Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
देव व भक्त, सद्गुरू व शिष्य यांच्यातील आत्यंतिक प्रेमाचे, आत्मीयतेचे संबंध प्रकट करणारी ही भक्तिरसपूर्ण ऑडिओ मालिका आहे. माझे सद्गुरू श्री परमानंदस्वामी यांच्या प्रदीर्घ सहवासात मी घडत गेलो अन त्यांचा... more
FAQs about Sudhakar Chodankar:How many episodes does Sudhakar Chodankar have?The podcast currently has 144 episodes available.
May 17, 2024आनंदची अंग आनंदाचे-आनंदची अंग आनंदाचे-पांडुरंगाचे परमभक्त श्री संत तुकाराम महाराजांकडुन त्यांच्या अंत:करणात उद्भवणारा अलौकिक आनंदाचा सहज सुंदर उत्सव म्हणा कल्लोळ म्हणा शब्दातून काहीशा अंशाने प्रकट होत आहे. आनंद हे आनंदाचेच अंग आहे. पूर्णातून पूर्णच उद्भवणार अन पुन्हा पूर्णातच एकरूप होणार असे काहीसे म्हणत असावेत - पाहूया आता ....more23minPlay
May 10, 2024देव आनंदात पाहू -देव आनंदात पाहू - देव दर्शन हे एकांगी असते, पण देव भेटी उभयतांची असते. देव भेटीत केवळ दर्शन नसून मार्गदर्शनही असते. जिथे भक्त किवा शिष्याचा आत्मशोधाचा मार्ग सुरूहोतो अन यालाच भक्ति म्हणतात. असा भक्त देवाला प्रत्यक्ष आनंदात पहातो. देव देवळात मंदिरात तीर्थक्षेत्री पहाता येतो. पण भक्तासाठी देव केवळ हृदयाचाच असतो. तेव्हा भक्त पाहू काय म्हणतो ते - देव आनंदात पाहू ...more20minPlay
May 03, 2024मना संत आनंत शोधुनी पाहेमना संत आनंत शोधुनी पाहे - संतांना शोधायचे म्हणजे त्यांच्या अंतरंगाचा शोध घ्यायचा. तरच आपल्याच स्वताच्या अंतरंगात डोकावणे घडू शकते. आत्मशोध म्हणतात स्वताचा शोध तो हाच. संत जसे ईश्वरी अनुभवाने सदा आनंदी, समाधानी, शांतिपूर्ण असतात तसे आपण होणे हेच तर जीवनाचे प्रयोजन. तेव्हा साधकाचा हा शोध कसा होतो तेच प्रकट झाले आहे या एपिसोडमधून ...more25minPlay
April 26, 2024तेथेच स्फुरते रामायणरामनवमीला अनेकांचे शुभ संदेश आले. अनेकजण जोडून आहेत याचा आनंद होतो आणि या सार्यांचा मी खूप ऋणि आहे या जाणिवेने मी सर्वांचे देणे लागतो असेच वाटते मला. केवळ ईश्वरी प्रेम देणे आणि घेणे यासारखे आनंददायी दुसरे काहीच नाही. " तेथेच स्फुरते रामायण " या एपिसोडमधून हे प्रेमच प्रकट होत आहे....more22minPlay
April 19, 2024देव माझा मी देवाचादेवाचे सारेच आहे. किंबहुना देवच साकार झालाय समग्र अस्तित्वाने. पण या अनुभवाचा मी झालो का? देव माझा झाला का आणि मी एकीएक देवाचाच झालो का या ध्यासाने जेव्हा भक्त सक्रिय होतो तेव्हा तो म्हणतो " देव माझा मी देवाचा " - तेव्हा ऐकू भक्त काय म्हणतो ते -...more24minPlay
April 12, 2024आनंदाचे जीवन झाले तुझ्यामुळेआनंदाचे जीवन झाले तुझ्यामुळे- असे भक्त म्हणतोय. आंतरीक कृतार्थतेतून उद्भवणारी त्याची कृतज्ञता सहजतेने वहात आहे त्याच्या सद्गुरूंच्या , पर्यायाने त्याच्या भगवंताच्या चरणापाशी. आनंदाचे जीवन झाले झाले तुझ्यामुळे - या आनंदाचे मूळ आहे कुठे , फळ आहे कुठे हे प्रकट होतेय त्याच्या ओघवत्या मधाळ वाणीतून- तीच ऐकू आता -...more23minPlay
April 05, 2024परी देव शोधोनी कोणी न पाहेश्री समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात- मनी मानिला देव तो पुजीताहे , परी देव शोधोनी कोणी न पाहे - ते का बरे असे सांगतात ?खरे तर ते साधकाला, भक्ताला, शिष्याला सावध करीत आहेत असेच जाणवते मला. असेच काहीसे प्रकट होत आहे "देव शोधोनी कोणी न पाहे " या एपिसोड मधून -...more24minPlay
April 01, 2024आलासी देवा जीवनीआलासी देवा जीवनी- देव आधी जीवनात यायला हवा तरच आंतरिक बदल शक्य होतो. तरच जीवन आनंदाचे होते. भक्तीचे समृद्धीचे होते. मी देवळातला देव म्हणत नाही, जे दैवत सद्गुरूरूपाने भक्ताच्या जीवनात प्रत्यक्ष येते. विलक्षण सहवासातून हा प्रत्यक्ष देव जेव्हा अप्रत्यक्ष होतो तेव्हा भक्ताच्या ठिकाणी हेच दैवत प्रस्फुटित होत रहाते हीच तर यथार्थ भक्तीची किमया. असेच प्रकट होत आहे " आलासी देवा जिवनी, जगता गोडी कळे " या एपिसोड मधून....more26minPlay
March 19, 2024देवा सोबत की देवा संगे ?देवा सोबत असणे तसे बाह्यांगाचे असते. पण संगे असणे हे बाह्यांगाबरोबर अंतरंगाचेही असते....more27minPlay
March 08, 2024तुला पाहतांनादेवाला भक्त सदैव पाहत असतो. भक्ताचे पहाणे केवळ डोळ्यांचे नसते. केवळ संवेदनांचे नसते, अंतरंगाचे असते. जिथे यथार्थ दृष्टीचा उद्भव होतो. म्हणूनच भक्त गातो "तुला पाहताना, तुझे गीत गातो, तुझे गीत गाता, तुझाची मी होतो" "देवाचा होणे" हीच तर साधकाची आंतरिक प्रक्रिया आहे. भक्ताचे रूपांतरण म्हणतात ते हे. भक्ताला सत् स्वरुपा कडे नेता नेता त्यातच विलीन होते ते संतत्व....असेच काहीसे प्रकट होत आहे या एपिसोड द्वारे .......more24minPlay
FAQs about Sudhakar Chodankar:How many episodes does Sudhakar Chodankar have?The podcast currently has 144 episodes available.