
Sign up to save your podcasts
Or


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतंच शंभराव्या वर्षांत पदार्पण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं अखंड जीवन आपल्या समोर तेजस्वीपणे मांडणाऱ्या बाबासाहेबांंचं आयुष्य नक्की कसं होतं याचा वेध डॉ. सागर देशपांडे यांनी घेतला आणि साकारली 'बेल भंडारा' ही कादंबरी...
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपट मांडणारं " बेलभंडारा " हे पुस्तक डॉ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेबांबरोबर 11 वर्षं सातत्यानं चर्चा करून, त्यांच्याविषयीचं सर्व लेखन अभ्यासून लिहिलं आहे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अवघं आयुष्य पुस्तकात मांडणं तसं अवघड होतं; पण सागर देशपांडे यांनी त्यांच्या दर्जेदार लेखणीतून प्रत्यक्षात उतरवलं आहे आणि या कादंबरीला आवाज लाभला आहे नचिकेत देवस्थळी यांचा...
तत्पूर्वी, या आठवड्यात, स्टोरीटेलवर येणाऱ्या पुस्तकांबाबत माहिती दिली आहे, प्रसाद मिरासदार यांनी.
बेल भंडारा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/books/2553432-Bel-Bhandara
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे मानवी संबंध कसे प्रभावित होतात याचा वेध घेणाऱ्या मनःस्पर्शी कथा आता स्टोरीटेलवर ऐकायला मिळणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी पाण्यावाचून होणारी परवड अन् त्या मागचे विविध पैलू 'पाणी! पाणी!!' या कथासंग्रहात गोष्टीरूपात मांडले आहेत. या कथांना आवाज लाभला आहे दिवंगत अभिनेते विनय आपटे, लालन सारंग व डॉ. गिरीश ओक यांचा... आवर्जून ऐकावा असा हा कथासंग्रह आहे... स्टोरीटेल कट्ट्याच्या या भागात याच कथासंग्रहातील विनय आपटे यांच्या आवाजातील मृगजळ ही कथा ऐका...
तत्पूर्वी, या आठवड्यात, स्टोरीटेलवर येणाऱ्या पुस्तकांबाबत माहिती दिली आहे, प्रसाद मिरासदार यांनी.
'पाणी! पाणी!!' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/books/2480469-Pani-Pani
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
ऐकण्याचा पुरेपुर आनंद देणारा, मराठीतील थरारक ध्वनीपट स्टोरीटेलने नुकताच रिलीज केलाय... '61 मिनिट्स' या थरारक आणि गूढ ध्वनिपटाची कहाणी रंगते एका अंधाऱ्या खोलीत... ४ अनोळखी लोकांना किडनॅप केलं जातं आणि मग रंगतं सूडाचं नाट्य... नक्की काय होतं शेवटी? ऐका स्टोरीटेलवर...
ही कथा कशी साकारली गेली, त्यासाठी दर्जेदार आवाजांची निवड कशी करण्यात आली अन् हा ध्वनीपट कसा पूर्णत्वास गेला हा सर्व प्रवास आम्ही जाणून घेतला आहे स्टोरीटेल कट्ट्यावर. हा थरारक ध्वनीपट लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे तुषार गुंजाळ याने... तर या ध्वनीपटाचा पब्लिशर आहे सुकीर्त गुमास्ते... या दोघांना बोलतं केलं आहे संतोष देशपांडे यांनी... तेव्हा नक्की ऐका हा स्पेशल कट्टा...
'61 मिनिट्स' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://www.storytel.com/in/en/books/2543577-61-Minutes
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
स्टोरीटेलने एका भन्नाट विषयावर ऑडिओ सिरीज आणली आहे... रोहित आणि रेवाची ही गोष्ट ऐकून तुम्हालाही मजा वाटेल... कारण नवरा-बायको या रोलबद्दलच्या त्यांच्या कन्सेप्ट्स जरा वेगळ्याच आहेत... स्वयंपाकाचं गणित न जमलेली रेवा आणि जॉबचं कोडं न उलगडलेला रोहित... आणि त्यांच्या असं असण्याने झालेली पंचाईत... या सगळ्याला ते दोघं कसं तोंड देतात, इतरांची बोलती कशी बंद करतात या सर्व मजेशीर किश्शांनी भरलेली हाऊस हसबंड ही गोष्ट... या सिरीजला आवाज दिला आहे, सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या सेलेब जोडीने... एकत्र काम करतानाचा अनुभव कसा होता, ऑडिओबुक साकारण्याचा प्रवास कसा होता हे या कपलने स्टोरीटेल कट्ट्यावर शेअर केलंय... त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत पब्लिशर सई तांबे हिने...
या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांच्याकडून.
हौस हसबंड ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://www.storytel.com/in/en/series/64462-Haus-Husband
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
माजी सनदी अधिकारी आणि उत्तम व्याख्याते अविनाश धर्माधिकारी यांचं आणि श्रवणाचं नातं कसं आहे. उत्तम श्रवणामुळे आज ते देशसेवेसारखे उदात्त कर्तव्य बजावू शकले. धर्माधिकारी यांनी आपल्या मार्गदर्शनातून अनेक उत्तम अधिकारी तयार केले, आपल्या व्याख्यानांतून अनेकांना प्रेरणा देण्याचे काम केले, देशसेवा हा जीवनाचा गाभा मानत कर्तव्य बजावले... त्यांचा हा आजवरचा प्रवास आणि ऐकण्याशी असलेलं त्यांचं असीम नातं आणि यावर केलेला मनमोकळा संवाद ऐका फक्त स्टोरीटेल कट्ट्यावर... अविनाश धर्माधिकारी यांच्याशी संवाद साधला आहे प्रसाद मिरासदार यांनी...
या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांच्याकडून.
मानवी जीवनातील निरंतर समस्या आणि त्यामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती या बद्दल जे. कृष्णमूर्तीं यांनी 'ज्ञातापासून मुक्ती' या पुस्तकात आपले प्रगल्भ विचार मांडले आहेत. धर्मामुळे होणारा संघर्षच नको या भावनेतून कृष्णमूर्ती यांनी सर्वच धर्म नाकारले. स्टोरीटेलवर जे. कृष्णमूर्ती यांच्या ज्ञातापासून मुक्ती या पुस्तकाला अनिरूद्ध दडके यांचा आवाज लाभला आहे. ऐकू आनंदे या कार्यक्रमात दडके यांनी या ऑडिओबुकमधील एक अंश आपल्या सर्वांना ऐकवला आहे...
तेव्हा नक्की ऐका हा कट्टा...
या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांच्याकडून.
'ज्ञातापासून मुक्ती' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/authors/113971-J-Krishnamurti
गोष्टींमधला थरार वाचायला जितका भारी त्याहून भारी असतो, तो गोष्टी ऐकताना अनुभवास येतो तो थरार. म्हणूनच, स्टोरीटेलनं मराठीमध्ये अनेक उत्तमोत्तम थरारकथा आणल्या आहेत. लेखिका सायली केदार हिच्या शब्दांमधून साकारलेली आणि आघाडीचा अभिनेता ललित प्रभाकर याच्या आवाजातून आपल्यापर्यंत पोहचणारी `हसासोर` ही स्टोरीटेलची ओरिजनल सिरीज श्रोत्यांना प्रचंड आवडली आहे. स्टोरीटेल कट्ट्यावर आज, `हसासोर`ची एक झलक सादर आहे. तत्पूर्वी, या आठवड्यात, स्टोरीटेलवर येणाऱ्या पुस्तकांबाबत माहिती दिली आहे, प्रसाद मिरासदार यांनी.
हसासोर ऐकण्यासाठी पुढील लिंक वापरा- https://www.storytel.com/in/en/search-hasasor
मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडे यांची नावं जरी उच्चारली तरी ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. या महान साहित्यिकांचे स्मरण करतानाच उलगडत जातात विनोदी साहित्यातील एकाहून एक भन्नाट किस्से आणि आठवणी. हे सारे खरोखर आपल्याला पुलकित करणारे क्षण. प्रा. मिलिंद जोशी यांसमवेत रंगलेली ही किश्शांची, आठवणींची सुहास्य मैफल याच क्षणांना आपणापुढं नव्यानं घेऊन येते.
आपल्या सगळ्यांचा लाडका कवी संदीप खरे याच्या अनेक सुंदर कलाकृती स्टोरीटेलवर रिलीज झाल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 'संदीप खरे रेअरली हर्ड'! या कार्यक्रमात संदीपने यापूर्वी कुठेही सादर न केलेल्या किंवा क्वचितच ऐकवलेल्या कविता सादर केल्या आहेत, या कवितांमागचे किस्से सांगितले आहेत. याशिवाय संदीपचा आवाज स्टोरीटेलवरील अनेक कथांना लाभला आहे. त्यामुळे तो कवी म्हणून तर प्रसिद्ध आहेच, मात्र आता त्याच्या आवाजात सादर होणाऱ्या कथांनाही लोकप्रियता मिळू लागली आहे. त्याच्या अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकून त्याचा प्रवास जाणून घेतला आहे, स्टोरीटेलचे प्रसाद मिरासदार यांनी. तेव्हा पावसांच्या सरींसोबत नक्की ऐक्का हा संवाद...
विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात मराठी साहित्यात एका विलक्षण कलाकृती साकारली गेली, ती म्हणजे 'सव्यसाची'! या कादंबरीत विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकातील सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती विशद करण्यात आली आहे. जागतिकीकरणाच्या वाटेवर असलेल्या भारतातील बंगालमध्ये त्यावेळी काय उलथापालथ होत होती, सव्यसाचीची भूमिका काय, या कादंबरतील इतर पात्रं कशी साकारली, नवी स्वप्नं पाहणाऱ्या समाजाचं काय झालं या सगळ्यावर भाष्य करणारी सव्यसाची लेखक संजय सोनावणी यांच्या लेखणीतून साकारली गेली. या कादंबरीचा प्रवास कसा होता, या कादंबरीत जिवंतपणा असावा यासाठी सोनावणी यांनी थेट बंगाल गाठलं, त्यांचा हा प्रवास खुद्द त्यांच्याच शब्दांतून ऐका स्टोरीटेल कट्ट्यावर... सोनावणींसोबतचा हा संवाद रंगवला आहे संतोष देशपांडे यांनी.
From the publisher's feed