आनंदी जीवन

आनंदी जीवन

By Sunita NakateEducationSelf-Improvement
Download on the App Store

आनंदी जीवन episodes

  • आईची चिडचिड का होते?
    आई... माझा पेन इथे ठेवला होता, तो पाहिलास का,? मला शोधून दे ना? मीराने असं म्हटल्याबरोबर आईचा रागाचा पारा अचानक चढला. हो ना, आता पेन सुद्धा मीच देते शोधून. वस्तू नीट जागेवर ठेवायच्या नाहीत आणि मग नंतर करत बसायचा आरडाओरडा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातील सर्व कामे मीच करायची का? मी म्हणजे काही यंत्र नाही,  मला दहा हात नाहीत. आईची बडबड सुरू झाली आणि ती थांबेचना. तिची खूप चिडचिड होत होती. मीराला कळेच ना, मी फक्त पेन काय विचारलं, आणि ही इतकी का भडकली आहे. सकाळी तर हीचा मुड किती छान होता. मला जवळ घेऊन तर हीने पप्पी दिली, आय लव यू म्हटलं. मग आता असं झालं तरी काय?
    8 min
  • आपल्या शरीरातील चार हॅपी हार्मोन्स आणि ते तयार करण्याचे मार्ग
    प्रत्येक व्यक्तीच्या आनंदाच्या व्याख्या या वेगवेगळ्या असतात. प्रत्येक मनुष्य प्राणी आनंदाच्या शोधात असतो. त्याच्या जीवनात तो अनेक भौतिक सुखे प्राप्त करतो. तरीही तो पूर्णपणे समाधानी कधीच नसतो. सर्व सुख मिळून हि त्याला पूर्णपणे आनंद होत नाही.
    पुराण काळातील एक गोष्ट आहे ज्यामधून आपल्याला समजेल की आनंद हा नक्की कुठे असतो?
    11 min
  • Self Discipline
    गांधीजी शिस्तीचे भोक्ते होते त्यांना शिस्त खूप आवडायची ते म्हणायचे की, 
    "स्वयंशिस्त ही एक अशी प्रक्रिया आहे की जीवनामध्ये सुंदरता निर्माण करते. स्वयंशिस्त ही माणसाच जीवन जगणं सुखकर बनवते आणि त्याला सुखी करण्याचं हे एक साधन आहे."
    या स्वयंशिस्तीचा गांधीजी च्या बाबतीत घडलेला एक किस्सा आहे.
    
    12 min
  • निगेटिव्ह विचारांशी कट्टी पॉझिटिव्ह विचारांशी गट्टी -- 2
    बहिणाबाईंनी मनाचं अगदी योग्य वर्णन केल आहे.
    " मन वढाय वढाय 
    उभ्या पिकातलं ढोर 
    किती हाकला हाकला 
    फिरुनी येतं पिकावर" 
    अशीच काहीशी मनाची अवस्था होऊन जाते. अशा वेळेस काय केलं पाहिजे? तर मग जाणून घेऊया. आणखी काही गोष्टी, ज्यामुळेे तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार भरले जातील.
    8 min
  • निगेटिव विचारांची कट्टी आणि पॉझिटिव विचारांशी गट्टी ----1
    आपल्या मनात येणारे नकारात्मक विचार हे या माकडांप्रमाणेच असतात जितके आपण त्यापासून दूर पळू तितके हे विचार आपल्याला छळत राहतात. त्याऐवजी आपण त्याकडे तटस्थपणे पाहिलं आणि सकारात्मक विचारांनी स्वतः ला भरुन टाकलंं. तर एक सकारात्मक विचार पुरेसा असतो  अनेक नकारात्मक विचारांना दूर करण्यासाठी.
    10 min
  • आत्मविश्वास वाढवण्याचे पाच सोपे मार्ग
    टीव्हीवर
     'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, 
    होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक' 
    हे गाणे लागले होते. त्या पिल्लाला कोणी खेळायला घ्यायचं नाही, ते एकटंच राहायचं. सगळे त्याला चिडवायचे. परंतु एके दिवशी जेव्हा त्याने आपली प्रतिमा पाण्यात पाहिली तेव्हा त्याला कळलं की तो वेगळा म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळा एक राजहंस आहे. 
    असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता असतात परंतु जोपर्यंत त्या क्षमतांवर विश्वास ठेवत नाहीत, स्वतःमध्ये डोकावून पाहत नाही, स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही की तुम्ही ही एक राजहंस आहात. त्यासाठी हा podcast नक्की ऐका
    .
    14 min
  • तेजस्वी जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी ---2
    जीवन म्हणजे जणू अविचाराने घडलेला एखादा अपघात असावा अशा रीतीने जीवन जगण्याचे थांबवा. जर आपल्याला अर्थपूर्ण यश प्राप्त करायचे असेल तर आपण कप्तान बनून आपल्या जीवनशैलीला नव्या दिशेने वळवायला हवे. आपण उत्तम सवयी लावून घ्यायला हव्यात, उच्च विचारसरणी अंगिकारायला हवी."
                                  ------ नित्झे
    तेजस्वी जीवन जगण्यासाठी च्या दहा दिनचर्या आपण पहात आहोत त्यातले पुढील पाच गोष्टी याप्रमाणे आहेत.
    8 min
  • तेजस्वी जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी ---1
    लॉक डाऊन च्या काळात बैठी जीवनशैली, जंक फूड, चमचमीत खाण्याचे पदार्थ, व्यायामाचा अभाव आणि क्रियाशीलतेला वाव नाही अशा सर्व गोष्टींमुळे या समस्या उद्भवत आहेत. तुम्ही सर्वजण अशा कोणत्या ना कोणत्या समस्यांमधून जात असाल. 
    तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. तुमचं जीवन आनंदी, परिपूर्ण रीतीने, सर्वोत्तम जगण्यासाठी आणि तेजस्वी होण्यासाठी तुम्ही काही दिनचर्येचे पालन करणे आवश्यक आहे.  या दहा महत्त्वाच्या दिनचर्या मी या Podcast मध्ये सांगितलेल्या आहेत. त्या दिनचर्या तुम्ही रोज केल्या तर नक्कीच तुमचं जीवन हे निरोगी, आनंददायी, परिपूर्णतेने तुम्ही जगाल.
    11 min
  • 7 Pillars of Self Care
    स्त्रियांना स्वतःची काळजी घेण्याचं कदाचित दडपण येत असेल, तुम्ही इतरांची काळजी घेता, तशी स्वतःची काळजी घेता का? कदाचित तुम्हाला या सर्व गोष्टी जाणवत असतील पण कसं करायचं हे समजत नसेल. मला या क्षणी नक्की काय हवंय हे लक्षात येत नसेल. तर हा Podcast तुमच्यासाठीच आहे. स्वतःची काळजी घेण्याचे हे सात पीलर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत जे तुम्ही तुमचं आयुष्य परिपूर्णतेने जगण्यासाठी नक्कीच मदत करतील.
    8 min

About आनंदी जीवन

From the publisher's feed

नमस्कार मी सुनिता नकाते आनंदी जीवन या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून मला महाराष्ट्रातील एक लाख महिलांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करणं हा माझा ध्यास आहे. आणि त्या…