
Sign up to save your podcasts
Or


सर्वांना आवडणारी चित्रं. त्यांच्या रंगांच्या, छटांच्या आपण प्रेमात पडतो. कोणी कागदावर तर कोणी मनात पण चित्रं सगळेच काढतात. रोज वेगवेगळे घटक, रंग त्याचा भाग बनत राहतात. चला तर मग कवितेच्या शब्दांनी सजवलेलं चित्र पाहायला.
1. हे चित्र
कवी - शंकर वैद्य
2. हाय काय न्हाय काय
कवी - वैभव जोशी
कवितासंग्रह - मी वगैरे
3 . चित्र
कवी - शांता शेळके
कवितासंग्रह - पूर्वसंध्या
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
धगधगत्या उन्हापासून जीवाला गारवा देणारी सावली. अशी ही हवीशी वाटणारी सावली रात्री आपल्याला नकोशी वाटते. तिची रूपं बदलतात. हरवून जाऊयात कवितांच्या सावल्यांत.
1. सावली
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मारवा
2. सावली
कवी - वि स खांडेकर
कवितासंग्रह - वि स खांडेकरांच्या कविता
3 . सावली
कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
शिवरायांचे शौर्य,सह्याद्रीचे सौंदर्य आणि पंढरीच्या माऊलीने पावन केलेला आपलं राज्य. अभिमानाने छाती फुलून यावी असा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभला आहे. ही गौरवपताका नेहमीच अशी महाराष्ट्रावर फडकत राहो. साजरी करूया महती आपल्या लाडक्या महाराष्ट्राची.
1. महाराष्ट्र गीत
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मारवा
2. महाराष्ट्र-गीत
कवी - माधव ज्युलियन
कवितासंग्रह - स्वप्नलहरी
3. नवा महाराष्ट्र
कवी - यशवंत
कवितासंग्रह - कमंडलू
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
पाण्यामुळे ही सृष्टी जिवंत आहे. ते आहे तर आपण आहोत. त्याचा निखळ प्रवाह, मुबलकता समृध्दी आणते. पाणी अत्यंत कमी होत चाललंय. त्याचं महत्व ओळखून आपण जागरूकतेने वागायला हवे. बघूया या जीवन देणाऱ्या पंचमहाभूताबद्दल काय म्हणतायत कवी मंडळी.
1. पाणी
कवी - श्रीपाद प्रभाकर जोशी
कवितासंग्रह - चोरकप्पा
2. पाणी...पाणी...
कवी- इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम
3. पाणी
कवितासंग्रह - दिवेलागण
कवी - आरतीप्रभू
4. पाणी
कवी ना धों महानोर
कवितासंग्रह पक्ष्यांचे लक्ष थवे
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
वासुदेव, गारुडी, सारंगीवाला, विदूषक ही व्यक्तिमत्वं अचाट असतात. त्यांच्या कलागुणांनी आपल्याला भारून टाकतात. लहानथोरापासून सर्वांनाच त्यांचं कौतुक वाटतं. बघूया कविवर्य यांची महती कशी कवितेत बांधतायत.
1. चिमणा वासुदेव
कवी के नारखेडे
कवितासंग्रह आठवणीतल्या कविता भाग 3
2. सारंगीवाला
कवी - यशवंत
कवितासंग्रह - पाणपोई
3. गारुडी
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - मुखवटे
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
आपला आवाज हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. त्यातून आपण कोणाला उमेद देऊ शकतो तर कोणाला उमेद हरवून बसण्याची वेळही आणू शकतो. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला म्हणून जगभरात विविध क्रांत्या घडून आल्या. बघूया कवितांचा आवाज आज कवींच्या शब्दरुपी माध्यमातून.
1. मुक्या माझ्या व्यथा कथा
कवी - बा भ बोरकर
कवितासंग्रह - चित्रवीणा
2. मी अन माझा आवाज
कवी - संदीप खरे
कवितासंग्रह - मी अन माझा आवाज
3. ताजा उष्ण आवाज
कवी - अरुणा ढेरे
कवितासंग्रह - मंत्राक्षर
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
सूर्याच्या प्रकाशाने अख्खी धरती उजळून निघते. तो आपल्याला जीवन तर देतोच पण रोज नवीन आशा देतो. या सुवर्णयज्ञावर काय कवितेचा प्रकाश टाकलाय बघूया कवी मंडळींनी.
1. अरूण
कवी बालकवी
कवितासंग्रह फुलराणी
2. सूर्य
कवी कुसुमाग्रज
कवितासंग्रह छंदोमयी
3. अर्घ्य
कवी अनिल
कवितासंग्रह सांगाती
4. सूर्य
कवी सुधीर मोघे
कवितासंग्रह आत्मरंग
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
आपल्याकडे किती पदार्थांची रेलचेल असते ना. तोच पदार्थ किती वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. ह्या गोष्टी आपल्याला किती सुखावून जातात. मज्जा आणतात जीवनात. चला तर मग मारुयात ताव कवितांचा आस्वाद घेऊन.
1. काय वाढले पानावरती
कवी - ग दि माडगूळकर
2. मोदक
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - मुखवटे
3. गुलाबजाम
कवी - अरुण साळगावकर
4. वडापाव
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
माणसांनी अख्ख्या पृथ्वीला आपल्या इच्छेनुसार बदललय. खूप गोष्टींचा शोध लावला. बोटे तोंडात घालायला लावेल अशी प्रगती केली. पण माणूस म्हणून आपण खरंच पुढं गेलोय का. का हरवून बसलोय माणूसपणाला. चला बघूया या मनुष्य प्राण्याविषयी काय विचार आहेत कवींचे.
१. माणसे
कवी - वलय मुळगुंद
कवितासंग्रह - एक झाड शब्दांचं
२. कवी - बा सी मर्ढेकर
कवितासंग्रह - मर्ढेकरांची कविता
३. मानवाचे अंती | एक गोत्र
कवी - विं. दा.करंदीकर
कवितासंग्रह - धृपद
#marathi #marathikavita #marathisahitya #podcast #marathipodcast #kavita #marathipoem #marathipoetry #कविता
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
झाडांच्या अस्तित्वाने सारं जग सुंदर बनवलंय. मनाला शांती, तनाला सावली आणि डोळ्याला गारवा देणारी ही झाडं. किती प्रकारचा आनंद देतात ना आपल्याला. अगदी निःस्वार्थपणे. पाहुयात या लाडक्या हिरव्या मित्राबद्दल काय म्हणतात कवीवर्य.
१.पिंपळ
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - पिंपळ
२.माडाचे भावगीत
कवी - बा.भ.बोरकर
कवितासंग्रह - आनंदभैरवी
३. कवी - संदीप अवचट
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
From the publisher's feed
Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that…
'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत.
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.