भक्त म्हणजेच स्व च्या शोधात असलेला साधक जस जसा सावध अन जागृत होत असतो तस तसा तो अधिकाधिक एकांतिक होत रहातो. बहयांगाने जगात वावरतांना दिसतो तो पण त्याचे व्यवधान म्हणा , अवधान म्हणा त्याच्या आंतरिक अस्तित्वाला पहात असेते, काहीसे अलिप्तपणे. याला साक्षीभाव म्हणता येईल. या मुळे मनाच्या ठिकाणी येणारे अन जाणारे विचार , भावना, बहाव, कल्पना, आशा, इच्छा , आठवणी, या सार्यांचे न होता, अलिप्त रहाणे असेच काहीचे त्याचे असणे असते. पर्यायाने तो स्पष्टपणे केवळ वर्तमानातच असतो. त्यामुळे मानसिक भूतकाळ वा भविष्यकाळ त्याच्याठिकाणी नाही पैदा होत. वर्तमान हेच तर जीवन. मी एक व्यक्ति वा एक पर्सन (person) म्हणून असलेली ओळख कमी होत तो एक presense (व्यक्तिनिरपेक्ष ) अस्तित्व म्हणून असतो. अशा जाणिवेतून मनाचे जे खेळ दिसतात, त्याला संबोधून तो म्हणतो " हे दीलें नादाँ " ( हे मना, काय चालले आहे तुझे ?). असे हे भक्ताचे अस्तित्व कसे प्रकट होते ते या एपिसोडमधून पाहू आता.