आनंदी जीवन

आनंदी जीवन

By Sunita NakateEducationSelf-Improvement
Download on the App Store

आनंदी जीवन episodes

  • Healthy Mindset
    तुमच्या मनामध्ये विचारांची गर्दी होते का? त्यामुळे तुमचा गोंधळ उडतो का?  
    विचारांवर कसं नियंत्रण ठेवावं हे समजत नाही.
    अनावश्यक विचार कसे थांबवावेत?
    हे जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर याचे उत्तर या Podcast मध्ये दिलेली आहे.
    आपल्याला हे नेहमी सांगितलं जातं की सकारात्मक राहा पॉझिटिव माइंडसेट ठेवा. फक्त सकारात्मक मानसिकताच नाही तर एक निरोगी मानसिकता तयार होणे फार गरजेचे आहे.
    निरोगी मानसिकता म्हणजे काय?
    निरोगी मानसिकतेमध्ये आपण आपल्या विचारांना कंट्रोल करण्या ऐवजी विचारांची शक्ती वाढवतो. निरोगी मानसिकतेमध्ये नकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा पहिली गोष्ट म्हणजे, विचार आहे तसे स्वीकारणे आणि विचारांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न
    करणं.
    6 min
  • How to keep committed to yourself
    जेव्हा आपण स्वतःसाठी काही गोष्टी ठरवतो, त्याचे प्लॅनिंग करतो, परंतु ते करण्याचा कंटाळा करतो ती म्हणजे आपणच आपल्याशी प्रतारणा करतो, आपण स्वतःला दिलेले वचन मोडतो. त्यामुळे असा विचार करा कि मी स्वतःशी केलेले कमिटमेंट पाळण्याची हीच वेळ आहे.
    9 min
  • 7 Pillars of Self Care
    स्त्रियांना स्वतःची काळजी घेण्याचं कदाचित दडपण येत असेल, तुम्ही इतरांची काळजी घेता, तशी स्वतःची काळजी घेता का? कदाचित तुम्हाला या सर्व गोष्टी जाणवत असतील पण कसं करायचं हे समजत नसेल. मला या क्षणी नक्की काय हवंय हे लक्षात येत नसेल. तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. स्वतःची काळजी घेण्याचे हे सात पीलर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत जे तुम्ही तुमचं आयुष्य परिपूर्णतेने जगण्यासाठी नक्कीच मदत करतील.
    8 min
  • चाळीशी नंतर आनंदी व निरोगी राहण्याचे पाच सोपे मंत्र
    चाळिशीनंतर चा काही मानसिक व शारीरिक समस्या जाणवतात त्या प्रश्नांची उत्तरे या मध्ये आहेत. कोणत्या गोष्टींचा आपण अवलंब केला तर आपण आनंदी व निरोगी राहू शकतो? त्या पाच सोप्या गोष्टी यात सांगितलेल्या आहेत.
    15 min
  • आनंदाचे डोही आनंद तरंग
    "आनंदाचे डोही आनंद तरंग"
    लहानपणापासून हा अभंग ऐकत आले आहे.
    या अभंगातुन संत तुकोबांनी आनंदाचे महत्व अधोरेखित केले आहे. खरंतर प्रत्येक व्यक्तीच्या आनंदाच्या व्याख्या या वेगवेगळ्या असतात. कोणाला कोणत्या गोष्टीतून आनंद मिळेल हे सांगता येत नाही. खरं तर आनंद आणि सुख या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपल्याला भौतिक गोष्टीतून मिळतं ते सुख असतं आणि एखादी गोष्ट केल्याने त्यातून आपल्याला आंतरिक परमानंद मिळतो, त्यालाच खरा आनंद म्हणता येईल. एखादी आपली आवडती गोष्ट आपण केल्यावर, "आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे" अशी जी मनाची अवस्था होते त्याला खरा आनंद म्हणता येईल.
    6 min
  • Time Waste करणं कसे बंद करायचे शिका फक्त पाच सेकंदात
    आजचे काम उद्यावर ढकलण्याचा आपल्या सवयी वर संत कबीरांनी खूप छान भाष्य केले आहे. आणि हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत तरीही त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येत नाही.
    कल करे सो आज कर 
    आज करे सो अब 
    पल मे प्रलय होएगी 
    बहुरी करोगे कब 
                      -----संत कबीर
    "Procastination is the thief of time. procrastination makes easy things hard, hard things harder"
    
    आपली बरीच कामे अशी असतात जी आपण उद्यावर ढकलत असतो. कामे उद्यावर ढकलण्याची आपल्याकडे हजारो कारणं तयार असतात. आपण स्वतःशीच बोलतो, आज नको उद्या करूया. असं बोलुन आपण आपल्या स्वतःला फसवत असतो. आपण उद्या वर टाकलेली कितीतरी कामे अशी असतात, ज्यांना पाच मिनिट सुद्धा वेळ लागत नाही. पण आपल्याला कामात टाळण्याची सवय लागून जाते आणि आपण आळशी होतो. काही दिवसांनी हा आळस आणि भीती याची इतकी सवय होते की आपण साधे सोपे ही काम करू शकत नाही. अगदी घरातल्या छोट्या कामापासून ते ऑफिसमधल्या मोठ्या कामा- पर्यंत ही सवय फार घातक आहे.
    आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर आपण नेहमी कारणे देतो. मला की नाही, वेळच मिळत नाही. उदाहरणार्थ आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे हे माहीत असतं. परंतु आपण काय करतो की मला वेळच नाही ही कारणे देतो. खरंतर वेळ मिळत नसतो तो काढावा लागतो.
    7 min
  • I Love Myself 2
    मला पूर्वी रेडिओवर लागत असलं एक गाणं आठवतं.
    मी कशाला आरशात पाहू ग
    मी कशाला बंधनात राहू ग
    मीच माझ्या रुपाची राणी ग
    मीच माझ्या रुपाची राणी ग
    लहानपणी त्याचा अर्थ कळत नव्हता पण जसजशी मोठी होत गेले तसा त्याचा अर्थ उलगडला. मी जशी आहे तशी मला खूप आवडते, त्यासाठी मला आरशात पाहायची गरज नाही किंवा कोणाच्या बंधनामध्ये राहायची गरज नाही.ज्या व्यक्तीचा स्वतःवर प्रेम असतं तीच व्यक्ती असं गाणं गुणगुणुं शकते. त्यामुळे तुम्ही या पृथ्वीतलावर एकमेवाद्वितीय आहात. तुमच्यासारखं दुसरं कुणीही असू शकत नाही. तुमच्या मध्ये जे काही चांगले गुण आहेत ते इतरांमध्ये असू शकत नाही. स्वतःला कधीही कमी लेखू नका. स्वतःला जाणून घ्या. स्वतःवर प्रेम करा.
    12 min
  • I Love Myself
    मानस शास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस याच्या मते 
    "प्रेम ही आनंद, दुःख, राग, भीती या सर्वसामान्य भावना सारखीच एक भावना आहे. या भावने प्रमाणेच प्रेम भावना ही उत्पन्न, विकास, र्हास, विलय या सर्व अवस्थांमधून प्रवास करते." 
    प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारणे, त्या व्यक्तीमध्ये पूर्णपणे तल्लीन होणे, तिच्याविषयी सकारात्मक विचार करणे. 
    दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करताना आपण त्याच्या गुणदोषांसह त्याला स्वीकारतो, तर मग आपण स्वतःवर असं प्रेम नक्कीच करू शकतो मी जशी आहे, तशी खूप छान आहे ही स्वीकाराची, सकारात्मकतेची भावना स्वतःबद्दल असणे म्हणजेच स्वतःवरील प्रेम ना?
    21 min
  • 7 सोप्या गोष्टी ज्यामुळे तुमचं दैनंदिन जीवन सजगतेने (mindfulness) जगाल.
    वर्तमान काळातील प्रत्येक क्षणाला कडे जाणीवपूर्वक लक्ष देणे हे सध्याच्या Distraction च्या काळात फार गरजेचे आहे. सध्याच्या काळात करण्यासारख्या खूप गोष्टी असतात. पण कळत नाही नक्की काय करावं? कोणत्याही एकाच गोष्टीवर मन फोकस होत नाही. शॉपिंगला जरी गेलो तरी तिथे वस्तूंचे, कपड्यांचे इतके पर्याय उपलब्ध असतात की काय घेऊ आणि काय नको अशी द्विधा अवस्था होते. त्यात वेळ, पैसा आणि श्रम या तिन्ही गोष्टी वाया जातात. आपल्याला समजत असतं की दिवसातला काही वेळ आपण आपल्या मनासाठी व शरीरासाठी द्यावयास हवा, पण वेळ आपण काढू शकत नाही याचं कारण आपलं अस्वस्थ मन कोणत्याच एका गोष्टीवर व्यवस्थित केंद्रित होऊन काम करू शकत नाही आणि दिवसभर इतकी मेहनत घेऊनही मन कायम अशांत आणि अस्वस्थ असत.
    अशा अशांत व अस्वस्थ मनाला गरज असते. ती शांतता, स्वस्थता, समाधान आणि आनंदाची.
    खालील सात गोष्टी आहेत ज्या तुम्ही दिवसभर सजगतेने ( Mindfulness) करू शकता आणि तुमच्या मनाला स्वस्थ आनंदी व शांत करू शकता .
    11 min
  • आपली आत्मशक्ती वाढवण्याचे 7 मार्ग
    नमस्कार 🙏 मी सुनिता नकाते. आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागतो. अगदी दैनंदिन आयुष्यात देखील अनेक आव्हाने अडचणी अडथळे येतात. आपले आरोग्य बिघडते. अशा वेळेस आपल्याला समजत नाही की, त्याचा सामना कसा करायचा? बरेच जण भांबावून जातात. काही जणांना हे ताण तणाव असह्य होतात. काही जण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, पण योग्य मार्ग सापडत नाही. एखाद्या चक्री वादळात सापडलेल्या बोटी सारखी त्यांची अवस्था होते.
    परंतु आपण जर अशा परिस्थितीत स्थिर व शांत असू. तर आपण या बदलांना सामोरे जाऊ शकतो. जी लोकं स्थिर आणि शांत असतात त्यांचे आत्मबल बलवान असते. ते कोणत्याही अशा वादळाचा सामना करू शकतात आणि समुद्र आणि वादळ शांत झाल्यावर ते वेगाने मार्गक्रमण करतात आणि इच्छित स्थळी पोहोचतात.
    जेव्हा कठीण काळ असतो, तेव्हा आपले मनोबल, मनशक्ती, आत्मशक्ती, आत्मबल, अंतर्गत सामर्थ्य आपल्याला कठीण प्रसंगातून बाहेर काढून यशाचा मार्ग दाखवते.
    चला तर मग पाहूया आपले मनोबल वाढवण्याचे सात मार्ग कोणते आहेत ते?
    13 min

About आनंदी जीवन

From the publisher's feed

नमस्कार मी सुनिता नकाते आनंदी जीवन या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून मला महाराष्ट्रातील एक लाख महिलांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करणं हा माझा ध्यास आहे. आणि त्या…