स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By Santosh DeshpandeArtsBooks
Download on the App Store

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum episodes

  • 'सायको किलर'ची गोष्ट...

    स्टोरीटेलवर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'सायको किलर' या ओरिजिनल सिरीजला श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. यामुळेच स्टोरीटेल कट्ट्यावर सायको किलर ही सिरीज नक्की कशी तयार झाली, त्याचा प्रवास कसा होता हे जाणून घेतलं आहे लेखक निरंजन मेढेकर आणि या सिरीजला ज्याचा आवाज लाभलेला आहे असा नचिकेत देवस्थळी यांच्याकडून... तर यांच्याशी संवाद साधला आहे पब्लिशर सुकीर्त गुमास्ते याने... तेव्हा नक्की ऐका हा खास कट्टा...

    सायको किलर ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/series/66977-Psycho-Killer

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    32 min
  • अशी साकारली 'जस्ट फ्रेंड्स'...

    स्टोरीटेलवर ऑडिओबुक्सप्रमाणेच ऑडिओड्रामालाही लोकप्रियता मिळू लागली आहे. नुकताच स्टोरीटेलवर जस्ट फ्रेंड्स हा ऑडिओ ड्रामा रिलीज झाला. सायली केदार आणि गौरी पटवर्धन यांनी लिहिलेला हा ध्वनिपट ललित प्रभाकर आणि गौतमी देशपांडे यांनी वाचला आहे. 'जस्ट फ्रेंड्स'ची संकल्पना कशी साकारली, ती प्रत्यक्षात कशी आली, सांगत आहे स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे...

    जस्ट फ्रेंड्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर करा -
    https://www.storytel.com/in/en/books/just-friends-1460919

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    23 min
  • साहित्य संमेलनात स्टोरीटेल...

    नाशिकमध्ये नुकतंच ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अगदी थाटामाटात आणि साहित्यप्रेमींच्या गर्दीत संपन्न झालं. या संमेलमात ग्रंथदालन हे नेहमीच साहित्यरसिकांना आकर्षित करत असतं. मात्र, यावेळी या ग्रंथदालनातील स्टोरीटेल ऑडिओबुक्सच्या दालनाला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. मोठ्या प्रमाणात स्टोरीटेल सबस्क्राईब करून घेण्यासाठी साहित्यरसिकांनी गर्दी केली होती. याच संमेलनाचा आणि स्टोरीटेलला दिलेल्या भरघोस प्रतिसादाचा आढावा घेतला आहे प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी. 

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    31 min
  • संमेलन स्पेशल स्टोरीटेल कट्टा : आनंद माडगूळकर

    मराठी साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिक आणि रसिकांसाठी अनोखी पर्वणी. यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नाशिक येथे संपन्न होत आहे, यानिमित्ताने आपला कट्टाही अगदी खास मान्यवरांच्या संवादाने साजरा होतोय. गीतरामायणकार गदिमा यांचे सुपुत्र आणि ज्येष्ठ लेखक, कवी, गायक आनंद माडगूळकर यांनी संमेलनाच्या आठवणी, गदिमांच्या व इतर दिग्गज साहित्यिकांच्या आठवणींना उजाळा देत हा कट्टा अगदीच स्पेशल केला आहे, तेव्हा नक्की ऐका हा संमेलन विशेष कट्टा. 


    आनंद माडगूळकर यांची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/narrators/485410-Anand-G-Madgulkar

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans 

    44 min
  • कट्टा स्पेशल : अरूण खोरे

    स्टोरीटेल कट्ट्यावर नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर संवाद साधण्यासाठी येतात. यावेळीही कट्ट्यावर ज्येष्ठ संपादक अरूण खोरे यांनी विविध विषयांवर, विविध पैलूंवर आपल्या दृष्टिकोनातून मतं मांडली आहेत... त्यामुळे स्टोरीटेल वर्धापनदिन विशेष कट्टा हा अधिक प्रगल्भ झालाय... तेव्हा नक्की ऐका हा स्पेशल कट्टा...

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans 

    48 min
  • स्टोरीटेल ऐकताना, चित्र काढताना...

    आजचा स्टोरीटेल कट्टा खूप खास आहे कारण, स्टोरीटेलच्या एका निस्सीम श्रोत्याशी प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांनी गप्पा मारल्या आहेत. चारूदत्त पांडे या चित्रकाराने  स्टोरीटेलवर तब्बल ९०० तास पुस्तकं ऐकली आहेत, तर आतापर्यंत त्याची २२५ पुस्तकं ऐकून झाली आहेत. याबाबतचा सर्व अनुभव त्याने आपल्यासोबत शेअर केलाय. तेव्हा ऐकायला विसरू नका हा स्पेशल कट्टा...

    33 min
  • कट्टा स्पेशल : वसंत वसंत लिमये

    रहस्यमयी आणि थरारकथांसाठी प्रसिद्ध असलेले लेखक वसंत वसंत लिमये यांची 'विश्वस्त' ही कादंबरी नुकतीच स्टोरीटेलवर रिलीज झाली आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात असामान्य घटना घडल्या की नाट्य जन्माला येतं! पुण्याच्या कॉफीशॉपमधे जमणारा, ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा, आजच्या जमान्यातील JFK नावाचा एक कलंदर ग्रूप. त्यांच्या हाती एका गडावर लागते एक अकल्पित खूण आणि मग होते एका रोमांचक साहसाची सुरवात. एका संचिताच्या शोधप्रयत्नात आपली अस्मिता, भारतीय सांस्कृतिक आदिबंध यांची आठवण करून देणारा हा चित्तथरारक प्रवास!असा प्रवास विश्वस्तमध्ये साकारण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांनी वसंत वसंत लिमये यांच्याशी संवाद साधला आहे.

    विश्वस्त ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/vishvasta-1434332

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans 

    51 min
  • पुस्तकांचं अद्भुत जग

    वाचनाचा ध्यास आपल्याला जीवनाचं एक विलक्षण दर्शन घडवू शकतं. मराठी मुलखात वाचनसंस्कृती विकसित झाली, रुजली. कोल्हापूरातील पुस्तकप्रेमी अभ्यासक अरुण नाईक यांच्याशी झालेल्या संवादातून पुस्तकांची कूळकथा तर उलगडतेच शिवाय, अनेक रंजक आठवणी आणि माहिती यातून त्यांनी अनुभवलेलं पुस्तकांचं एक अद्भूत जग आपल्याला गवसतं...

    1 hr
  • तिमिरातुनी तेजाकडे...

    गेले दीड वर्ष आपण सगळेच एका अतिशय कठीण काळातून जातो आहोत. कधीही विचार केला नव्हता अशा गोष्टी घडल्या, आपण घरात अडकून पडलो, अनेकांच्या रोजगाराचे प्रश्न तयार झाले, मुलांबरोबर आपल्या सगळ्यांचं आयुष्यही डिजिटल झालं, कोरोनाने फक्त आपल्याला घरात डांबलं आपल्या मनात प्रचंड असुरक्षितता निर्माण केली. या सगळ्याचा प्रचंड मानसिक ताण आपल्यावर आला. अस्वस्थता निर्माण झाली. पण आता यातून बाहेर पडलंच पाहिजे. दिवाळी निमित्ताने अंधःकाराकडून प्रकाशाकडे जाऊया. मनावर आलेली असुरक्षिततेची काळजी काढून टाकू या आणि दीपोत्सवाच्या निमित्ताने कोरोनाने निर्माण केलेल्या ताणातून मुक्तता मिळवूया... पण हे करायचं कसं? हेच समजून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका आणि समुपदेशक डॉ. मुक्ता पुणतांबेकर.

    तत्पूर्वी, या आठवड्यात, स्टोरीटेलवर येणाऱ्या पुस्तकांबाबत माहिती दिली आहे, प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी.

    53 min
  • श्रवणीय दिवाळी...

    दरवर्षी प्रमाणेच यंदाही स्टोरीटेलवर दिवाळी अंकांची रेलचेल आहे... या दिवाळी अंकांचा इतिहास, पार्श्वभूमी, विषय, विचार या सर्व पैलूंबाबत संवाद साधला आहे, युनिक फिचर्स व समकालीन प्रकाशनचे आनंद अवधानी यांच्याशी... तसेच स्टोरीटेलवर या आठवड्यात कोणते दिवाळी अंक आणि ऑडिओबुक्स येत आहेत याबाबत माहिती दिली आहे प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांनी...

    सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans 

    34 min

About स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

From the publisher's feed

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.