Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

By Vechleli PhuleSociety & CultureArtsBooks
Download on the App Store

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast episodes

  • देव्हारा |Devhara

    देव्हारा

    घरातला, मनातला असा आल्हाददायक कोपरा जो खूप काही देतो, आणि खूप काही घेतो आपल्या काळज्या, मागण्या, प्रार्थना. धूपदीप, फुलं आणि आपली श्रध्दा अशा गोष्टींनी सजलेला देव्हारा जगात कुठंही असू शकतो. एखाद्या जागेत, एखाद्या माणसात, एखाद्या दगडात सुद्धा. पाहुयात कवितारुपी माळांनी देव्हारा कसा सजवला आहे ते.


    1. देवदेव्हारा मांडला

    कवी - इंदिरा संत

    कवितासंग्रह - बाहुल्या


    2. देव्हारा

    कवी - कुसुमाग्रज

    कवितासंग्रह - मराठी माती

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    6 min
  • कवी कोण? | Kavi kon

    कवी कोण?

    आपणा सर्वांना त्यांच्या काव्य प्रतिभेने आनंद आणि जीवनाचं सूत्र सांगणारे हे कवी. अगदी उजेडापासून ते अंधारापर्यंत कोणतीही गोष्ट यांच्या काव्यजाळात अडकली नाहीये असं झालं नाहीये. जगातल्या सगळ्या भाषांमध्ये कविता रचल्या गेल्या आणि त्यांनी नेहमीच सर्वांना प्रसन्नता दिली. पाहुयात कविंबद्दल कविलोक काय म्हणतायत.


    1 सृष्टी आणि कवी

    कवी - केशवसुत

    कवितासंग्रह - समग्र केशवसुत


    2. कवी कोण?

    कवी - बा भ बोरकर

    कवितासंग्रह - प्रतिभा

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    8 min
  • लोक काय म्हणतील | Lok kaay mhantil

    लोक काय म्हणतील

    रोज वावरताना आपण चार चौघात बरोबर वाटू असंच आपण वागत राहतो. अगदी आयुष्यभर. खूप इच्छांना मुरड घालत बसतो. समाजाच्या चौकटीत बसण्याची धडपड करत असतो नेहमी. त्यामुळे खूप वेगळं काही करायची इच्छा असूनही ते न केल्यामुळे शेवटी फक्त पश्चात्ताप उरतो. बघुयात काय काय आहेत अश्या गोष्टी कविवर्यांच्या सोबत.


    1. पण .. लोक काय म्हणतील

    कवी - गुरू ठाकूर


    2. जन पळभर म्हणतील हाय हाय

    कवी - भा रा तांबे

    कवितासंग्रह - भा रा तांबे याची समग्र कविता

    #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    6 min
  • निसर्ग | Nisarg

    निसर्ग

    सूर्योदय, खळखळ वाहणारे धबधबे, चांदण्यांनी भरलेले आकाश अश्या असंख्य मनोवेधक दृश्यांची उधळण निसर्ग आपल्यावर नेहमी करत असतो. ह्या गोष्टी फक्त डोळ्यांनाच नाही तर मनाला प्रसन्न करून टाकतात. निसर्ग आपल्याला जगायला लागणाऱ्या आणि जीवनाचा आनंद घ्यावा अश्या नेहमीच मुबलक प्रमाणात देत असतो. चला हरवून जाऊयात या रंगांमध्ये कवितांच्या सहवासात.


    1. निसर्ग

    कवी - श्रीपाद प्रभाकर जोशी

    कवितासंग्रह - चोरकप्पा


    2. निसर्ग

    कवी - शांता ज शेळके

    कवितासंग्रह - वर्षा

    #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    10 min
  • आठवणी | Athavani

    आठवणी

    बालपण, शाळा, कॉलेज मग नोकरी या आयुष्याच्या प्रवासात असंख्य आठवणी आपण मनाच्या कोपऱ्यात साठवत असतो. काही गोड, काही कटू पण त्यांच्या सोबत आपण काही क्षण पुन्हा जगतो. त्या आपल्याला खूप लोकांशी, घटनांशी जोडायला मदत करतात. चला तर हरवून जाऊयात आठवणीच्या गावी.



    1. आठवण

    कवी - बी

    कवितासंग्रह - फुलांची ओंजळ


    2. तुझी आठवण

    कवी - वैभव जोशी

    कवितासंग्रह - मी..वगैरे..

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    6 min
  • विठ्ठल विठ्ठल |Vitthal Vitthal

    विठ्ठल विठ्ठल

    हा नाद मनात, जीभेवर ठेऊन अख्खी मांदियाळी पंढरीकडे वाटचाल दरवर्षी तितक्याच उत्साहाने करते. कित्येकांना त्यांची माऊली, त्यांचा सखा, पाठीराखा विठ्ठलामध्ये सापडतो. भक्त्यांच्या वेड्या मायेपुढे तर तो हतबल आहेच पण काव्यारुपी मायाजळात तर तो गेली कित्येक वर्षे प्रेमाने अडकून आहे. चला तर मग विठोबाची महती आज कवितेच्या संगतीने ऐकू.

    १. पांडुरंग

    कवी - बा.भ. बोरकर

    कवितासंग्रह - चिन्मयी

    २. विठाई

    कवी - वलय मूळगुंद

    कवितासंग्रह - एक झाड शब्दांचं

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    6 min
  • जुई | Jui

    जुई

    आपल्या सुगंधाने भारून टाकणारे ते जुईचे नाजूक फुल. त्याच्या प्रेमात कोणी पडणार असं होऊच शकत नाही. चांदण्याप्रमाणे दिसणारी ही सुंदर गोड फुलं कवितेच्या माळेमध्ये काय बहार आणतात ते पाहूया.


    1.जुई

    कवी - अनिल

    कवितासंग्रह - दशपदी


    2. फुलांचे भांडण

    कवी - दा वि फफे

    कवितासंग्रह - आठवणीतल्या कविता 3

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    9 min
  • झंझावात | Jhanjhavaat

    झंझावात

    एखादा झंझावात पूर्ण आयुष्याचं चित्रच बदलून टाकतो. काहीवेळा तो आपल्याला आपल्या प्रतिभेची ओळख करून देतो. नवीन गोष्टींची कल्पना अचानक होते. कधी - कधी स्वतःलाच झंझावात बनून जीवनाला आव्हान द्यावं लागतं. बघूया कसा सामना करतात या वादळाचा कविवर्य.


    1. झंझावात

    कवी - सुरेश भट

    कवितासंग्रह - एल्गार


    2. झंझावात

    कवी - इंदिरा संत

    कवितासंग्रह - शेला

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    7 min
  • बाप | Baap

    बाप

    अख्ख्या घरासाठी रात्रंदिवस राबणारा तो बाप. त्यांच्या भावना, समस्या ते सहसा बोलून दाखवत नाहीत. लढत राहतात जगाशी सर्वांच्या सुखासाठी. आपला भक्कम आधार असणाऱ्या अश्या या आपल्या लाडक्या बाबांविषयी काय म्हणतायत कविवर्य.


    1. माझी कन्या

    कवी - बी

    कवितासंग्रह - फुलांची ओंजळ


    2. बाप

    कवी - इंद्रजीत भालेराव

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    10 min
  • शाळा | Shala

    शाळा

    आपल्या सर्वांच्या आयुष्यातला सुवर्णकाळ. वर्ग, मित्र, शिक्षक, पुस्तकं, शिक्षा, मैदान या गोष्टींनी किती दिलंय आपल्याला. आपल्याला फक्त पुस्तकातलेच नाही तर जीवनाचे पण धडे शिकवले या शाळेने. तिचं ऋण आपण कधीच फेडू नाही शकणार. बघूया कवितेच्या शब्दात शाळेची गोडवी जिथं आपण हे शब्द बनवायला शिकलो.


    1. शाळेचा रस्ता

    कवी - ना गं लिमये


    2. शाळा

    कवी - श्रीपाद प्रभाकर जोशी

    कवितासंग्रह - चोरकप्पा

    #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    7 min

About Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

From the publisher's feed

Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that…