
Sign up to save your podcasts
Or


पाहुणे
' पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा ' ही म्हण उगाचच नाही आली. कोणी पाहुणे येणार म्हटलं की घरात गोडधोडाची रेलचेल. खूप गप्पा, आठवणींची उजळणी आणि परत लवकरच भेटण्याच्या आणाभाका, हे अगदी ओघानं आलंच. काही पाहुणे खूप लाघवी तर काही अगदी तिखट नकोसे. पण गंमत तर आणतातच. बघूया पाहुण्यांचा कवितारुपी आगथ्य सोहळा.
1. पाहुणा
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - महावृक्ष
2. पाहुणा
कवी - सुधीर मोघे
कवितासंग्रह - स्वतंत्रते भगवती
#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
स्वातंत्र्यलक्ष्मी
१५ ऑगस्ट हा सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा दिवस. या दिवशी ७७ वर्षापूर्वी आपण पारतंत्र्यातून मुक्त होऊन देशाची सूत्रं आपल्या हातात घेतली. यासाठी अनेक गांधी, टिळक, आगरकर आपल्याला गमवावे लागले. पण हा सोनियाचा दिवस त्यांच्यामुळेच आपल्याला लाभला आणि आपण हे स्वातंत्र्य आज अनुभवतो आहोत. चला तर मग वंदन करूया या महान व्यक्तींना आणि भारत मातेला.
1. वंदे मातरम!
कवी - ग दि माडगूळकर
कवितासंग्रह - पुरीया
2. गाऊ त्यांना आरती
कवी - यशवंत
कवितासंग्रह - पाणपोई
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
पोकळी
काही व्यक्ती, वस्तू, जागा अतिशय महत्वाच्या असतात आपल्या आयुष्यात. त्यांच्या नसण्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण होते. ती भरून कधी शक्य होतं कधी नाही. ही जाणीव खूपच उशिरा सर्वांना. बघुयात या पोकळीबद्दल कवीवर्य काय म्हणतायत
1. पोकळी
कवी - प्रकाश खोटे
कवितासंग्रह - साधना
2. पोकळी
कवी - मिलिंद जोशी
कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही..
#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
चहा
आपल्या सर्वांचा लाडका चहा. त्याच्याशिवाय आपला दिवस सुरूच होत नाही. तो आपल्याला फक्त तरतरीच अन् उबच नाही तर साथही देतो. कधी - कधी नवीन नात्यांच्या सुरुवातीचं तो गोड कारण असतो. अश्या सर्वगुण संपन्न अश्या लाडक्या पेयाच कौतुक कवितारुपी स्तुतीसुमनांनी झालं नाही तर नवलच. चला तर मग घेऊया आस्वाद.
1. गवती चहा
कवी - वलय मूळगुंद
कवितासंग्रह - एक झाड शब्दांचं
2. चहा
कवी - शशी डंभारे
कवितासंग्रह - प्रिय मित्रास
#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
' जीवन ' त्यांना कळले हो
आयुष्याचे टप्पे - टोणपे कधी आपल्याला उंच उडवतात तर कधी जोरात जमिनीवर आपटतात. पण काही धडे मात्र नक्की शिकवतात. आपल्या मानव जातीचा अहंकार काही क्षणात धुळीस मिळवला जातो. पण खरंच आपल्याला जीवन कळतं का , कळलं तर मग ते खरंच आपण ते खरंच जगतो का असे नाना प्रश्न उभे राहतात. पाहुयात कवीवर्यांचा काव्यमय दृष्टिकोन.
1. कुणि मारावे
कवी - बा सी मर्ढेकर
कवितासंग्रह - मर्ढेकरांची कविता
2.जीवन त्यांना कळले हो
कवी - बा भ बोरकर
कवितासंग्रह - आनंदभैरवी / बोरकरांची कविता
#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
आकाशवेड
प्रत्येकालाच त्याच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचं असतं, आकाशाला गवसणी घालायची असते. हे उंच, विस्तीर्णग आकाश त्याच्या सुंदर रूपांनी तर आपल्याला भरुळ घालतेच पण आपण किती उंच उडू शकतो याची जाणीवही करून देते. आपल्याला त्याच्या प्रेमात पाडणाऱ्या आणि नवीन भरारी घेण्यास प्रेरणा देणाऱ्या या आभाळाला कवितातून गवसणी घालूया.
1. आपले आभाळ
कवी - संदीप खरे
कवितासंग्रह - मौनांची भाषांतरे
2. आकाशवेडी
कवी - पद्मा गोळे
#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
झोका
झोका म्हणजे नुसती धमाल. हे समीकरण अगदी ठरलेलं. झोक्यावर बसलं की वेगळ्याच जगात आपण फिरतो आहोत असं वाटतं. त्याच्या सोबत आकाशाला गवसणी घालत भरारी घेण्यासारखी मज्जा दुसरी काय असू शकते. चला बसुया या कवितांच्या झोक्यावर.
1. झोका
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - मुखवटे
2. झोका
कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश
#marathi #marathikavita #marathisahitya #podcast #marathipodcast #kavita #मराठी #marathipoem #marathipoetry
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
आनंदाची उधळण करणारा हा पावसाळा. मातीचा सुगंध, हिरवळ, इंद्रधनू यांची नुसती बरसात करत राहतो. सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आणतो. चला तर मग चिंब भिजून जाऊयात कवितांच्या वृष्टीत.
1. पाऊस
कवी - ना धों महानोर
कवितासंग्रह - पावसाळी कविता
2. पावसाचा शृंगार
कवी - सावनी शेंडे
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
हिमालयाची हाक
उत्तुंग पर्वत नेहमीच आपल्याला विविध गोष्टी देत राहतो. त्यांच्याकडे फक्त पाहिलं तरी खंबीरपणा ज्याला म्हणतात ते हेच असावं वाटतं. प्रत्येक ऋतूत वेगळंच रूप ते धारण करतात. कधी हिरवागार, कधी सोनेरी. त्यांच्या माथ्यावरून दिसणाऱ्या सुंदर दृश्यांना तोड नाही. त्यांची महती काव्यातून पाहूया.
1. हिमालयाची हाक
कवी - बा भ बोरकर
कवितासंग्रह - आनंदभैरवी
2. गिरीगान
कवी बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
साडी
साडी हा सर्व भारतीय स्त्रियांचा, मुलींचा अगदी जिव्हाळयाचा विषय. वय कितीही असो, साड्या भुरळ पाडतातच. लग्नाच्या शालू, भावाची साडी, ओटी भरणाची अश्या विविध प्रसंगांच्या साड्या वेगळीच रंगत आपल्याला कपाटाला आणत राहतात. मिरवूया या लाडक्या साड्यांना कवितेच्या बाजारात.
1. मऊ रेशमाची घडी
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम
2. पैठणी
कवी - शांता शेळके
कवितासंग्रह - गोंदण
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
From the publisher's feed
Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that…
'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत.
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.