Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

By Vechleli PhuleSociety & CultureArtsBooks
Download on the App Store

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast episodes

  • ग्रीष्मातल्या सकाळी | Grishmatalya sakali

    ग्रीष्मातल्या सकाळी

    हे रणरणतं ऊन सगळ्यांच्याच नाकी नऊ आणून सोडतं. नुसती धगधग. पण हेच इतर खूप गमतीजमती सोबत घेऊन येतं. मोगरा, जाई जुईचा दरवळ , आंबे, कोकिळेची गाणी, करवंद, जांभळं..यादी न संपणारी आहे. चला तर मग मजा घेऊया या ग्रीष्म ऋतूची.


    1. ऊन पानात झेलीत

    कवी - नलेश पाटील

    कवितासंग्रह - हिरवं भान

    2. ग्रीष्मातल्या सकाळी

    कवी - पद्मा

    कवितासंग्रह - श्रावणमेघ

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    6 min
  • काळी वर्तुळं | Kaali Vartule

    काळी वर्तुळं

    पृथ्वीचा आकार, पोळी, गोळी, शून्य अश्या असंख्य गोष्टी वर्तुळाकार असतात. किती व्यापले आहे यांनी आपलं आयुष्य. एक वर्तुळच पूर्ण करत खरं तर आपण. चला तर मग फिरुया गोलगोल या काव्यारुपी वर्तुळात.


    1. वर्तुळ

    कवी - मंगेश पाडगांवकर

    कवितासंग्रह - गिरकी


    2. काळी वर्तुळं

    कवी - वलय मुळगुंद

    कवितासंग्रह - एक झाड शब्दांचं

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    7 min
  • तुम्ही व्हॉट्सॲप वर आहात ना? | Tumhi Whatsapp var ahat na?

    तुम्ही व्हॉट्सॲप वर आहात ना?

    ज्यांच्याकडे स्मार्टफोन्स आहेत त्या सगळ्यांकडे व्हॉट्सॲप आहेच. दिवसरात्र एकमेकांशी आपण कॉन्टॅक्ट मध्ये आहोत हे दाखवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. समोर दिसलं तर बोलणार नाहीत पण व्हॉट्सॲप मात्र एकमेकांसाठी जीव देण्याच्या बाता केल्या जातात. खरा संवादच हरवून बसला आहे. चला बघुया या जंजाळाची कथा.


    1. Whatsapp

     कवी - मिलिंद जोशी

    कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही


    2. व्हरच्युली युअर्स

    कवी - वैभव जोशी

    कवितासंग्रह - म्हणजे कसं की...

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    7 min
  • बाईपण : महिला दिन विशेष | Baipan: Mahila Din Vishesh

    बाईपण : महिला दिन विशेष

    एक बाई आयुष्यात असंख्य भूमिका पार पडते. तेही तितक्याच ताकदीने. अनेक संकटांचा सामना करत ती कधी बनते दुर्गा तर कधी लहान मूल. आज २१व्या शतकातही बाईच्या समस्या कमी झालेल्याच नाहीत दुर्दैवाने. पण तिची झुंज मात्र चालू आहे. चला करूया मुजरा या स्त्रीशक्तीस कवितांच्या सोबत.


    1. आता तरी थांब

    कवी - अज्ञात


    2. बाई असते...

    कवी - अशोक बागवे

    कवितासंग्रह - कवितेच्या गावा जावे

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    8 min
  • शोध | Shodh

    शोध

    मला हे सापडत नाहीये, ते मिळत नाहीये, हे कळत नाहीये म्हणून आपण सगळेच काही ना काही शोधतच असतो. कधी गोष्टी सापडतात तर कधी कायमच्या हरवतात. चला तर मग शोधूया काय हरवलंय ते कवितेसोबत.



    1. शोध

    कवी - मंगेश पाडगावकर

    कवितासंग्रह - त्रिवेणी


    2. शोध

    कवी - अशोक बागवे

    कवितासंग्रह - कवितांच्या गावा जावे

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    6 min
  • माय मराठी - मराठी भाषा गौरव दिन विशेष | Maay Marathi - Marathi Bhasha Gaurav Din Special

    माय मराठी - मराठी भाषा गौरव दिन विशेष

    आपली मराठी भाषा अमृताहूनही गोड आहे. याबाबत काही शंकाच नाही. संत तुकाराम असोत किंवा कुसुमाग्रज सगळ्यांनीच या बोलीची थोरवी भरभरून गायली आहे. साहित्य, गाणी, गोडी अश्या अनेक बाबतीत मराठीचं कौतुक करावं तितकं थोडं. चला तर करुया गौरव आपल्या मायबोलीचा.


    1. मराठी

    कवी - श्रीपाद प्रभाकर जोशी

    कवितासंग्रह - चोरकप्पा

    2. माझी मराठी

    कवी - वि. म. कुलकर्णी

    कवितासंग्रह - बालभारती

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    6 min
  • सेल्फ पोर्ट्रेट | Self Portrait

    सेल्फ पोर्ट्रेट

    आपण साऱ्या जगामध्ये उठून दिसावं म्हणून अतोनात प्रयत्न करत असतो जो तो. कधी ती मेहनत फळाला येते तर कधी साफ आपलं माकड होतं. दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतील या विचारात आपण हरवून जातो. आपल्याला काय वाटतं याचा विचार पुरेसा नाही होत. तर चला काढुया सेल्फ पोर्ट्रेट कवितेच्या कुंचल्यातून.


    1. सेल्फ पोर्ट्रेट

    कवी - संदीप खरे

    कवितासंग्रह - मौनाची भाषांतरे


    2. सेल्फ पोर्ट्रेट

    कवी - सौमित्र

    कवितासंग्रह - ... आणि तरीही मी!

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    8 min
  • विपश्यना | Vipasyana

    विपश्यना

    ही गोष्ट आहे जी करणं अवघड पण साध्य झाली तर आयुष्याचा चेहरामोहराच बदलून जातो. स्वतःचा स्वतःशीच संवाद, मग त्यात व्यत्यय आणायला कोणी आणि काहीही नाही. चला तर पाहूया असतं काय हे.


    1. विपश्यना आणि यादव खैरनार

    कवी - सौमित्र

    कवितासंग्रह - बाऊल


    2. विपश्यना

    कवी - संदीप खरे

    कवितासंग्रह - मी अन् माझा आवाज

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    8 min
  • प्रश्न | Prashn

    प्रश्न

    मी काय करू आता पासून मी आयुष्यात कोणती वाट निवडू असे असंख्य प्रश्न आपल्या सर्वांना रोज पडत असतात. त्यांची उत्तरं शोधण्याचा आटोकाट प्रयत्न आपण करत असतो. कधी ती मिळतात तर कधी नाही. काही प्रश्न तर तसेच राहतात पण आपण पुढे जातो. चला तर मग बघुयात प्रश्न.


    1. प्रश्न झाला

    कवी - इंदिरा संत

    कवितासंग्रह - मृगजळ 


    2. प्रश्न

    कवी - वैभव जोशी

    कवितासंग्रह - काळ सरकत राहिला

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    6 min
  • झेंडावंदन | Zendavandan - Republic Day Special

    झेंडावंदन

    आज आपला ७५वा प्रजासत्ताक दिन. आपण काळाच्या खूप पुढे आलो आहोत. पण देश म्हणून, देशवासी म्हणून आपण खरंच किती पुढे आलो. ? जितके आपण करू शकलो या भारतभूसाठी तितके केलं? असे अनेक प्रश्न आपल्याला निरुत्तरित करून सोडतात. बघुया कविवर्य काय मार्गदर्शन करतायत.


    1. हा देश माझा

    कवी - सेनापती बापट

    कवितासंग्रह - बालभारती


    2. झेंडावंदन

    कवी - निरंजन उजगरे

    कवितासंग्रह - कवितेच्या गावा जावे

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    6 min

About Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

From the publisher's feed

Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that…