आनंदी जीवन

आनंदी जीवन

By Sunita NakateEducationSelf-Improvement
Download on the App Store

आनंदी जीवन episodes

  • 7 Things which will change your life by using good habits
    आपल्या रोजच्या सवयी कशा आहेत त्यावरून आपलं भविष्य ठरतं. 
    चांगल्या सवयीने जीवनात कोणते परिवर्तन घडून येते? 
    चांगल्या सवयीने नेमक्या कोणत्या गोष्टी साध्य होतात? 
    काय बदल घडतो आपल्या जीवनात?
    7 min
  • Small habits which can change your life
    Your habits will determine your future
    --Jack canfield
    अगदी खरं आहे जशा आपल्या सवयी असतात असं आपलं भविष्य ठरतं. प्रत्येक व्यक्ती चांगल्या सवयी लागण्यासाठी सातत्याने स्वता:वर काम करत असते. चांगल्या सवयीने मनुष्य घडतो आणि वाईट सवयीने बिघडतो.
    आपल्याला असणाऱ्या चांगल्या सवयी या इतरांपेक्षा आपल्याला वेगळं बनवतात. परंतु याचा सगळ्या चांगल्या सवयी लागणार कशा?
    त्या विषयी आजचा podcast आहे. हा नक्कीच ऐका.
    आणि कमेंट करा.
    8 min
  • आरोग्यदायी आणि आनंदी दिवाळी
    दिवाळी येते आणि जीवनामध्ये सप्तरंग, आनंद, उल्हास, चैतन्य घेऊन येते. दिवाळीतला प्रत्येक दिवस खूप छान आणि सुंदर भासतो. काय नाही आपल्या दिवाळीमध्ये? त्याला उगीचच सणांचा राजा म्हटलेल नाहीये. थंड छान हवीहवीशी गार हवा, मोकळ आणि छानसं वातावरण, गोड-धोडाची रेलचेल, नवीन कपडे, नातेवाईकांची भेट, फराळाची लगबग, फटाके, नवीन खरेदी, सोनं आणि दाग-दागिन्यांची खरेदी, फक्त आनंद आणि आनंद असतो. 
    
    अश्विन महिन्यात दिवाळी येते त्यावेळेस निसर्ग सौंदर्य बहरलेलं असतं, निसर्गामध्ये बदल घडत असतो. शेतकऱ्याची शेतीतील कामे आटोपलेली असतात. या काळात शारीरिक बल वाढवण्यासाठी पोषक असं वातावरण असतं.
    7 min
  • चाळिशीनंतर योगाचे महत्व
    योगः मन: प्रशमन उपायः"
    योग वाशिष्ठ्य" या ग्रंथात योगाची ही व्याख्या सांगितलेली आहे. योग म्हणजे मनाला प्रयत्नपूर्वक नियंत्रित करण्याचा उपाय आहे. योगाभ्यासाने मनाची एकाग्रता, मानसिक शक्ती, आकलनशक्ती ,स्मरणशक्ती, निर्णय शक्ती वाढते आणि अधिकाधिक प्रभावी होते. चाळीशीनंतरचे वजन नैसर्गिक पातळीत राहण्याकरता योगासने, प्राणायाम, शुद्धिक्रिया यांचा नियमित अभ्यास केला तर प्रमाणापेक्षा अधिक असलेले वजन कमी होऊन प्रमाणात येते. शरीराची प्रमाणबद्धता आणि आरोग्य संपन्नता, नैसर्गिक आकर्षकता सुद्धा योगसाधनेने मिळवता येते.
    14 min
  • Gratitude
    Morning ritual मध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे कृतज्ञता.
    ‘कृतज्ञता’ ही भावना मनोविकासाच्या मार्गावरची महत्त्वाची देणगी आहे. कृतज्ञतेच्या जाणिवेमुळे किती तरी नकारात्मक विचारांवर- भावनांवर सहज मात करता येते. ते नुसते जीवनमूल्य नाही तर आपली ताकदसुद्धा आहे, नात्यांची वीण पक्की करणारी आणि आपल्याला ‘मी’ पलीकडचं वर्तुळ दाखवणारी!
    10 min
  • Morning ritual जे आपल्याला देईल यशस्वी आणि आनंदी जीवन
    तुमच्या सर्वांच्याही कानावर  हा शब्द वारंवार पडत असेल. काय आहे बरं हे  Morning rituals हा प्रश्न मलाही पडला होता. पण जेव्हा मी हे सगळं काही करायला लागले तेव्हा खरोखरच जादू झाली आणि माझ्या जीवनामध्ये बदल आमूलाग्र बदल घडला.
    आपल्या सगळ्यांना एक सुंदर असं आयुष्य देवाने दिलेल आहे. प्रत्येकाची आपल्या या आयुष्यात काही स्वप्न, ध्येय, इच्छा, आकांक्षा असतात आणि जर त्या पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला रोजच त्या दिशेने काहीतरी पावलं टाकावी लागतात. हे पाऊल टाकण्यासाठी रोज निश्‍चितपणे काही गोष्टी आपल्याला सातत्याने कराव्या लागतात. मग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिस्त, सातत्य, उत्तम आरोग्य, उत्साह व आनंद याची गरज असते.
    आणि या सगळ्या गोष्टींची सवय लागते Morning rituals मधूनच आणि मलाही आता त्याची सवय झाली आहे आणि याचा संपूर्ण जीवनावर होणारा सकारात्मक बदल आणि चांगला परिणाम मी अनुभवते आहे.
    आपला वेळ हा बहुमूल्य आहे आपल्या वेळेची किंमत जाणून घेऊन संपूर्ण दिवसभरातील वेळ आपण सत्कारणी कसा लावू शकतो त्याचं संपूर्ण नियोजन हे  Morning rituals मध्ये होते.
    10 min
  • Self Love Affermation
    स्वतःवर प्रेम करण्यासाठी, आपली आत्मप्रतिमा उंचावण्यासाठी हे Self Love Affermation आहे.
    4 min
  • नेहमी आनंदी राहण्याची सवय कशी लावावी? ---1
    दैनंदिन जीवनामध्ये आनंदी कसे राहावे असा सगळ्यांनाच प्रश्न पडतो नेहमीच प्रत्येक क्षणात आनंदी राहणे जमतंच असं नाही. पण आपल्या मध्ये काही सवयी आपण जर लावल्या तर आनंदी राहणं शक्य आहे. आनंद हा प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. कोणी स्वतःच्या कोषात आनंदी राहतं, तर कुणी मित्रमंडळींमध्ये आनंदी होतं, तर कोणाला आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यामध्ये आनंद मिळतो. आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी काही सवयी या महत्त्वाच्या असतात. खरंतर वाईट सवय मोडणे अवघड असते पण अशक्य नाही. पण चांगली सवय जर सातत्याने लावली तर त्या आपल्या मनावर कायमच्या कोरल्या जातात. या सवयी लावताना ताण सुद्धा येतो पण तुम्ही या सवयी लावण्यासाठी त्यावर सातत्य ठेवा आणि टिकून राहण्याचा प्रयत्न करा. या चांगल्या सवयी मुळे सतत आनंदी राहण्याची एक प्रेरणा तुम्हाला मिळते.
    39 min
  • मेनोपाॅजचा काळ आनंदी जाण्यासाठी उपयुक्त गुजगोष्टी
    आज-काल सर्व स्त्रियांसाठी मेनोपॉज चा काळ अतिशय त्रासदायक ठरत आहे. हा काळ आनंदी जाण्यासाठी छान अशा उपयुक्त टिप्स या पॉडकास्ट मध्ये सांगितलेल्या आहेत.
    7 min

About आनंदी जीवन

From the publisher's feed

नमस्कार मी सुनिता नकाते आनंदी जीवन या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून मला महाराष्ट्रातील एक लाख महिलांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करणं हा माझा ध्यास आहे. आणि त्या…