स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By Santosh DeshpandeArtsBooks
Download on the App Store

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum episodes

  • प्रा. मोटेगावकर सरांचा `लातूर पॅटर्न`!

    दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये आणि विशेषतः वैद्यकीय व अभियांत्रिकी  प्रवेश परीक्षांत(नीट आणि जेईई) हमखास भरसोस यश लातूरमधील विद्यार्थ्यांना मिळवून देतो, तो `लातूर पॅटर्न` नेहमीच चर्चेत असतो. हा पॅटर्न नेमका कसा विकसित झाला, बदलत गेला आणि आज त्याचा एवढा बोलबाला का आहे, याचं कुतूहल अनेकांना असते. याची उलगड करण्यासाठी लातूरसह राज्यातील अनेक ठिकाणी कार्यरत असणाऱ्या व राज्यात अव्वल स्थानी असल्याचा दावा असणाऱ्या आरसीसी कोचिंग क्लासेसचे प्रमुख डॉ. शिवराज मोटेगावकर यांना बोलतं केलं आहे संतोष देशपांडे यांनी. एकूणच लातूर पॅटर्न नेमका काय आहे, खासगी क्लासेसचं त्यात योगदान किती आहे, यातून विद्यार्थ्यांना किती फायदा होतो, `आरसीसी`नं यात आघाडी कशी घेतली या व अशा अनेक प्रश्नांची उलगड करुन दाखवणारा हा विशेष पॉडकास्ट जरुर ऐका आणि सर्वांपर्यंत पोहोचवा. 

    31 min
  • 'काया' ही पंढरी..आत्मा हा 'विठ्ठल'!

    प्लास्टिक सर्जरी क्षेत्रात सर्वोच्च वैद्यकीय पदवी घेऊन आपले ज्ञान, कौशल्य ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी पणाला लावणारे लातूर येथील प्रसिद्ध डॉक्टर डॉ. विठ्ठल लहाने यांचे कार्य आणि विचार दोन्ही महान. 'डॉक्टर्स डे' निमित्ताने संतोष देशपांडे यांच्याशी संवाद साधताना डॉ. लहाने केवळ आपले अनुभव सांगत नाहीत तर प्रेरणेची पेरणीही करतात.    प्रत्येकाने जरुर ऐकावा आणि समृद्ध व्हावे, असा हा स्पेशल पॉडकास्ट. 

    29 min
  • करिअर कोठे नि कसे....सांगती बोटांचे ठसे!

    करिअर हा विषय प्रत्येकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच जिव्हाळ्याचा विषय. योग्य वेळेत योग्य दिशा लाभली तर उत्तम करिअर घडू शकतं...मात्र ते नेमकं कसं साधायचं हा सर्वांपुढे प्रश्न असतो. `डर्मेटोग्राफिक एनालिसिस` च्या माध्यमातून तुमच्या बोटांच्या ठशांवरुन तुमचं व्यक्तिमत्व उलगडतं आणि त्याच्या सखोल विश्लेषणातून तुमच्यासाठी कोणतं करिअर उत्तम ठरेल, हे सूचविण्यात येतं. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या करिअर मार्गदर्शक स्नेहल गाडगीळ यांच्याशी याच विषयावर संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद करिअर निवडीच्या टप्प्यात नेमक्या कोणत्या गोष्टींवर भर द्यायला हवा, याची सहज उलगड करतो. जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवावा असा हा स्टोरीटेल कट्ट्यावरील विशेष पॉडकास्ट. 

    43 min
  • `दिनविशेष`कार संजीव वेलणकर

    समाजमाध्यमांत दररोज निरनिराळ्या लोकांचे परिचय, त्यांच्याविषयीची माहिती अचूकपणे गेली ८ वर्षे सातत्याने, निरपेक्ष भावनेने लिहित राहणे ही सोपी गोष्ट नाही. पुण्यातील संजीव वेलणकर आपला केटरिंगचा व्यवसाय सांभाळत समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर व्यक्तींचे परिचय आपल्या फेसबुक, इन्स्टाग्राम अथवा व्हॉटस्अप ग्रुप अशा माध्यमांतून करुन देतात. एखादा अपवाद वगळता, दररोज त्यांचे हे लेखन हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहोचते. मागील आठ वर्षांत, त्यांचा हा प्रवास कसा झाला, त्यांचे अनुभव काय आहेत याविषयी संतोष देशपांडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद ऐकणे, हा देखील एक छानसा अनुभव ठरतो. 

    18 min
  • आली पाहा दारी...कैवल्यवारी!

    पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचे विशुद्ध दर्शन. आळंदी-देहूतून ज्ञानोबा माऊली व तुकोबारायांच्या पालख्या पंढरीकडे प्रस्थान करतात. या मार्गावरील त्यांचा प्रवास मग केवळ वारकऱ्यांचा राहात नाही, तो सर्वांच्याच मनातून सुरु होतो. याच जाणिवेतून वरिष्ठ पत्रकार, विश्लेषक व संवादक राजेंद्र हुंजे यांनी  `कैवल्यवारी` या सांगीतिक वारीची संकल्पना साकारली व रसिकांनी त्यास भरभरुन प्रतिसाद दिला. कैवल्यवारीचे शीर्षकगीत नुकतेच दाखल झाले असून प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांनी ती सादर केली आहे. यानिमित्ताने, सावनी आणि राजेंद्र यांना बोलतं केलं आहे संतोष देशपांडे यांनी. कैवल्यवारीचा प्रवासच नव्हे तर त्यातून आलेले विलक्षण अनुभव ऐकणं ही देखील श्रोत्यांसाठी पर्वणीच ठरते. `कैवल्यवारी`चा हा असा स्पर्श लाभणं म्हणजे प्रत्यक्ष वारीत सहभागी होण्यातला आत्मिक आनंद मिळण्यासारखंच ठरतं...जरुर ऐका आणि इतरांनाही ही कैवल्यवारी अनुभवू द्या! 

    33 min
  • `क्रिप्टो करन्सी`चं भवितव्य काय?

    आभासी चलन, म्हणजेच क्रिप्टो करन्सी (उदा. बिटकॉइन) हा अनेकांसाठी अत्यंत उत्सुकतेचा विषय आहे. वेगानं डिजिटाइज होत चाललेल्या जगातील अर्थव्यवस्थांमध्ये क्रिप्टो करन्सीच्या आगमनामुळे खळबळ माजली आहे. ती का माजली आहे, या करन्सीला भवितव्य आहे का, गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहता येईल का ? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं उलगडणारा हा पॉडकास्ट. स्टोरीटेलचे भारतातील प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या गप्पांमधून हा विषय सहज सोप्या शब्दांत उलगडून दाखवला आहे आणि त्याचबरोबर स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी काय नवे आले आहे, नवी कोणती पुस्तकं वाचायला हवीत यावरही भाष्य केलं आहे. मन समृद्ध करणारा हा माहितीप्रधान पॉडकास्ट जरुर ऐका आणि इतरांनाही जरुर ऐकवा. 
    स्टोरीटेल चे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा आणि हजारो पुस्तकांशी नातं जोडा... 
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    26 min
  • मान्सून जगावा, जाणावा... मान्सून केरळी अनुभवावा!

    `मान्सूनच्या स्वागताला, चला केरळाला` असा एक आगळा उपक्रम पुण्यातील `भवताल मंच`ने  हाती घेतला आहे. पर्यटनातील रंजनाबरोबरच त्यातून निसर्गाच्या, पर्यावरणाच्या आणि स्थानिक लोकजीवनाच्या आणखी जवळ जात आपण समृद्ध होऊ शकतो, अशा विचारांतून प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक, पत्रकार अभिजित घोरपडे यांनी `भवताल`च्या माध्यमातून अशा विविध संकल्पना राबवण्याचा संकल्प सोडला आहे. मान्सून अनुभवणं म्हणजे नेमकं काय याची उलगड करतानाच निसर्ग आणि पर्यावरणाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आणि आकलन देणाऱ्या अभिजित घोरपडे यांचा संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या गप्पा ऐकताना तुम्हीही नकळत मान्सून अनुभवाल, निसर्गाच्या कुशीत शिराल... असा हा पॉडकास्ट जरुर ऐका आणि इतरांनाही आवर्जून ऐकवा! 

    35 min
  • हानिट्रॅप, हेरगिरी - किती खोटी? किती खरी?

     हेरकथा म्हणजे वाचकांना कायम खिळवून ठेवणारा साहित्यप्रकार. हेरगिरी जी आपण पुस्तकांतून वाचतो किंवा पडद्यावर पाहतो, त्यापेक्षा वास्तवात कशी चालते याचीही उत्सुकता अनेकांना असते. हेरांचे मुख्य काम काय असते? हानी ट्रॅप हा प्रकार नेमका कसा घडतो? माहिती मिळवण्यासाठी हानी ट्रॅप कामी येतो का? आंतरराष्ट्रीय हेरगिरीमध्ये शत्रुंप्रमाणे मित्रदेशांवरही हेरगिरी होते का? अशा प्रकरणांत हेरगिरी उघडकीस आली तर गुप्तचर संस्था काय करतात, इतिहास संशोधकांपासून कलाकारांपर्यंत, शास्त्रज्ञांपासून पत्रकारांपर्यंत हेरगिरीसाठी कोणाकोणाचा वापर होऊ शकतो  या व अशा अनेक रंजक बाबींची उलगड केली आहे गुप्तहेरगिरीचा  प्रत्यक्षात अनुभव असलेले, हेरकथा लेखक संजय सोनवणी यांनी, संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या गप्पांमधून. 

    संजय सोनवणी यांच्या गाजलेल्या हेरकथा स्टोरीटेलवर जरुर ऐका- 
    धोका- https://www.storytel.com/in/en/books/dhoka-s01e05-180063
    कॉलगर्ल मिसिंग - https://www.storytel.com/in/en/books/call-girl-missing-1179944
    मृत्यूरेखा- https://www.storytel.com/in/en/books/mrutyurekha-571493
    रक्त हिटलरचे- https://www.storytel.com/in/en/books/rakta-hitlerche-190174
    ब्लॅकमेल- https://www.storytel.com/in/en/books/blackmail-152469
    स्टोरीटेल सबस्क्राइब करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    39 min
  • ऐकू या, `बिनचूक मराठी` लिहायचं कसं?

    आपली मराठी भाषा किती लोभस, सुंदर! मात्र, मराठीत लिहिताना अनेकदा आपण कळत नकळत चुका करतो. या चुका नेमक्या कोणत्या, मराठी शब्द लिहिताना कोणती काळजी घ्यायला हवी, व्याकरणाच्या गुंतागुंतीत न अडकता मराठीचे साधे, सोपे नियम कोणते आहेत, इंग्रजी शब्दांना मराठीत प्रतिशब्द कोणते आहेत, शहरांची नावे, अंकलेखन करताना काय काळजी घ्यायला हवी? आपणास रोजच्या व्यवहारात पडणाऱ्या या व अशा अनेक प्रश्नांची उलगड करणारे पुस्तक `लिहू या बिनचूक मराठी` नुकतेच दाखल झाले आहे. प्रकाशनाच्या वेळीच पहिली आवृत्ती संपली अशा या पुस्तकाचे लेखक श्रीपाद ब्रह्मे व नेहा लिमये यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या संवादातून मराठी बिनचूक लिहिण्याची प्रेरणा तर मिळतेच शिवाय, त्यासाठीचे कानमंत्रही मिळतात. जरुर ऐकावा व इतरांनाही आवर्जून ऐकवावा असा हा स्पेशल पॉडकास्ट. 

    43 min
  • `मनी` की बात!

    पैसा हे सर्वस्व नाही, मात्र व्यवहारात पैशाविना सारं काही अडतं देखील. मग, या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं याचं अर्थभान प्रत्येकालाच असणं गरजेचं ठरतं. आपल्या  मराठी समाजाचा पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा हवा, गुंतवणुकीपासून बचतीपर्यंत, विमाखरेदीपासून शेअर बाजारापर्यंत अर्थव्यवहारातील कोणत्या बाबींची माहिती आपल्याला हवी, अल्पकालीन व दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट्य म्हणजे काय व ते कसे असायला हवे अशा अनेक महत्त्वाच्या बाबींची उलगड `सकाळ मनी`चे संपादक, ज्येष्ठ आर्थिक पत्रकार मुकुंद लेले यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या पॉडकास्टमध्ये. जरुर ऐका आणि इतरांनाही आवर्जून ऐकवावा, असा हा अर्थपूर्ण पॉडकास्ट. 

    47 min

About स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

From the publisher's feed

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.