
Sign up to save your podcasts
Or


श्रावण आणि कवितांचे एक अद्वैताचं नातं असतं. याच नात्यातून जन्म घेतात आशयघन शब्द आणि त्यातूनच फुलतं काव्य. श्रावणाच्या आगमनानिमित्त कवी संतोष देशपांडे यांच्यासमवेत प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांची श्रावणमैफल कट्ट्यावर रंगते, तेव्हा आपसूकच त्यातून सुरेल काही हाती लागतं....प्रत्येकानं आपल्या मनात जपलेल्या श्रावणाची आठवण करुन देतं.
गुंतागुंतीचे वाटणारे विषय सहजशैलीतून उलगडून दाखवणारे वाचकप्रिय लेखक अच्युत गोडबोले यांची थिंकबॅंक चॅनलवर विनायक पाचलग आणि प्रसाद मिरासदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकणं हा एक अनुभव आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवता येऊ शकतं का, त्यात कोणती आव्हानं आहेत आणि त्यांवर मात कशी करता येऊ शकते या व अशा अनेक विषयांना स्पर्श करणारा हा संवाद आज कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी घेऊन येत आहोत. जरुर ऐका आणि समृद्ध व्हा.
स्टोरीटेल वर अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकांचा आस्वाद घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- Author - Achyut Godbole - Storytel
स्टोरीटेलचे सभासदत्व घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- Storytel - Subscriptions
पंढरीच्या वारी म्हणजे मराठी संस्कृतीचं आगळं वैशिष्ट्यं. विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारी निघते आणि आळंदी-देहू ते पंढरपूर या प्रवासात विविध टप्प्यांवर पोहोचते तेव्हा नेमकं काय होतं, वारकऱ्यांच्या मनात कोणते भाव असतात आणि ते कसे व्यक्त होतात याचं आगळं सांगीतिक दर्शन घडविणारा प्रयोग म्हणजे कैवल्यवारी. यातून महाराष्ट्रातील दिग्गज गायकांनी, कलाकारांनी भक्तीसंगीत नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या संकल्पनेचे शिल्पकार, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे आणि कैवल्यवारीच्या गीतकार सौ. वर्षा हुंजे यांच्यासमवेत संतोष देशपांडे यांनी साधलेल्या संवादातून स्टोरीटेलवर श्रोत्यांना कैवल्यवारीचा अनुभव घेता येतो. त्याचीच ही झलक आजच्या कट्ट्यावर. कैवल्यवारीतील अत्यंत श्रवणीय अशी गीते आणि त्यांची संवादातून गुंफण करणारा हा पॉडकास्ट संपूर्ण ऐकण्यासाठी स्टोरीटेलला भेट द्या आणि रममाण व्हा विठुरायाच्या भक्तीरंगांत.
`कैवल्यवारी` स्टोरीटेलवर संपूर्ण ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- Kaivalya Wari - Audiobook - Santosh Deshpande - Storytel
स्टोरीटेल सबस्क्राइब करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- Storytel - Subscriptions
स्टोरीटेल ऐकणं म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर त्यातून विचारांना दिशाही मिळते. पंढरीच्या वारीच्या निमित्तानं, संत साहित्य व अध्यात्म यांवर आधारित असं कोणतं साहित्य स्टोरीटेल श्रोत्यांसाठी घेऊन आलं आहे आणि त्यात नेमकं काय दडलं आहे याचा उहापोह केला आहे, प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी.
वारीनिमित्त स्टोरीटेलवर खास उपलब्ध असणारी पुस्तकं-
Anand Ovari - Audiobook - Di. Ba Mokashi - Storytel
Wari - Ek Amrutanubhav - Audiobook - Narendra Vinayak Ganpule - Storytel
Paule Chaalati Pandharichi Vaat - 01 - Audiobook - Rasika Kulkarni - Storytel
स्टोरीटेलचे वर्गणीदार होण्यासाठी खालील लिंक वापर आणि आपला आवडता प्लॅन निवडा- Storytel - Subscriptions
पुस्तकं अगणित आहेत पण ऐकण्यापूर्वी त्यांची निवड करायची कशी असा प्रश्न स्टोरीटेलच्या अनेक श्रोत्यांना पडू शकतो. म्हणूनच, स्टोरीटेल कट्ट्यावर याच विषयाचा वेध घेण्यासाठी स्टोरीटेल इंडियाचे व्यवस्थापक योगेश दशरथ यांनी संवाद साधला. स्टोरीटेलवर दाखल झालेल्या नव्या आणि वेगळ्या पुस्तकांची ओळख करुन देतानाच, श्रोत्यांना अशा अनेक पुस्तकांची वैशिष्ट्यं, त्यातील आशय यांची उलगड ते करतात.
स्टोरीटेल सबस्क्राइब करण्यासाठी पुढील लिंकवर जाऊन आपणास हवा तो प्लॅन निवडा आणि आस्वाद घ्या असंख्य गोष्टींचा, अगदी मनमुराद.
Storytel - Subscriptions
मराठी तरुण उद्योजकतेच्या बाबतीत कुठे चुकतात? प्रिन्स चार्ल्स कडून पुरस्कार स्वीकारतानाचा अनुभव कसा होता? सरकारी कंत्राटदार बदनाम का आहेत? सध्याच्या लेखकांना वाचनाची सवय नाही? उद्योजक, लेखक शरद तांदळे यांची विनायक पाचलग व प्रसाद मिरासदार यांनी थिंक बॅंकच्या व्यासपीठावर घेतलेली मुलाखत, खास कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी सादर.
‘द आंत्रप्रेन्युअर’ चे ऑडीओबुक ऐकण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
लिंक - https://www.storytel.com/in/en/books/...
कैस जौनपुरी लिखित छोटी दुर्गा ही कादंबरी हिंदीत खूप गाजली... मराठी बालमित्रांनाही या सिरीजची मजा लुटता यावी यासाठी तिचा भावानुवाद केला गेला आणि मे महिन्याच्या सुट्टीत बालश्रोत्यांसाठी मराठीतील 'छोटी दुर्गा' सज्ज झाली. सर्वांच्या लाडक्या मेघना एरंडेचा आवाज या सिरीजला लाभला आहे... त्याचीच ही झलक अवश्य ऐका!
छोटी दुर्गा संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/series/80508-Choti-Durga
स्टोरीटेल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
Https://tinyurl.com/yck7rn27
आजचा स्टोरीटेल कट्टा अत्यंत खास आहे कारण आपल्याशी गप्पा मारणार आहेत, थेट स्टोरीटेलचे कंट्री हेड योगेश दशरथ. योगेश यांनी या कट्ट्यावर स्टोरीटेलचं बदलतं स्वरूप, जगातील स्टोरीटेलचे स्थान, स्टोरीटेलची आगामी आकर्षणं आणि सबस्क्रीप्शन प्लॅन्स या सगळ्या सविस्तर आढावा घेतलाय... तेव्हा जरूर ऐका हा विशेष कट्टा!
स्टोरीटेल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
Https://tinyurl.com/yck7rn27
स्टोरीटेलच्या खजिन्यात या आठवड्यात आणखी नवीन भर पडणार आहे... नक्की कोणकोणते ऑडिओबुक्स येत आहेत हे जाणून घेण्यासाठी हा कट्टा आवर्जून ऐका!
स्टोरीटेल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
Https://tinyurl.com/yck7rn27
From the publisher's feed