आणि तुमचा शत्रू, ज्याला असें वाटते की तुम्हीं तुमची ही शर्यत पूर्ण करू नये, तुमच्यां कारच्या विंडशील्डवर चिखल फेकतो. आणि तात्पुरते तुमचे लक्ष तुमच्यां लक्ष्य रेषेवरून विचलित होऊन जाते आणि तुमची कार अचानक दुसऱ्या दिशेने जाऊ लागते, तेव्हां त्याचा अर्थ असा होत नाहीं की तुम्हीं तुमची शर्यत अर्ध्यावर सोडणार आहात.

    आणि निश्चितच याचा अर्थ असाहि नाहीं की तुम्हीं चुकीच्या रेसट्रॅकवर आहात. नाहीं तर, तुमच्यां प्रतिस्पर्धीने -  तुमच्यां शत्रूने - तुम्हांला मुळीच अडथळा आणला नसता. याचा अर्थ असा आहे की तुम्हांला ताबडतोब तुमच्यां विंडशील्डचे वाइपर सुरू करायचे आहे.

    जेव्हा तुमच्यां मनात चिंता आक्रमण करते आणि परमेश्वराचे गौरव आणि त्यानें आमच्यासाठीं जे वैभवी भविष्य योजून ठेविलें त्यापासून आपली दृष्टी अंधुक होऊ लागते, तेव्हां त्याचा अर्थ असा होत नाहीं की आपण विश्वासहीन आहोत, अथवा हा की आपण स्वर्गात जाणार नाहीं. याचा अर्थ हा आहे की आपल्या विश्वासावर आक्रमण केलें जात आहे.

    पहिला प्रहार होताच, परमेश्वराच्या अभिवचनांवरील आमचा विश्वास डळमळू शकतो आणि विचलित होऊ शकतो. परंतु आपण रेसट्रॅकवर राहून अंतिम रेखा पार करणार किंवा नाहीं हे यावर अवलंबून आहे की, कृपेने, आपण प्रतिरोधाची प्रक्रिया सुरू केली आहे किंवा नाहीं - आपण चिंतेच्या अविश्वासाविरुद्ध प्रतिघात करित आहों किंवा नाहीं. आपण विंडशील्ड वाइपर सुरू करणार आहोत का?

    स्तोत्र 56:3 म्हणते, “मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन.”

    लक्ष द्या: हे वचन असं म्हणत नाहीं की “माझा भीतीशी कधीही संघर्ष होत नाहीं.” भीती आक्रमण करते, आणि एक सुयुद्ध सुरू होते. म्हणून खऱ्या विश्वासणाऱ्यांस कुठलीही चिंता नसते असें पवित्र शास्त्र गृहित धरत नाहीं. त्याऐवजी, पवित्र शास्त्र आम्हास सांगते की जेव्हां चिंता आम्हांवर आक्रमण करतांत तेव्हां आम्हांला कसें सुयुद्ध करायचे आहे. ते आम्हांला सांगते की विंडशील्ड वाइपर कसे सुरू करावे.

    3 min
  • 9 November : इतिहासाच्या शेवटाविषयी आश्‍चर्यपात्र  होणें.

    संकट सोसणाऱ्या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणें, हे देवाच्या दृष्टीनें न्याय्य आहे... म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेंसहित प्रकट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहींत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहींत त्यांचा तो सूड उगवील. आपल्या पवित्र जनांच्या ठायीं गौरव मिळावा म्हणून, आणि त्या दिवशी विश्वास ठेवणार्‍या सर्वांच्या ठायीं आश्‍चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्हीं दिलेल्या साक्षीवर तुम्हीं विश्वास ठेवला आहे. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल (2 थेस्सल 1:7-10).

    प्रभू येशूनें अभिवचन दिल्याप्रमाणें जेव्हां तो या जगांत परत येईल, त्यावेळी ज्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला नाहीं त्यांच्याविषयी पौल म्हणतो, “त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.” हे एक असें भयानक दृश्य असणार आहे कीं ज्यामुळें हे सत्य ऐकणाऱ्या सर्वांचा थरकांप उडायला पाहिजें.

    आणि हो, आम्हीं जे विश्वास ठेवणारे आहों त्यां आम्हांला यांपासून किती सांत्वन मिळायला पाहिजें आणि कोणती गोष्ट पणास लागली आहे याविषयी आम्हांला किती गंभीर व्हावयाला पाहिजें. आह, जे सुवार्तेवर विश्वास ठेवीत नाहींत आणि सुवार्ता ज्यांच्या कानीही पडत नाहीं अशा लोकांविषयी आपली अंतःकरणें किती कळवळ्याने भरून गेलीं पाहिजेंत.

    पण आमच्या सर्व संकटांत आम्हीं धीर धरावा म्हणून येथे पौल आम्हांला उत्तेजन आणि आशेचे दोन शब्द देतो. “संकट सोसणाऱ्या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणें, हे देवाच्या दृष्टीनें न्याय्य आहे.” जर आपल्याला इतिहासाच्या शेवटाजवळ दुःखाची भयानक तीव्रता अनुभवास येत असेल, तर परमेश्वराचे वचन हे आहे: खंबीर असां: तारण जवळ आहे. तुमची संकटे शेवट हा नाहीं. आणि बाह्यरूपाने सामर्थ्यवान दिसणारे तुमचें शत्रू त्या दिवसावर पश्चाताप करून आक्रांत करतील ज्या दिवशी त्यांनी प्रभूच्या लोकांस स्पर्श केला होता.

    पण मग उत्तेजन आणि आशेचा उत्तम शब्द येतो. प्रभू आल्यावर आपल्याला केवळ विश्रांती देणार नाहीं, तर आपल्याला सर्वप्रथम ज्यासाठीं उत्पन्न करण्यात आलें आहे, त्याचा सर्वात मोठा अनुभवहि आम्हांस प्राप्त होईल. आपण त्याचे गौरव पाहूं, आणि आपल्यामध्यें त्याचा गौरव होईल यासाठीं कीं सर्व जगानें ते पाहावें हे जाणून आपण आश्चर्यपात्र होऊं.

    वचन 10: “आपल्याला पवित्र जनांच्या ठायीं गौरव मिळावा म्हणून, आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठायीं आश्चर्यपात्र व्हावें म्हणून तो येईल,” आपण आश्चर्यपात्र व्हावें यासाठींच आपल्याला घडविण्यात आलें होते. ज्याला वधस्तंभावर खिळण्यांत आले, जो मरणातून पुन्हां उठला, व जो परत येणार आहे असा जो गौरवी राजा, येशू ख्रिस्त ह्याच्यापेक्षा अधिक अद्भुत कांहींही नाहीं आणि कोणीही नाहीं. तो त्याचे गौरव प्राप्त करील, आणि आम्हांला परिपूर्ण, पापरहित, असें होण्याच्या आनंदाची प्राप्ती होईल व आपण सर्वात अद्भुत अशा गोष्टीचे आश्चर्यपात्र होऊं जिचा कधीच शेवट होणार नाहीं.

    4 min
  • 8 November : ज्या गोष्टीचा आम्हीं आनंद घेतो, तिचा आम्हीं आदरहि करतो

    “तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहींस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहींस, शब्बाथ आनंददिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असें म्हणून त्याचा आदर करशील; व त्या दिवशी आपलें कामकाज करणार नाहींस, आपला धंदा चालवणार नाहींस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहींस. तर तू परमेश्वराच्या ठायीं हर्ष पावशील; तू देशाच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करशील, असें मी करीन” (यशया 58:13)

    देवाचे गौरव न करता देवाचा शोध घेणें शक्य आहे. जर तुम्हांला असें वाटते कीं तुम्हीं देवाचा जो शोध घेतां त्यांत त्याचे गौरव व्हावें, तर मग तुम्हीं त्याचा शोध घ्यावा तो तुम्हांला त्याच्या सहभागितेचा आनंद मिळावा म्हणून घ्या.

    याचे उदाहरण म्हणून शब्बाथावर विचार करा. देवाचे लोक देवाचा पवित्र दिवस न पाळतां आपल्याच सुखविलासाचा शोध घेऊं पाहतांत म्हणून तो त्यांची कानउघाडणी करतो. “तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहींस. माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहींस.” पण त्याच्या बोलण्याचा अर्थ काय? प्रभूच्या दिवशी आपण आपल्या आनंदविलासात मग्न होऊ नये हा त्याचा अर्थ आहे का? नाहीं, कारण पुढे तो म्हणतो, “शब्बाथ आनंददिन आहे.” आणि 14 व्या वचनात तो म्हणतो, “तू त्याचा आदर करशील.” म्हणून तो त्यांना ज्या गोष्टीसाठीं दोष लावतोय ती ही कीं ते शब्बाथ दिवशी आपल्यां परमेश्वराच्या वैभवाठायीं आणि विश्रांतीठायीं आणि पावित्र्याठायीं, ज्याचा तो दिवस द्योतक आहे, हर्ष करण्याऐवजी स्वतःच्या कामकाजात रममाण होत आहेत.

    ते पूर्णानंदाचा शोध घेतांत या गोष्टीसाठीं तो त्यांची कान-उघाडणी करित नाहींये. तर तें किती वायफळ गोष्टींत त्याचा शोध घेताहेत या साठीं तो त्यांची कानउघाडणी करत आहे. सी. एस. लुईस यांनी म्हटल्याप्रमाणें, “आम्हीं अगदी क्षुल्लक गोष्टींत आनंदी होतो.” त्यांनी आपला आनंद व समाधान यांचा शोध जगीक गोष्टींमध्यें घेऊ पाहिला आहे, आणि त्यामुळे त्यांनी त्यां गोष्टींचा परमेश्वरापेक्षा अधिक आदर केला आहे.

    लक्ष द्या कीं शब्बाथाला “आनंद दिन” म्हणणें हे प्रभूच्या पवित्र दिवसाला “सन्मान्य दिन” म्हणण्यासारखे आहे. जर तू “शब्बाथ आनंददिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असें म्हणून त्याचा आदर करशील.” याचा अर्थ असा आहे कीं तुम्हांला ज्या गोष्टीमध्यें आनंद वाटतो तुम्हीं त्यां गोष्टींचा आदर करता. किंवा तुम्हांला ज्या गोष्टीमध्यें आनंद वाटतो त्यांचा तुम्हीं गौरव करता.

    परमेश्वरामध्यें आनंद घेणें आणि परमेश्वराचा गौरव करणें ह्यां दोन्ही गोष्टीं एकच आहेत. त्याचा सनातन सत्संकल्प आणि आपला सनातन आनंद उपासनेच्या अनुभवात एक होतो. परमेश्वराचा दिवस यासाठींच आहे. खरोखर, संपूर्ण जीवनाचा उद्देश्य हाच आहे.

    3 min
  • 7 November : देवाची प्रीति सशर्त आहे का?

    “तो अधिक ‘कृपा करतो;’ म्हणून शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.” म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजें तो तुमच्यांपासून पळून जाईल. देवाजवळ या म्हणजें तो तुमच्यांजवळ येईल.” (यशया 58:13)

    याकोब येथें आम्हास शिकवतो कीं असा एक गोड किंवा मौल्यवान अनुभव आहे ज्याला “अधिक कृपा” पावणें आणि देवाचे “आमच्याजवळ येणें” असें म्हटलें जाते. नक्कीच हा एक अद्भुत अनुभव आहे - अधिक कृपा आणि देवाची विशेष अशी जवळीक. पण मी विचारतो : परमेश्वराच्या प्रीतिचा हा अनुभव बिनशर्त आहे का? नाहीं. असें नाहीं. आमचे स्वतःला लीन करणें आणि देवाजवळ येणें या दृष्टीने प्रीतिचा हा अनुभव सशर्त आहे. परमेश्वर “लीनांवर कृपा करतो... देवाजवळ या म्हणजें तो तुमच्यांजवळ येईल.”

    देवाच्या प्रीतिचे अनमोल असें अनुभव आहेत ज्यांच्या प्राप्तीसाठीं आपणास गर्वाशी लढा देण्याची, लीन होण्याची आणि पूर्ण मनाने देवाच्या जवळ येण्याची गरज आहे. ह्यां अटी आहेत. म्हणजें, अशा अटी ज्यां पूर्ण व्हाव्यांत अशी कृति स्वतः देवच आमच्यामध्ये साधून देतो. पण तरी त्यां अशा अटी आहेंत ज्या आमच्यांत पूर्ण होतांत.

    जर हे खरे असेल, तर माझ्या चिंतेचे प्रमुख कारण म्हणजें हे कीं देवाची प्रीति ही पूर्णपणें बिनशर्त आहे याविषयीची अशास्त्रीय आणि पवित्र शास्त्राच्या दृष्टीनें गाफील अशी आश्वासनें लोकांना त्या सर्व गोष्टी करण्यापासून थांबवू शकतांत ज्यां करण्यांस पवित्र शास्त्र त्यांना आज्ञा देते ज्यां पूर्ण केल्यानें त्यांना त्यां सर्व शांतीचा आनंद प्राप्त होतो जो प्राप्त करण्याची त्यांना तळमळ असते. आपण जर लोकांना “अटीविरहित” शांतीचे आश्वासन देण्याचा प्रयत्न करतो, तर आपण कदाचित त्यांना त्यां निरोगी आध्यात्मिक जीवनापासूनच दूर करून बसणार ज्याच उल्लेख पवित्र शास्त्रांत केलेला आहे.

    निश्चितच, देवानें आपली प्रीतिने केलेली निवड, आणि ख्रिस्ताच्या मरणाद्वारे देवाची प्रकट झालेली प्रीति आणि त्याच प्रीतिने त्यानें आपल्याला दिलेला नवा जन्म, या सर्व गोष्टीं पूर्णपणें बिनशर्त आहेत या सत्याची आपण उच्च आणि अगदी स्पष्ट स्वरात घोषणा केली पाहिजें, यांत शंका नाहीं.

    शिवाय, आपण अथकपणें या सुवार्तेची घोषणा केलीं पाहिजें कीं आमचे नीतिमान ठरविले जाणें हे ख्रिस्ताचे आज्ञापालन आणि त्यानें स्वतःचे केलेलें अर्पण यांवर आधारित आहे, आपल्या कर्मावर नाहीं (रोम 5:19, “कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगानें पुष्कळ जण पापी ठरलें होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनानें पुष्कळ जण नीतिमान ठरतील.”)

    परंतु त्यांच बरोबर, आपण पवित्रशास्त्राच्या या सत्याची घोषणाहि करणें आवश्यक आहे कीं जो कोणी स्वतःला आपल्या दैनदिन जीवनांत लीन करतो आणि देवाजवळ येतो, त्याला देवाची कृपा आणि देवाचा जवळीकपणा यांचा परिपूर्ण आणि मधुर अशा आनंदाचा अनुभव प्राप्त होईल.

    4 min
  • 16 October : परमेश्वर ईर्ष्यावान आहे याची भीती बाळगून आशा ठेवणें

    "ज्याचे नाव ईर्ष्यावान आहे, तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे." (निर्गम 34:14)

    देव त्याच्या नावाच्या प्रतिष्ठेसाठीं अफाट ईर्ष्यावान आहे, आणि तो अशा लोकांविरुद्ध भयंकर क्रोधाविष्ठ होऊन त्यांचा न्याय करतो ज्यांचे अंतःकरण त्याच्याठायीं असायला पाहिजे परंतु ते इतर गोष्टींच्या मागे जातांत, जशी कीं एक पत्नी आपला नवरा सोडून दुसऱ्या प्रियकराच्या मागे जाते.

    उदाहरणार्थ, यहेज्केल 16:38-40 मध्यें तो विश्वास न ठेवणाऱ्या इस्राएलला म्हणतो,

    “जारिणी व रक्तपाती स्त्रिया ह्यांचा न्याय करावा तसा मी तुझा न्याय करीन आणि क्रोधाने व ईर्ष्येने मी तुझा रक्तपात करीन. मी तुला त्यांच्या हाती देईन, म्हणजें ते तुझी कमानदार घरे उद्ध्वस्त करतील, तुझी उच्च स्थाने पाडून टाकतील; तुझी वस्त्रे हिरावून घेऊन व तुझे उंची जवाहीर काढून घेऊन तुला उघडीनागडी करून सोडतील. ते तुझ्याविरुद्ध मंडळी जमवून आणून तुला दगडमार करतील व आपल्या तलवारींनी तुला भोसकतील.”

    तुम्हीं ह्या सावधगिरीच्या इशाऱ्याकडे आपलें कान लावावे अशी मी तुम्हांला विनंती करतो. तुमची समर्पित प्रीति आणि भक्ती यांसाठीं देवाची ईर्ष्या ही सदैव अंतिम दावा ठरते. ज्यां काहीं गोष्टीं तुम्हांला भ्रामक आकर्षण देऊन देवावरील तुमची प्रीति हिरावून घेतांत त्यां सर्व तुमच्यावर उठून तुम्हांला उद्ध्वस्त करतील.

    देवानें तुम्हांला जे जीवन दिलें त्याचा उपयोग तुम्हीं त्या सर्वसमर्थाच्याच विरुद्ध व्यभिचार करण्यासाठीं करावा ही एक भयानक गोष्ट आहे.

    परंतु तुमच्यांपैकीं जे खरोखर ख्रिस्ताशी एकरूप झालें आहेत ते तुम्हीं बाकीं सर्व गोष्टींचा त्याग करून केवळ त्याच्याशीच जडून राहण्याचे आणि त्याच्या प्रतिष्ठेसाठीं जीवन जगण्याचे आपलें वचन पाळतां त्यां तुम्हांसाठीं देवाची ईर्ष्या मोठे समाधान आणि मोठी आशा आहे.

    कारण कीं देव त्याच्या नावाच्या प्रतिष्ठेसाठीं अफाट ईर्ष्यावान आहे म्हणून जे काहीं किंवा जो कोणी त्याच्या विश्वासू पत्नीच्या कल्याणासाठीं धोका निर्माण करतो ते सर्व ह्या सर्वसमर्थ देवाचा वैरी ठरते. देवाच्या विश्वासू पत्नीसाठीं, म्हणजें त्याच्या विश्वासू लोकांसाठीं हे शुभवृत्त आहे.

    जारकर्म करणाऱ्या आणि आपलीं अं:तकरणने जगाला विकणाऱ्या व देवाबरोबर वैर ठेवणाऱ्या लोकांसाठीं देवाची ईर्ष्या विनाशकारी आहे (याकोब 4:3-4). परंतु जे लोक आपल्या कराराची शपथ पाळतात आणि आपण ह्या जगांत परके आणि प्रवासी आहों असे मान्य करतांत त्यांच्यासाठीं त्याची ईर्ष्या मोठे समाधान आहे.

    3 min
  • 16 अक्तूबर : अपने मुँह की चौकसी करो

    “जो अपने मुँह की चौकसी करता है, वह अपने प्राण की रक्षा करता है, परन्तु जो गाल बजाता है उसका विनाश हो जाता है।” नीतिवचन 13:3

    प्युरिटन थॉमस ब्रूक्स ने एक बार लिखा था, “हम धातुओं को उनकी छनकार से पहचानते हैं, और लोगों को उनके बोलने से।”[1]

    शब्द कभी तटस्थ नहीं होते। हमारे द्वारा बोले जाने वाले प्रत्येक शब्द को परमेश्वर सुनता है—हमारे जीवन उनके सामने उजागर हैं, और बाइबल में यह अद्वितीय क्षमता है कि वह हमारे दिलों के गहरे कोनों तक पहुँचकर उसे भी परख सकती है जिसे हम खुद से और दूसरों से छिपाना चाहते हैं।

    जो शब्द लोगों द्वारा हमसे बोले जाते हैं, उनकी छाप हमारी स्मृति में छप जाती है। शायद हम एक बच्चे द्वारा बोले गए पहले शब्दों की खुशी पर विचार करते हैं या फिर एक दोस्त के दर्दनाक शब्दों की कड़वाहट को महसूस करते हैं। बचपन से ही हम यह सीख जाते हैं कि हानि पहुँचाने के लिए या खुशी दिलाने के लिए शब्दों का उपयोग कैसे किया जाता है। राजा सुलैमान ने सही कहा था: “जीभ के वश में मृत्यु और जीवन दोनों होते हैं” (नीतिवचन 18:21)।

    हम सभी पाप में पतन के शिकार हैं। इसलिए चोट पहुँचाने वाले शब्द बड़ी आसानी से हमारे मुँह से निकल आते हैं। वे एक तलवार के अनियन्त्रित प्रहार के समान बड़े घातक हो सकते हैं और जब हम सुनने से पहले उत्तर दे देते हैं, तो हमारे शब्द बड़े लापरवाही से भरे हो सकते हैं। कभी-कभी हम बस जरूरत से ज्यादा बोल जाते हैं; और परिणामस्वरूप हम ऐसी बातें कह देते हैं जो हमें अपने तक ही रखनी चाहिए थीं। शब्द किसी पड़ोसी को नष्ट कर सकते हैं, किसी मित्र की भावनाओं को आहत कर सकते हैं, और हमारे सम्बन्धों में आग लगा सकते हैं। एक गलत शब्द किसी के चरित्र को बिगाड़ सकता है, किसी की प्रतिष्ठा को धूमिल कर सकता है, या किसी और के जीवन की उपयोगिता को लम्बे समय तक नुकसान पहुँचा सकता है। हम यह सब जानते हैं, फिर भी अपने मुँह पर नियन्त्रण रखना हमारे लिए कितना कठिन होता है। कितनी बार हम तब मुँह बन्द करते हैं जब बहुत देर हो चुकी होती है—जब हम पहले ही उसे जरूरत से ज्यादा खोल चुके होते हैं और खुद को या दूसरों को नुकसान पहुँचा चुके होते हैं।

    यदि हम सचमुच अपनी जीभ की असफलताओं के बारे में ईमानदार होते, तो हम एक-दूसरे के प्रति बहुत अधिक सहनशील होते। और परमेश्वर की मदद से हम अपने मुँह की रक्षा करने और विनाशकारी शब्दों को हटाने में और अधिक गम्भीर होते। यह हमारे दोस्तों, परिवार और पड़ोसियों के लिए अनुग्रह का कितना सुन्दर प्रदर्शन होता! यीशु ही एकमात्र सिद्ध व्यक्ति है; उसने अपने शब्दों से कभी पाप नहीं किया (याकूब 3:2)। यदि हम इस पहलू में उसके जैसे बनने का प्रयास करें, तो शायद लोग इस बात पर चकित होंगे कि उसके होंठों से कैसे करुणा, कोमलता और दयालुता से भरे शब्द निकलते थे (लूका 4:22)।

    यद्यपि आपके शब्द और कार्य स्वयं में स्वर्ग के द्वार पर आपके लिए कुछ प्राप्त नहीं कर सकते, फिर भी ये इस बात का प्रमाण हैं कि प्रभु यीशु मसीह में आपके विश्वास की घोषणा सच्ची है। अब ज़रा सोचिए, कैसा लगेगा जब आप इन शब्दों को गम्भीरता से लेना आरम्भ करेंगे: “हर एक मनुष्य सुनने के लिए तत्पर और बोलने में धीर और क्रोध में धीमा हो” (याकूब 1:19)?

      याकूब 3:2-12

    ◊ पूरे वर्ष में सम्पूर्ण बाइबल पढ़ने के लिए: 1 शमूएल 10–12; इफिसियों 5:17-33

    [1] द कम्पलीट वर्क्स ऑफ थॉमस ब्रूक्स  में “दि अनसर्चेबल रिचेस ऑफ क्राईस्ट,” सम्पादक ऐल्क्ज़ेण्डर बालोख़ ग्रोज़ार्ट (जेम्स निकोल, 1866), खण्ड 3, पृ. 178.

    5 min
  • 15 October : प्रार्थनेची योजना करा

    तुम्हीं माझ्यामध्यें राहिलात व माझी वचने तुमच्यामध्यें राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजें ते तुम्हांला प्राप्त होईल. तुम्हीं विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो; आणि तुम्हीं माझे शिष्य व्हाल. . . . माझा आनंद तुमच्यामध्यें असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.” (योहान 15:7-8,11)

    प्रार्थना, या गोष्टीची जाणीव ठेऊन कीं आपल्यां प्रार्थनांच्या उत्तरस्वरूपांत आपण जे फळ देतो त्याद्वारे देवाचा गौरव होतो, येशूबरोबर फळदायक सहभागितेंत असलेल्या आनंदाचा शोध घेते. पण तरी, देवाची मुले आनंद देणाऱ्या ह्या फलदायी प्रार्थनेच्या अखंडित सवयी विकसित करण्यांत वारंवार का अपयशी ठरतात?

    जर मी अति शहाणपण दाखविण्याची चूक करित नसेल, तर याची पुष्कळ कारणें असूं शकतांत आणि त्यांपैकीं एक म्हणजें आपल्याला प्रार्थना करण्यांत रस नसतो असे नाहीं, तर आपण तिची योजना करत नाहीं.

    जर तुम्हांला चार आठवड्यांची सुट्टी घ्यायची असेल, तर तुम्हीं एक दिवस सकाळी-सकाळी उठून असे म्हणत नाहीं, "चला, आज ऑफिसला जाऊया!" त्यासाठीं तुमची तयारी नसते. तुम्हाला कुठे जायचे हे कळणार नाहीं. काहीही नियोजन केलेंलें नसते.

    पण आपल्यांपैकीं बरेच लोक प्रार्थनेला असेच समजतांत. आपण प्रत्येक दिवशी उठतो आणि आपल्यां लक्षात येते कीं अरे, आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग प्रार्थनेची ठराविक वेळ असायला पाहिजे, परंतु प्रार्थना कशाविषयी करावीं यावर आपल्याकडे विषयच नसतो.

    कुठून सुरवात करावी हे आपल्याला माहित नसते. कोणतीही योजना केलेंलीं नसते. ठराविक वेळ नाहीं. ठराविक ठिकाण नाहीं. कुठलाही क्रम नाहीं. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे कीं जेथें योग्य योजना असते तेथें प्रार्थना ही खोल अं:तकरणात उत्स्फूर्त अशा अनुभवांचा एक अद्भुत प्रवाह बनते. जेथें योग्य योजना नसते तेथें त्यांच त्यां जुन्या पुनरावृत्ती असतांत.

    जर तुम्हीं सुट्ट्यांचा आनंद कुठे आणि कसा घ्यावा याची योग्य योजनाच केलीं नाहीं, तर तुम्हीं कदाचित घरी राहून टीव्ही पाहत बसाल. आध्यात्मिक जीवनाच्या ह्या अशा स्वाभाविक आणि अनियोजित सरावामुळें संजीवनाचा स्तर अधिक खालच्या पातळीवर जातो. आम्हांला नेमून दिलेली धाव धावायची आहे आणि एक युद्ध जिंकायचे आहे. जर तुम्हांला तुमच्या प्रार्थनेच्या जीवनांत एक नवे परिवर्तन घडवून आणायचे असेल, तर तुम्हांला ते परिवर्तन मूर्त स्वरूपांत पाहण्यासाठीं तशी योजनाहि करणें आवश्यक आहे.

    म्हणून, मीं तुम्हांला सोप्या भाषेंत उत्तेजन देतो : आपण आजच आपला प्राधान्यक्रम आणि त्या क्रमाशी प्रार्थनेची सांगड कशी बसते यांवर पुनर्विचार करण्यासाठीं वेळ काढूया. आपण काहीं नवनवीन संकल्प करूं. देवाच्या सामर्थ्याने काही नवे पराक्रम करण्याचा प्रयत्न करूं. एक ठराविक वेळ साध्य करूं. एक ठिकाण ठरवू. मार्गदर्शनासाठीं पवित्र शास्त्राचा एक भाग निवडा.

    स्वतःवर व्यस्त दिवसांची जुलमी हुकुमत चालू देऊन कामाच्या दडपणाखाली येऊ नका. आम्हां सर्वांना आपली दिनचर्या सुधारण्याची गरज आहे. आजचा हा दिवस तो दिवस बनूं द्या जेव्हां तुम्हीं प्रार्थनेच्या नित्यक्रमाकडे वळलांत- जेणेंकरून देवाचा गौरव व्हावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.

    4 min
  • 14 October : देव नम्र करून बरे करतो

    “मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन; मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे, त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन. मी त्याच्या तोंडून आभारवचन उच्चारवीन, जे दूर आहेत व जे जवळ आहेत, त्यांना शांती असो, शांती असो; मी त्यांना सुधारीन असे परमेश्वर म्हणतो." (यशया 57:18-19)

    मनुष्य हा त्याची बंडखोरी आणि हट्टीपणा या गंभीर रोगाने ग्रस्त असला तरी, देव त्याला बरे करील. त्याला कसे बरे केलें जाईल? यशया 57:15 सांगते कीं देव ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीं वसतो. असे असले तरी, यशया 57:17 मधील लोक हे कांहीं नम्र लोक नाहींत. ते अभिमानी वृत्तीने निर्लज्जपणें आपापल्या मार्गाचे अनुसरण करित आहेत. तर मग, याचा उपचार कसा केला जाईल?

    उपचाराचा एकच मार्ग असू शकते. देव त्यांना नम्र करून बरे करील. तो त्याचा अभिमान ठेचून त्यां रुग्णाला बरा करील. ज्यांचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे जर असेच लोक देवाच्या वस्तीचा आनंद घेऊं शकतांत (यशया 57:15), आणि जर इस्राएल बंडखोरी आणि हट्टीपणा या गंभीर रोगाने ग्रस्त आहे (यशया 57:17), आणि जर देवा त्यांना बरे करण्याचे अभिवचन देतो (यशया 57:18), तर मग नम्र करणें हा त्याचा उपचार अनुतापयुक्त हृदय हे त्याचे समाधान असणें आवश्यक आहे.

    यिर्मयाने ज्याला नवा करार आणि नव्या हृदयाची देणगी म्हटलें होते त्याच बाबतींत भविष्यवाणी करण्याची ही यशयाची पद्धत नाहीं का? त्यानें म्हटलें, “असे दिवस येत आहेत कीं त्यात इस्राएलाचे घराणें व यहूदाचे घराणें ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन. . . . मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृत्पटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील” (यिर्मया 31:31, 33).

    यशया आणि यिर्मया दोघेही असे दिवस येत असल्याचे दर्शन पाहतात जेव्हा रोगग्रस्त, आज्ञा न मानणारे, व पाषाण हृदयी अशा लोकांची अंतर्यामें अलौकिकरित्या बदलून टाकिलें जातील. यशया बरे होण्याविषयी बोलतो, तर यिर्मया त्यांच्या हृत्पटलावर नियमशास्त्र लिहिले जाण्याविषयी बोलतो. आणि यहेज्केल हेच सत्य अशा शब्दांत मांडतो: “मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायीं नवा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांला मांसमय हृदय देईन” (यहेज्केल 36:26)

    ह्याप्रमाणें यशया 57:18 चे बरे केलें जाणें हे नव्या हृदय प्रत्यारोपणाचे एक प्रमुख कार्य आहे — पाषाण रुपी जुने, गर्विष्ठ, हट्टी हृदय बाहेर काढले जाते, आणि त्या ठिकाणी एक नवें मऊ, कोमल असे मांसाचे हृदय प्रत्यारोपित केलें जाते, एक अशी शस्त्रक्रिया ज्यामध्यें मागील पाप आणि कायमस्वरूपी असे जे पाप ह्याचे स्मरण देऊन ते सहजपणें नम्र आणि अनुतप्त केलें जाते.

    हेंच ते चित्त जेथें तो महाप्रतापी ज्याचे नाव पवित्र आहे सर्वकाळ वस्ती करील.

    4 min