स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By Santosh DeshpandeArtsBooks
Download on the App Store

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum episodes

  • माध्यमांची डिजिटल वाटचाल...

    माध्यमांचं डिजिटायजेशन कसं होतंय, पॉडकास्ट हे माध्यम भविष्य काळात किती मोठं आणि प्रभावी ठरेल तसेच प्रिंट माध्यम आणि डिजिटल माध्यम यांचे स्वतंत्र महत्त्व काय यावरील सखोल चर्चा ऐका आजच्या स्पेशल कट्ट्यावर... माध्यमतज्ज्ञ आणि निवेदक सिद्धार्थ केळकर यांनी माध्यमांची डिजिटलकडे कशी वाटचाल सुरू आहे यावरील निरीक्षणे नोंदवली आहेत... तेव्हा नक्की ऐका हा विशेष कट्टा...
    त्यासोबतच ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात नवं काय येतं आहे, याचा घेतलेला थोडक्यात आढावा.

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    30 min
  • रशिया-युक्रेन युद्धाच्या निमित्ताने...

    सध्या सगळीकडे एक धगधगता विषय चर्चिला जातोय, तो म्हणजे रशिया वि. युक्रेन युद्ध... हा विषय नक्की काय आहे, या दोन्ही देशांमध्ये वादाची ठिणगी नक्की कुठे आणि कधी पडली, दोन्ही देशांना युद्ध करायला लागावं असं नक्की काय घडलं, या देशांच्या भूमिका काय आहेत याबद्दलची माहिती साहिल देव यांनी या पॉडकास्टमध्ये दिली आहे.
    तत्पूर्वी ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात नवं काय येतं आहे, याचा थोडक्यात आढावा.

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    17 min
  • शिवकालातील आठवावे प्रताप...

    हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, आपल्या अस्मितेचा मानबिंदू व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील एक रोमहर्षक प्रसंग म्हणून पावनखिंडीतील लढाईकडे पाहिले जाते. अतुलनिय धैर्य आणि अजोड स्वामिनिष्ठेच्या बळावर वीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पावनखिंड लढविली. ते क्षण साक्षात शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून ऐकणं हा संस्मरणीय अनुभव. स्टोरीटेलवर उपलब्ध असणाऱ्या शिवचरित्र कथनमालेतील पावनखिंड हे प्रकरण शिवजयंतीच्या निमित्ताने आज कट्ट्यावर उपलब्ध करुन देत आहोत. तत्पूर्वी ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात नवं काय येतं आहे, याचा थोडक्यात आढावा.

    शिवचरित्रकथन ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/series/54169-Shivcharitra-Kathan

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    1 hr 4 min
  • 'व्हॅलेंटाईन डे' स्पेशल : प्रेमिकल लोचा

    स्टोरीटेल नेहमीच नवनवीन कलाकृती श्रोत्यांसाठी घेऊन येतं. व्हॅलेंटाईन डे निमित्त अशीच एक खास लव्हस्टोरी स्टोरीटेल रिलीज करत आहे. प्रसिद्ध लेखिका मनस्विनी लता रविंद्र यांच्या लेखणीतून साकारलेली 'प्रेमिकल लोचा' ही नवीकोरी ऑडिओ सिरीज १४ फेब्रुवारीला रिलीज होतेय. त्याला आवाज लाभला आहे अभिनेता ओंकार गोवर्धन आणि आरती मोरे यांचा. या निमित्ताने स्टोरीटेलचे पब्लिशर सुकीर्त गुमास्ते यांनी ओंकार आणि आरतीसोबत साधलेला संवाद ऐकायला विसरू नका!

    येत्या आठवड्यात श्रोत्यांना स्टोरीटेलवर काय ऐकायला मिळणार हे ऐका कट्ट्याच्या पूर्वार्धात.

    प्रेमिकल लोचा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/series/73453-Premical-Locha

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    27 min
  • ऐका, अंधाराच्या हाका!

    'अंधाराच्या हाका' ही भयकथा मालिका 'स्टोरीटेल' वर नुकतीच दाखल झाली आहे. संवेद गळेगावकर लिखित ही स्टोरीटेल ओरिजिनल मालिका अभिनेते सुव्रत जोशी यांच्या आवाजात आपल्यापुढे आली आहे. या निमित्ताने, 'स्टोरीटेल'च्या पब्लिशर सई तांबे यांनी त्यांच्याशी साधलेला हा मुक्तसंवाद. तत्पूर्वी ऐका, महाराष्ट्रातील काही सांस्कृतिक घडामोडींचा थोडक्यात आढावा.

    'अंधाराच्या हाका' हे ऑडिओबुक सिरीस ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/series/72890-Andharachya-Haka-S01E01

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    25 min
  • स्मरणांजली- अनिल अवचट

    डॉ. अनिल अवचट म्हणजे माणसांवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व. निर्मळ मनानं निखळ आनंदाचा मार्ग शोधणारा अवलिया लेखक, साहित्यिक, समाजसेवक, डॉक्टर आणि खूप काही. त्यांनी नुकताच आपला निरोप घेतला. दोन वर्षांपूर्वी, अनिल अवचट स्टोरीटेल कट्ट्यावर आले होते. तिथे सागर गोखले यांच्याशी संवाद साधताना वाचनाचे आपल्यावर झालेले संस्कार, वाचनसंस्कृतीविषयीची निरीक्षणे यांची उकल केली होती. आजही ताजा-टवटवीत वाटावा असा हा संवाद, त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन जातो. तत्पूर्वी ऐका, स्टोरीटेलच्या जगात तुमच्यासाठी या आठवड्यात काय काय येतं आहे याविषयी.

    डॉ . अनिल अवचट यांचे स्टोरीटेल वरील साहित्य (रिपोर्टिंगचे दिवस, कुतूहलापोटी, सुमित्राची संहिता)  ऐकण्यासाठी खालील लिंकवर  क्लिक करा :-
    https://www.storytel.com/in/en/authors/388856-Anil-Awachat

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    38 min
  • कोविडच्या लाटेत स्वतःला `असं` जपा!

    सध्या कोविडच्या तिसऱ्या लाटेने अनेकांना ग्रासले आहे. अशा परिस्थितीत, आपण स्वतःची, आपल्या परिवाराची नेमकी कशी काळजी घ्यायला हवी. कोविडचा हा संसर्ग कितपत धोकादायक आहे, त्यापासून दूर कसं राहायचं, आहार-विहार कसा हवा? लस घ्यावी की न घ्यावी अशा सर्व प्रश्नांची उकल प्रसिद्ध फिजिशियन डॉ. शिशिर जोशी यांनी केली आहे. जरुर ऐका...निरोगी राहा.

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    24 min
  • 'तें' उलगडताना....

    मराठी साहित्य व सांस्कृतिक घडामोडींचा धावता आढावा ऐका स्टोरीटेल कट्ट्यावर. उत्तरार्धात सादर आहे, जेष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा रंगतदार संवाद. यात सहभाग घेतला आहे, प्रसिद्ध समीक्षक रेखा इनामदार-साने, प्रसाद मिरासदार व विनायक पाचलग यांनी.

    विजय तेंडुलकर यांचे साहित्य ऐकण्यासाठी खालील लिंकवर  क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/authors/199859-Vijay-Tendulkar

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    49 min
  • दैनंदिन गीतेची सांगता...

    स्टोरीटेलने मागील वर्षी एक अनोखा उपक्रम राबवला होता. ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या गीतेवरील निरूपणाचे ३६५ भाग दररोज स्टोरीटेलच्या श्रोत्यांना ऐकण्यासाठी उपलब्ध होते. ज्याचा श्रोत्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. याच दैनंदिन गीतेची नुकतीच सांगता झाली, त्या निमित्ताने स्टोरीटेलचे प्रसाद मिरासदार यांनी खेर यांच्याशी संवाद साधला आहे. नक्की ऐका हा स्पेशल कट्टा...
    याशिवाय संतोष देशपांडे यांनी या आठवड्यातील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेतला आहे. 

    दैनंदिन भगवद्गीता ऐकण्यासाठी खालील लिंकवर करा -
    https://www.storytel.com/in/en/series/55992-Bhagwatgeeta-Divas

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    40 min
  • 'स्टोरीटेल'चं न्यू ईयर स्पेशल 'मिशन'!

    आपण सर्वांनी २०२२ चं दणक्यात स्वागत केलंत... यावर्षी स्टोरीटेल कट्ट्यानंही आपलं रूप बदललं आहे... संतोष देशपांडे यांनी एका आगळ्यावेगळ्या शैलीतून कट्ट्याची रंगत वाढवली आहे... तुम्हाला हा कट्टा कसा वाटला ते जरूर सांगा... त्याचबरोबर ऐका स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे आणि अभिनेत्री अनिता दाते यांच्या 'मिशन मेमरी फेअरी' या स्टोरीटेल ओरिजिनल वरील गप्पा...

    'मिशन मेमरी फेअरी' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/series/70965-Mission-Memory-Fairy-S01

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    53 min

About स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

From the publisher's feed

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.