"राज"कारण " Rajkaran

"राज"कारण " Rajkaran

Download on the App Store

"राज"कारण " Rajkaran episodes

  • कुणी केली पोलिसांची हाफ पँट बंद

    पोलिसांची हाफ पँट बंद करणं असो वा मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र लावणं असो…किंवा रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन असो….एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला होता….कोण होता हा नेता……

    15 min
  • तुरुंगात साखरपुडा झालेला मुख्यमंत्री (Know about Maharashtra ex CM Babasaheb Bhosale)

    बॅ. ए. आर. अंतुले यांना सिमेंट घोटाळ्यात राजीनाम द्यायला लागल्यानंतर तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एका नव्या चेहेऱ्याला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती….या नेत्याला का मिळाली ही संधी घेऊयात जाणून……

    14 min
  • मुख्यमंत्री पद नाकारणारे असेही दादा | The Maharashtra Politician who denied CM Post for Values

    सध्या सत्ता आणि खुर्चीसाठी पक्ष बदलणं....गट-तटांचं राजकारण करणं हे खूपच वाढलंय...पण चालून आलेले मुख्यमंत्रिपद नाकारणारा, पण आपला पक्ष न सोडणारा, आपल्या विचारसरणीशी प्रतारणा न करणारा असा नेता एकेकाळी महाराष्ट्रानं पाहिला....कोण होता हा नेता...घेऊयात जाणून....

    13 min
  • गद्दारीचे "फळ"

    आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या गटात असलेल्या छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि बाळासाहेबांनी त्यांना धूळ चारण्याचा निर्धार केला….त्याच्या समोर आलेल्या नवख्या उमेदवारानं भुजबळांना धोबीपछाड दिली…त्याची ही कहाणी

    12 min
  • पराभव राजकारणातल्या एका दिग्गजाचा How Shivraj Patil Chakurkar Defeted in 2004 Elections

     शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसमधलं मोठं नाव….देशाचे गृहमंत्री, लोकसभेचे सभापती अशी पदं भूषवलेला हा नेता…..तब्बल सात वेळा लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या चाकूरकरांना २००४ च्या निवडणुकीत मात्र पराभवाची धूळ चाखावी लागली….ती कशी याची ही कहाणी

    12 min
  • लातूरकरांचा चिमटा आणि मातब्बराचा पराभव How Vilasrao Deshmukh lost Election in Latur

    कैलासवासी विलासराव देशमुख हे एकेकाळचे मराठवाड्यातले मातब्बर नेते. पण त्यांनाही एकदा पराभवाची चव चाखायला लागली होती. ती कशी यामागची ही कारणमिमांसा

    11 min
  • धर्माधारित ध्रुवीकरण की जात आधारित ध्रुवीकरण | Polarization based on religion or caste?

    निवडणुकीतील मतांचं ध्रुवीकरण आणि जातींच्या आधारावर होण्याचा इतिहास पाहता जातगणना आणि ओबीसींचं उपवर्गीकरण या दोन्ही बाबी आता राजकारणात संवेदनशील बनायला लागतील. भाजपला रोखू पाहणाऱ्या उत्तर भारतातील प्रादेशिक पक्षांना, यानिमित्तानं जातगणना व्हावी; तशी ती झाली तर आपोआपच राजकारणाच्या मध्यावर जात हा घटक येईल आणि तो भाजपला हव्या त्या ध्रुवीकरणाच्या विरोधात जाणार असल्यानं त्याचा लाभ होईल असं वाटतं. अशी गणना टाळण्याकडे भाजपचा कल आहे. हा टकराव निवडणुकीच्या तोंडावर वाढत जाईल

    17 min
  • अविश्वास ठराव….की प्रचाराचा धुरळा (Analysis of No Confidance Motion by Opposition against Modi Government in Parliament

    लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आला त्यावेळी त्या चर्चेतून काही ठोस निघेल….सरकारची काही मुद्यांवरची भूमिका स्पष्ट होईल अपेक्षा होती….मात्र, त्या सगळ्या चर्चेतून केवळ चिखलफेकीशिवाय काहीच निघालं नाही….

    15 min
  • आघाड्यांचे राजकारण पुन्हा रंगणार? Coalition Politics on card in India

    निवडणूका जिंकताना अंकगणित जमावं लागतं. तसंच लोकाना आवडेल असा कार्यक्रम, जातधर्माची गणितं आणि नेतृत्वाची मतदारांवर प्रभाव टाकण्याची क्षमता, अशा अनेक बाबी लागतात. आता एनडीए आणि इंडिया या दोन आघाड्या पुढं येत असताना अंकगणित आणि वैचारिक लढाईतील रणरेषा ठरवण्याचा प्रयत्न सध्या स्पष्ट दिसतोय. सध्याचा काळ पाहता पुन्हा एकदा आगामी काळात आघाड्यांना महत्त्व येणार आहे असं चित्र आहे

    16 min
  • संवेदना हरवल्यात? | Manipur Violence and Political Sensitivity

    मणिपूर अखेर देशाच्या सार्वजनिक चर्चाविश्‍वात ठळकपणे आलं......मणिपूरातील दोन महिलांवरील नृशंस अत्याचाराचे तपशील आता पुरेसे बाहेर आले आहेत ते बाहेर यायला दोन अडीच महिने गेले इथंच खरंतर सरकार नावाची चीज करते काय? त्यांची सारी यंत्रणा, सारा गुप्तचर विभाग, मणिपूरचं आणि केद्रातलं गृहखातं करतं काय? असेच प्रश्‍न उपस्थित करणारं आहे

    13 min

About "राज"कारण " Rajkaran

From the publisher's feed

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.