
Sign up to save your podcasts
Or


कुसमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आपली मराठी अगदी ज्ञानेश्वर ते आताचे लेखक, कवी, विविध कलाकार यांनी समृध्द केली. आपल्या भाषेला खूप मोठा सुवर्ण इतिहास आहे. पाहुयात मराठीच्या गोडीबद्दल कविवर्य काय म्हणतायत.
1. मायबोली
कवी - सुरेश भट
कवितासंग्रह -रुपगंधा
2. मराठी माती
कवी -कुसुमाग्रज
कवितासंग्रह मराठी माती
3. मराठी ओव्या
कवी- बा भ बोरकर
कवितासंग्रह - बोरकरांची समग्र कविता भाग 2
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
दिवसाचा शेवट आणि रात्रीच्या आधीचा रम्य काळ म्हणजे संध्याकाळ. सूर्यास्ताचे रंग, मनाची चलबिचल, परतीच्या वाटा अशा अनेक गोष्टींनी भरलेली. रोज वेगळ्या रूपाने भुरळ घालणारी. बघूया कशी रिझवतीय ही कवी मनाला.
१. कविता - माझ्या मावळत्या उन्हा
कवितासंग्रह - कांचनसंध्या
कवी - बा.भ. बोरकर
२. कविता - संध्याकाळ
कवितासंग्रह - समग्र केशवसुत
कवी - केशवसुत
३. कविता - संध्यामाई
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश
कवी - ग्रेस
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
निळी पिवळी पत्रं, तिकिटं खूपच गोड भाग आपल्या बालपणातला. ती वाचणं, लिहिणं, जपून ठेवणं यात काही औरच गंमत होती. प्रेमाची, खुशालीची, मायेची ही पत्रं खूप देऊन जातात. थोडे शब्द जे लिहिले नसतात तेही बोलून जातात. अशी ही सुंदर पत्रे.
1. असे छानसं पत्र लिहू बघतो आहे
कवी - संदीप खरे
2. पोस्टमन
कवी - द वा फफे
कवितासंग्रह - आठवणीतल्या कविता भाग 2
3. पत्र लिही.. पण
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - रंगबावरी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
आपण किती गोष्टींच्या प्रेमात पडतो ना. आपली खेळणी, कपडे, व्यक्ती, पुस्तकं. या यादीत नवीन गोष्टींची भर पडतच राहते. या व्यक्ती, वस्तू आपल्या जीवनात रंगत आणतात. प्रेमाच्या गुलाबी दुनियेत डोकावूयात आज.
प्रेम कुणावर करावं
१. कविता - प्रेम
कवितासंग्रह - प्रिय मित्रास
कवी - शशी डंभारे
२. कविता - मग बोलू...
कवितासंग्रह - मिलिंद जोशी
कवी - असंच होतं ना तुलाही
३. कविता - प्रेम कुणावर करावं
कवितासंग्रह - छंदोमयी
कवी - कुसुमाग्रज
#kavita #marathikavita #marathi #marathisahitya #marathipodcast #podcast #prem #love #kusumagraj
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
मन हा अत्यंत किचकट विषय पण अतिशय महत्वाचा. वेड लावणारं पण हेच असतं आणि शहाणपणा शिकवणारं पण हेच असतं. अश्या या बावऱ्या मनाची व्यथा ऐकूया आज.
1. मन
कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रसवंतीचा मुजरा
2. मन वढाय वढाय
कवी - बहिणाबाई चौधरी
कवितासंग्रह - बहिणाबाईंची कविता
3. खुळे मन
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - सहवास
4. मन
कवी - आरतीप्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण
#kavita #marathikavita #marathi #marathisahitya #marathipodcast #podcast #SureshBhat #mangeshpadgaonkar #bahinabai
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
आपल्या बालपणाचा मोठा भाग म्हणजे आपले आजी-आजोबा. ते त्यात खीरीचा गोडवा, मायेची ऊब अन् पोळीवर खूप सारं तूप घालत राहतात. त्यांच्या मजेशीर अनुभवांनी खूप हसवतात आणि नकळत खूप काही शिकवून जातात. त्यांच्या गोड जगात हरवून जाऊयात या कवितांच्या शब्दांतून.
1. कविता - आजोबा
कवी - शांता शेळके
कवितासंग्रह - गोंदण
2. कविता - नातू, आजोबा आणि पाऊस
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - पाऊसगाणी
3. कविता - आजी
कवी - संदीप खरे
कवितासंग्रह - मी अन माझा आवाज
#kavita #marathikavita #marathi #marathisahitya #marathipodcast #podcast #aaji #aajoba #shantashelke #mangeshpadgaonkar #bahinabai
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
आपल्या सर्वांच्या अत्यंत लाडक्या लता दीदींचं प्रथम पुण्यस्मरण येत्या ६ फेब्रुवारीला. या स्वरगंगेनं आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद अगदी ओसंडून भरला. त्यांचं आपल्यावर नेहमी ऋण राहील. त्यांच्यावरच्या प्रेमाखातर.
कविता
१.लता मंगेशकर
कवितासंग्रह- आई आणि इतर कविता
कवी - फ.मु.शिंदे
२.कवी - वैभव जोशी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
आपण खूप गोष्टींना घाबरतो. लहानपणी बागुलबुवा, परीक्षा, गुरुजी मग नोकरी, बॉस..यादी न संपणारी आहे. प्रत्येकाची भयाला तोंड द्यायची पद्धत वेगळी. बघूया भीती कशी व्यक्त करतात ही कवी मंडळी.
१.कविता - भयभीत
कवितासंग्रह - मेंदी
कवी - इंदिरा संत
२. कविता - दैत्यांचे भय l भय देवाचेही
कवितासंग्रह - धृपद
कवी - विं.दा. करंदीकर
३. कविता - सीन
कवितासंग्रह - मी...वगैरे
कवी - वैभव जोशी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
दैनंदिन जीवनात काही ना काही गमतीजमती होत असतात. त्या आपल्या चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहत नाहीत.बोलतोय अश्याच काही मजेशीर गोष्टींबद्दल.
१.कविता - उखाणा
कवितासंग्रह - मोरू
कवी - मंगेश पाडगावकर
२. कविता - परिटा येशील कधी परतून?
कवितासंग्रह - झेंडूची फुले
कवी - प्र.के.अत्रे
३. कविता - वय झालं बहुतेक
कवितासंग्रह - मी अन माझा आवाज
कवी - संदीप खरे
#Gudgulya #MarathiKavita #kavita #Atre #Padgaonkar #SandeepKhare #Keshavkumar
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
खूप स्वप्नं असतात ना आपली सर्वांची. पण त्यांच्या मार्गात रोज काही ना काही आव्हानं येतच असतात. कधी आपण निराश होतो तर कधी त्यांना सामोरं जातो. त्यापासून पळून जाऊन आपण स्वतःच्याच प्रगतीच्या आड येतो. सामना करूया या आव्हानांचा आणि देऊया त्यांना उत्तर.
1.मी फुल तृणातील इवले
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - जिप्सी
2.कोलंबसाचे गर्वगीत
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा
#AnantAmuchiDhyeyasakti #MarathiKavita #Kavita #Kusumagraj #Mangesh #Padgaonkar
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
From the publisher's feed
Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that…
'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत.
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.