Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

By Vechleli PhuleSociety & CultureArtsBooks
Download on the App Store

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast episodes

  • प्रार्थना | Prarthana

    प्रार्थना

    भले काही संकट असो किंवा नसो प्रार्थना आपण कोणत्या न कोणत्या कारणाने करतच असतो. प्रार्थना ही आशा , सकारात्मकता, दिलासा देणारी गोष्ट. एक छोटीसी प्रार्थना पूर्ण चित्रच पालटून टाकते. अवघड परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक वेगळंच बळ मिळतं. चला तर मग करूयात प्रार्थना.


    1. प्रार्थना

    कवी - मंगेश पाडगावकर

    कवितासंग्रह - नवा दिवस


    2. प्रार्थना

    कवी - कुसुमाग्रज

    कवितासंग्रह - छंदोमयी

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    6 min
  • आव्हान माझे | Avhan Majhe

    आव्हान माझे 

    या जीवनप्रवासात आव्हानं झेलतच पुढचं स्टेशन गाठावं लागतं. कधी आपण आशा सोडून देतो, कधी त्यांच्याशी लढतो. फक्त दृष्टिकोन बदलला की चित्र वेगळंच दिसायला लागतं. चला तर मग दोन हात करूया आव्हानांनसोबत.


    1. आव्हान

    कवी - अशोक थोरात

    कवितासंग्रह - बालभारती


    2. आव्हानशृंग

    कवी - भा रा तांबे

    कवितासंग्रह - भा रा तांबे यांची समग्र कविता

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    6 min
  • खोट्या पैश्याचे गाणे | Khotya Paishyache Gane

    खोट्या पैश्याचे गाणे

    पैसा कमावण्यासाठी आपण सगळेच जीवाची वाताहात करत असतो. ' दाम करी काम ' हे नाकारता तर येणारच नाही. पण या पैश्याच्या हव्यासापायी माणूस काय काय करतो हे तर सांगायलाच नको. चला तर बघुया दामाची कवितरुपी कहाणी.


    1. खोट्या पैशाचे गाणे

    कवी - विंदा करंदीकर

    कवितासंग्रह - धृपद


    2. दामायण

    कवी - रामदास फुटाणे

    कवितासंग्रह - सफेत टोपी लाल बत्ती

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    5 min
  • आला शिशिर | Aala Shishir

    आला शिशिर

    हिवाळ्याची सुरुवात या ऋतूपासून होते. स्वेटर, शाली, टोप्या हळूहळू कपाटातून बाहेर येतात. गरम - गरम चहा आपला दिवसभराचा सोबती होऊन जातो. झाडांची पानगळती होते. एक वेगळंच वातावरण तयार होतं. चला तर मग करूया शिशिर ऋतूचं स्वागत कवितेच्या माध्यमातून.


    1. शिशिर ऋतुचं गान

    कवी - वा रा कांत


    2. शिशिर

    कवी - अनिल

    कवितासंग्रह - बालभारती

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    6 min
  • समुद्र | Samudra

    समुद्र

    अथांग, निळाशार असा हा सागर. त्याच्या किनारी बसून पाण्याशी खेळणं, उसळत्या लाटा पाहणं, सूर्यास्त पाहणं याची गंमत काही न्यारीच असते. प्रत्येकवेळी आपल्याला त्याची नवी मनोवेधक रूपं बघायला मिळतात. चला तर मग जाऊया दर्याकिनारी कवितेच्या होडीतून.


    1. समुद्र

    कवी - वैभव जोशी

    कवितासंग्रह - मी.. वगैरे..


    2. सागर

    कवी - कुसुमाग्रज

    कवितासंग्रह - बालभारती

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    8 min
  • लहानपण देगा देवा | Lahanpan Dega Deva

    लहानपण देगा देवा

    बालपणाचा काळ तो सुखाचा. आईचा मार अन् प्रेम, मित्र - मैत्रिणींसोबत केलेल्या गमती - जमती , शाळेतले प्रसंग अश्या असंख्य सुंदर गोष्टींचा खजाना म्हणजे बालपण. प्रत्येकालाच ते प्रिय असतं. तिथं रमायला आवडतं. चला तर मग जगुयात ते सुवर्णक्षण पुन्हा एकदा.


    1. बाळ होऊनी कुशीत यावे

    कवी - विंदा करंदीकर

    कवितासंग्रह - मृदगंध


    2. बाळपण

    कवी - इंदिरा संत

    कवितासंग्रह - गर्भरेशीम

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    5 min
  • झुळूक | Jhuluk

    झुळूक

    ती सुंदर, आल्हाददायक झुळूक किती आराम देते आपल्याला. असती छोटीच पण तीच किमया खूप मोठी असते. नुसती सगळीकडे पळत असते. झाडांची पाने हलव, फळं पाड, फुलांना गुदगुल्या कर, पाण्यावर रांगोळी काढ असे उद्योग करत राहते. चला तर मग कवितेची गोड झुळूक घेऊयात.


    1. झुळुक

    कवी - दामोदर अच्युत कारे

    कवितासंग्रह - बालभारती


    2. एक झुळुक

    कवी - ग. दि. माडगूळकर

    कवितासंग्रह - पूरिया

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    7 min
  • आली दिवाळी | Aali Diwali

    आली दिवाळी

    सण तेजाचा, प्रकाशाचा. उटण्याची- सुवासिक तेलाची आंघोळ, दिवे - आकाशकंदील - रांगोळीची आरास, खमंग फराळाने भरलेले ताट आणि पोट, कुटुंबासोबतचा गोड वेळ या सगळ्या गोष्टींची बरसात करणार सण कोणाला प्रिय नसेल. परिसरासोबत मनातलाही अंधार दूर करणारा दीपोत्सव. चला तर मग लक्ष दिव्यांची रोषणाई करूयात कवितेच्या माळेसोबत.


    1. दीपावली

    कवी - इंदिरा संत

    कवितासंग्रह - शेला


    2. भाऊबीज

    कवी - सुरेश भट

    कवितासंग्रह - रसवंतीचा मुजरा

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    6 min
  • इच्छा | Ichcha

    इच्छा

    इच्छा - आकांक्षा असतात सर्वांच्याच. म्हणून तर आपण काहीतरी करत राहतो, धडपडतो. या इच्छा आपल्याला मोठं करतात, मार्गदर्शन करतात. काही इच्छा मजेशीर, गोड अन् कधी कधी अवघडही असतात. पण त्या आपण कधी खरोखर तर कधी स्वप्नात जगतो. चला तर जाऊया इच्छांच्या गावा.


    1. इच्छा

    कवी - रवींद्रनाथ टागोर (अनुवाद : पु. ल. देशपांडे)

    कवितासंग्रह - बालभारती


    2. इच्छा मेली

    कवी - संदीप खरे

    कवितासंग्रह - नेणिवेची अक्षरे

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    8 min
  • फुलपाखरू | Fulpakhru

    फुलपाखरू

    रंगीबेरंगी , फुलांवरून एकडून - तिकडे उडणारी ही सुंदर फुलपाखरे. सारेजण ह्यांच्या प्रेमात असतात. ती दिसली की नजर त्यांच्यावरून हटतच नाही. मन प्रसन्न करणारी, जग किती सुंदर आहे हे दाखवणारी , उडत रहा असा संदेश देणारी. चला तर मग मारुया गिरकी यांच्यासोबत.


    1. फुलपाखरू

    कवी - अ ज्ञा पुराणीक

    कवितासंग्रह - बालभारती


    2. फुलपाखरें

    कवी - मंगेश पाडगावकर

    कवितासंग्रह - आनंदऋतू

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    8 min

About Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

From the publisher's feed

Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that…