Radio Haritpane

Radio Haritpane

Download on the App Store

Radio Haritpane episodes

  • शाश्वत शेती व्यवस्थापनासाठी मिश्र शेती बाबत...
    आज आपण चर्चा करणार आहोत, मिरेवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथील तरुण अभ्यासू शेतकरी श्री अजित कोरडे यांचे सोबत.
    फ्रुटवाला बागायतदा, आणि फेसबुक युट्युबवर दादा कायम शेतकरी हितासाठी तांत्रिक माहीती कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करत असतात.
    टोमॅटो व्हायरस बाबत टास्क फोर्स मधे देखील त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
    उस शेती ज्या ठिकाणी एक प्रमुख पिक, अशा भागात टोमॅटो पिकाची शेती करत असतांना, टोमॅटो लागवडीतील अन्नद्रव्य व्यवस्थापन, रोग व किड नियंत्रण या सोबतच टोमॅटो मार्केट चा सखोल अभ्यास करतात.
    त्यांच्या कडून जाणून घेवुया, शाश्वत शेती व्यवस्थापनासाठी ते जे अनेक प्रयोग करत असतात त्यातील एक मिश्र शेती बाबत...
    28 min
  • श्री. प्रविण महाजन, ऐनपूर ता. रावेर जि. जळगाव यांची मुलाखत
    केळीच्या टिश्यु कल्चर रोपांची ज्या बोटावर मोजण्या इतक्या शेतकरी बांधवांनी पहिली लागवड केली त्यांच्या पैकी एक ज्यांना सर्वच जण प्रेमाने मामा म्हणुन ओळखतात आणि ज्यांचे कडे ऐनपुर मधिल पहिले केळीचे टिश्यु कल्चर रोप लागले त्या, श्री. प्रविण महाजन यांचे कडुन जाणुन घेवुया केळी टिश्यु कल्चर रोपाच्या पहिल्या लागवडीचा आणि त्यांच्या एकंदर वाटचालीचा अनुभव.
    10 min
  • प्लांट वेस्ट सोनं आहे.
    पहिल्या एपिसोड मधे सेंद्रिय खते आणि रासायनिक खते यांचे संतुलन साधुन कशा प्रकारे शेती केली जावु शकते हे आपण जाणुन घेतले. आजच्या एपिसोड मधे आपण जाणुन घेणार आहोत, जेथे शेणखत महाग आहे किंवा मिळणे मुश्किल होते, अशा भागातील शेतकरी बांधवांच्या साठी प्लांट वेस्ट मटेरियल (पुर्व पिकाचे अवषेश) वापरुन कशा प्रकारे मातीचा सामु, ईसी सकारात्मक होतो, आणि खतांच देखिल बचत होते. आजच्या एपिसोड मधे ऐका, श्री. ऋशिकेश महाजन, रा. नायगांव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव यांची मुलाखत.
    9 min
  • प्लांट वेस्ट मटेरियल सोनं आहे.
    पहिल्या एपिसोड मधे सेंद्रिय खते आणि रासायनिक खते यांचे संतुलन साधुन कशा प्रकारे शेती केली जावु शकते हे आपण जाणुन घेतले. आजच्या एपिसोड मधे आपण जाणुन घेणार आहोत, जेथे शेणखत महाग आहे किंवा मिळणे मुश्किल होते, अशा भागातील शेतकरी बांधवांच्या साठी प्लांट वेस्ट मटेरियल (पुर्व पिकाचे अवषेश) वापरुन कशा प्रकारे मातीचा सामु, ईसी सकारात्मक होतो, आणि खतांच देखिल बचत होते. आजच्या एपिसोड मधे ऐका, श्री. ऋशिकेश महाजन, रा. नायगांव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव यांची मुलाखत.
    9 min
  • टायटल- शाश्वत खत व्यवस्थापन...
    ऊसा पेक्षा थोड कमी खादाड अस जे पिक - केळी,
    या पिकाची अन्नद्रव्यांची गरज शेणखत आणि गरज असेल तेव्हा रासायनिक खत यातून पुर्ण करून, मातीचे शाश्वत संगोपन आणि संवर्धन साधणारे
    श्री. शेखर चौधरी, रा. तांदलवाडी, ता. रावेर, जि. जळगाव यांची मुलाखत.
    17 min
  • Subject: श्री सुरेशअण्णा कबाडे यांचे कडून जाणून घ्या, एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे रहस्य...
    Discription:
    सन २००५ पासून दरवर्षी सतत १०० टन आणि अनेकवेळा त्या पेक्षा जास्त उत्पादन मिळवणा-या कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित आदर्श शेतकरी श्री सुरेशअण्णा कबाडे यांची मुलाखत.
    25 min
  • विषय - बुरशीनाशक खर्च कमी आणि शाश्वत रोग नियंत्रण- श्री अरविंद खोडे.
    हजारो द्राक्ष बागायतदारांच्या बुरशीनाशक खर्चात बचत करून, शाश्वत रोग नियंत्रण आणि निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी प्रभावी ठरलेल्या कॉन्टॅक्ट थेअरी चे प्रचारक श्री. अरविंद खोडे यांची मुलाखत.
    9 min
  • विषय - जिवाणू आणि बुरशी खरच वाढवता येतात का? आणि ते पिकासाठी खरच फायदेशिर ठरतात का?
    उपयुक्त जिवाणू हे मातीत वरून टाकाने खरच चुकीचे आहे,ते शेणात, गुलाचा पाण्यात, वाढून वापरावे या सारखे समाज गैरसमज उपयुक्त जिवाणू बाबत आहेत ,जाणून घेऊया जिवाणूंच्या विश्वा बाबत , आणि ते खरोखर उपयोगी ठरतात का?
    23 min
  • विषय -पावसाच्या वातावरणात पिकावरील रोग नियंत्रणात सूक्ष्मजीवांचे महत्व.
    पावसाच्या कमी तापमानाच्या आणि जास्त आद्रतेच्या वातावरणात पिकावरील रोग्नियांत्रान कठीण होऊन जाते तर जाणून घेऊया निसर्गाच्या मदतीने पावसाच्या वातावरणात रोग नियंत्रण कशा प्रकारे करता येईल.या बद्दल सविस्तर माहिती...
    12 min

About Radio Haritpane

From the publisher's feed

भारत के किसान भाईयो के लिये, खेती संबंधी जानकारी देने वाला पॉडकास्ट|