Sports कट्टा

Sports कट्टा

By Ideabrew StudiosSportsNewsSports NewsCricket
Download on the App Store

Sports कट्टा episodes

  • CCBK Special, कधी लागणार Sarfaraz Khan ची Team India मध्ये वर्णी?

     त्याचं वजन बघा. त्याचा फिटनेस बघा. त्याचा यो-यो टेस्टचा स्कोर बघा. हि सगळी कारणं एकीकडे दिली जात असताना सर्फराझ खान मात्र त्याच्या धावांनी आणि त्याच्या मैदानावरील कामगिरीने भारतीय कसोटी संघाचा दरवाजा नुसता ठोठावत नाही, तर तोडायचा प्रयत्न करत आहे. नक्की काय कारण आहे ज्याने निवड समिती अजूनही त्याला घेत नाहीये संघात, पाहूया अमोल कऱ्हाडकरांकडून 'CCBK स्पेशल' मध्ये     
     Look at his weight. Look at his fitness. Look at his Yo-Yo test score. Putting all these reasons - or excuses aside -  Sarfaraz Khan continues to knock on the door, in fact has been on the verge of breaking it open, of the Indian Test team with his runs and performance on the field. What exactly is the reason why the selection committee is still not picking him in the squad? Let's hear it from Amol Karhadkar in 'CCBK Special'

    9 min
  • Saaptahik CCBK, Will Virat Kohli surpass Sachin Tendulkar's record of 100 hundreds?

    विराट कोहली वर्ल्ड कप २०२३ च्या आधी ५० ODI शतकांचा पल्ला पार करेल? त्याहूनही महत्त्वाचं, खरंच कोहली सचिन तेंडुलकरांचा १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडू शकेल? कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजची श्रीलंकेविरुद्धची कामगिरी भारतासाठी किती महत्त्वाची आहे? आणि केएल राहुल व अक्षर पटेलची जागा नयूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कोण घेऊ शकेल? पाहूया 'साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर ह्यांच्या गप्पा  
    Will Virat Kohli cross the 50 ODI hundreds' mark before the 2023 World Cup? Moreover, does he have it in him to go past Sachin Tendulkar's record of 100 hundreds in international cricket? Besides Kohli, how significant was Kuldeep Yadav and Mohammed Siraj's performance with the ball against Sri Lanka? Who will come in for KL Rahul and Axar Patel for the series against New Zealand? Let's hear it from Sunandan Lele and Amol Karhadkar in 'Saaptahik CCBK'  

    15 min
  • CCBK Special, Why Prithvi Shaw isn't considered for Team India

    रणजी ट्रॉफीमधील विक्रमी ३७९ धावांच्या खेळीने पृथ्वी शॉ पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. ह्या खेळीने उघडेल पुन्हा भारतीय संघाचा दरवाजा शॉसाठी? नक्की कारणं काय आहेत ज्यामुळे पृथ्वीला गेली ४ वर्षे कसोटी संघातून डावललं जात आहे? खरंच मैदानाबाहेरील कारणांमुळे शॉची मैदानावरील कामगिरी झाकोळली जात आहे? पाहूया आदित्य जोशी सादर करत असलेल्या 'CCBK स्पेशल' मध्ये     
    Prithvi Shaw has hit the headlines for the right reasons after his record-breaking innings of 379 in the Ranji Trophy. Will it help him break the door into the Indian team again? Why has he been ignored for most of the last four years despite emerging as a Boy Wonder? Aditya Joshi tells us in 'CCBK Special"

    14 min
  • Saaptahik CCBK, Bumrah's failed comeback bid; Will Suryakumar Yadav get a chance in ODIs?

     जसप्रीत बुमराहचं पुनरागमन व्हायच्या आधीच फिस्कटलं. कसा हाताळायला हवा  बुमराहचा मुद्दा? आणि अक्षर पटेलने T२० व ODI क्रिकेटमध्ये तो रविंद्र  जाडेजापेक्षा सरस असल्याचं दाखवून दिलं आहे. सुर्यकुमार यादवची श्रीलंकेविरुद्ध ODI मालिकेसाठी संघात जागा होऊ शकेल? आणि ईशान किशनचं काय होणार? ह्या सर्व मुद्द्यांवर 'साप्ताहिक CCBK' मध्ये चर्चा करत सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर त्यांचं ODI मालिकेचं भाकित करत आहेत. तुमचं प्रेडिक्शन आम्हाला नक्की सां

    16 min
  • फ्री हिट - CCBK मुक्तपीठ, Ten India pace bowlers you should watch out for

    जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि उम्रान मलिक तर आहेतच, परंतु भारताच्या जलदगती गोलंदाजीचा ताफा येणाऱ्या काळात चालू ठेवणारे १० गोलंदाज निवडले आहेत संदीप जगे ह्यांनी. संदीप, जे अलिबाग परिसरातील सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक आहेत, त्यांनी त्यांच्या आवडीचे दहा गोलंदाज निवडले आहेत जे येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवू शकतील. तुमचे टॉप-१० सुद्धा आम्हाला कळवा.   
    हा आहे आपल्या "फ्री हिट - CCBK मुक्तपीठ" सदरातील पहिला दृकश्राव्य भाग. आजवर फ्री हिट अंतर्गत CCBK परिवारातील सदस्यांनी लिहिलेले लेख आपण प्रसिद्ध केले आहेत. तुम्हीदेखील ५ ते १५ मिनिटांचा तुमच्या पसंतीच्या विषयावरील व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला ई-मेल द्वारे पाठवू शकाल. निवडक भाग आम्ही नक्की प्रसारित करू. रेकॉर्डिंग साधनांबाबतीत शंका असल्यास आधीच ई-मेल करा

    19 min
  • Saaptahik CCBK, IND v SL: Focus on Hardik Pandya, Washington Sundar in T20I series

    हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेकडून आशिया कपमधील पराभवाचा वचपा काढेल? कुठल्या खेळाडूंच्या कामगिरीवर असेल नजर T२० मालिकेत? पाहूया आदित्य जोशी व अमोल कऱ्हाडकर ह्यांचे विश्लेषण "साप्ताहिक CCBK" मध्ये

    12 min
  • CCBK Explainer, Indian cricket's heroes and zeroes of 2022

    २०२२ च्या सुरुवातीला भारतीय क्रिकेट संघाकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु प्रत्यक्षात मात्र रसिकांच्या दृष्टीने निराशा झाली. राहुल द्रविडसारखा माजी खेळाडू प्रशिक्षक आणि पाच वेळा आयपीएल जिंकलेला कर्णधार रोहित शर्मा यांची जोडी अजून तरी कमाल करू शकलेली नाही. २०२३ मध्ये तरी आपण मॉडर्न क्रिकेट खेळायला लागू आणि नवीन निवड समिती संघामध्ये आवश्यक ते बदल करण्याची धमक असणारी असेल या आशेवर २०२३ सुरूवात करूया. तोपर्यंत पाहूया २०२२ मधील भारतीय पुरुष व महिला क्रिकेट संघामधील 'हिरो' आणि 'झिरो' 'बी. यु. भंडारी प्रस्तुत CCBK एक्स्प्लेनर' म

    18 min
  • Saaptahik CCBK, Time running out for KL Rahul and Rahul Dravid? ft Sunandan Lele

    बांगलादेशविरुद्ध रडतखडत जिंकलेल्या मालिकेने २०२२ चा शेवट जरी गोड झाला असला तरी ह्या वर्षात भारतीय क्रिकेटवरील विविध प्रश्नचिन्ह कायम राहिली आहेत. केएल राहुलला कसोटी संघातून वगळायची वेळ आली आहे का? आणि विराट कोहलीचं काय? संघ व्यवस्थापनाला कठोर भूमिका घ्यावी लागेल? ह्या मुख्य पप्रश्नांवर चर्चा करताना 'बी. यु. भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK' मध्ये  सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर देत आहेत भारतीय पुरुष व महिला संघांना २०२२ च्या कामगिरीचे गुण

    15 min
  • Saaptahik CCBK, Hot picks at the IPL Auction 2023

    २३ डिसेंबरला होणाऱ्या लिलावात १० संघ मिळून २०६ कोटींची उधळण करू शकतात. त्यातील सर्वात जास्त बोली लागू शकणारे १० लक्षवेधी खेळाडू - ५ परदेशी व ५ भारतीय देशांतर्गत खेळाडू - तुमच्यासमोर मांडत आहे अमोल कऱ्हाडकर 'बी. यु. भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK' मध्ये  

    15 min
  • CCBK बोल फुटबॉल - Who will win the FIFA World Cup final?

     २०२२ चा वर्ल्ड कप अर्जेन्टिना किंवा फ्रान्स कोणीही जिंकले तरी एका अर्थाने विजय हा कतारचाच होणार आहे. कारण लिओनेल मेस्सी आणि किलियन एम्बापे हे दोघंही कतार स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंट ग्रुप ची मालकी असलेल्या पी.एस.जी ह्या संघाकडून खेळतात आणि साहजिकच ह्या अंतिम सामन्याचं मुख्य आकर्षण असणार आहेत आणि मेस्सीचा हा वर्ल्ड कप मधला अखेरचा सामना आहे हे नक्की..

    14 min

About Sports कट्टा

From the publisher's feed

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi…

More shows like Sports कट्टा

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners