
Sign up to save your podcasts
Or


डॉक्टरकीचं शिक्षण घेत असतानाच त्यानं लिहिलेलं पहिलं इंग्रजी पुस्तक प्रकाशित झालं. त्याचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पुढचं पुस्तक तर बेस्ट सेलरच्या यादीच झळकलं. देशभरात आता त्याची ओळख एक आघाडीचा इंग्रजी रोमॅंटिक लेखक म्हणून बनली आहे. पुण्यातील आदित्य निघोटची गोष्ट लय भारी आहे. एकीकडे डॉक्टरकी आणि दुसरीकडे लेखनप्रपंच सांभाळत हा तरुण लेखक स्वतःचा वाचकवर्ग निर्माण करतो आहे. डॉ. आदित्यचा आजवरचा भन्नाट लेखनप्रवास उलगडणारा स्टोरीटेल कट्ट्यावरील हा विशेष पॉडकास्ट प्रत्येक युवा लेखकाने ऐकायला हवा.
मराठी पुस्तकांना मागणी नाही, ही ओरड खोटी ठरवित या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली ती `अक्षरधारा`ने! ग्रंथयात्रेत काम करताना पुस्तकांच्या प्रेमात पडलेल्या रमेश राठिवडेकर यांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी अव्याहत कष्टातून, चिकाटीने आणि कल्पकतेने ही `अक्षरधारा` राज्यभरात प्रदर्शनांच्या माध्यमातून पोहोचविली. व्यवसाय व व्यवहाराच्या पलीकडे जाऊन वाचक, प्रकाशक, लेखक अशा तिन्ही घटकांना एका सूत्रात बांधत त्यांनी आव्हानांचे संधीत कसे रुपांतर केले, याची ही विलक्षण गोष्ट, राठिवडेकरांकडून उलगडवली आहे, संतोष देशपांडे यांनी. पुस्तकप्रेमी प्रत्येकाने आवर्जून ऐकावा, असा हा स्टोरीटेल कट्टाचा दिवाळी स्पेशल पॉडकास्ट.
समाजातील दुर्लक्षित घटकांचे सक्षमीकरण झाले तरच तो समाज खऱ्या अर्थाने पुढं येऊ शकतो. पुण्यानजिक वेल्हे व भोर तालुक्यांमधील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास या संस्थेने विविध सेवाप्रकल्पांच्या माध्यमातून मोठं काम उभा केलं आहे. त्याचीच उलगड केली आहे, संस्थेचे सचिव मंदार अत्रे यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या गप्पांमधून. सेवाभावाने केलेल्या कार्यातून इतरांचं आयुष्य तर फुलतच शिवाय स्वतःच्या आयुष्यालाही वेगळा आशय मिळतो, हे अधोरेखित करणारा हा पॉडकास्ट.
वक्तृत्व ही दैवी देगणी असते, अंगभूत प्रतिभा असते की सहजसाध्य कला असते असा प्रश्न अनेकदा पडतो. त्याची उत्तरे शोधण्यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, प्रसिद्ध संवादक, वक्ते आणि माध्यमविद्या क्षेत्रातील प्राध्यापक देवदत्त भिंगारकर यांना. वक्तृत्वकला कशी जोपासता येऊ शकते, त्यासाठी काय करायला हवं, उत्तम वक्त्यांमधील वेगळपण काय असते यावर प्रा. भिंगारकर या गप्पांमधून प्रकाश टाकतात. ज्यांना आपण उत्तम बोलू शकतो असं वाटतं पण पुढं आत्मविश्वास डळमळीत होतो, अशा प्रत्येकानं जरुर ऐकायला हवा, असा स्टोरीटेल कट्टा स्पेशल पॉडकास्ट.
इंग्रजी ही जगाची भाषा. उत्तम मराठी साहित्यरसिक असणाऱ्यांना इंग्रजी साहित्याचाही आस्वाद घेण्याची ईच्छा असते. मात्र, त्यांना हे धाडस वाटते. या पार्श्वभूमीवर, मराठी साहित्यरसिकांनी इंग्रजीकडे कसे वळावे, सुरवात कशी करावी, अडचणी कोणत्या असू शकतात आणि त्यावर मार्ग कसा काढता येतो, मराठी लेखकांना इंग्रजीत लिहिता येऊ शकते का, इंग्रजीतील भारतीय लेखकांचे स्थान कसे आहे या व अशा अनेक बाबींची उलगड प्रसिद्ध इंग्रजी लेखक चेतन जोशी यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या विशेष पॉडकास्टमध्ये केली आहे. जरुर ऐका आणि आपल्या वाचनविचारांचेही सीमोल्लंघन करा.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आज शिवरायांवर अनेक पुस्तके आपल्याकडे उपलब्ध असतानाही शिवकथाकार श्री विजयराव देशमुख यांनी लिहिलेल्या `शककर्ते शिवराय` या शिवचरित्राला मानाचे स्थान आहे. हे शिवचरित्र कसे साकारले गेले, या ग्रंथामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या वाचकांना आणि अभ्यासकांना खिळवून ठेवतात, या ग्रंथनिर्मितीमागची पार्श्वभूमी काय होती या व अशा अनेक प्रश्नांची उलगड करणारा हा पॉडकास्ट. या पुस्तकाचे प्रकाशक असणाऱ्या छत्रपती सेवा संघाचे एक प्रमुख कार्यकर्ते श्री मोहनराव बरबडे यांच्याशी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या पॉडकास्टमधून `शककर्ते शिवराय`चे वेगळेपण तर अधोरेखित होतेच शिवाय हे शिवचरित्र प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांमागची प्रेरणाही उलगडते. जरुर ऐकावा आणि इतरांपर्यंत पोहोचवावा, असा हा पॉडकास्ट.
इस्त्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरु आहे. त्याचे भीषण परिणामही आता पुढे येऊ लागले आहेत. सर्व काही सुरळीत चालू असतानाच हे युद्ध का सुरु झाले आहे असाच प्रश्न अनेकांच्या मनात डोकावतो. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील या युद्धामागची नेमकी काय कारणं आहेत यापेक्षा त्याची वेळ हीच का निवडण्यात आली असावी, त्याचा नेमका कोणाला आणि कसा फायदा होऊ शकतो, यातून ग्लोबल ऑर्डर बदलल्याचे संकेत मिळत आहेत का या व अशा बाबींची उलगड करण्याचा प्रयत्न योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांनी केला आहे, या विशेष पॉडकास्टमधून.
एका बाळाच्या डीएनए सॅम्पलवरुन त्याच्या जन्मदात्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश मिळतं का, याची रहस्यमय कथा म्हणजेच `रहस्य डीएनएचं`. स्टोरीटेलवरील खाकी स्टोरीज् मालिकेतील ही कथा श्रोत्यांना प्रचंड आवडली आहे. निरंजन मेढेकर यांनी लिहिलेली आणि अभिनेते शशांक शेंडे यांच्या दमदार आवाजातून साकारलेली ही कथा ऐकणं, हा एक आगळा अनुभव ठरावा. अशा या कथेची एक झलक आपल्या सर्वांसाठी, स्टोरीटेल कट्ट्यावर.
ही संपूर्ण कथा स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/books/dna-che-rahasya-2158364
स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in#pricePlans
आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करणारे खरे घटक कोणते असतात, हा सर्वांच्याच मनात डोकावणारा प्रश्न. अशा कोणत्या बाबी असतात, ज्या व्यक्तीचं महत्त्व वाढवितात, तो नेमका कोणता दृष्टिकोन असतो जो तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं राखतो या व अशा विविध बाबींची उलगड करणारा स्टोरीटेल कट्ट्यावरील हा अत्यंत वेगळा पॉडकास्ट. ज्येष्ठ पत्रकार, संवादक राजेंद्र हुंजे यांनी आजवर अनुभवलेल्या अनेक थोर व्यक्तिमत्वांमधील वेगळेपण अधोरेखित करताना हा विषय सहज उलगडून दाखविला आहे, संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून. जरुर ऐकावा आणि इतरांनाही आवर्जून ऐकवावा, असा हा स्वतःकडे नव्याने पाहण्याचा दृष्टिकोन देणारा संवाद.
ग्रंथालय म्हणजेच वाचनालयांनी आपल्या महाराष्ट्राच्या वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक जीवनाला पुस्तकांच्या, विचारांच्या जवळ ठेवले आणि त्यामुळेच महाराष्ट्र हा कायमच देशात आपले अग्रस्थान राखू शकले. गेल्या काही वर्षांत आलेल्या स्थित्यंतरांमुळे आता महाराष्ट्र ज्यातून घडला अशा ग्रंथालयांचे, पर्यायाने येथील वाचनसंस्कृतीचे काय होणार अशी शंका सर्वांच्या मनात डोकावू लागली. याच विषयाचा समग्र अभ्यास केलेल्या आणि वाचनचळवळीशी जवळचं नातं असणारे प्रसाद मिरासदार यांना संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आणि त्यातून पुढं आलं एक आगळी शक्यता... महाराष्ट्रातील ग्रंथालयांचं भवितव्य काय असू शकतं! पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं ऐकालयाच हवा, असा हा खास पॉडकास्ट!
From the publisher's feed