Sudhakar Chodankar

Sudhakar Chodankar

Download on the App Store

Sudhakar Chodankar episodes

  • नको डोळे भरून पाहुस सावळ्या हरीला –

    अगं राधे, तू डोळे भरून पाहतेस या सावळ्या हरीला तर मग, काजळ

    लावायला डोळ्यात जागाच उरणार नाही ! अशी चिंता राधेच्या सखीला पडली. पण राधा सखीच्या या प्रश्नाला  बेमालूम आंतरिक भक्तीच्या  भरलेपणातून असे काही उत्तर देते की आपण चकित व्हाल
    – तेच ऐकू या एपिसोड मधून

     

    17 min
  • देव रोकडा संत सज्जनी-

    भाविकाला मूर्तितला, तसबीरीतला देव पुरेसा होत असेल, पण भक्ताला मात्र देव प्रत्यक्षाचा लागतो. त्याच्या सारखा हाडा मासाचा. तसबीर, फोटो पाहून निवड करता येते. पण लग्न व्हायचे असेल तर तसबीर नाही पुरेशी. प्रत्यक्ष व्यक्ति हवी. तसा देवही रोकडा हवा.  असा हा रोकडा देव केवळ अन केवळ संत सत्पुरुषांच्या रूपानेच आपलासा होतो. जिथे भक्त पूर्णत्वाला पोचतो. असेच काहीसे प्रकट होत आहे या एपिसोडमधून

    22 min
  • भेट अधूरी राही तरीही-

    मित्रांनो, भक्त प्रकट करतोय आपली व्यथा. देवा, तुझी भेट कितीही

    झाली तरी अपुरीच पडते मला. खरे तर प्रेमात आगतिक झालेल्या आपल्या प्रत्येकाचा हाच अनुभव आहे. भक्त काही अपवाद नाही. परंतु या व्यथेवर देव भक्ताला जे सांगतो ते विलक्षण आहे. ते देवाचे सांगणे (वचन) जेव्हा भक्ताचे जीवन होते तेव्हा अखंड मिलनाचा अनुभव भक्त घेत असतो. तो कसा तेच पाहू ,  या एपिसोड मधून  

    22 min
  • मन मंदीरा तेजाने -

    मनाला मंदिर म्हटले आहे. आपण मंदिर कशाला म्हणतो ? ज्या वास्तूत देवाची प्रतिष्ठापना झाली आहे त्याला. माझ्या मनात देवाची अशी स्थापना झाली आहे का ? तरच मनाला मंदिर म्हणता येईल ना? केवळ स्थापना होणे पुरेसे नाही तर तसे पावित्र्य, तशी सजावट , तशी नित्याची साधना घडते आहे का ? अशाच प्रश्नाचा शोध घेत आहे साधक या एपिसोड मधून-

    21 min
  • नमिला गणपति

    श्री संत एकनाथ महाराजांचा हा अभंग म्हणताना माझ्या कडून नमन

    घडत असते. पण म्हणून झाल्यावर मनात  सारखी खंत येत रहाते. “ नमिला गणपति” म्हणतो मी पण गणपति अजून मिळालाच नाही असे वाटत असते. गणपति अजून लाभलाच नाही मला. असे का होते हेच प्रकट होत आहे या एपिसोड मधून -

    23 min
  • दत्त दत्त ऐसे लागले ध्यान-

    भाविक आणि भक्त यात फरक आहे. भाविक भक्त होईलच असे सांगता येत नाही. तशी संभावना असते. भक्ताचा प्रवास म्हणजे साधकत्व. साधक होणे म्हणजे प्रयोगशील होणे. सद्गुरुवचन जीवनात उतरविण्यासाठी प्रयत्न हाच प्रयोग. यातूनच देव भेटीचा योग घडतो. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान – हे भक्ताचे उद्गार – त्याच्या आंतरिक स्थितीची चाहूल देतात. ही दत्ताची आरती , केवळ शाब्दिक , वा भावनिक त्यावेळेपूर्ती आर्तता नाही तर साधकाचे समग्र जीवन कवेत घेणारी स्थिति आहे असेच प्रगट होत आहे या एपिसोड मधून ..

    22 min
  • बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल-

    श्री संत तुकाराम महाराज सांगत आहेत. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल.

    मला तर जाणवते आहे की साक्षात विठ्ठलच बोलतोय श्री संत तुकाराम महाराजांच्या मुखातून. असे काय बोलतोय तेच ऐकू या एपिसोडमधून “बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव”

    21 min
  • आवडे निरंतर हेचि ध्यान-

    श्री संत  तुकाराम महाराज अगदी आनंदाने सांगत आहेत. आवडे निरंतर हेचि ध्यान. ही त्यांची आवड काही क्षणाची , वेळेची नाही. माझीही आवड निवड असते.  पण आजची आवड उद्या नावड होऊ शकते माझी. इथे तर संत तुकाराम महाराज आवडी निवडीच्या पलीकडे पोचले आहेत. आवडे निरंतर असे म्हणत आहेत ते. आता हे ध्यान कुणाचे ? केवळ मूर्तीचे ?की जिला पहाता पहाता ते अंतरंगातून अखंड ध्यानमग्न झाले. या ध्यानाबद्दल बोलत आहेत की काय ? हेच ऐकू या एपिसोड मधून .

    22 min
  • निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे-

    सगुणाला सगुण भेटणे आपण नेहमी पहातो. निर्गुणाला निर्गुणाची भेट या विषयी बोलताही येत नाही. पण सगुण निर्गुणाला भेटणे हा अलौकिक अनुभव आहे. जो केवळ उत्कट भक्तीतूनच भक्ताला येतो. असाच अनुभव संत गोरा कुंभार यांना सद्गुरू संत नामदेव महाराज यांच्या कृपेने आला. हेच पाहू या एपिसोड मधून.

    निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे-

     

    सगुणाला सगुण भेटणे आपण नेहमी पहातो. निर्गुणाला निर्गुणाची भेट या विषयी बोलताही

    येत नाही. पण सगुण निर्गुणाला भेटणे हा अलौकिक अनुभव आहे. जो केवळ उत्कट भक्तीतूनच
    घडू शकतो. असाच अनुभव संत गोरा कुंभार यांना सद्गुरू संत नामदेव महाराज यांच्या कृपेने
    आला. हेच पाहू या एपिसोड मधून.

    सगुणाला सगुण भेटणे आपण नेहमी पहातो. निर्गुणाला निर्गुणाची भेट या विषयी बोलताही
    येत नाही. पण सगुण निर्गुणाला भेटणे हा अलौकिक अनुभव आहे. जो केवळ उत्कट भक्तीतूनच
    घडू शकतो. असाच अनुभव संत गोरा कुंभार यांना सद्गुरू संत नामदेव महाराज यांच्या कृपेने
    आला. हेच पाहू या एपिसोड मधून.

    22 min
  • मेरे जिंदगीमें हुजूर आप आये

    भगवंत जेव्हा भक्ताच्या अनुभवाचा होतो तेव्हा भक्त कृतार्थ होत असतो. या कृतार्थतेतूनच भक्त नितांत कृतज्ञ रहातो देवाचा. कारण आता देव हा भक्ताच्या जीवनात संचारून असतो. या अशा आंनंदातून तो गातो " बहुत शुक्रिया बडी मेहरबानी , मेरे जिंदगीमे हुजूर आप आये. सर्वांगाने भक्ताचे प्रिय करतो तोच खरा प्रियकर अन भक्त त्याची प्रेयसी - ती गाते या एपिसोडमधून -

    23 min

About Sudhakar Chodankar

From the publisher's feed

देव व भक्त, सद्गुरू व शिष्य यांच्यातील आत्यंतिक प्रेमाचे, आत्मीयतेचे संबंध प्रकट करणारी ही भक्तिरसपूर्ण ऑडिओ मालिका आहे. माझे सद्गुरू श्री परमानंदस्वामी यांच्या प्रदीर्घ सहवासात मी घडत गेलो अन…