स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By Santosh DeshpandeArtsBooks
Download on the App Store

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum episodes

  • 158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'!

    आशिष गायतोंडेचा मृतदेह रेल्वे रूळावर सापडतो. आशिषने आत्महत्या केली की त्याची कोणी हत्या केली असा प्रश्न पोलिसांना पडतो आणि घटनेचा शोध घेण्याची जबाबदारी इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधानवर येते. अनुभवी, हुशार, प्रामाणिक आणि बहादूर ऑफिसर अशी ओळख असलेला अभिमन्यू या प्रकरणाचा छडा कसा लावतो, त्यासाठी तो त्याचं वैयक्तिक आयुष्य आणि एका पोलिसाचं कर्तव्य कसं पणाला लावतो याची थरारक गोष्ट ऐका मर्डर केस या मालिकेत! स्टोरीटेलवर गाजलेली ही मालिका लिहिली आहे श्रीपाद जोशी आणि जयेश मेस्त्री यांनी आणि या सिरीजला दमदार आवाज लाभला आहे अभिनेता आस्ताद काळे याचा... तेव्हा ऐका या मालिकेतील एक अंश...


    या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून.

    मर्डर केस ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/series/56323-Murder-Case

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    37 min
  • 157: कोरोना 2.0....तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!

    कोरोनाच्या सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या लाटेला आपण सर्वांनी कसं सामोरं जायला हवं, कोरोनाची नवीन लक्षणं कोणती, व्हॅक्सिनबाबतचे समज-गैरसमज काय आहेत, ऑक्सिजनची समस्या नेमकी कशी हाताळता येऊ शकते, लस घेतल्याने संसर्गापासून कितपत बचाव होतो, रेमडिसिवीर कोणी घ्यावं, सिटी स्कॅन तपासणीतून नेमकं काय निदान होतं या व अशा तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत पुण्यातील प्रसिद्ध चेस्ट फिजिशियन डॉ. स्वप्निल कुलकर्णी यांनी. स्टोरीटेल कट्ट्यावर संतोष देशपांडे यांच्या समवेतचा या आरोग्य संवादामधून डॉ. स्वप्निल यांनी कोरोना संदर्भातील केलेलं मार्गदर्शन आजच्या घडीला आपणा सर्वांसाठी अत्यंक उपयुक्त ठरणार आहे. तेव्हा चुकवू नये, असा हा पॉडकास्ट ऐका... सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्या आणि फिट राहा. या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात कोणत्या नव्या गोष्टी आपल्या भेटीस येणार आहेत याबाबत प्रसाद मिरासदार यांच्याकडून. 


    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    1 hr 1 min
  • 156: अशी साकारली 'हसासोर'!

    सब इन्स्पेक्टर अमर पाटील आणि आरोपी निखिल जगताप यांच्यात नक्की काय संबंध आहे, आपल्या संपूर्ण कुटुंबाचा खून केलेला निखिल अमरला बघून का चवताळतो, त्या दोघांच्याही आयुष्यात कोणत्या विचित्र घटना घडू लागतात या सगळ्याचा वेध घेणारी 'हसासोर' ही थरारक मालिका स्टोरीटेलवर २६ एप्रिलला रिलीज होईल. स्टोरीटेलवर यापूर्वी गाजलेली 'हिडन कॅमेरा' ही सिरीज लिहिलेल्या नीरज शिरवईकरने पुन्हा एकदा एक वेगळाच जॉनर निवडत हसासोर श्रोत्यांसाठी आणली आहे आणि विशेष म्हणजे या सिरीजला आवाज लाभला आहे अभिनेता ललित प्रभाकर याचा! यानिमित्ताने स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे हिने कट्ट्यावर नीरजशी गप्पा मारल्या आहेत, या मालिकेची पार्श्वभूमी, जॉनरची निवड अशा अनेक विषांवर रंगलेल्या या गप्पा नक्की ऐका!  


    या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून.

    हसासोर ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/search-hasasor

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    42 min
  • 154: अवलिया पुस्तकीया...

    आपण अनेक वाचनप्रेमी बघतो, पण आपलं जीवनच पुस्तकमय झालंय असा अवलिया तुम्ही बघितलाय का? संडे विथ देशपांडेमध्ये आम्ही अशाच एका अवलियाला बोलतं केलंय ज्याचं जगणं म्हणजेच वाचन आहे, पुस्तकं ही घरातल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहेत आणि पुस्तक भेट देण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीमुळे ते प्रसिद्धही आहेत... तुम्ही कोणत्याही पुस्तकाचं नाव सांगा, या अवलियाने तुम्हाला त्या पुस्तकाबद्दल माहिती आणि त्या संदर्भातील आणखी दोन पुस्तकं सांगितली नाही तरच नवल... तर पुस्तक हेच जग असलेले पुस्तकदूत शशिकांत सावंत यांचा हा स्पेशल पॉडकास्ट नक्की ऐका आणि पुस्तकमय व्हा!


    'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    42 min
  • 155: दैनंदिन 'गीतायोग'!

    ज्येष्ठ साहित्यिक, तत्वचिंतक राजेंद्र खेर यांच्या शब्दांत दररोज सकाळी भगवद्गीता ऐकणं म्हणजे एक अविस्मरणीय आनंद! स्टोरीटेलने खास श्रोत्यांसाठी 'दैनंदिन भगवद्गीता'च्या माध्यमातून दररोज म्हणजे ३६५ दिवस गीतेतील विविध आध्याय, त्याचे अर्थ व महत्त्व अशा स्वरूपात गीता उपलब्ध केली आहे. गेली अनेक वर्षे गीतेचा अभ्यास असलेले खेर अगदी सोप्या भाषेत ही गीता समजावून सांगतात... हा उपक्रम नक्की काय आहे, गीतेचं महत्त्व त्यांनी कशाप्रकारे समजावून सांगितलं आहे, यावर राजेंद्र खेर व प्रसाद मिरासदार यांनी चर्चा केली आहे. तेव्हा आवर्जून ऐका हा गीतामय कट्टा!


    या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून.
     
    'दैनंदिन भगवद्गीता' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/series/55992-Bhagwatgeeta-Divas

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    42 min
  • 153: कॅलिग्राफीचा किमयागार!

    ‘सुंदर अक्षर हाच खरा दागिना’ असं लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं... पण खरंच अक्षर सुंदर असेल आणि त्याचा कलात्मक वापर केला गेला तर उत्तम कॅलिग्राफर म्हणून जगभरात नाव होतं… संडे विथ देशपांडेच्या या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत भारतीय कॅलिग्राफीला जगभरात पोहोचवलेले ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांना... कॅलिग्राफी या कलेकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, या कलेचा होत असलेला प्रसार, विकास, त्यातील संधी इथपासून ते आजवरच्या प्रवासात आलेले काही अनुभव, आठवणी यांचा हा सुंदर असा अक्षरसंवाद ऐकायलाच हवा!


    'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    1 hr 13 min
  • 152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!

    जिने आपल्या आवाजाने बच्चेकंपनीपासून ते अगदी आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनाच भूरळ घातली, वेगवेगळे आवाज काढून आपल्या आवाजातील जादू जगासमोर आणली, हे आवाजातलं वैविध्य सिद्ध करण्यासाठी जिनं अपार मेहनत घेतली अशा सुपरस्टार मेघना एरंडेला आपण आज स्टोरीटेल कट्ट्यावर ऐकणार आहोत... आवाजातील मॉड्युलेशन, आवाजाचा योग्य वापर, ऑडिओबुक्ससाठी कसा आवाज हवा या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मेघनानं या पॉडकास्टमध्ये दिली आहेत... याशिवाय तिचा आवाजाच्या विश्वातील प्रवासही तिनं उलगडून दाखवलाय... स्टोरीटेलचे राहुल पाटील यांनी मेघनाला बोलतं केलं आहे, तेव्हा चुकूनही चुकवू नका हा कट्टा!


    या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून.

    मेघना एरंडेची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/search-meghana+erande

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    49 min
  • 151: चाणक्य समजून घेताना...देताना!

    एखादं करिअर निवडणं आणि ते यशस्वी करून दाखवणं यासाठी लागणारी गुरूकिल्ली देणारे, यशाचा मार्ग दाखवणारे डॉ. राधाकृष्णन् पिल्लई यांना आज आपण कट्ट्यावर ऐकणार आहोत. गेली २० वर्षं चाणक्य आणि चाणक्यच्या अर्थशास्त्र, व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासाने झपाटलेले राधाकृष्ण पिल्लई हे नवीन पिढीसाठी आदर्श आहेत. पिल्लई यांच्याकडून चाणक्यनीती समजून घेणं हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. त्यांची अनेक पुस्तकं आपणास स्टोरीटेलवर ऐकायला मिळतात. अध्यापन, समुदेशन, लेखन यांमार्फत पिल्लई कायमच विद्यार्थ्यांना मार्ग दाखवण्यासाठी सज्ज असतात. लिडरशीप या त्यांच्या विषयामुळे आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी नेतृत्त्वगुण पेरले आहेत. तेव्हा पल्लवी वाघ यांनी घेतलेली ही मुलाखत नक्की ऐका.


    या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून.

    राधाकृष्णन् पिल्लई यांची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/narrators/101206-Radhakrishnan-Pillai

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    1 hr 8 min
  • 150: तुम्ही मिलेनियल्स आहात?

    मिलेनियल्सच्या हाती जगाचं नेतृत्व येतंय, असं म्हणतात. अशा या ‘मिलेनियल्स’ किंवा ‘जनरेशन वाय’ या संकल्पनेबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे? हे मिलेनियल्स म्हणजे नेमकं कोण, त्यांची नक्की वैशिष्ट्यं काय, तुम्ही मिलेनियल्स आहात का? या व अशा आजवर न पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा हा पॉडकास्ट. मिलेनियल्स या विषयावर संशोधनपर बहुचर्चित पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका, अभ्यासक आणि व्याख्यात्या डॉ. मोना शाह यांच्यासमवेतचा हा आगळा संवाद.


    'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    57 min
  • 149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!

    नाथमाधव यांच्या वीरधवलचं गारूड अजूनही मराठी बालसाहित्यावर आहे. ही अजरामर साहित्यकृती स्टोरीटेलने खास श्रोत्यांसाठी आणली आहे आणि त्यास आवाज लाभला आहे, अभिनेता हरीश कुलकर्णी यांचा. त्याने आपल्या भारदस्त आवाजाने वीरधवलमधील अनेक पात्रं जिवंत केली आहेत... वीरधवलला आवाज देण्याचा अनुभव आणि कलाकार म्हणून हरीशचा आजपर्यंतचा प्रवास संतोष देशपांडे यांनी कट्ट्यावर जाणून घेतला आहे... तेव्हा चुकवू नये असा पॉडकास्ट नक्की ऐका!


    याशिवाय प्रसाद मिरासदार यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार!

    वीरधवल ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/1265052-Veerdhawal

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    45 min

About स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

From the publisher's feed

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.