सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • तुमचा फोन चोरीला गेला तर सरकार असं शोधून देईल BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    तुमचा कधी फोन हरवलाय किंवा कधी चोरीला गेलाय का? मग तो फोन कधीही परत येत नाही.

    मग आपण आधी रडतो, मग पोलिसात तक्रार करतो, ते सिम कार्ड ब्लॉक करून घेतो आणि पुढे नवीन फोन आणि डुप्लिकेट सिम घेऊन आपल्या कामाला लागतो.

    पण तुमचे हरवलेले किंवी चोरीला गेलेले फोन परत मिळवता यावेत, यासाठी आता सरकारने एक नवीन पोर्टल आणलं आहे. पण ते कसं काम करेल? त्याने खरंच फायदा होणार का?

    लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    8 min
  • सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता व्हिप कुणाचा लागणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनात पहिला सर्वात मोठा धक्का एकनाथ शिंदे गटाला बसलाय. शिंदे गटानं गुवाहाटीतून निवडलेले पक्षाचे व्हिप अर्थात प्रतोद भरत गोगावले यांची निवड सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवली.

    पण हे व्हिप म्हणजे नेमकं काय? आणि त्यावरूनच आता शिंदे सरकारच्या अडचणी वाढू शकतात का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
    लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    8 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : सरकारच्या मदतीने स्विगी, झोमॅटोपेक्षा स्वस्तात अन्न मिळणार? कुठे आणि कसं मिळणार?

    तुम्ही सहसा जेवण ऑर्डर करायला स्विगी किंवा झोमॅटो वापरता, टॅक्सीसाठी ओला किंवा उबर आणि शॉपिंगसाठी फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिंत्रा किंवा आणखी काही... आता कल्पना करा तुम्हाला या सगळ्या ऑनलाईन ॲप्सची तुलना एकाच ॲपवर करता आली तर? आणि जर ते ॲप सरकारी असेल तर?

    6 min
  • ‘द केरला स्टोरी’ किती खरा? किती प्रोपगंडा? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    ‘द केरला स्टोरी’ या एका सिनेमावरून सध्या देशात वादंग उठलंय. काही राज्यांनी तो टॅक्स फ्री केलाय, तर काही राज्यांनी त्यावर बंदी घातलीय. म्हणजे दोन वेगवेगळ्या टोकाची पावलं टाकायला लावणारा हा सिनेमा आहे तरी काय? तो किती खरा? किती खोटा आहे? आणि त्यावरून राजकारण का होतंय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    7 min
  • कृत्रिम बुद्धिमत्ता मानवापेक्षा जास्त हुशार का होत चाललीय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    AI म्हणजेच Artificial Intelligence खरंच इतकं प्रगत झालंय का की तज्ज्ञांनाही आता त्यातला फरक करता येत नाहीय? भविष्यात AI मानवापेक्षाही जास्त हुशार होऊ शकतं, अशी भीती खरी ठरतेय का?

    AIचा धोका अचानक का वाढलाय? AIमुळे समाजाला खरंच किती धोका?

    पाहा ही सोपी गोष्ट.

    लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : हनी ट्रॅप म्हणजे काय?

    DRDO मधली एका शास्त्रज्ञाला महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केल्यानंतर हनी ट्रॅप हा शब्द पुन्हा तुमच्या कानावर पडला असेल. या शास्त्रज्ञाकडून माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानी व्यक्तीने ‘हनी ट्रॅप’ वापरून हे सगळं केल्याचा ATS ला संशय आहे.

    पण हनी ट्रॅप म्हणजे काय प्रकार आहे? याआधी अशा कुठल्या घटना घडल्या आहेत?

    6 min
  • मणिपूरमध्ये आरक्षणासाठीचं आंदोलन कसं चिघळलं? सोपी गोष्ट 849

    मणिपूर राज्यात सध्या जाळपोळ, हिंसाचार आणि अशांतता पसरली आहे, कारण तिथल्या मैतेई समुदायाला ST म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये स्थान द्यायचं की नाही, यावरून वाद सुरू आहे. या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    वार्तांकन - दिलीप कुमार शर्मा, बीबीसी हिंदीसाठी
    निवेदन – गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • व्लादिमीर पुतिन खरंच बॉडी डबल वापरतात का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना ड्रोन हल्ल्याने मारण्याचा युक्रेनने प्रयत्न केला, असा आरोप रशियाने केलाय. मात्र युक्रेनने हा आरोप फेटाळलाय.

    पण वर्षभरापासून युद्धात अडकलेल्या दोन देशांमध्ये तणाव आणखी वाढलाय. नेमकं काय घडलंय?
    रशियन राष्ट्राध्यक्षांवर खरंच असा हल्ला होऊ शकतो का? हे सगळं रशियानेच घडवून आणलं असेल अशी शंका का घेतली जातेय? आणि यामुळे रशिया युक्रेन युद्धाचा पुढचा गिअर टाकला जाईल का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
    लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग – शरद बढे

    6 min
  • Go First विमान कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

    मुंबईच्या वाडिया ग्रुपची गो फर्स्ट, जी आधी गो एअर होती, तिने तीन दिवसांसाठी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. गो फर्स्टने 2 मे रोजी घोषणा केली की त्यांच्याकडे इतकाही पैसा उरला नाहीय की ते त्यांच्या नियोजित फ्लाईट्स उडवू शकतील. परिणामी त्यांना 3 आणि 4 मेच्या सर्व फ्लाईट्स रद्द कराव्या लागत आहेत.

    नेमकं काय झालंय? आणि किंगफिशर, जेट एअरवेजप्रमाणेच गो फर्स्टचा लास्ट होणार का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,586 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,043 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,514 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,804 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,802 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,034 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,990 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,226 Listeners

Americast by BBC News

Americast

724 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners