काव्यकथा मराठी

काव्यकथा मराठी

By Kavita DeoghareArtsBooks
Download on the App Store

काव्यकथा मराठी episodes

  • देत रहा ! | Inspirational Marathi Story
    एक भिकारी होता.एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला. त्याला पाहून भिकाऱ्याने असा विचार केला की हा बराच श्रीमंत दिसतोय, याला भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल.
     
    भिकारी त्याच्यापाशी जाऊन भीक मागू लागला. भिकाऱ्याने त्याला भीक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून तो शेटजी म्हणाला, “तू तर नेहेमी इतरांना काहीना काही मागतच फिरतोस, पण कधी कुणाला काही देतोस तरी का?”तेव्हा तो भिकारी म्हणाला, “शेठजी, मी एक भिकारी आहे. मी नेहेमीच लोकांना भीक मागतच फिरतो. कुणाला कांही देण्याची माझी काय ऐपत असणार?”
     
    “अरे, तू जर कुणाला काहीच देऊच शकत नाही तर तुला भीक मागण्याचाही काही अधिकार नाही. मी स्वतः व्यापारी आहे, आणि माझा व्यवसाय देण्या-घेण्याचा आहे. भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखे कांही असेल तरच मी तुला भीक देईन.” शेटजी उत्तरले. इतक्यात स्टेशन आले आणि ते शेटजी स्टेशनवर उतरून निघून गेले. 
     
    इकडे भिकारी शेठजीच्या बोलण्यावर विचार करू लागला. शेठजींनी दिलेले उत्तर त्याच्या मनात घोळू लागले. त्याच्या मनात आले की शेटजी म्हणाले ते बरोबर असावे. मी कुणाला भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकत नाही, म्हणूनच मला अधिक भीक मिळत नसावी. पण शेवटी मी तर पडलो भिकारी, मी लोकांना काय देऊ शकणार? पण मग मी तरी किती दिवस लोकांना काही ना काही दिल्याशिवाय केवळ भिकच मागत राहायची?
     
    बराच वेळ विचार करून भिकाऱ्याने मनातल्या मनात विचार केला की यापुढे जी कुणी व्यक्ती आपल्याला भीक घालील त्याला काही ना काही मी जरूर देईन. पण काय द्यायचे? जी व्यक्ती स्वतःच भिकारी आहे, ती व्यक्ती इतरांना खरेच काय देऊ शकेल? दिवसभर हाच एक विचार त्याच्या मनात घोळत होता पण त्याला उत्तर सापडत नव्हतं.
     
    विचारांच्या तंद्रीतच तो दुसऱ्या दिवशी स्टेशनपाशी बसला होता. तेव्हढ्यात त्याचे लक्ष स्टेशनजवळील फुलांच्या झाडांकडे गेले. ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे? आपला हा विचार त्याला भलताच भावला आणि त्याने लगेच कांही फुले तोडून पिशवीत भरून घेतली.
     
     तो गाडीत शिरला आणि नेहेमीप्रमाणे भीक मागू लागला. जो कुणी त्याला भीक घालीत असे त्याला तो आपल्या पिशवीतील कांही फुले काढून देत असे. ती सुगंधी, ताजी फुले बघून लोक खुश होऊ लागले. आता आपण सुद्धा लोकांना भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकतो ही भावना त्याला सुखावू लागली. आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली.
     
    काही दिवसांतच त्याच्या लक्षात आले की त्याला आता अधिक भीक मिळू लागली आहे. तो रोजच्या रोज स्टेशनजवळील फुलझाडांची फुले तोडत असे आणि जो पर्यंत त्याच्यापाशी फुले असतील तोपर्यंत लोक भीक घालीत असत आणि फुले संपली की लोकसुद्धा भीक देत नसत.
     
    आता हे रोजचेच झाले होते. असेच एक दिवस गाडीत भीक मागत असतांना त्याला तोच सुटाबुटातील मनुष्य पुन्हा दिसला. तो लगेच त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला, “शेटजी, आज बघा मला तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत.
     
    तुम्ही मला आज भीक दिलीत तर बदल्यात मी तुम्हाला कांही फुले देईन.” शेटजीने त्याला भिकेमध्ये कांही पैसे दिले आणि त्याने बदल्यात दिलेली सुंदर फुले ठेवून घेतली. भिकाऱ्यातील हा बदल बघून शेटजी खुश झाले होते. ते म्हणाले, “व्वा! क्या बात है? आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास.” एव्हढं बोलून तो शेटजी गाडीतून स्टेशनवर उतरून चालता झाला. 
     
    पण त्या शेटजीने बोललेले एक वाक्य, “आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास”, त्याच्या मनात घर करून गेलं. तो सतत याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात तो खुश होऊ लागला. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसू लागली.
     
    आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकिल्लीच आपल्या हाती लागली आहे असे त्याला वाटू लागले.
     
    विचार करीतच तो गाडीखाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकीत तो स्वतःशीच मोठ्याने उद्गारला, “नाही, मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी. मी सुद्धा त्या शेटजीसारखा एक छान व्यापारी होऊ शकतो. मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो.” आसपासचे लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधी दिसला नाही.
     
    साधारणपणे एक वर्षानंतर याच स्टेशनवर दोन सुटाबुटातील माणसे आली आणि सोबतच गाडीत चढली. दोघांची नजरानजर झाली. त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्या माणसाला हात जोडून नमस्कार केला आणि स्मितहास्य करीत विचारले, “ओळखलंत मला?
    आता त्याच्याकडे पाहत तो दुसरा माणूस उत्तराला, “नाही, मला कांही आठवत नाही. आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत.”
    पहिला : “नाही, नाही! शेठजी. जरा आठवा. आज आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत.”
    दुसरा : “असं? मला तर कांही आठवत नाहीय
    6 min
  • आज का नाही?
    MotivationalStories
    Motivational Stories Marathi | प्रेरणादायी कथा:आज का नाही?
    Motivational Story Marathi | आज का नाही? | Inspirational Marathi Story
    Motivational story in Marathi for success
    Inspirational story in Marathi for success
    Motivational stories in Marathi for Students
    Short motivational stories in Marathi with moral
    मला एकाने विचारले कि motivational stories (Marathi) वाचून काय होते? ... मी उत्तर दिले कि motivational stories वाचून आपल्याला इतरांच्या चुका कळतात, जेणेकरून आपण त्या चुका परत करू नये याची शिकवण मिळते. म्हणूनच अधिकाधिक motivational stories Marathi आणि inspirational stories Marathi  वाचा.
    चला तर मग..! आज अशीच एक Marathi Motivation Story वाचूया...
    Marathi Motivational Story | आज का नाही? | Inspirational Story Marathi
    Motivational Stories Marathi | Inspirational Stories Marathi
    Inspirational Motivational Marathi Story: 
    Read Inspirational Motivational Marathi Story:  
    एक काळातली गोष्ट आहे कि एक शिष्य त्याच्या गुरूंचा खूप आदर-सन्मान करत असे. गुरूंना हि त्या शिष्य विषयी खूप प्रेम वाटत असे. परंतु तो शिष्य अभ्यासाविषयी खूप आळस करत होता.
    नेहमी अभ्यासापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून आजची कामे उद्यावर ढकलता येतील. 
    आता गुरुजींना पण त्या शिष्या विषयी खूप चिंता वाटू लागली होती, त्यांना हि भीती होती कि हा जीवनाच्या संघर्ष्यात हरणार तर नाही ना? आळसामध्ये कोणत्याही वक्तीला कर्मशुन्य बनवण्याची पूर्ण ताकत असते हे गुरुजी जाणून होते.
    अशी व्यक्ती कोणतेही कष्ट न करता फळाची अपेक्षा करत असते. आणि आलासी व्यक्तींमध्ये जलद निर्णय घेण्याची क्षमता नसते आणि जरी निर्णय घेतला तरी तो लगेच कामात आणणे त्यांना जमत नाही, आणि नशीबाने मिळणाऱ्या संधींचा फायदा उठवण्याच्या कलेमध्येही ते कुशल होतात.
    गुरूंनी आपल्या शिष्याच्या कल्याणासाठी त्याच्या मनात एक योजना आखली.
    एके दिवशी शिष्याच्या हातात काळ्या दगडाचा तुकडा देऊन गुरुजी म्हणाले - "मी तुला जादुई दगडाचा तुकडा दोन दिवसाठी देत आहे आणि मी दुसर्‍या गावात जात आहे. तु ज्या लोखंडी वस्तूला स्पर्श करशील त्याचे सोन्यात रुपांतर होईल. पण लक्षात ठेव सूर्यास्तानंतर दुसऱ्या दिवशी मी तो दगड तुझ्याकडून परत घेईन. "
    शिष्य हि संधी मिळाल्या मुळे खूप खुश झाला, परंतु आळशी असल्यामुळे त्याने पहिला दिवस हाच विचार करण्यात घालवला कि जेंव्हा त्याच्या जवळ भरपूर सोनं असेल त्यावेळी तो किती प्रसन्न, खुश आणि संतुष्ट असेल, एवढे नोकर चाकर असतील कि त्याला पाणी पिण्यासाठी सुद्धा उठाव लागणार नाही.
    दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठल्यावर त्याच्या पूर्ण लक्षात होते कि सोनं मिळवायचा आजचा शेवटचा दिवस आहे.
    त्याने मनाशी पक्का ठरवलं कि गुरुजींनी दिलेल्या काळ्या दगडाचा आज पुरे पूर फायदा उठवायचा. त्याने ठरवलं कि तो बाजारात जाईल आणि लोखंडाचे मोठं मोठे सामान विकत घेईन आणि त्याला सोन्यात परावर्तित करेन.
    दिवस पुढे सरत चालला होता, परंतु तो अजून ह्याच विचारात होता कि अजून खूप वेळ आहे आपल्याकडे, कधीही बाजारात जाऊन सामान घेऊन येऊ शकतो.
    त्याने ठरवलं कि दुपारचं जेवण झालं कि सामान घ्यायला बाजारात जायचे. परंतु जेवल्यानंतर त्याला विश्राम करण्याची सवय होती. आणि  त्याने बाजारात जाण्याऐवजी थोडा आराम करण्याचा विचार केला.
    परंतु आळशी असा तोह पूर्णपणे गाढ झोपी गेला, आणि जेंव्हा उठला तेंव्हा कळले कि सूर्यास्त होण्याच्या मार्गावर आहे.
    आणि आता तो वेगाने बाजाराकडे पळू लागला होता, परंतु रस्त्यातच त्याला गुरुजी भेटले आणि त्यांना बघता क्षणी त्यांचे पाय धरून तो त्यांची विनवणी करू लागला कि अजून एक दिवस त्याला तो दगड देण्यात यावा.
    पण गुरुजी ऐकायला तयार नव्हते आणि शिष्याच श्रीमंत व्हायचं स्वप्न हे स्वप्नच राहील. परंतु ह्या घटने वरून शिष्याला खूप मोठी समज मिळाली, त्याला त्याच्या आळशी स्वभावावर खूप वाईट वाटत होते.
    त्याला समजले कि आळस हा त्याच्या आयुष्याला शाप आहे.आणि त्याने प्रण घेतला कि तो आज पासून कोणत्याही कामापासून दूर पाळणार नाही आणि आयुष्यात कष्टाला खूप प्राध्यान्य देऊन एक सक्रिय व्यक्ती बनून दाखवेन.
    Moral of this Motivational Story Marathi
    मित्रांनो, जीवनात आपल्याला एकापेक्षा एक संधी उपलब्ध होत असतात, परंतु खूप लोग ह्या संधी केवळ आळसा मुळे वाया घालवतात.
    म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो कि जर तुम्हाला यशस्वी, आनंदी, श्रीमंत व्हायचं असेल तर आळस हा सोडावाच लागेल आणि आपल्यामध्ये विवेक, कर्म जागृती ह्यासारख्या गुणांना विकसित करायला हवे.
    जेंव्हा केंव्हाहि कोणतेही आवश्यक काम टाळण्याचा विचार तुमच्या मनात आला तर स्वतःला एक प्रश्न वि
    6 min
  • सुखी, आनंदी जीवनासाठी गीतेतील ५ अत्यंत उपयुक्त उपदेश
    Bhagavad Gita Bodh In Marathi सुखी, आनंदी जीवनासाठी गीतेतील ५ अत्यंत उपयुक्त उपदेश भारतीय तत्त्वज्ञान हे कालातीत आहे. देशात अनेक धर्म, जाती, पंथाचे नागरिक अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. प्रत्येक धर्मात सांगितलेले तत्त्वज्ञान अतिशय मोलाचे असल्याचे पाहायला मिळते. भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अगदी कानाकोपऱ्यातून संशोधक, अभ्यासक, विचारवंत देशात येत असतात. देशातील अनेक प्रमुख ग्रंथांमध्ये वरचे स्थान असलेला ग्रंथ म्हणजे भगवद्‍गीता. गीतेतील शिकवण ही कालातीत असून, आजच्या काळातही गीताज्ञान किती अमोघ, अनमोल आणि अमूल्य वाटते, याची प्रचिती अनेकांना येत असते. 
    हजारो वर्षे लोटली तरी, गीताज्ञानाची महती, उत्सुकता, महत्त्व कमी होताना दिसत नाही. आजच्या काळातही अनेक विचारवंत, तत्त्वज्ञ गीतेवर संशोधन करताना दिसतात. गीतेवर देशभरात अनेक अन्य ग्रंथ, टीका ग्रंथ रचण्यात आले. यावरूनही गीतेची थोरवी अधोरेखित होते, असे सांगितले जाते. कलियुगातही गीता तितकीच महत्त्वाची असल्याचे दिसून येते. सुखी आणि आनंदी जीवनासाठी गीतेतील काही उपदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. नेमके काय म्हटलेय गीतेत? जाणून घेऊया... 1. ​कर्म हाच अधिकार
    कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
    मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥
    भावार्थ : तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे. त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको; (पण) कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको.
    याचा अर्थ असा की, मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रीत करावे. वर्तमानात मेहनत, परिश्रम घेतले, तरच भविष्यात सुफलप्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते. 2. ​कर्म हाच अधिकार
    कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
    मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥
    भावार्थ : तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे. त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको; (पण) कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको.
    याचा अर्थ असा की, मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रीत करावे. वर्तमानात मेहनत, परिश्रम घेतले, तरच भविष्यात सुफलप्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते. 3. ​कोणाचाही द्वेष करू नका
    
    यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
    शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः॥
    भावार्थ : असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही. तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्मांचा त्याग करतो. तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे.
    याचा अर्थ असा की, एखादे कार्य मनाप्रमाणे पार पडल्यानंतर अति आनंदीत होता कामा नये. अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते. तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्ष्याही करू नये. मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो. 4. ​संयम आणि नियंत्रण आवश्यक
    
    कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्।
    इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते॥
    भावार्थ : मनुष्य हा वरवर इंद्रियांवर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो. मात्र, मनातून तो त्यांचेच चिंतन करत असतो वा त्या विषयी विचार करतो, तो दांभिक मानला जातो.
    याचा अर्थ असा की, दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्यवचनी आणि कपटी असल्याचे म्हटले जाते. खऱ्या अर्थाने इंद्रियांवर नियंत्रण मिळण्याची कला अवगत करता आली पाहिजे. इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे अपेक्षा, आशा, इच्छा, आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय. असे केल्याने समाधान, खऱ्या, निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते. 5. ​श्रद्धा, सबुरी, विश्वास ठेवा
    
    एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः।
    सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः॥
    भावार्थ : जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरुपाचे आणि योगशक्तीचे तत्त्व जाणतो, तो निश्चल भक्तियोग युक्त होतो. यात कोणतीही शंका नाही.
    याचाच अर्थ असा आहे की, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो. भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही.
    7 min
  • आव्हानांचा सामना करणं म्हणजेच जीवनाचा वास्तविक विकास
    आव्हानांचा सामना करणं म्हणजेच जीवनाचा वास्तविक विकास
    आमच्या घरात वरच्या मजल्यापासून ते खालपर्यंत ४५ शिड्या आहेत ज्यात वळणाच्या रुपात पाच अडथळे आहेत. अनेकदा मनात विचार येतो की हे वळणे किंवा अडथळे नसते तर किती सोपं झालं असतं. चढ-उतार करणं सोपं आणि लवकर झालं असतं. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. जसं शिड्यांवरून उतरु लागलो पाय घसरला आणि वेगाने आठ शिड्या पार करत सरळ पहिल्या वळणावर आलो. जर शिड्यामध्ये वळणं नसती तर सर्व ४५ शिड्यांवरून घरंगळत, आदळत-आपटत थेट जमिनीवर येऊन थांबलो असतो आणि माझी काय अवस्था झाली असती याचा विचारही न केलेला बरा. शिड्यांची वळणं असोत किंवा रस्त्यावर तयार केलेले गतिरोधक असोत, चौकात लागलेले सिग्नल असोत किंवा वाहनांच्या तपासणीसाठी उभारलेले तपासणी नाके असोत हे आपल्या जीवनात अडथळे निर्माण करतात, पण सोबतच आपल्याला नियंत्रित करण्यात सहाय्यक ठरत असतात.
    जीवनात अडथळेही आवश्यक आहेत. जीवनात जर अडथळे किंवा गतिरोधक नसतील तर आपण अमर्याद वेगाने धावायला सुरुवात करू आणि अनेक विविध प्रकारच्या दुर्घटनांना बळी पडू. लाल सिग्नल लागल्यावर थांबणे आवश्यक आहे, पण यामुळे आपण अव्यवस्था आणि ट्रॅफिक जाम पासून वाचू शकतो. गतिरोधक आपल्या अनियंत्रित गतीला नियंत्रित करतात आणि ते आपला दुर्घटना होण्यापासून बचाव करतात. तपासणी नाका आणि विविध प्रकारच्या तपासणी एजन्सी नसत्या तर आपली असंविधानिक व अनैतिक कामे करण्याच्या शक्यता वाढल्या असत्या. कोणते ना कोणते भौतिक गतिरोधक किंवा मानसिक दबावामुळेच आपण अपेक्षित नियमांचे पालन करून चांगले नागरिक झालो आहोत. तसं पाहता आपण जीवनात अनियंत्रित होऊन सतत पळत राहिलो तर आपण किती पळू शकणार आहोत? लियो टॉल्सटॉयच्या गोष्टीतील एक प्रमुख पात्र अधिक जमीन मिळवण्याच्या नादात पूर्ण दिवस अनियंत्रित वेगाने पळू लागतो पण अखेर त्याला आपले प्राण गमवावे लागतात. धावल्यानंतर थकवा येणं स्वाभाविक आहे. आता विश्रांती घ्यावी असे ठरवणेही गरजेचे आहे. काम करून थकल्यानंतर योग्य वेळी विश्रांती घेतली तर आयुष्यभर धावू शकतो आणि जीवनाच्या शर्यतीत खरोखर आगेकूच करू शकतो. यासाठी विश्रामरुपी गतिरोधक आवश्यक आहे. जीवनात सतत काम करत राहाल, पैसेही कमवाल पण शारीरिक स्वास्थ, मानसिक सर्तकता व भावनात्मक संतुलनाकडे लक्ष न दिल्यास सतत तणाव आणि चिंतेने ग्रासलेले असाल तर अशा कमाईचा काहीही उपयोग होणार नाही? जीवनात संतुलन राखणे गरजेचे आहे. जीवनात विविध प्रकारचे अडथळे किंवा बाधा संतुलन मिळविण्याच्या संधी प्राप्त करून देत असतात. हे अडथळे सांगत असतात की, जीवनात बाहेरील अडथळ्यांशिवाय अंतर्गत अथवा मानसिक अडथळ्यांना दूर करणे किती महत्त्वाचेआहे.
    आपण आयुष्यात किती धावलो त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे की, आपण किती अडथळे पार केले. अडथळेरहित जीवनापेक्षा आव्हानयुक्त जीवन चांगलं आहे कारण आव्हानांचा स्वीकार करण्यातच जीवनाचा वास्तविक विकास शक्य आहे. आव्हांनाशिवाय आपण कोणताही नवी गोष्ट शिकू शकणार नाही किंवा विषम परिस्थितीत त्याच्याशी झगडण्याचा संकल्प किंवा साहस आपण करू शकणार नाही. अडथळे आपल्याला मागे वळून पाहण्यात आणि आत्मपरीक्षण किंवा पुर्नमूल्यांकन करण्याची संधी देत असतात.
    5 min
  • चाणक्य की 10 बातें जो आपका जीवन बदल सकती है !
    चाणक्य की 10 बातें जो आपका जीवन बदल सकती है ! 1. मुर्ख लोगो से कभी विवाद न करे..मुर्ख लोगो से कभी विवाद न करे :
    चाणक्य कहते है कि हमें कभी भी मुर्ख लोगो के साथ विवाद नहीं करना चाहिए. मुर्ख लोगो के पास बिलकुल भी समझदारी नहीं होती अगर आप उनसे विवाद करेंगे तो नुकसान आपका ही होगा. ऐसे लोगो के साथ बहस होने पर आपकी इज्जत कम हो जाएगी. ऐसे लोग आपको मानसिक तौर पर कमजोर कर सकते है. मुर्ख लोगो से विवाद से बचना हो तो चुप रहे और अपने विवेक से काम ले. इसलिए कभी भी मुर्ख लोगो से विवाद न करे. 2. वर्तमान में जीवन बिताओ.... वर्तमान में जीवन बिताओ :
    आचार्य चाणक्य कहते है ” हमें भूत के बारे में कभी भी पछतावा नहीं करना चाहिए, न ही भविष्य की चिंता होनी चाहिए. विवेकवान व्यक्ति हमेशा वर्तमान में जीते हैं ”. अगर आपको अपना जीवन सुखी जीना है तो हमेशा आज में जियें. आपके पास न तो आने वाला कल है और न हीं बिता हुआ कल. आपके पास बस एक ही चीज है वह है – आज. जो बीत गया उसके बारे में पछतावा करते रहोगे तो खुद को ही दुखी करोगे.
    बिता हुआ कल अब याद करके वापस तो आने वाला है नहीं. इसलिए बीते कल के बारे में सोचना व्यर्थ है. अगर आप आने वाले कल के बारे में सोचते हो तो वह भी आपको चिंतित ही करेगा. भविष्य के बारे में सोचकर आप अपना आज ख़राब न करे.
    आपके पास सिर्फ अभी का पल है इसलिए इसे जियें. इस पल को ऐसे कार्य में लगाये जो आपके जीवन को बेहतर बनाये. आप अपने आज को सवारते रहो आपका आने वाला कल अपने आप सही होता जायेगा.... 3. अपने से कम या ज्यादा प्रतिष्ठा के लोगो से दोस्ती न करे..अपने से कम या ज्यादा प्रतिष्ठा के लोगो से दोस्ती न करे :
    आचार्य चाणक्य कहते है कि ” कभी भी उनसे मित्रता मत कीजिये जो आपसे कम या ज्यादा प्रतिष्ठा के हों. ऐसी मित्रता कभी आपको ख़ुशी नहीं देगी ”. जो लोग आपसे कम प्रतिष्ठा रखते है उनसे अगर आप दोस्ती करोगे तो आप हमेशा परेशानी में ही रहेंगे. ऐसे मित्र आपसे हमेशा मदद की उम्मीद रखेंगे और आपका फायदा लेने की सोचेंगे. अगर आप कभी संकट में होंगे तो ऐसे मित्र आपकी कुछ help भी नहीं कर पाएंगे.
    वही आपसे अधिक प्रतिष्ठा के लोगो से दोस्ती करने पर आप हमेशा अपने मित्र के साथ अपनी तुलना में लगे रहेंगे और आपके अंदर ईर्ष्या का भाव रहेगा. आप उसके सामने खुद को हमेशा छोटा समझोगे जो आके आत्मसम्मान के लिए ठीक नहीं है. अगर मुसीबत के समय कभी वह आपकी हेल्प न कर पाए तो आपको अपनी मित्रता पर गुस्सा आएगा. इसलिए इस बात का ध्यान रखे की आपका मित्र आपके लेवल का ही हो.... 4. खुश रहना है तो लगाव से दूर रहे. खुश रहना है तो लगाव से दूर रहे :
    आप मानो या न मानो पर अधिकांश लोग आज खाने – पीने के लिए दुखी नहीं है बल्कि अपने रिश्तो के कारण दुखी रहते है. जिसका मन उसके साथ नहीं होता वह व्यक्ति दुखी रहता है और इस दुःख का कारण है – लगाव. आचार्य चाणक्य कहते है ” जो अपने रिश्तो के साथ अत्यधिक जुड़ा हुआ होता है, उसे भय और चिंता का सामना करना पड़ता है. सभी दुखों कि जड़ लगाव है ”.
    जब आप किसी के साथ लगाव रखते हो तो आप माया – मोह के चक्र में फंस जाते हो और यही आपके दुखो का कारण होता है. चाणक्य की बातें वर्तमान माहौल में सटीक बैठती है. आजकल हमें देखने को मिलता है कि आज का युवा Relationship में रहने लगा है.
    अपनी नौजवानी की Age में वह रिश्ते में रहने लगा है और जब इस रिश्ते में थोड़ी सी भी आपसी खींचतान या झगड़ा होता है तो वह तनाव लेकर बैठ जाते है. उसे अपने पार्टनर को खोने का भय रहता है और इस चिंता में वह टेंशन में डूबा रहता है.
    वे खुद के लिए जीने के बजाय आपसी लगाव में फंस जाते है. अगर यह लगाव नहीं होगा तो वह अपने लिए वक़्त निकालेगा. खुद को Improve करेगा और अपने करियर में सफल होएगा. इसलिए आपको अगर अगर खुश रहना है तो उस रिश्ते से बाहर निकलने की सोचे जिससे आपको बहुत ज्यादा लगाव है... 5. जो बात न सुने उस पर विश्वास न करे..जो बात न सुने उस पर विश्वास न करे :
    आपने कई लोगो को देखा होगा जो आपके साथ बैठे रहते है. आपसे बाते करते है. आपने अपनी कोई महत्वपूर्ण बार रखी और वह उसे गौर से सुनने के बजाय अनदेखा करे तो समझ ले की यह इन्सान आपको धोखा जरुर देगा. ऐसे लोगो पर विश्वास करने से बचे. इन लोगो को सिर्फ वही बात बताये जिन्हें आप हर किसी के साथ शेयर कर सकते हो.
    अपनी निजी या important बातो को ऐसे लोगो से करने से बचे. अगर आपने ऐसे लोगो को अपनी जरुरी बातें बता दी तो समझ लो की अब आपकी ये बातें निजी नहीं रही. ऐसे लोग इन बातो दूसरो को भी बता देते है. इन लोगो पर Vishvas न करे.. 6. आलस्य को त्याग दे... आलस्य को त्याग दे
    14 min
  • कणा- कुसुमाग्रजांची
    विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर(जन्म : नाशिक, २७ फेब्रुवारी १९१२; मृत्यू : १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक,नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्त्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. मराठी कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. कुसुमाग्रजांची कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे. ओळखलत का सर् मला पावसात आला कोणी
    कपडे होते कर्दमलेले केसावरति पाणी
    क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन
    गंगामाई पाहुणि आलि गेली घरटयात राहुन
    माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतित नाचली
    मोकळ्या हाती जाईल कशी बायको माञ वाचली
    भिंत खचली चूल वीझली होते नव्हते नेले
    प्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी माञ ठेवले
    कारभारणीला घेऊण संगे सर आता लढतो आहे
    पडकी भिंत बान्धतो आहे चिखल गाळ काढतो आहे
    खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
    पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला
    मोडून पडला संसार तरि मोडला नाहि कणा
    पाठीवरती हात ठेउन नुसते लढ म्हणा.
    _कुसुमाग्रज
    2 min
  • मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते
    Suresh Bhat (Marathi: सुरेश भट; 15 April 1932 – 14 March 2003) was a noted Marathi poet from the state of Maharashtra, India. He was known as Ghazal Samrat (Emperor of ghazals) for his exposition of the ghazal form of poetry and its adaptation to the Marathi language. Suresh bhatt kavita Bhat was born in a Karhade Brahmin family inAmravati, Maharashtra to Shridhar Bhat, aphysician. His mother was fond of poetry and made young Bhat learn famous Marathi poems by heart. He later acknowledged this practice to be a key influence in the development of his poetic abilities.[citation needed]
    When he was two and a half years old, Bhat contracted polio. The disease left his right leg incapacitated for the remainder of his life.[citation needed]
    Bhat completed his education in Amravati, and earned a B.A. degree in 1955 after failing twice in his final exams. He said later that due to his physical disability and lack of interest in academics, he often suffered humiliation at home. According to him, his poems were the only source of comfort for him during such times of bitterness and depression.[citation needed]
    After graduation, Bhat continued writing poems whilst holding various teaching jobs inRural areas around Amravati.[citation needed]
    Suresh Bhat converted to Buddhism with the help of Bhante Surai Sasai. Because of Buddhism was the religion of Babasaheb Ambedkar, who was an ideal to him.[1][2]
    In his private life, Bhat made no bones about his hurt over the rejections and embarrassment that he suffered earlier in life, and said that he was not someone who forgives or forgets easily. His poems reflect his angst about human suffering, and due to their fiery nature, are generally popular amongst the youth.[citation needed]
    He had two sons and a daughter. One of them predeceased him when he was killed in an accident.[citation needed]
    Suresh Bhat died of cardiac arrest on 14 March 2003. He was 70.[3]
    जगत मी आलो असा
    जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
    एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!
    जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
    सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!
    कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
    पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!
    सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
    एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!
    स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
    एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!
    वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
    सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!
    संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
    लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!
    (रंग माझा वेगळा  ह्या काव्यसंग्रहातून)
    आकाश उजळले होते
    इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
    मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
    ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
    मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते
    गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
    (पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)
    मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
    मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
    याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
    मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते
    नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
    नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते
    घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
    जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते
    मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
    मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते
    (एल्गार)
    5 min
  • पिपात मेले ओल्या उंदीर
    Ba si mardhekar yancha jayanti nimittane aswad gheuya tyancha eka Sundar kavitecha. पिपात मेले ओल्या उंदिर;
    माना पडल्या, मुरगळल्याविण;
    ओठावरती ओठ मिळाले;
    माना पडल्या, आसक्तीविण.
    गरिब बिचारे बिळात जगले,
    पिपात मेले उचकी देउन;
    दिवस सांडला घाऱ्या डोळी
    गात्रलिंग अन धुऊन घेउन.
    जगायची पण सक्ती आहे;
    मरायची पण सक्ती आहे.
    उदासतेला जहारी डोळे,
    काचेचे पण;
    मधाळ पोळे
    ओठावरती जमले तेही
    बेकलाइटी,बेकलाइटी!
    ओठावरती ओठ लागले;
    पिपात उदिर न्हाले! न्हाले!
    कवी : बा. सी. मर्ढेकर
    3 min
  • बहिणाबाईंच्या कविता
    बहिणाबाई चौधरी (जन्म : इ.स. १८८०; मृत्यू : ३ डिसेंबर, १९५१) ह्या पूर्व खानदेशात (आताच्या जळगांव जिल्ह्यातील) असोदा येथे जन्मलेल्या कवयित्री होत्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई 'लेवा गण बोली'त आपल्या कवीता करत व त्यांचे चिरंजीव सोपान चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.
    त्यांच्या कविता मराठी साहित्यातील अनमोल साठा आहे.
    सुगरणीचा खोपा
    अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
    देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला !
    पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला
    तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला !
    सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर
    तिले जाल्माचा संगती मिये गाण्य गम्प्या नर
    खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा
    पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा!!
    तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ
    तुला देले रे देवान दोन हात दहा बोटं ???
    मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर ही बहिणाबाईंची प्रसिद्ध कविता आहे. अनेक पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश होता. अभ्यासक्रमात या कवितेला विशिष्ठ महत्व होतं.
    मन वढाय वढाय
    उभ्या पीकांतलं ढोर,
    किती हांकला हांकला
    फिरी येतं पिकांवर.
    मन मोकाट मोकाट
    त्याले ठायीं ठायीं वाटा,
    जशा वार्‍यानं चालल्या
    पान्यावर्‍हल्यारे लाटा.
    मन लहरी लहरी
    त्याले हातीं धरे कोन?
    उंडारल उंडारलं
    जसं वारा वाहादन.
    मन जह्यरी जह्यरी
    याचं न्यारं रे तंतर,
    आरे इचू, साप बरा
    त्याले उतारे मंतर !
    मन पांखरू पांखरूं
    त्याची काय सांगूं मात ?
    आतां व्हतं भुईवर
    गेलं गेलं आभायांत.
    मन चप्पय चप्पय
    त्याले नहीं जरा धीर,
    तठे व्हयीसनी ईज
    आलं आलं धर्तीवर.
    मन एवढं एवढं
    जसा खाकसचा दाना,
    मन केवढं केवढं ?
    त्यांत आभाया मायेना.
    देवा, कसं देलं मन
    आसं नहीं दुनियांत !
    आसा कसा रे यवगी
    काय तुझी करामत !
    देवा, आसं कसं मन ?
    आसं कसं रे घडलं
    कुठे जागेपनीं तुले
    आसं सपन पडलं !
    अरे संसार संसार
    अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
    आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।
    अरे संसार संसार, होटा कधी म्हनू नाही
    राउळीच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नाही ।
    अरे संसार संसार, नाही रडन कुढन
    येड्या, गयांतला हार, म्हणू नकोरे लोढनं ।
    अरे संसार संसार, खिरा येला वरचा तोड
    एक तोंडामधी कडू, बाकि लागतो रे गोड ।
    अरे संसार संसार, म्हनू नकोरे भिलावा,
    त्याले गोड भिम फुल, मधी गोडंब्याचा ठेवा ।
    देखा संसार संसार, शेंग वरतून काटे,
    अरे वरतून काटे, मधी चिकणे सागर गोटे ।
    एक संसार संसार, दोन्ही जिवांचा इचार,
    देतो सुखाले नकार, अन् दुखाले होकार ।
    देखा संसार संसार, दोन्ही जिवांचा सुधार
    कदी नगद उधार, सुखदुखःचा बेपार ।
    अरे संसार संसार, असा मोठा जादुगर
    माझ्या जिवाचा मंतर, त्यच्यावरती मदार ।
    असा संसार संसार, आधी देवाचा इसर
    माझ्या दैवाचा जोजर्, मग जिवाचा आधार ।
    माझी माय सरसोती
    माझी माय सरसोती माले शिकवते बोली
    लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !!
    माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता --भागवत
    पावात समावत आणि मातीमधी उगवत !!
    आरे देवाचं दर्सन झालं झालं आपसुक
    हिरीदात सुर्याबापा दाये अरूपाच रूप !!
    तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी
    देवा तुझ येनजान वारा सांगे कानामधी !!
    फुलामधी समावला धरत्रीचा परमय
    माझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय !!
    किती रंगवशी रंग रंग भरले डोयात
    माझ्यासाठी शिरिरंग रंग खेये आभायात !!
    9 min

About काव्यकथा मराठी

From the publisher's feed

This is the world of sometimes hindi and sometimes marathi kavita and sometimes stories also. it's just a trial of expressing feelings, emotions of a person in his/her day to day life. I am sure you…