
Sign up to save your podcasts
Or


साऱ्याच पायवाटा
डोंगर - दऱ्यातून आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या या पायवाटा. छोट्या पण तितक्याच महत्वाच्या. आपल्याला इच्छित ठिकाणी पोचविण्याचा मार्ग सोप्या करणाऱ्या या पायवाटा खूप भारी असतात.चालुयात या पायवाटांवरती कवितेची साथ घेऊन.
1. पायवाट
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन
2. साऱ्याच पायवाटा
कवी - शांता शेळके
कवितासंग्रह - गोंदण
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
बाहुली
गोड - गोड दिसणाऱ्या, आपली सखी सवंगडी असणाऱ्या, लहानपणी आपलं सगळं ऐकून घेणाऱ्या या बाहुल्या. त्या असतात नेहमीच तिथं. फक्त आपण दूर गेलो असतो. उगाच कोणत्यातरी आविर्भावात जगत राहून आपलं स्वत्व हरवून बसतो. चला तर मग जाऊयात या मजेशीर दुनियेत परत.
1. बाहुली
कवी - रजनी परूळेकर
कवितासंग्रह - स्वीकार
2. बाहुल्या
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - बाहुल्या
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
अजून उशीर झालेला नाही
पर्यावरणाचा समतोल ढासलळा आहे हे आपण गेली कित्येक वर्षं पाहतो आहोत. त्याचे दुष्परिणाम दरवर्षी वाढतच चालले आहोत. म्हणून आपण हातावर हात धरून बसून चालणार नाही. आशेवर सारं जग चालतं. आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या परीने प्रयत्न केले तर परिस्थिती नक्कीच बदलेल आणि हे विश्व परत सुंदर होईल. चला तर मग लागुया तयारीला कारण अजून उशीर नाही झालेला.
1. अंतिम स्फोट
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - पाथेय
2. अजून उशीर झालेला नाही
कवी - अरुणा ढेरे
कवितासंग्रह - जावे जन्माकडे
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
दर्शन
आपल्या सर्वांच्याच लाडक्या देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण खूप धडपड करतो. भरपूर प्रवास करतो, ताटकळत रांगेमध्ये उभे राहतो, उन्हातान्हात चालतो. का? तर फक्त त्या विधात्याची एक झलक पाहायला मिळावी म्हणून. पण दर्शन काय फक्त देवलायामध्येच होतं का? याचं उत्तर पाहूया काव्यारुपात.
1. दर्शन
कवी - संदीप खरे
कवितासंग्रह - मी आणि माझा आवाज
2. दर्शन
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - जिप्सी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
साडे तीन मुहूर्तापैकी एक असा हा सोनेरी सण. याची सुरुवात घटस्थापना करून होते. खूप उत्साहाने नवरात्र साजरी केली जाते. आदिशक्तीची वेगळी रुपे, त्याचं महत्व, त्याचा अनुभव घेणं हे प्रचंड भारी असतं. चला तर सोनं बनुया, सोनं लुटुया कवितेच्या खजिन्यासोबत.
1. नवरंगांची उधळण
कवी - उमा पाटील
2. दसरा
कवी - गोविंदाग्रज
कवितासंग्रह - पिंपळपान
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
खिडकीशी बसून
लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच खिडकी प्रिय असते.ती आणते वाऱ्याची झुळूक, पावसाचे थेंब, सोनेरी किरणे आणि सुंदर करून टाकते आजुबाजूच जग. खिडकीत बसून आपण स्वप्न रंगवतो, दुनिया पाहतो, स्वतःशीच गप्पा मारतो. चला तर मग उघडूयात खिडकीची दारे कवितेच्या दारातून.
1. खिडकीशी बसून
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम
2. खिडकी
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - मुखवटे
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
घर कौलारू
सर्वांना विसावा ,ऊब आणि प्रेम देणारं घर. प्रत्येकालाच आपलं घर प्रिय असतं. त्या फक्त भिंती नसतात, तिथं आपलं बालपण, गोड आठवणी आणि असंख्य आवडत्या गोष्टी असतात. जगातला कोणताच महाल आपल्या घराची जागा घेऊ नाही शकत. चला तर मारुया फेरफटका घराकडे कवितांसोबत.
1. घर कौलारू
कवी - अनिल भारती
2. घर
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - रंगबावरी
#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
वर्तमान
आपल्यातले किती जण वर्तमानात जगतात? आपण एक तर भूतकाळात जाऊन स्वतःला आणि झालेल्या गोष्टींना दोष देत बसलो असतो किंवा उद्याच्या भविष्याची रंगीत स्वप्नं रेखाटत गुंग झालो असतो. पण जे होऊन गेलं त्याचा विचार हा व्यर्थ आणि जे व्हावं असं वाटतंय त्याबद्दल आज काम करावं लागेल. पण आपण हे पुरते विसरतो. चला या आता या वर्तमानात जगूया
1. वर्तमान
कवी - प्रकाश खोटे
कवितासंग्रह - साधना
2. वर्तमान
कवी - संदीप खरे
कवितासंग्रह - मौनांची भाषांतरे
#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
जन्मदिवस
या पृथ्वीतलावर आपण जेव्हा आलो तो खास दिवस,आपला वाढदिवस. केक, फुगे, औक्षण, थोरांचे आशीर्वाद अन् खूप सारं प्रेम यांनी भरलेला हा दिवस. यामुळेच तर आपल्याला हे सुंदर जग बघण्याची अन् आयुष्य जगण्याची सुवर्णसंधी मिळते. त्यामुळे या दिवशी जितकं नाचावं , गावं, कृतज्ञता व्यक्त करावी ती थोडीच. तर मग स्विकार करा कवितांची ही अमूल्य भेट तुमच्या खास दिवसासाठी.
1. जन्मदिवस
कवी - अमोल शिंगणे
2. औक्षण
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - बाहुल्या
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
भिंत
भिंती किती प्रकारच्या असतात ना. काही भिंती उभारून नवीन जग बनवता येतं, तर काही भिंती उभारून असलेलं जग विभागलं जातं. काही भिंती निधड्या छातीने आपलं रक्षण करतात तर काही भिंती लोकांच्या मनामध्ये फूट पाडून शांतीचं भक्षण करतात. त्यांच्या पल्याड काही छानही असेल याची वेडी आशा दाखवतात पण कधी त्यांच्या निगरगट्ट स्वभावाने मनं तोडतात. बघुयात या भिंतीमुळे मनाची घरे कशी पडतात आणि उभी राहतात.
1. भिंती
कवी - प्रकाश खोटे
कवितासंग्रह - साधना
2. जेव्हा भिंती स्तब्ध होतात
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
From the publisher's feed
Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that…
'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत.
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.