स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By Santosh DeshpandeArtsBooks
Download on the App Store

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum episodes

  • `रावण`चं उदात्तीकरण होतंय?

    रावण- राजा राक्षसांचा ही लोकप्रिय कादंबरी आता स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी उपलब्ध झाली आहे. त्यास दमदार आवाज दिला आहे प्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये यांनी. स्टोरीटेल वर या कादंबरीच्या आगमनाच्या निमित्ताने लेखक शरद तांदळे यांच्याशी संवाद साधला आहे प्रसाद मिरासदार व विनायक पाचलग यांनी.
    रावण- राजा राक्षसांचा स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी क्लिक करा- Ravan Raja Rakshsancha - Audiobook - Sharad Tandale - Storytel
    स्टोरीटेल सबस्क्राइब करण्यासाठी क्लिक करा- Storytel - Subscriptions

    53 min
  • दिलीप प्रभावळकर, बोक्या सातबंडे आणि नवी गुगली !

    अभिनेते म्हणून उत्तुंग यश मिळवत असतानाच दिलीप प्रभावळकर यांनी आपला लेखनाचा छंदही जोपासला. त्यांनी निर्माण केलेले बोक्या सातबंडे हे पात्र मराठी मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय झाले. बोक्या सातबंडे चे दहा भाग राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले. दिलीप प्रभावळकरांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. बोक्या सातबंडेच्या सर्व भागांबरोबरच त्यांनी लिहिलेल्या व राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पत्रापत्री, गुगली आणि नवी गुगली या पुस्तकांचे अभिवाचनही दिलीप प्रभावळकरांनी केलेले आहे. त्यांच्याशी प्रसाद मिरासदार यांनी साधलेला संवाद.
    स्टोरीटेल खालील लिंकवरून डाऊनलोड करा आणि जरूर ऐका.
    Storytel - Subscriptions
    बोक्या सातबंडे ऐकण्यासाठी क्लिक करा- Series - Sunday with Bokya Satbande - Storytel

    35 min
  • `थोडेसे अतिप्रेम` च्या निमित्तानं....

    परशुरामची डायरी या मालिकेमधील `थोडेसे अतिप्रेम` ही स्टोरीटेलवर नुकतीच दाखल झालेली रहस्यकथा अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे. त्यानिमित्ताने, या कथेचे लेखक योगेश दशरथ आणि प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद श्रोत्यांना लेखकाच्या मनात काय चालू असतं, त्याचं विश्व काय असतं याची उलगड करुन देतो.
    थोडेसे अतिप्रेम ऐकण्यासाठी क्लिक करा-Parshuramchi Dairy - Thodese Atiprem - Audiobook - Yogesh Dashrath - Storytel
    स्टोरीटेलचे सभासदत्व घेण्यासाठी क्लिक करा- Storytel - Subscriptions

    22 min
  • ॲट एनी कॉस्ट! आणि इन्शाल्लाह
    प्रसिद्ध लेखक, नाटककार अभिराम भडकमकर यांची ॲट एनी कॉस्ट! आणि इन्शाल्लाह ही दोन्ही अत्यंत गाजलेली पुस्तके स्टोरीटेलवर आलेली आहेत. या दोन्ही पुस्तकांविषयी प्रसाद मिरासदार यांसोबत रंगलेला त्यांचा हा संवाद.
    30 min
  • अद्भूतरम्यतेच्या जगात....

    प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी ज्या विविध लेखनप्रकारांमध्ये मुक्त मुशाफिरी केली आहे, त्यातील एक महत्त्वाचा म्हणजेच अद्भूतरम्य अर्थात फॅन्टसी. स्टोरीटेलवर त्यांच्या याच प्रकारातील नवंनवं साहित्य रसिकांच्या भेटीस आलं आहे. जंबू ग्रहावरच्या कथा, हे त्यातील एक. या कथा आबालवृद्ध श्रोत्यांना  भूरळ घालत आहेत. त्यानिमित्ताने, त्यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादामध्ये वेध घेतला आहे अद्भूतरम्यतेच्या साहित्य जगताचा, त्यातील लेखन, लेखक आणि त्याच्याशी निगडीत अनेक बाबींचा. पॉडकास्टच्या आरंभी, काश्मीरमध्ये श्रीनगर येथील लाल चौकात श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा त्यांचा विलक्षण अनुभव नक्की ऐका.
    जंबू ग्रहावरील कथा ऐकण्यासाठी क्लिक करा- मातेलीचा सूड ( Matelicha Sood - Audiobook & E-book - Sanjay Sonawani - Storytel)
    शेपटीच्या ताऱ्याचे रहस्य- Sheptichya Taryache Bhavishya - Audiobook & E-book - Sanjay Sonawani - Storytel
    स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- Storytel - Subscriptions

    25 min
  • विचार बदला, उद्योजक बना!

    करिअरची दिशा बदलण्याची वेळ आल्यानंतर उद्योगाचा पर्याय नजरेपुढे येतो. हा पर्याय स्वीकारताना काय विचार करावा? या विषयी प्रसाद मिरासदार यांनी लिहिलेला विचारप्रवर्तक लेख ऐकणे म्हणजे स्वतःच्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे टाकणे. 
    जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा. 
    स्टोरीटेलचे सबक्रिप्शन घेण्यासाठी क्लिक करा- Storytel - Subscriptions

    9 min
  • शोध...`शोध`च्या यशाचा!

    राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेली मुरलीधर खैरनार लिखित 'शोध' ही कादंबरी प्रचंड गाजली. छत्रपती शिवरायांनी सुरतेत लुटलेल्या खजिन्याचा काही भाग नाशिक परिसरात लपवला जातो आणि आजच्या काळातील काही तरूण याचा शोध घेतात असे उत्कंठावर्धक कथानक असलेली ही कादंबरी स्टोरीटेलवर उपेन्द्र लिमये आणि केतकी थत्ते यानी वाचली आहें. स्टोरीटेल आणि राजहंस प्रकाशन आयोजित ऐकू आनंदे या उपक्रमात या कादंबरीच्या यशाचा शोध घेण्यात आला. यात सहभागी झाले आहेत, उपेंद्र लिमये, केतकी थत्ते, संजय भास्कर जोशी आणि प्रसाद मिरासदार.

    स्टोरीटेलवर शोध ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- Shodh - Audiobook - Murlidhar Khairnar - Storytel
    स्टोरीटेलचे वर्गणीदार होण्यासाठी - Storytel - Subscriptions

    18 min
  • लोकमान्य ते महात्मा- डॉ. सदानंद मोरे

    स्टोरीटेल आणि राजहंस प्रकाशनच्या वतीने आयोजित ऐकू आनंदे कार्यक्रमात वाचा आणि ऐका योजनेच्या निमित्ताने लोकमान्य ते महात्मा या डॉ.सदानंद मोरे लिखित ग्रंथांवर लेखकाशी चर्चा केली आहें स्टोरीटेलच्या प्रसाद मिरासदार यांनी !   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने ऐकावी अशी मुलाखत !
    लोकमान्य ते महात्मा ही मालिका स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी क्लिक करा- Series - Lokmanya Te Mahatma - Storytel
    स्टोरीटेल सबस्क्राइब करण्यासाठी क्लिक करा- Storytel - Subscriptions

    35 min
  • अस्थिर जगात जगावं कसं?

    सध्याचे जग कसे आहे असा प्रश्न कणालाही विचारला तर साधारणपणे जी उत्तरे येतात त्यात आपले जग फार वेगवान होत चालले आहे असे बरेच जण म्हणतात. अनेकांना नेमकं काय चालले आहे ते समजतच नाही. पुढे काय होणार? आपल्या मुलांचे काय होणार? आपल्या गुंतवणूकीचे आणि भविष्याचे काय होणार या चिंतेने जो तो हैराण असतो. पूर्वी ज्याप्रमाणे पुढील पाच पन्नास वर्षांचे नियोजन करता यायचे, एकदा नोकरी मिळाली की चिंता नाही असे अनेकांना वाटायचे. पण आता इतके संदर्भ बदलले आहेत की आपण ज्या मल्टीनॅशनल कंपनीचे भविष्यच सांगता येत नाही तर नोकरीचे भविष्य कसे सांगणार असे तरूण मुले विचारू लागले आहेत.... एकूणच, या सर्व बाबींची उकल करणारे प्रसाद मिरासदार यांचे विशेष विश्लेषण. 

    स्टोरीटेल सबस्क्राइब करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans 

    21 min
  • झलक- साठा उत्तराची....

    श्रावणातल्या कहाण्यांकडे नव्याने पाहात, त्याला आधुनिकतेचा स्पर्श देत सौ. श्रृती बोंद्रे यांनी साठा उत्तराची... ही मालिका लिहिली. आजच्या समाजातील मानवी नातेसंबंध, पर्यावरण, अर्थकारण, महिलाविषयक दृष्टिकोन आदींचे विविध पैलू कहाण्यांमधून उलगडतात. कधी रुपकाचा आधार देत, तर कधी वास्तवतेचं दर्शन घडवत मानवी जीवनाला आकार देणाऱ्या मूल्यांचा विचार त्यात आढळतो. खास श्रावणमासानिमित्त, स्टोरीटेल कट्ट्यावर साठा उत्तराची.. या मालिकेतील एक कहाणी झलक म्हणून ऐकवित आहोत.
     
    साठा उत्तराची... ही संपूर्ण मालिका स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा- Series - Satha Uttarachi - Storytel
    स्टोरीटेल सबस्क्राइब करण्यासाठी - Storytel - Subscriptions

    9 min

About स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

From the publisher's feed

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.