स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By Santosh DeshpandeArtsBooks
Download on the App Store

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum episodes

  • अस्मिता टोकदार झाल्यामुळे कलानिर्मितीत बाधा?
    चित्रपट, नाटक, गाणी, जाहिरात, सीरीज असं वैविध्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये क्षितिज पटवर्धन हे महत्त्वाचं नाव आहे. गेल्या काही वर्षांत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ताली या बहुचर्चित सिनेमाच्या निमित्ताने ते हिंदीत पदार्पण करत आहेत. थिंकबुक्स दिवाळी विशेष या मालिकेत क्षितिज पटवर्धन यांच्याशी संवाद साधला आहे, विनायक पाचलग व प्रसाद मिरासदार यांनी. आजच्या घडीला रसिकांची बदलती अभिरुची, त्याचा कलानिर्मितीवर पडणारा प्रभाव यावरील हे श्रवणीय चिंतन प्रत्येकाने ऐकायलाच हवे.
    स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
    59 min
  • भविष्यात वाचनाची जागा ऑडिओबुक्स घेणार?
    ऑडिओबुक्स संकल्पना भारतामध्ये लोकप्रिय होत असतानाच प्रश्न उपस्थित होतो, की यामुळे वाचनसंस्कृतीवर परिणाम होतो आहे का? भविष्यात पुस्तकांची जागा, ऑडिओबुक्स घेणार का? स्टोरीटेलच्या पाच वर्षांच्या प्रवासाविषयी या विषयाची उलगड केली आहे, स्टोरीटेल इंडियाचे भारतातील प्रमुख योगेश दशरथ व प्रसाद मिरासदार यांनी, थिंकबॅंकचे विनायक पाचलग यांच्यासमवेतच्या संवादातून.
    40 min
  • हॅपी बर्थ डे, `स्टोरीटेल`
    २७ नोव्हेंबर रोजी स्टोरीटेल इंडियाचा पाचवा वर्धापनदिन. वाचकांना श्रवणाच्या माध्यमातून पुस्तकांशी, पॉडकास्टशी नातं जोडून देणाऱ्या स्टोरीटेलचे भारतातील प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी यानिमित्ताने मनमोकळा संवाद साधला आहे, संतोष देशपांडे यांनी. स्टोरीटेलनं श्रोत्यांना नेमकं काय दिलं, आजवरचा प्रवास कसा राहिला, यापुढे काय बदल अपेक्षित आहेत अशा अनेक प्रश्नांचा त्यात उहापोह झाला आहे. जरुर ऐकावा असा स्टोरीटेल बर्थडे स्पेशल पॉडकास्ट.
    स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
    16 min
  • आठवण `सुशिं`ची..

    सुहास शिरवळकर यांचं साहित्य रसिक वाचकांच्या अन् श्रोत्यांच्याही मनात अजरामर आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देतानाच, स्टौरीटेलवर सुशिंची लोकप्रियता किती आहे, याची उलगड होते. वाचकांचं निस्सिम प्रेम लाभलेल्या सुशिंच्या एकाहून एक सरस कादंबऱ्या ऐकणं हा देखील सुरेल अनुभव ठरतो. 
    स्टोरीटेलवर सुशिंची पुस्तकं ऐकण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/authors/50157-Suhas-Shirvalkar  
    स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    27 min
  • मध्यमवर्गाची सामाजिक जाणीव संपत चालली आहे का?
    प्रादेशिक भाषेत विश्वकोश निर्माण करण्याची गरज का असते? विश्वकोषामुळे भाषेच्या विकासाच्या प्रक्रियेत कोणती भर पडते? इतिहास अभ्यासण्याचे कोणते फायदे असतात? मध्यमवर्गाची सामाजिक जाणीव संपत चाललीय का? ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांच्याशी विनायक पाचलग व प्रसाद मिरासदार यांनी साधलेला संवाद.
    1 hr 2 min
  • पैशापाण्याच्या प्रश्नांची प्रफुल्ल उत्तरे!
    प्रकाशनापूर्वीच अठरा हजारांपेक्षा अधिक पुस्तक नोंदणीचा विक्रम प्रफुल्ल वानखेडे यांच्या 'गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकाने नोंदवला आहे .३०,००० पुस्तकांची पहिली आवृत्ती संपून तेवढ्याच प्रतींची दुसरी आवृत्तीदेखील आली आहे. साक्षरता आणि आर्थिक साक्षरता या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. पैसै कमावण्यापेक्षा ते कुठे खर्च करावे हे आपल्याला माहिती नसतं. आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत आपण अजूनही खूप अनभिज्ञ आहोत. आर्थिक साक्षरता म्हणजे काय? आर्थिक साक्षर कसं व्हायचं? पैशाची गुंतवणुक कशी करायची? कुठे करायची? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी, प्रफुल्ल वानखेडे यांची विनायक पाचलग व प्रसाद मिरासदार यांनी घेतलेली मुलाखत...
    स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
    53 min
  • निसर्गाशी नाळ तुटते आहे?
    विषय चाकोरीबाहेरचा आहे. शैली धारदार आहे. थेट कोंडूरा किंवा बनगरवाडीची आठवण करून देणारे लिखाण आहे. 'नदीष्ट 'ही' केवळ कादंबरी नाही, तो आहे प्रत्यक्षदर्शी आणि अनुभवसिद्ध घटनांचा कसदार ललित गद्य हुंकार.
    या कादंबरीचे लेखक, मनोज बोरगावकर यांच्याशी प्रसाद मिरासदार व विनायक पाचलग यांनी साधलेला संवाद.
    स्टोरीटेलवर नदीष्ट ऐकण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/books/nadishta-2005731
    स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
    47 min
  • चला, दिवाळी समजून घेऊया!
    दिवाळी दरवर्षीच येते...पण अशा काय गोष्टी असतात, ज्यामुळे आपणास नवा आनंद, ऊर्जा लाभू शकते. प्रसन्नतेची पखरण आपल्या मनात आणि समाजात होऊ शकते...याचाच वेध घेतला आहे ज्येष्ठ पत्रकार, विश्लेषक व संवादक श्री राजेंद्र हुंजे यांनी, संतोष देशपांडे यांच्यासमवेतच्या दिवाळी स्पेशल गप्पांमधून.
    29 min
  • गप्पा `इकॉन गली` पॉडकास्टरशी!

    अर्थकारण हा विषय अनेकांना पचवण्यास कठीण असतो. मात्र, स्वप्निल करकरे या तरुण चार्टर्ड अकाउन्टटने सर्वसामान्य लोकांना कोणत्याही घटनेमागील अर्थकारण सोप्या भाषेत समजून सांगण्यासाठी इकॉन गली हा पॉडकास्ट सुरु केला. त्याच्या या प्रयोगाविषयी ऐकुया त्याच्याकडूनच. 
    हा पॉडकास्ट ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- Series - econGully Marathi Podcast - Storytel
    स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी क्लिक करा- Storytel - Subscriptions

    23 min
  • कहाणी `इन्क्लाब विरुद्ध जिहाद`ची!

    एका बाजूला अफगाणिस्तानच्या जनतेचा इन्किलाब, आणि दुसऱ्या बाजूला तालिबानी धर्मांधांचा जिहाद... या संघर्षाची कहाणी कादंबरीच्या रूपाने मराठी वाचकांसमोर आणणारी कादंबरी म्हणजे इन्किलाब विरूध्द जिहाद! या कादंबरीचे लेखक, लक्ष्मीकांत देशमुख यांच्याशी विनायक पाचलग व प्रसाद मिरासदार यांच्याशी रंगलेला संवाद.
    स्टोरीटेलवर `इन्किलाब विरुद्ध जिहाद` ऐकण्यासाठी क्लिक करा - Inqilab Viruddha Jihad - Audiobook - Laxmikant Deshmukh - Storytel

    57 min

About स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

From the publisher's feed

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.