Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

By Vechleli PhuleSociety & CultureArtsBooks
Download on the App Store

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast episodes

  • डेरिंग-फिरिंग | Daring-Pheering

    डेरिंग-फिरिंग

    मानव जातीने कितीही प्रगती केली असली तरी ती आपल्याला मिळालेल्या निसर्गाच्या साथीमुळे. एखादा सिनेमा पाहिला की आपल्याला वाटतं मी पण असाच या नायकासारखं जग बदलवून टाकेन. पण आपलं आयुष्य आपल्या घर - ऑफिस या वर्तुळापर्यंतच मर्यादित राहातं. मग कुठलं जग बदलणार. आपल्या प्रगतीचा झेंडा गर्वाने मिरवणाऱ्या या मनुष्य प्राण्याने हे विसरू नये की तो या विश्वाची निर्मिती आहे. बघुयात कवी मंडळी कसं जागं करतायत आपल्याला.



    1. पुस्तकांचे कौतुक

    कवी - ओम कंटाळे


    2. ग्रंथ आमुचे साथी

    कवी - मंगेश पाडगावकर

    कवितासंग्रह - नवा दिवस

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    8 min
  • कविता | Kavita

    कविता

    तिच्या फक्त २ ओळींनी हसवणारी, प्रेरणा देणारी ही कविता. किती श्रेष्ठ असते. पण तिला समजणं, कागदरुपी जाळ्यात पकडणं तितकच कठीण काम. पण ती जेव्हा येते तेव्हा नुसती बहार आणते. चला तर मग कवितेच्या गावांत कवितांच्या नावेतून.


    1. कविता 1

    कवी - संदीप खरे

    कवितासंग्रह - मौनाची भाषांतरे


    2. कविता

    कवी - मिलिंद जोशी

    कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही..

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    7 min
  • तू सुखकर्ता - गणेश चतुर्थी विशेष | Tu Sukhkarta - Ganesh Chaturthi Special

    बाप्पा मोरया

    आपल्या सर्वांचं अत्यंत लाडकं दैवत - गणपती बाप्पा. तो आला की सगळीकडे नुसता उत्साहाला उधाण येते. आरत्या, आरास, मोदकाचा नैवेद्य यांनी वातावरण मंगलमय होऊन जाते. त्याच्या आगमनाने जणू आपल्याला एक मित्र भेटायला आल्यासारखं वाटतं. तो बुध्दीचा देवता, विघ्नहर्ता अन् सुखकर्ता तर आहेच. पण तो नक्कीच एक जादूगार आहे असं मला वाटतं. त्याच्या फक्त आगमनाने आपल्याला संकटांचा सामना करण्याचं धैर्य मिळतं. चला तर मग जल्लोषात स्वागत करूया मोरयाचं कवितांच्या ढोल ताशांच्या गजरात.


    १.गणेशा, ये आम्हा उध्दरू

    कवी - शांता शेळके

    कवितासंग्रह - कळ्यांचे दिवस फुलांच्या राती


    2. तेजोमया, हे चिन्मया

    कवी - मंगेश पाडगावकर

    कवितासंग्रह - सूर आनंदघन

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    6 min
  • आशा उद्याची | Asha Udyachi

    आशा उद्याची

    वादळं नेहमीच येत असतात आपल्या आयुष्यात. आपण सगळी उमेद हरवून बसतो. पण आशेचा हात धरून आपण एक एक पाऊल टाकत जातो. मग दिसते ती सुंदर सोनेरी सकाळ. आशेच्या जोरावरच आजपर्यंत मानवाने इतकी प्रगती केली आहे. या आशेची कास धरूया कवितांच्या पक्तींतून.


    1. जिवलगा, खिन्नता का ही?

    कवी - सुधीर मोघे

    कवितासंग्रह - आरसपानी


    2. आशा

    कवी - कुसुमाग्रज

    कवितासंग्रह - मुक्तायन

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    8 min
  • पुस्तकांची किमया | Pustakanchi Kimya

    पुस्तकांची किमया

    पुस्तकं काळी - पांढरी, अबोल पण बोलकी, निर्जीव पण तितकीच सजीव, छोटी पण तितकीच महान. आपल्या पानातून वेगळ्याच दुनियेत नेऊन सोडतात. खूप लोकांशी संपर्क येतो, आपल्याला आयुष्याचे धडे मिळतात. अनेक न पाहिलेले प्रसंग आपण परत जगतो. अशी जादूमय असतात ही पुस्तकं. भरुभरून आनंद, प्रेरणा, ज्ञान देतात. चला तर मग स्वार होऊयात पुस्तकांच्या जगात कवितेच्या विमानातून.


    1. पुस्तकांचे कौतुक

    कवी - ओम कंटाळे


    2. ग्रंथ आमुचे साथी

    कवी - मंगेश पाडगावकर

    कवितासंग्रह - नवा दिवस

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    7 min
  • जिप्सी | Gypsy

    जिप्सी

    जगरहाटीची फिकीर न करता पायाची भिंगरी करुन फिरणारे हे भटके. त्यांना कोणतीही बंधनं नसतात. येईल तो दिवस आनंद अन् कुतूहल यांनी भरलेला ठेवतात. कशाचीच त्यांना भीती नसते. एक वेड मनाशी घेऊन ते फक्त फिरत राहतात. बघूया निदान काव्याचं जाळं तरी अडवू शकतं या जिप्सीना.



    1. जिप्सी

    कवी - मंगेश पाडगावकर

    कवितासंग्रह -जिप्सी


    2. जिप्सी

    कवी - शशी डंभारे

    कवितासंग्रह - प्रिय मित्रास

    #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    9 min
  • मनमोहन श्रावणघन | Manmohan Shravanghan

    मनमोहन श्रावणघन

    हिरव्यागार धरतीने नटलेला, इंद्रधनुष्याच्या रंगांनी सजलेला, आणि मृदगंधाच्या अत्तराने बहरलेला श्रावण. हा महिना धरतीसोबतच आपल्या मनालाही न्हाऊ घालतो. सगळं जग कसं नवीन चित्तवेधक रूप धारण करतं.सणांची अन् गोडधोडाची रेलचेल, पाऊस ऊनाचा खेळ, पावसाची गाणी, चहा भजी यांनी तर नुसती धमाल येते आयुष्यात. असा हा मनमोहक श्रावण बघुयात कवितेच्या वर्षावातून.


    1. श्रावणाचा पारिजात

    कवी - इंदिरा संत

    कवितासंग्रह - निराकार


    2. मनमोहन श्रावणघन

    कवी - मंगेश पाडगावकर

    कवितासंग्रह - पाउसगाणी

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    6 min
  • रेशीम धागा - रक्षाबंधन विशेष | Reshim Dhaga - Rakshabandhan Vishesh

    रेशीम धागा | रक्षाबंधन विशेष

    भावाबहिणींच्या नात्याचा गोडवा साजरा करण्यासाठीचा खास सण. हा रेशीम धागा बांधून ठेवतो मनाचेही घट्ट धागे घट्ट अन् हो मिठाईचा डब्बाही राहत नाही मागे. प्रसंगी एकमेकांवर भांडताना तुटून पडणारे ही दोघंजणं तितक्याच खंबीरपणे उभी राहतात प्रसंगी. चला तर मग राखीपौर्णिमा साजरी करूया कवितेच्या गोडव्यासोबत.


    1.राखी पोर्णिमा

    कवी : प्रा.विजय पोहनेरकर


    2. बालपणाचे गाव

    कवी : प्रभाती बेनाडे

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    8 min
  • आयुष्याचा ग्रंथ | Ayushyacha granth

    आयुष्याचा ग्रंथ

    एक एक पान या ग्रंथाचं आपण रोज वाचतो. कधी - कधी लिहायलाही बघतो. आपले अनुभव, काही व्यक्ती, प्रसंग त्यात भर टाकतात आणि आपण त्या परीने भर टाकत राहतो त्या ग्रंथात. पण तो ग्रंथ सर्वतो परी सुंदर व्हावा म्हणून किती प्रयत्न करतो आपण. बघूया काही क्लृप्त्या कवितेच्या ओळीमधून.


    1. आयुष्याच्या पायापाशी

    कवी - संदीप खरे

    कवितासंग्रह - नेणिवेची अक्षरे


    2. आयुष्याचा ग्रंथ

    कवी - वि स खांडेकर

    कवितासंग्रह - वि स खांडेकरांच्या कविता

    #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    7 min
  • नदीकिनारी | Nadikinari

    नदीकिनारी

    नदी कोणाला प्रिय नाही?.गंगा, यमुना, सरस्वती यांनी फक्त नदीकाठच नाही तर सुकलेल्या मनाचे कोपरेही त्यांच्या वाहत्या पाण्याने नुसते हिरवेगार करून टाकले आहेत. या नद्या निसर्गाला रूप आणतात, सर्व जीवांना पोसतात. फक्त प्रवाहासोबत वाहत राहिल्याने आपण कसे निर्मळ राहतो हा धडा शिकवत राहतात. चला तर मग बसुया नदीकिनारी आणि विसरून जाऊयात चिंता सारी.


    1. नदीकाठ

    कवी - ना धों महानोर

    कवितासंग्रह - पक्ष्यांचे लक्ष थवे 


    2. नदीकिनारी

    कवी - कुसुमाग्रज

    कवितासंग्रह - विशाखा

    #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    6 min

About Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

From the publisher's feed

Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that…