इतर रंगांचा राग नाही की हव्यासही नाही. वास्तविक काचेच्या लोलकातून प्रकाशाचा किरण गेला की विविध रंगांची उधळण होते. सार्याच रंगांची उत्पत्ति, स्थिति अन विलय या किरणातच होत असते. ऊर्जा , स्त्रोत, चेतना एकच आहे. अगदी तसेच सार्या अस्तित्वाची उत्पत्ति, स्थिति अन विलय या एकमेव ईश्वरी अस्तित्वातच होत असते. भक्त याच अस्तित्वाचा होऊन रहातो म्हणून तो म्हणतो – एक रंग तुझा खेळे -