भक्ति तिच जी जगण्याला भान देते. जिवंत सगळेच असतात पण यथार्थाने आनंदाने जगणे घडते का ? हा प्रश्न केवळ भक्तीतूनच उद्भवतो अन जीवन भक्तीचे होता होता भक्त आनंदाचा स्वामी होऊन रहातो. “मी “ म्हणून हा जो कोणी आहे तो मनाचा, शरीराचा बांधील असतो म्हणूनच जगणे आनंदाचे होत नाही. भक्ति याच “मी” ला स्वत्व देते. स्व च्या शोधासाठी ध्यास लावते. तेव्हाच मन, मनाची बुद्धी, विचार, विकार, कल्पना, स्मृति, संस्कार, मान्यता, समजुती आणि या सर्वातून घडणारा आपला स्वभाव अगदी स्पष्ट दिसायला लागतो भक्ताला. तेव्हा कळते, अरे हा जो माझा स्वभाव, जो मी पहातोय तो वेगळा अन मी पहाणारा वेगळा. याचे भान येत जाते. हे भानच जेव्हा सहज अन सतत असते तेव्हाच ती जाणीव होऊन रहाते भक्ताची. आपल्या या मूळ स्व ( स्वरूपाचे ) होत रहातो तो. हेच ते “जाणीवेच्या उगमाकडे”