
Sign up to save your podcasts
Or


देऊळ
मोठ्या भक्तिभावाने आपण देवळात जातो, प्रार्थना करतो. एक वेगळंच समाधान, शांती आपल्याला मिळते. पण या देवळांचाही एक अनोखा बाजार झालेला आजकाल दिसून येतोय. बघुयात देवळांची व्यथा.
1. देऊळ
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - मुखवटे
2. देवळाच्या गाभाऱ्यात
कवी - अरुणा ढेरे
कवितासंग्रह - मंत्राक्षर
#marathipodcast #मराठीकाव्य #मराठीभाषा #maharashtra #marathisahitya #marathisahitya #marathisahitya #कविता #marathipoetry #महाराष्ट्र #मराठी #महाराष्ट्रीयन #मीमराठी #मराठीभाषा #पॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट #मराठीसाहित्य #मराठीकवी #कवी #साहित्य #साहित्यिक
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
तुकोबा
संत तुकाराम हे व्यक्तिमत्त्व किती मोठं. त्यांनी खूप केलं आणि खूप दिलं. आजही त्यांचं कार्य आपल्याला प्रेरणा देत राहतं. चला तर बघुया काय म्हणतायत कवी मंडळी.
1. तुकोबा
कवी - दासू वैद्य
कवितासंग्रह - तूर्तास
2. एक पत्र तुकोबांना
कवी - वसंत बापट
कवितासंग्रह - तेजसी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
संत ज्ञानेश्वर
लहान वयातच मोठ्या मोठ्या पंडितांना चकित करून टाकणाऱ्या, रेड्याच्या मुखी गीता वदवणाऱ्या, गीतेचे सार सर्वसामान्य माणसांसाठी आणणाऱ्या या संताची महती जितकी सांगावी तितकी कमीच. खूप दिलं ,देतायत आणि देतच राहतील. चला तर मग जाऊया ज्ञानबांच्या गावा.
१.ज्ञानदेवी माझी
कवी - बा.भ. बोरकर
कवितासंग्रह - कैवल्याचे झाड
२. कै. ज्ञानेश्र्वर विठ्ठल कुळकर्णी
कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
नववर्ष : याला तयारी पाहिजे
२०२४ च्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. कोणी पार्टीचे, कोणी फिरायचे, तर कोणी कशाचे मनसुबे रचत आहेत. या वर्षापेक्षा पुढचं वर्ष नक्की चांगलं असेल अशी उमेद उरी बाळगूनच आपण पुढं पाऊल टाकणार आहोत. चला तर मग करूया जल्लोषात स्वागत नववर्षाचे.
1. दोन दिवस
कवी - नारायण सुर्वे
कवितासंग्रह - सुर्वे
2. त्याला तयारी पाहिजे
कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - जातक
#marathipodcast #मराठीकाव्य #मराठीभाषा #maharashtra #marathisahitya #marathisahitya #marathisahitya #कविता #marathipoetry #महाराष्ट्र #मराठी #महाराष्ट्रीयन #मीमराठी #मराठीभाषा #पॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट #मराठीसाहित्य #मराठीकवी #कवी #साहित्य #साहित्यिक
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
माणूस म्हणजे
या पृथ्वीतलावर अधिराज्य गाजवणारा एकमेव घटक म्हणजे माणूस. पण चंद्रपर्यंत भरारी मारूनही आपल्याला खरंच माणूस म्हणजे काय कळलं का हे आजही कोडंच आहे. प्रत्येकाचा अनुभव, व्याख्या निराळीच. चला बघुया सुटतंय का कोडं.
1. माणूस म्हणजे
कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण
2. माणूस
कवी - राम मोरे
कवितासंग्रह - बालभारती
#marathipodcast #मराठीकाव्य #मराठीभाषा #maharashtra #marathisahitya #marathisahitya #marathisahitya #कविता #marathipoetry #महाराष्ट्र #मराठी #महाराष्ट्रीयन #मीमराठी #मराठीभाषा #पॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट #मराठीसाहित्य #मराठीकवी #कवी #साहित्य #साहित्यिक
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
थेंब
एखाद्या थेंबाचे महत्व जेव्हा तो खूप मौल्यवान गोष्टीचा असेल तरच खूप वाटतं. मग भले तो महागड्या अत्तराचा असेल किंवा कुठल्या धातूचा असेल. पण तो एक एक ना थेंब असतो म्हणूनच तर सागर बनतो. प्रत्येक थेंबाचे योगदान हे असतंच. चला तर मग कवितरूपी पावसातून काही थेंब झेलुयात.
1. थेंब
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - जिप्सी
2. थेंब
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
माहेराची वाट
विवाहित स्त्रिया असोत किंवा कामानिमित्त बाहेर राहणारी मुले मुली असोत ' माहेर ' सगळ्यांनाच लागू पडतं. ते गोड घर, प्रेमळ माणसं, अमूल्य असंख्य आठवणी यांची शिदोरी तर तिथे असतेच. पण एक वेगळाच विसावा मनाला अन् तनाला तिथे मिळतो सगळ्यांना. चला तर मग रमुया परत एकदा माहेरच्या आठवणीत.
1. माहेराची वाट
कवी - बहिणाबाई चौधरी
कवितासंग्रह - बहिणाबाईंच्या कविता
2. माहेर
कवी - ग दि माडगूळकर
कवितासंग्रह - पुरिया
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
पेपर : चहाचा सोबती
सकाळी आपल्या सर्वांच्याच दिवसाची सुरुवात वर्तमानपत्राने होते. तो आपल्या चहा - नाश्त्याचा सोबतीच असतो. घरबसल्या आपण त्याच्यासोबत जगाची सफर करून येतो. कधी उसासे देतो, कधी टाळ्या पिटतो तर कधी नवीन गोष्टी शिकतो. असा हा पेपर कुटुंबातल्या प्रत्येकाचा लाडका असतो पण वेगवेगळ्या कारणांसाठी. चला तर काव्य पक्तींतून बघुया पेपर काय म्हणतोय ते.
1. थेंब
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - जिप्सी
2. थेंब
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
लग्न म्हणजे काय?
सप्तपदी करून दोन व्यक्ती एकमेकांचा हात हातात धरून जीवनभर एकमेकांना साथ देण्याचं वचन देतात. एक अनोख्या मोठ्या प्रवासाला त्यांची सुरुवात होते. खूप मोठा सोहळा केला काय किंवा नाही केला काय हा प्रवास त्या दोघांनाच न डगमगता , एकमेकांना समजून घेऊन पार करायचा असतो. तो जितका सुंदर वाटतो तितकाच तो खडतर असतो. चला तर बघुया हा सोहळा कवितेच्या माध्यमातून.
1. लग्न म्हणजे काय असतं
कवी - रोहिणी रणदिवे
2. सप्तपदी
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
सुंदरता
आकाश, नद्या, झाडं, फुलं, पक्षी असे निसर्गाचे असंख्य घटक सौंदर्य म्हणजे काय हे आपल्याला शिकवत राहतात. सुंदरता पाहणाऱ्याच्या नजरेत असते. एखादं भग्न मंदिरही कोणाला मोहिनी घालू शकतं तर कोणाला प्राजक्ताचा सडाही सुंदर नाही वाटू शकत. नीट पाहिलं तर हे विश्व इतकं सुंदर आहे ना की आपल्या डोळ्याचे नुसते पारणे फिटेल. चला तर बघुया काय काय सुंदर आहे ते.
1. सुंदरता
कवी - ना घ देशपांडे
कवितासंग्रह - शीळ
2. सुंदरतेची भेट
कवी - विजया वाड
कवितासंग्रह - बालभारती
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
From the publisher's feed
Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that…
'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत.
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.