
Sign up to save your podcasts
Or


रंगमंच
चेहऱ्यावर रंग लाऊन स्टेजवरती ते पात्र करणं जेवढं अवघड आहे तितकंच अवघड तुमचं आयुष्यातलं पात्र समाजाच्या नियमांनुसार निभावणं. हा जीवनाचा रंगमंच आपल्याला बहुपात्री/बहुरंगी बनायला भाग पाडतो. या तारेवरच्या कसरतीचा चित्रपट काव्यारुपात कसा सजला आहे ते बघूया.
1. रंगमंच
कवी - ग दि माडगूळकर
कवितासंग्रह - पूरीया
2. रंगमंच
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - मेंदी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
शीळ
मनाला वेड लावणारी, दाद देणारी, मजेशीर वाटणारी अशी ही शीळ. याचेही खूप प्रकार असतात. ती एका तऱ्हेची कलाच. ही धून कशी अडकलीय या काव्यरुपी माळेमध्ये.
1. शीळ
कवी - ना घ देशपांडे
कवितासंग्रह - शीळ
2. शीळ
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
विविध प्रकारच्या पालख्या आपण सगळ्यांनीच अनुभवल्या आहेत. त्यांच्याबद्दल कौतुक, आदर तर असतोच. कारण पालख्या खूप महत्त्वाच्या व्यक्तींना, गोष्टींना वाहून नेतात. पाहुयात आज कोण घेतायत पालखीची स्वारी.
1. पालखी
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - चित्कळा
2. पालखी
कवी - वैभव जोशी
कवितासंग्रह - मी.. वगैरे..
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
मुखवट्यानी अख्ख जग व्यापले आहे. जो तो ते घालूनच रोजचं आयुष्य जगतोय. काळाची गरज होऊन बसले आहेत हे मुखवटे. भावनाशून्य, नाटकी असे हे मुखवटे कधी कधी खूप त्रासदायक ठरतात. आपण स्वत्व हरवत चाललोय याची खंत भासवतात.
1. मुखवटे
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - मुखवटे
2. मुखवटा
कवी - प्रकाश खोटे
कवितासंग्रह - साधना
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
मेंदीचा तो रंग, सुगंध मनाला खूप मोहून टाकतो. आपण स्वप्नांत हरवून हरवून जातो त्या नक्षिसोबत. खूप हवीशी वाटणारी ही गोड मेंदीही आपल्या कवितेच्या शब्दांनीही सजली आहे. बघूया कसा रंग चढतोय.
1. मेंदी
कवी - शांता शेळके
कवितासंग्रह - कळ्यांचे दिवस फुलांच्या राती
2. मेंदी
कवी - वैभव जोशी
कवितासंग्रह - मी वगैरे
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
कोणाला आठवून, काहीतरी हरवल्यानंतर, कधी विनाकारण हुरहूरही लागतेच. ती आपला वेळ आणि चैन दोन्ही हिरावून घेते. पण काही गोष्टींची हुरहूर खूप गोड असते. चला बघूया कशाची हुरहूर लागलीय आपल्या लाडक्या कविवर्याना.
1. हुरहूर
कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रसवंतीचा मुजरा
2. हुरहूर
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - सहवास
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
गुंता
अगदी एखाद्या कपापासून ते घरापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये आपण गुंतत जातो. त्यापासून दूर होणं आपल्याला खूपच अवघड होऊन बसतं. या गुंत्यामध्ये आपण इतके गुंतून पडतो की आपण सारं काही विसरून बसतो. चला बघूया या गुंत्यातून बाहेर पडता येतं का कवितांचा आधार घेऊन.
1. नाही गुंतून जायचे
कवी - सुधीर मोघे
कवितासंग्रह - पक्ष्यांचे ठसे
2. पाऊल तरी उचलू कशी
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
मोगरा, धूप-दीप, पहिला पाऊस यांचा सुगंध मनाला वेगळाच आनंद देऊन जातो. त्या-त्या सुवासाच्या आठवणी आणि त्यांचे संदर्भ वेगवेगळे असतात पण ते विस्मरणीय असतात. चला तर मग हरवून जाऊयात या काव्यरुपी गंध गाभाऱ्यात.
1. गंधांतून गूढ उकलते
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - जिप्सी
2. गंध
कवी - मिलिंद जोशी
कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
आईची महती काय सांगावी. ती शब्दात बसवणं शक्यच नाही. ती आपला पहिला गुरू तर असतेच पण असंख्य भूमिका पार पाडते. डॉक्टर, मैत्रीण, आधार. नेहमी पाठीशी घालणारी, आपल्याला समजून घेणारी आईच असते. अश्या या माऊलीची थोरवी कशी मांडलीय बघूया कवी मंडळींनी.
१. आई
कवी - अनिल
कवितासंग्रह - सांगाती
२. आईचे मन
कवी - यशवंत
कवितासंग्रह - पाणपोई
३.आई
कवी - मिलिंद जोशी
कवितासंग्रह - असेच होते ना तुलाही
४.आईची आठवण
कवी - माधव ज्युलीन
कवितासंग्रह - स्वप्नलहरी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
विज्ञानाच्या साह्याने मानवाने गगनभरारी घेतलीय. आपलं आयुष्य आता मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप या गोष्टींशिवाय अपूर्ण वाटतं. प्रत्येक कामासाठी विज्ञानाचा टेकू घ्यायची वाईट खोडचं लागलीय आपल्याला. बघूया कवितेच्या शब्दांमध्ये सापडते का ही विज्ञानाची घोडदौड.
1. √-1
कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - मृदगंध
2. Touch screen
कवी - मिलिंद जोशी
कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही
3. थँक गॉड कुसुमाग्रज!
कवी - वैभव जोशी
कवितासंग्रह - मी वगैरे
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
From the publisher's feed
Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that…
'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत.
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.