यंदाची मंडळातली मराठी एकांकिका स्पर्धा गाजली ती हिरीरीने उतरलेल्या ५ संघांच्या उत्तमोत्तम नाटिकांमुळे. स्पर्धेच्या निकालाचं महत्वाचं आणि जोखमीचं असं काम करुन झाल्यावर एक परीक्षिका रुपाताई ह्यांना थोडी 'वेल्लेगिरी' करायची हुक्की आली आणि त्यांनी त्यांच्या स्वत:च्या खुमासदार विनोदी शैलीत प्रत्येक एकांकिकेचा कसा समाचार घेतला ते ऐकूया ह्या धमाल मुलाखतीत.