
Sign up to save your podcasts
Or


इंजिनिअरिंग, मेडिकल या पल्याड जात ज्यांना कला शाखेच्या माध्यमातून वेगळं काही करावंसं वाटतं अशा सर्वांना आकर्षित करणारा विषय म्हणजे लिबरल आर्टस्. हा विषय नेमका काय आहे, त्यातून काय साध्य होऊ शकतं, नव्या शैक्षणिक धोरणाशी त्याचं काय नातं असू शकतं आणि लिबरल आर्टस् हा विषय भविष्यात आपणास काय देऊ शकतो, या व अशा अनेक गोष्टींची उलगड करणारा हा विशेष पॉडकास्ट. एमआयटी वर्ल्ड युनिर्व्हसिटीच्या स्कूल ऑफ लिबरल आर्टस् च्या प्रमुख डॉ. प्रीती जोशी यांच्याशी याच विषयावर संवाद साधला आहे संतोष देशपांडे यांनी. करिअरच्या वेगळ्या वाटा चोखाळण्यास उत्सूक अशा सर्वांनी ऐकायलाच हवा असा हा पॉडकास्ट.
कृत्रिम बुद्धमत्ता म्हणजेच आर्टिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञान जसजसे विकसित होते आहे, तसतसे त्याचा प्रभावही विविध क्षेत्रांवर दिसून येऊ लागला आहे. `चॅट जीपीटी` सारख्या चॅटबोटमुळे क्रिएटिव्ह म्हणजेच कला, लेखन अशा क्षेत्रावर कसा आणि कितपत प्रभाव पडू शकतो, याची अनेकांना उत्सुकता आहे. याच विषयावर स्टोरीटेल कट्ट्यावर संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांना. भविष्यात हे तंत्रज्ञान आपणा सर्वांसाठी तारक ठरणार आहे, की आव्हान उभं करणार आहे, याची उलगड करणारा हा पॉडकास्ट जरुर ऐका.
वाचनाची आवड ही वेगळ्या पुस्तकांमुळे बहरते, समृद्ध होते. अनेक पुस्तकं अशी असतात, ज्यांची नावं आपल्याला ठाऊकही नसतात पण ती अत्यंत वेगळी ठरतात. काही लेखकही अनेकांसाठी अज्ञात असतात पण त्यांचे लेखन तुम्हाला खिळवून ठेवते. वाचनवाटेवरील अशाच अनेक पुस्तकांवर संतोष देशपांडे यांनी मुक्त संवाद साधला आहे, वरिष्ठ पत्रकार, विश्लेषक व वाचन चळवळीचे अभ्यासक सुनील चव्हाण यांनी. पुस्तकांशी असणारं नातं नव्यानं उलगडणारा हा पॉडकास्ट जरुर ऐका आणि सर्वांना ऐकवा.
स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
एप्रिल महिन्यात स्टोरीटेलवर श्रोत्यांसाठी खास पर्वणी आहे...ती म्हणजे सर्वांचे लाडके लेखक पु.ल. देशपांडे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्यांची. पुलंच्या अजरामर लेखणीतून आपल्या सर्वांना ज्यांचा परिचय घडला, ज्यांनी आपल्या मनात स्थान निर्माण केलं अशी व्यक्तीचित्रे या महिन्यात आपल्याला भेटायला येत आहेत. गुण गाईन आवडी, उरलंसुरलं, आपुलकी, मैत्र अशा त्यांच्या अजरामर पुस्तकांतील निवडक व्यक्तिचित्रे आपणापुढे दिग्गजांच्या आवाजात सादर झाली आहेत. याचीच उलगड करणारा संतोष देशपांडे आणि प्रसाद मिरासदार यांच्यात रंगलेला हा पॉडकास्ट जरुर ऐका आणि पुलंचे फॅन असाल तर जराही वेळ न दडवता स्टोरीटेल ऐकायला लागा.
एप्रिल पुलं अंतर्गंत ऐकता येतील असे काही...
पुलंच्या साहित्याचा अमर्याद आनंद लुटण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/search-pu+la
स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
स्टोरीटेलवर नुकतीच दाखल होत श्रोत्यांची पसंती मिळवणारी `माता कैकयी` या पुस्तकानिमित्त, ज्येष्ठ लेखक, संशोधक संजय सोनवणी यांनी एकूणच कैकयी या पात्राविषयी, त्या अनुषंगाने ऐतिहासिक पात्रांकडे पाहण्याची भारतीय रसिकांची दृष्टी कशी आहे व ती कशी असायला हवी यावर सुंदर विवेचन केले आहे. जिला खलनायिका समजतो, त्या कैकयीच्या आयुष्यात नेमके अशा काय गोष्टी घडल्या ज्यांची उलगड अद्याप झालेली नाही व त्यामुळेच तिला अप्रियतेचा शाप भोगावा लागला, याची थक्की करणारी मीमांसा म्हणजे `माता कैकयी`. पुराणकथांकडे लेखक कसे पाहतात, वाचक कसे हाततात आणि त्यातून अनेकदा पात्रांवर अन्याय होत जातो, यावर संतोष देशपांडे यांच्याशी झालेल्या संवादातून संजय सोनवणी परखड भाष्य करतात. प्रत्येकाने ऐकायलाच हवा असा पॉडकास्ट.
स्टोरीटेलवर माता कैकयी ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/books/mata-kaikayi-2232874
स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
ऑडिओबुक्सचा सर्वांचा आवडता प्लॅटफॉर्म म्हणजे स्टोरीटेल. स्टोरीटेलवर गेल्या तीन महिन्यांत गाजत असलेली, लोकप्रिय पुस्तकं कोणती? लोकांना कोणत्या प्रकारातली पुस्तकं ऐकायला अधिक आवडतात, अशी कोणती पुस्तकं आहेत, जी आपण ऐकायलाच हवीत याची उलगड केली आहे, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी. जरुर ऐकावा असा हा खास पॉडकास्ट, खास आपल्यासाठी सादर.
स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
यंदाच्या ऑस्कर पुरस्काराच्या निमित्ताने जगभरातील रसिकांना आवडलेल्या अनेक चित्रपटांच्या मुळाशी प्रसिद्ध कादंबरी असते हे अधोरेखित होते. त्याच अनुषंगाने पडद्यावर रसिकांना भेटणारी कलाकृती साहित्यकृतीचा आविष्कार कशी असते, अशा कोणत्या चित्रपट, मालिकांचा त्यात समावेश होतो याचा वेध घेतला आहे, स्टोरीटेल इंडिया चे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यां सोबत रंगलेल्या या पॉडकास्ट मध्ये!!
मराठी भाषा जपण्यासाठी काय केलं पाहिजे? मराठीतील वाचनसंस्कृती बदलली आहे का? मराठी भाषेच्या प्राध्यापक म्हणून काम करतानाचा अनुभव कसा होता?
ज्येष्ठ लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांच्याशी विनायक पाचलग व प्रसाद मिरासदार यांनी साधलेला संवाद.
महिलांनी करिअरकडे कसं पाहायला हवं, घर की करिअर या द्वंदात सापडले असताना काय विचार करायला हवा, त्यांनी वेळेचं व्यवस्थापन कसं करायला हवं, या सर्व प्रक्रियेत कुटुंबाने कशी मदत करायला हवी, या व अशा आपल्या अनेकांच्या मनातल्या प्रश्नांची सोपी आणि थेट उत्तरे दिली आहेत प्रसिद्ध उद्योजिका व व्यवस्थापनतज्ज्ञ सौ. विजया पाटील यांनी. `सकाळ`च्या माजी सरव्यवस्थापक व मुक्ता पब्लिशिंग हाउसच्या संचालिका असणाऱ्या सौ. विजया पाटील यांचे `सेकंद सेकंद` हे वेळेच्या व्यवस्थापनावरील पुस्तकही गाजलेलं आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्टोरीटेल कट्ट्यासाठी संतोष देशपांडे यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद श्रोत्यांना नक्कीच प्रेरित करुन जातो.
युक्रेन-रशिया युद्धाला वर्ष उलटले. या निमित्ताने, एकूणच युद्ध हे किती आघाड्यांवर खेळले जात असते याची एव्हाना कल्पना जगाला आली. आधुनिक काळात इन्फॉर्मेशन वॉरफेअर, परसेप्शन मॅनेजमेंट ही देखील या युद्धात वापरली जाणारी महत्वाची आयुधे आहेत, याची फारशी कल्पना सर्वसामान्य लोकांना नसते. त्याचीच नेमकी उकल केली आहे ज्येष्ठ संरक्षण पत्रकार व युद्धवार्ता अभ्यासक प्रा. विनय चाटी यांनी संतोष देशपांडे यांच्या सोबत रंगलेल्या या संवादात...
From the publisher's feed