Solid Joys

Solid Joys

By Alethia4India
Download on the App Store

Solid Joys episodes

  • 18 August : कठीण आज्ञां पाळण्याची आशा धरा

    “जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल. . . त्यानें वाइटाकडें पाठ फिरवून बरे ते करावे.” (1 पेत्र 3:10-11)

    आपण येशूच्या आज्ञा का पाळत नाहीं याचे एकच मूळ कारण आहे : ते म्हणजें हे कीं आज्ञा न मानण्यापेक्षा आज्ञा पाळल्याने आम्हांला अधिक आशीर्वाद प्राप्त होईल यावर आपला मनापासून विश्वास नसतो. आपण देवाच्या अभिवचनावर पूर्ण आशा ठेवीत जगत नाहीं.

    पेत्र येथें कोणते अभिवचन नमूद करतो? येशूनें जे शिक्षण दिलें, पेत्र ते पुढीलप्रमाणें आपल्याला सोपवितो :

    वाइटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका; तर उलट आशीर्वाद द्या; कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठीं तुम्हांला पाचारण करण्यात आलें आहे. कारण,“जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल….त्यानें वाइटाकडें पाठ फिरवून बरे ते करावे. त्यानें शांतीच्या प्राप्तीसाठीं झटावे व तिचा मार्ग धरावा.” (1 पेत्र 3:9-11)

    पेत्र, जो येशूचे अनुकरण करत होता, त्यानें आम्हांला कठीण आज्ञां पाळण्यास — जसे कीं वाइटाबद्दल वाईट असे करू नका —प्रवृत्त करण्यास कसलीही लाज धरली नाहीं, आणि त्याबरोबर त्यानें एका मोठ्या हर्षाचे अभिवचनही दिलें. “निंदेबद्दल निंदा असे करू नका, जेणेंकरून तुम्हांला आशीर्वाद प्राप्त व्हावा!” तुम्हांला येणार्‍या युगात सार्वकालिक जीवनाचा आनंद घ्यायचा आहे का? तर वाइटाकडें पाठ फिरवून बरे ते करा! तुमच्यासाठीं युगानुयुगाचा आनंद राखून ठेविलेला आहे! तर मग आता सूड घेण्यांत जो आनंद मिळतो त्यापेक्षा ते प्रतिफळ जर आपण सूड घेणें टाळते तर, अधिक मोठे नाहीं का?

    येशूची आज्ञा मोडण्याऐवजी जर तुम्हीं त्याची आज्ञा पाळता तर तुमचे नेहमी कल्याणच होईल, मग त्या आज्ञापालनामुळें तुम्हांला तुमचा जीवहि गमवावा लागला तरी योग्यच. येशूनें म्हटलें,

    मी तुम्हांला खचीत सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता व सुवार्तेकरता घर-दार, बहीण-भाऊ, आई-बाप, मुले-बाळे किंवा शेती-वाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकींबरोबर शंभरपटीने….येणार्‍या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाहीं. (मार्क 10:29-30)

    प्रीतिचे मौल्यवान अर्पण देऊन ख्रिस्ताचे अनुकरण करण्यासाठीं लागणारे सामर्थ्य मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजें आपण दृढ विश्वासाने ही आशा बाळगावी कीं, जर आपण त्याचे आज्ञापालन करतांना आपला जीवही गमावला, तरी आपण तो पुन्हा मिळवू आणि सर्वकाळासाठीं गौरवाच्या प्रतिफळाची कापणी करूं.

    3 min
  • 17 August : परमेश्वराचा धन्यवाद करणें म्हणजें काय

    माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. (स्तोत्र 103:1)

    या स्तोत्राच्या सुरुवातीला आणि शेवटी स्तोत्रकर्ता त्याच्या जिवाला आव्हानात्मक उपदेश देऊन परमेश्वराचा धन्यवाद करण्यास सांगतो— “हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर” — शिवाय, तो देवदूतांना आणि स्वर्गातील सैन्यांना आणि देवाच्या सर्व हस्तकृतींना देखील तेच करण्याचे आव्हान करतो.

    अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्हीं बलसंपन्न आहात,

    आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणें चालता

    ते तुम्हीं त्याचा धन्यवाद करा.

    अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो,

    जे तुम्हीं त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता,

    ती तुम्हीं त्याचा धन्यवाद करा.

    परमेश्वराच्या सर्व कृत्यांनो,

    त्याच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणी त्याचा धन्यवाद करा;

    हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर! (स्तोत्र 103:20-22)

    या स्तोत्राचा मुख्य विषय परमेश्वराचा धन्यवाद करण्यावर केंद्रित आहे. परमेश्वराचा धन्यवाद करणें म्हणजें काय?

    याचा अर्थ त्याची महानता व चांगुलपण यांविषयी प्रशंसनीय शब्द बोलणें - आणि खरं तर त्याचा अर्थ म्हणजें ती प्रशंसा आपल्या जीवाने व अंतर्यामाने करणें.

    दावीद या स्तोत्राच्या पहिल्या आणि शेवटच्या वचनांमध्यें जेव्हां असें म्हणतो, “हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर,” तेव्हां तो असे म्हणत आहे कीं देवाचे चांगुलपण आणि त्याची महानता यांविषयी प्रामाणिकपणाचे शब्द हें आत्म्याच्या खोलीतून आलें पाहिजे.

    जीव व अंतर्याम यांवाचून मुखाने परमेश्वराचा धन्यवाद करणें हे ढोंगीपणाचे ठरेल. येशूनें म्हटलें, "हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतांत. पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे." (मत्तय 15:8). ही गोष्ट किती भयप्रद आहे याची दाविदाला जाणीव आहे, म्हणून तो स्वतःलाच आव्हानात्मक उपदेश करतो. तो आपल्या जिवाला सांगत आहे कीं त्यानें असले ढोंग करू नये.

    “हे माझ्या जिवा, ये आणि देवाचे वैभव व त्याचे चांगुलपण पाहा. माझ्या मुखाबरोबर स्वर-सांगड घाल म्हणजें आपण आपल्या संपूर्ण व्यक्तित्वाने परमेश्वराचा धन्यवाद करूं. हे माझ्या जिवा, आपण ढोंगीपणा करणार नाहीं!”

    3 min
  • 16 August : आपण लैंगिक पापात का पडतो

    आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे; म्हणजें तू मोडलेली माझी हाडे उल्लासतील. . . . तू केलेंल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे; आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. (स्तोत्र 51:8, 12)

    दावीद त्याला लैंगिक दुराचारी प्रवृत्तीवर शक्ती मिळावी असा धावा का करत नाहीं? लोकांनी आपल्याला जाब विचारावा अशी तो लोकांकडें जाऊन मागणी का करत नाहीं? स्त्रीकडें वासनेने पाहण्यापासून देवानें त्याच्या डोळ्यांचे रक्षण करावें व त्याला वासना-मुक्त असे विचार द्यावेंत अशी प्रार्थना तो का करत नाहीं? खरे पाहता, बेथशेबेवर जणू बलात्कारच केल्यानंतर त्यानें पापाचा अंगीकार आणि पश्चात्तापाचे हे जे स्तोत्र लिहिलें, त्यांत दाविदाने अशीच काहींतरी विनवणी करायला पाहिजे होती अशी तुम्हीं अपेक्षा करत असाल.

    याचे कारण असे कीं लैंगिक पाप हे एक लक्षण आहे, रोग नाहीं, हे त्याला ठाऊक आहे.

    लोक लैंगिक पापं करतांत कारण त्यांना ख्रिस्तामध्यें आनंद व हर्षाची पूर्णता प्राप्त झालेंलीं नसते. त्यांची अंत:करणें स्थिर, खंबीर, आणि घट्ट पायावर उभारलेली नाहींत. ते अडखळतांत. परीक्षा आली कीं ते लगेच पापांत पडतांत कारण त्यांच्या भावना आणि विचार यांमध्यें देवाला ते सर्वोच्च स्थान नाहीं जे त्यांनी त्याला द्यायला पाहिजे.

    दावीद हे स्वतःविषयी जाणून होता. आमच्याबाबतही ते खरे आहे. म्हणून दावीद जी विषयवस्तू घेऊन प्रार्थना करतो त्याद्वारे तो आम्हांला दाखवून देत आहे कीं, जे लोग लैंगिक पापांत पडतांत त्यांना खरी गरज कशाची आहे: देवाची! देवामध्यें असलेला आनंद व हर्ष.

    हे शहाणपण आपल्यासाठीं अफाट आहे.

    2 min
  • 15 August : आम्हांला मुळांत कोणत्या उद्देश्याने बनविले होते

    कारण, आपल्याला देवाकडें आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठीं, नीतिमान अनीतिमान लोकांसाठीं, एकदा मरण पावला. (1 पेत्र 3:18)

    सुवार्तेची- म्हणजें शुभवर्तमानाची -  सर्वात मोठ्या आनंदाची बाजू म्हणजें स्वतः देवाबरोबर सहभागीतेचा आनंद घेणें. ही सत्य येथे 1 पेत्र 3:18 मध्यें "आपल्याला देवाकडें आणण्यास" या वाक्यात अगदी स्पष्ट शब्दांत मांडलेले आहे. ख्रिस्त यासाठींच मरण पावला.

    सुवार्तेत असलेली इतर सर्व दानें हा आनंद साध्य केला जावा म्हणूनच आहेत.

    • आपल्या अपराधांची क्षमा झाली आहे, कीं यापुढे आपलें अपराध आपल्याला देवापासून दूर नेणार नाहींत.
    • आपण नीतिमान ठरविलेले गेलें आहोंत, कीं यापुढे दंडाज्ञा आपल्याला देवापासून दूर करणार नाहींत.
    • ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताद्वारे देवाचा कोप दूर केला गेला, कीं यापुढे आपला पिता झालेंल्या देवाचा कोप त्याच्या आणि आपल्यामध्यें अडखळण नसावा.
    • आम्हांला आता सार्वकालिक जीवन दिलें गेले आहे, व पुनरुत्थान होईल तेव्हा नवीन शरीरे दिली जातील, कीं ज्यामुळें आपण सर्वकाळासाठीं देवाबरोबर राहण्यांस व त्याच्या सहवासाचा आनंद घ्यावयांस पूर्णपणें समर्थ व्हावें.
    • आपली अंत:करणें चाचपडून पाहा. तुम्हांला तुमच्या पातकांची क्षमा का हवी आहे? का तुम्हांला नीतिमान ठरविले ज्याण्याची गरज आहे? देवाचा कोप शमविला जावा म्हणून प्रायश्चित व्हावे असे तुम्हांला का वाटते? तुम्हांला सार्वकालिक जीवन का हवे आहे? “कारण मला देवाचा आत्ता आणि सर्वकाळासाठीं आनंद घ्यायचा आहे” हे याचे निर्णायक उत्तर आहे का?

      देवानें ह्या शुभवर्तमानांत आम्हांला प्रीतिची जी भेट दिली ती भेट स्वतः देव आहे. मुळांत आम्हांला यासाठींच निर्माण केलें गेलें होते. पण आम्हीं आपल्या पापामुळें देवाचा हा सहवास गमाविला होता. ख्रिस्त हेच नाते व सह्भागीता पुन्हा स्थापित करण्यासाठीं आला.

      “तुझ्या उपस्थितीत विपुल हर्ष आहे, तुझ्या उजव्या हातांत सुख सर्वकाळ आहेत” (स्तोत्र 16:11).

      3 min
    • 14 August : देव कश्याप्रकारे पातकांची क्षमा करूनही नीतिमान ठरतो

      दावीद नाथानाला म्हणाला, “मी परमेश्वराविरुद्ध पातक केलें आहे,” नाथान दाविदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझे पातक दूर केलें आहे; तू मरणार नाहींस. तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त दिलें आहेस, ह्यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार.” (2 शमुवेल 12:13-14)

      जे झालें ते संतापजनक आहे. उरिया मृत झाला आहे. बथशेबेवर बलात्कार झाला आहे. ह्यातून जे बाळ जन्मास आलें तेहि खात्रीने मरणार. तरी नाथान म्हणतो, “परमेश्वराने तुझे पातक दूर केलें आहे.”

      बस असेच? दावीदाने व्यभिचार केला. त्यानें हत्येचा आदेश दिला. त्यानें लबाडी केलीं. त्यानें “परमेश्वराची आज्ञा तुच्छ” मानली (2 शमुवेल 12:9). त्यानें परमेश्वराच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त दिलें. तरी “परमेश्वराने [त्याचे] पातक बस असेच सहजपणें दूर केलें”?!

      हा देव कोणत्या प्रकारचा नीतिमान न्यायाधीश आहे? तुम्हीं बलात्कार व खून करून व खोटे बोलून असेच निर्दोषपणें सुटून जाऊ शकत नाहीं. कोणी नीतिमान न्यायाधीश असे करणार नाहीं.

      पौलासाठीं ही एक मोठी पेंचांत पाडणारी धर्मशास्त्रीय अडचण होती - आज लोक ज्या अडचणींशी झुंज देत आहेत त्यापेक्षा खूपच वेगळी : देव एकाच वेळी अपराध क्षमा करणारा व तरीही नीतिमान असावे हे कसे शक्य आहे? रोमकरांस 3:25-26 मध्यें पौलाने जे म्हटले त्यांत या प्रश्नाचे उत्तर आहे :

      त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवानें [ख्रिस्ताला]  पुढे ठेवले. ह्यासाठीं कीं, पूर्वी झालेंल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळें त्यानें आपलें नीतिमत्त्व व्यक्त करावे; म्हणजें आपलें नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे कीं, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणार्‍याला नीतिमान ठरवणारे असावे

      दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, देव दावीदाच्या पातकाची शुद्ध उपेक्षा करत असल्याचे जे दिसून येते त्यामुळें आपल्याला होणारा मनस्ताप योग्यच आहे जर देव दावीदाचे पाप अगदी सहजपणें गालिच्याखाली दाबून टाकून देत असेल. पण तो तसे करित नाहींये.

      देव जेव्हां दावीदाने पाप केलें त्यां काळापासून पुढे भविष्यांत अनेक शतकानंतर त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या मृत्यूकडें पाहतो जेव्हां तो दावीदाच्या जागी मरण सोसणार होता, ज्यामुळें देवाच्या दयेवर असलेला दावीदाचा विश्वास आणि भविष्यात ख्रिस्ताद्वारे देवाचे मुक्तीचे कार्य ह्या दोन्ही गोष्टी दावीद व ख्रिस्त यांमध्यें समेट घडवून आणतांत. आणि ज्याला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे तो देव आपल्या मनांत दावीदाची पापे ही ख्रिस्ताची पापे म्हणून गणतो आणि ख्रिस्ताचे नीतिमत्त्व हे त्याचे नीतिमत्त्व म्हणून गणतो आणि अशाप्रकारे देव ख्रिस्तामुळें सहनशीलतेने दावीदाच्या पापाची न्याय्यत्वाने उपेक्षा करतो.

      देवाच्या पुत्राचे मरण मनस्ताप देण्यांस पुरे आहे, आणि त्याद्वारे देवाचा जो गौरव कायम राहतो तोही मर्यादेपलीकडें आहे, म्हणजें असे कीं जेव्हां देव दावीदाला त्याचे व्यभिचाराचे, खून करण्याचे व लबाड बोलण्याचे पातक क्षमा करतो त्यांत तो नीतिमान ठरतो. तसेच, आमच्याही पातकांची क्षमा करण्यांत तो नीतिमान ठरतो.

      अशाप्रकारे देव त्याचे परिपूर्ण नीतिमत्व आणि न्याय दोन्हींचे रक्षण करतो आणि त्याच वेळी येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांवर दया करतो, मग त्यांची पातकें कितीही असंख्य असों वा कितीही भयानक असों. अनिर्वचनीय (अकथनीय) सुवार्ता हीच आहे.

      4 min
    • 13 August : चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय विश्वासाने कसा पूर्ण होतो याची तीन उदाहरणें

      ह्याकरता तर आम्हीं तुमच्यासाठीं सर्वदा अशी प्रार्थना करतो कीं, आपल्या देवानें तुम्हांला झालेंल्या ह्या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे. (2 थेस्सलनीका 1:11)

      जेव्हा पौल म्हणतो कीं देवानें…..चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे (तो आमच्या कर्मांना “विश्वासाची कार्ये” म्हणतो), तेव्हा त्याचा अर्थ आपण पापाचा पराभव करावा आणि आपण विश्वासाने नीतिमत्वाला योग्य अशी कर्मे करावी असा होतो, म्हणजेंच पुढील पाच मिनिटे, पाच महिने, पाच दशके आणि अनंतकाळ यां एकूणच सर्व टप्प्यांमध्यें देव ख्रिस्ताठायीं आपल्यासाठीं काय काय करेल अशी जी त्यानें आम्हांला अभिवचने दिलीं आहेंत त्यांवर आपण अवलंबून राहतो.

      तुमच्या जीवनात ह्याचे परिदृश्य कसे दिसते याची तीन उदाहरणें पुढीलप्रमाणें आहेत :

      1. जर तुम्हीं तुमच्या अंतःकरणांत त्याग व औदार्याने देण्याचे ठरविता, तर चांगुलपणाचा हा मनोदय पूर्ण करण्यासाठीं तुम्हांला देवाचे सामर्थ्य प्राप्त होईल कारण या संदर्भांत त्यानें भावी कृपा पुरविण्याची जी जी अभिवचनें दिलींत त्यांवर तुम्हीं विश्वास ठेवता, ती अभिवचनें अशी : “माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायीं गौरवाच्या द्वारे पुरवील” (फिलिप्पै 4:19); आणि “जो उदार हाताने पेरील तो त्याच प्रमाणात कापणी करील” (2 करिंथकर 9:6); त्याचप्रमाणें, "तुमच्याजवळ सर्व गोष्टींत सदा, सर्व पुरवठा रहावा आणि प्रत्येक चांगल्या कामात तुम्हीं संपन्न व्हावे म्हणून देव तुम्हास सर्व प्रकारची कृपा पुरवण्यास समर्थ आहे " (2 करिंथ 9:8).

      2. जर तुम्हीं तुमच्या अंतःकरणांत पोर्नोग्राफीचा त्याग करण्याचे ठरविता, तर चांगुलपणाचा हा मनोदय पूर्ण करण्यासाठीं तुम्हांला देवाचे सामर्थ्य प्राप्त होईल कारण या संदर्भांत त्यानें भावी कृपा पुरविण्याची जी जी अभिवचनें दिलींत त्यांवर तुम्हीं विश्वास ठेवता, ती अभिवचनें अशी : "जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील" (मत्तय 5:8); आणि "तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे" (मत्तय 5:29). हे किती बरे. अद्भुत कार्य. पूर्णपणें समाधान देणारे सामर्थ्याचे काम.

      3. आणि जर तुम्हीं तुमच्या अंतःकरणांत असे ठरविता कीं जेव्हां जेव्हां संधी येईल, तुम्हीं ख्रिस्ताच्या साक्षीसाठीं आपलें तोंड उघडाल, तर चांगुलपणाचा हा मनोदय पूर्ण करण्यासाठीं तुम्हांला देवाचे सामर्थ्य प्राप्त होईल कारण या संदर्भांत त्यानें जी भावी कृपा पुरविण्याचे अभिवचन दिलें त्यावर तुम्हीं विश्वास ठेवता, ते अभिवचन असे, “जेव्हा तुम्हास अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. तेव्हा तुम्हीं काय बोलायचे ते तुम्हांला सांगितले जाईल” (मत्तय 10:19).

      देवानें त्याच्या मौल्यवान अभिवचनांवर आपला दैनंदिन विश्वास वाढवावा – म्हणजें भावी कृपेविषयी असलेल्या त्याच्या अक्षय, रक्ताने विकत घेतलेल्या, व ख्रिस्ताला उंचविणाऱ्या अभिवचनांवर असलेला विश्वास.

      4 min
    • 12 August : माझा जीव देवासाठींतान्हेला झाला आहे

      हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठीं लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठीं लुलपत आहे. माझा जीव देवासाठीं, जिवंत देवासाठीं तान्हेला झाला आहे; मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन? (स्तोत्र 42:1-2)

      जी गोष्ट आपल्यासाठीं हा शास्त्रपाठ इतका प्रिय आणि इतका महत्त्वाचा बनवते ती ही कीं स्तोत्रकर्त्याचा जीव येथें मुख्यतः त्याच्या जीवावर उठून आलेंल्या संकटमय परिस्थितीतून मुक्त होण्यासाठीं तान्हेला झालेंला नाहीं. आपल्याला आपल्या शत्रूंपासून सुटका मिळावी किंवा त्यांचा नाश व्हावा यासाठीं त्याचा जीव प्रामुख्याने तान्हेला झालेंला नाहीं.

      सुटकेसाठीं व्याकूळ होणें, आणि त्यासाठीं प्रार्थना करणें चुकींचे नाहीं. अनेक प्रसंगी शत्रूंच्या पराभवासाठीं प्रार्थना करणें योग्यच आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा व्यक्ती जर कोणी असेल, ज्याच्यासाठीं आपला जीव तान्हेला व्हावयाला पाहिजे,  तर तो देव स्वतः आहे.

      आपण स्तोत्रांवर मनन करतांना जेव्हां देवाविषयी विचार करतो आणि त्याला अनुभवतो, तेव्हा त्याचा मुख्य परिणाम पुढीलप्रमाणें होतो : आपण देवावर प्रीति करू लागतो, आणि देवाच्या दर्शनासाठीं व्याकूळ होऊन जातो, व देवासोबत राहण्याची उत्कंठा बाळगू लागतो, आणि देवाची प्रशंसा करण्यात आणि त्याच्यांत आनंद करण्यात समाधानी होऊं लागतो.

      वचन 2 च्या शेवटचा संभाव्य अनुवाद असा आहे, "मी कधी येऊन साक्षात देवाचे मुख पाहीन?" या प्रश्नाचे अंतिम उत्तर योहान 14:9 आणि 2 करिंथ 4:4 मध्यें दिलेंलें आहे. तिथें येशूनें म्हटलें, “ज्याने मला पाहिले आहे त्यानें पित्याला पाहिले आहे.” तसेच पौल सुद्धा म्हणतो कीं आपण ख्रिस्तामध्यें रूपांतरित होऊं तेव्हा आपण “ख्रिस्त....त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश” ह्याला पाहूं.

      आपण ख्रिस्ताचे मुख पाहतो तेव्हा आपण देवाचे मुख पाहतो. आणि पौल 2 करिंथ 4: 4 आणि 6 मध्यें म्हणतो त्याप्रमाणें जेव्हा आपण ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान याविषयीची सुवार्ता ऐकतो, तेव्हां आपण ख्रिस्ताच्या मुखावरील गौरव पाहतो. तो ह्या गोष्टीला “ख्रिस्ताच्या गौरवाची सुवार्ता, जो देवाची प्रतिमा आहे” असे म्हणतो. किंवा जसे तो पुढे वचन 6 मध्यें म्हणतो : "येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश."

      देव करो, तुम्हींहि देवाचे मुख पाहण्यासाठीं भुकेलें आणि तान्हेले व्हावे व ती भूक व तहान अधिकाधिक वाढत जावी. आणि आजच देवाची प्रतिमा असलेल्या ख्रिस्ताच्या गौरवाच्या सुवार्तेद्वारे तो तुमची ही व्याकुळता (लुलपतपणा) तृप्त करो.

      3 min
    • 11 August : कृपेचे भिन्न काळ

      ह्याकरता तर आम्हीं तुमच्यासाठीं सर्वदा अशी प्रार्थना करतो कीं, आपल्या देवानें तुम्हांला झालेंल्या ह्या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे; ह्यासाठीं कीं, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठायीं व तुम्हांला त्याच्या ठायीं गौरव मिळावा. (2 थेस्सलनीका 1:11-12)

      कृपा ही देवाची केवळ अशी प्रवृत्ती नाहीं कीं आपण पात्र नसतांनाहि तो आपलें कल्याण करतो - आपण तिला "आमच्या प्रतिकूलतेंत पात्र नसतांनाहि आम्हांसाठीं देवाची अनुकूलता" असे म्हणतो; तर देवाची कृपा ही देवाकडून येणारे सामर्थ्य देखील आहे जे आपल्या जीवनात कार्य करते आणि आपल्यामध्यें आणि आपल्यासाठीं चांगल्या गोष्टी घडवते – आणि ह्या कृपेस देखील आपण पात्र नसतो.

      पौलाने म्हटले कीं आपल्यात चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय हा देवाच्या “सामर्थ्याने” पूर्ण होतो (वचन 11). आणि मग तो वचन 12 च्या शेवटी असे म्हणतो, “आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने.”  हे सामर्थ्य जे आमच्यांत ख्रिस्ताला उंचविणारी आज्ञाधारकता निर्माण करण्यासाठीं आमच्या जीवनात प्रत्यक्षात कार्य करते, देवाच्या कृपेने घडून येणारे परिश्रम आहे.

      आपण हे 1 करिंथ 15:10 मध्यें देखील पाहू शकता:

      तरी जो काहीं मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाहीं; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केलें, ते मी केलें असे नाहीं, तर माझ्याबरोबर असणार्‍या देवाच्या कृपेने केलें.

      तर मग, कृपा ही एक सक्रिय, सदैव उपस्थित, जीवन बदलून टाकणारी, आज्ञाधारक शक्ती आहे.

      म्हणून, ही कृपा, जी वेळोवेळी देवाकडून तुमच्याकडें सामर्थ्याने वाहत येते, ती गतकालीन व भावी अशी दोन्ही स्वरुपाची आहे. ज्याअर्थी तिच्याद्वारे आपल्यासाठीं किंवा आपल्या अंतकरणात पूर्वी काहींतरी घडवून आणिले गेलें, म्हणून ती गतकालीन कृपा म्हटली जाते. आणि ज्याअर्थी आता त्यांच कृपेद्वारे आपल्यासाठीं किंवा आपल्या अंतकरणात वर्तमान समयी काहींतरी घडवून आणिले जात आहे म्हणून, तिला भावी कृपा म्हटले जाते - आतापासून पुढे पाच सेकंद आणि आतापासून पुढे पाच दशलक्ष वर्षे, दोनहि.

      देवाची कृपा ही कृपेच्या अक्षय झऱ्यातून वाहणाऱ्या वर्तमानाच्या धबधब्यावरून सतत झिरपत असते जी आमच्यावर भूतकाळात झालेंल्या कृपेच्या सतत वाढत जाणाऱ्या जलाशयातून भविष्याकडून आमच्याकडें वाहत येत आहे. पुढच्या पाच मिनिटांत, तुम्हांला भविष्याकडून येणारी सांभाळ करणारी कृपा प्राप्त होईल — तुमचा यावर विश्वास आहे; तसेच भूतकाळात झालेंल्या कृपेच्या जलाशयाकडून आणखी पाच मिनिटांची कृपा तुमच्या खाती जमा होईल - यासाठीं तुम्हीं देवाचे आभार मानता.

      4 min
    • 10 August : हे देवा, माझ्यावर कृपा कर

      हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेंला अनुसरून माझे अपराध काढून टाक. (स्तोत्र 51:1)

      तीनदा : "कृपा कर," " आपल्या वात्सल्याला अनुसरून," आणि " आपल्या विपुल करुणेंला अनुसरून."

      निर्गम 34:6-7 मध्यें देवानें हे अभिवचन दिलें होते:

      "परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर1 दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा, (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो."

      दाविदाला ठाऊक होते कीं काहीं अपराधी असे आहेंत कीं त्यांना क्षमा केलीं जाणार नाहीं. त्याचप्रमाणें, त्याला हेही ठाऊक होते कीं काहीं अपराधी असे आहेंत कीं ज्यांच्या तारणासाठीं केलेंल्या काहीं गूढ कार्यामुळें त्यांचे अपराध गणिले जाणार नाहींत, तर त्यांना क्षमा केलीं जाईल. स्तोत्र 51 मध्यें तो देवाच्या कृपेच्या यांच रहस्याला दृढ धरून ठेवत आहे.

      “हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेंला अनुसरून माझे अपराध काढून टाक.” दाविदाला या मुक्तीच्या रहस्याचे जितके गूढ ठाऊक होते, त्यापेक्षा अधिक आता आपल्याला या मुक्तीच्या रहस्याचे गूढ ठाऊक आहे. आम्हीं ख्रिस्ताला ओळखतो. तरी त्या करुणेंला मात्र आपण त्याच्याप्रमाणेंच दृढ धरून ठेवतो.

      आपल्या असहाय स्थितींत एक निर्णायक गोष्ट जी तो करतो ती म्हणजें देवाची करुणा व प्रीति ह्यांकडें वळणें. आज याचा अर्थ आपल्या असहाय स्थितींत ख्रिस्ताकडें वळणें असा होतो, ज्याने त्याच्या स्वतःच्या रक्ताने आपल्याला आवश्यक असलेली सर्व करुणा प्राप्त करून घेतलीं.

      3 min
    • 8 August : सर्व सृष्टीचा अधिपती

      पदरात चिठ्ठ्या टाकतांत, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून होतो. (नीतिसूत्रे 16:33)

      आधुनिक भाषेत आपण ते ह्या शब्दांत मांडू शकतो, "फासा तर टेबलावर टाकला जातो, पण प्रत्येक बाजी व तिचा शेवट सर्वस्वी परमेश्वराकडून होतो."

      दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यांस, ह्या जगांत घडणारी अशी कोणतीही लहानांत लहान घटना नाहीं ज्यामागे देवाचा हेतूं नसावा वा जी तो स्वतः घडवून आणत नाहीं. "दोन चिमण्या दमडीला विकतांत कीं नाहीं? तथापि तुमच्या पित्याच्या आज्ञेवाचून त्यांतून एकही भूमीवर पडणार नाहीं. तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील मोजलेलें आहेत” (मत्तय 10:29-30).

      तुमच्या शहरातील प्रत्येक फास, हजारो जंगलात भूमीवर पडणारी प्रत्येक लहानात लहान चिमणी – हे सर्व देवाच्या आज्ञेनुसार आहेंत.

      योनाच्या पुस्तकात आपण वाचतो कीं परमेश्वर एका प्रचंड माशाला आज्ञा देतो कीं त्यानें एका पुरुषाला गिळंकृत करावें (1:17), तो एका झाडाला सावली द्यावयांस उगविण्याची आज्ञा देतो (4:6), व मग तो एका किड्याला ते झाड सुकविण्याची आज्ञा देतो (4:7).

      मासे व किडे यांची सृष्टीच काय, तर तो याहीपेक्षा मोठ-मोठी कृत्यें आज्ञा देऊन करतो, जसे कीं आकाशातील तारे हें देवाच्या आज्ञेनुसार बाहेर येतांत व ते सर्व आपापल्या ठिकाणी स्थिर राहतांत.

      आपलें डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केलें? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांना बाहेर आणतो; तो त्या सर्वांना नावांनी हाक मारतो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकीं कोणी उणा पडत नाहीं. (यशया 40:26)

      तर मग, या जगात घडणाऱ्या नैसर्गिक घटना किती विशेषकरून त्याच्या आज्ञेप्रमाणें घडून येत असतील– मग ते हवामान असो, विपत्ती असोत वा रोगराई, मनुष्याचे अपंगत्व असो वा मरण.

      आपली व्यवस्था तो अंमलात आणतो;

      सर्व तारे त्याच्या आज्ञेने गतिमान

      सूर्य आपल्या कक्षेत त्याची आज्ञा पाळून चमकतो;

      टेकड्या व पर्वत,

      नद्या व झरे,

      महासागराच्या खोलीही

      त्याचे परमेश्वरत्व जाहिर करतांत.

      ("ज्यांत काहीं जीवन आहे, ते सर्व," कॅथरीन डेव्हिस)

      यास्तव, ज्याअर्थी आपल्याला हे ठाऊक आहे कीं कोणतीही नैसर्गिक घटना देवाचे ज्ञान व त्याच्या सत्संकल्पानुसार असून त्यां त्याच्या आज्ञेच्या बाहेर नाहींत,  तर आपण परम आदराने भयभीत होऊन शांत राहू या.

      3 min