
Sign up to save your podcasts
Or


मराठी भाषेचा इतिहास काय, मराठी भाषेचा प्रसार कसा झाला, कसा खुंटला, बोलीभाषा आणि प्रमाणभाषा या वादाचा परिणाम भाषाविस्तारावर होतो आहे काय, समाजकारण आणि राजकारण यांचा थेट संबंध भाषासंवर्धनाशी कसा आहे, मराठीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा वेध घेता ‘मराठीकारण’ म्हणजे नेमकं काय या साऱ्या बाबींवर सखोल चर्चा करणारा हा स्पेशल पॉडकास्ट! यात विशेष सहभाग आहे मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आणि मराठी भाषा चळवळीतील अग्रणी डॉ. दीपक पवार. मराठी भाषेसंबंधी आपल्या मनात असणाऱ्या अनेक मतांना, भावनांना आणि तर्कांना स्पर्श करणारा हा संवाद ऐकणं म्हणजे एक प्रकारचा समृद्ध अनुभव.
स्टोरीटेलवर सर्वांत आवडीने ऐकला जाणारा जॉनर म्हणजे क्राईम थ्रिलर... क्राईम थ्रिलर लिहिण्यासाठी गुंतवणून ठेवणारी लेखन शैली आणि सर्वोत्तम कथानक गरजेचं असतं... अशातही अनेक भागांची ओरिजिनल क्राईम थ्रिलर लिहिणं हे चॅलेंजिंग टास्क... हेच टास्क अगदी लिलयापणे पूर्ण करून दाखवलं आहे लेखक निरंजन मेढेकर याने... त्याच्या सिरीयल किलर, विनाशकाले, व्हायरस पुणे अशा सिरीजना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला... क्राईम थ्रिलर कशा लिहाव्यात याच विषयावर स्टोरीटेलचा पब्लिशर सुकीर्त गुमास्तेने निरंजन मेढेकर आणि योगेश शेजवलकर यांच्याशी संवाद साधला आहे...
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही जगात भारी आहे. कोल्हापुरी, खान्देशी, कोकणी, पुणेरी, मराठवाडी, वऱ्हाडी अशी नाना प्रकारची खाद्यसंस्कृती असलेल्या आपल्या राज्यात कुठे, काय आणि कसं बेस्ट खायला मिळतं याची इत्तंभूत माहिती या विशेष पॉडकास्टमध्ये मिळणार आहे. भारतभर खाद्यभ्रमंती केलेले पत्रकार व फूड ब्लॉगर आशिष चांदोरकर यांनी कुठे काय स्पेशल पदार्थ मिळतात हे त्यांच्या खुमासदार शैलीत सांगितले आहे... त्यामुळे तुम्ही खरोखर भोजनभाऊ, खाद्यरसिक, खवय्ये किंवा चवीनं खाणारे असाल तर हा पॉडकास्ट ऐकाच!
भारतात स्टोरीटेलचा श्रीगणेशा झाल्यानंतर पहिल्या काही ओरिजिनल्समध्ये ‘माया महा ठगनी’ने आपलं अव्वल स्थान निर्माण केलं होतं. आर्टिफिशयल इंटेलिजन्स आणि नातेसंबंधांभोवती फिरणारी ही स्टोरीटेल ओरिजिनल इतकी लोकप्रिय झाली की, आता या सिरीजचा पुढचा सिझन आलाय... संवेद गळेगांवकर लिखित आणि प्रसिद्ध अभिनेत्री लीना भागवत यांच्या भारदस्त आवाजातील ‘हॅशटॅग नॉट माईन’ हा माया महा ठगनीचा पुढचा सिझन नुकताच रिलीज झालाय, आणि याच निमित्ताने स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे हिने संवेद, लीना आणि मुक्ता चैतन्य यांच्याशी संवाद साधला, त्यामुळे हा कट्टा अजिबात चुकवू नका आणि ‘हॅशटॅग नॉट माईन’चा प्रवास जाणून घ्या!
याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार!
लॉकडाऊनच्या दरम्यान अनेकांची पावलं गावाकडे वळली, 'वर्क फ्रॉम होम' करता करता अनेकांनी आपली शेतीची आवडही जोपासली. तर काहींनी ‘शेती करणं’ हेच आपलं करिअर म्हणून निवडलं! खरंच मुख्य प्रवाहातून बाजूला येत वेगळी वाट चोखाळत शेती करणं शक्य आहे का, ज्यांना शेतीतील काहीच माहिती नाही असे लोक शेती करू शकतात का, कोणत्या जमिनीत कोणती पिकं लावावीत, शेतीसोबत कोणता जोडधंदा असावा? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ‘शेतकरिअर’ या पॉडकास्टमध्ये वरिष्ठ कृषी पत्रकार व विश्लेषक दीपक चव्हाण यांनी दिली आहेत. ज्यांच्या मनात शेती करण्याचा विचार घोळत आहे त्यांनी लगेचच ऐकावा असा पॉडकास्ट!
शब्दांची जादू ही रसिकांना रिझवित असते. श्राव्य जगतातही ही जादू रसिकश्रोत्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या, शब्दांवर हुकमत गाजवणाऱ्या गुणी लेखिकांशी आपण महिला दिनानिमित्त संवाद साधला आहे. ‘फिरंग’, ‘तो, ती आणि तिचा तो’, ‘मिशन हिमालय’ अशा लहान मुलींपासून ते विवाहित स्त्रियांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अतिशय खिळवून ठेवणाऱ्या शैलीत लिहिणारी गौरी पटवर्धन आणि ‘डेस्परेट हजबंड’, ‘केस नं. ००१’, ‘चित्रकथा’ सारख्या एरोटिका ते क्राईम थ्रिलर लिहिणारी सायली केदार या दोघींशी पब्लिशर सई तांबेने संवाद साधला आहे... तेव्हा समस्त महिला श्रोतृवर्गासाठी स्पेशल असा हा कट्टा ऐकायला अजिबात विसरू नका...
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे... मराठी राजभाषा दिनानिमित्त अष्टपैलू आणि सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या आणि कायमच हासवणाऱ्या पुलंचं चरित्र स्टोरीटेलवर आज रिलीज झालंय. पुलंच्या जीवनावर आधारित ‘या सम हा!’ हे चरित्र त्यांच्याच निस्सिम चाहत्यानं म्हणजेच प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक प्रसाद नामजोशी यांनी पुलंचे विविधांगी पैलू आपल्या या विशेष ऑडिओबुकमधून मांडले आहे. त्याला आवाज लाभला आहे प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांचा... प्रसाद नामजोशींनी पुलंवरील हे चरित्र कसं लिहिलं, त्यांचा हा अनुभ कसा होता हे जाणून घेतलं आहे स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे हिने... त्यामुळे आवर्जून ऐकावा असा हा कट्टा अजिबात चुकवू नका...
याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार!
स्टोरीटेलवरील प्रेम मराठी रसिक कायमच सर्व माध्यमांतून व्यक्त करत असतो. आज स्टोरीटेल कट्ट्यावर आपण बोलतं केलं आहे `स्टोरीटेल`च्या एका खास चाहत्याला... आणि या चाहत्याने स्टोरीटेलबाबतच्या आपल्या भावना चक्क दुबईहून व्यक्त केल्या आहेत. त्यांचं नाव- आशिष कालकर. ते स्वतः उत्तम लेखक आहेत. आपली वाचन व श्रवण संस्कृती परदेशात टिकवून ठेवणं आणि तेथील साहित्य संपदा आपल्या मायबोलीत मराठी वाचकांसमोर आणण्याचं मोठं काम सध्या आशिष दुबईत राहून करत आहेत... तेव्हा नक्की ऐका हा दुबई स्पेशल चाहत्याचा खास पॉडकास्ट...
जगतो तर प्रत्येकजण आहे. पण खऱ्या जगण्याचं मर्म कशात सामावलं आहे, याची उकल काही व्यक्तींच्या कार्यातून होते. यजुवेंद्र महाजन हे त्यातले एक. समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांचे मनोबल वाढविण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास पेरुन त्यांचं जगणं फुलविण्याचं व्रत घेतलेल्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक असणाऱ्या यजुवेंद्र महाजन यांचा आजवरला प्रवास उलगडणारा हा हदयस्पर्शी संवाद.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची खास मुलाखत स्टोरीटेल कट्टाच्या रसिक श्रोत्यांसाठी! नेमाडे यांचे वाचन व श्रवणविषयक विचार व त्यांचा दर्जेदार लेखनापर्यंतचा प्रवास कसा होता हे ऐका खुद्द त्यांच्याकडूनच... अभिनेते अतुल पेठे यांनी नेमाडेंचा हा लेखनप्रवास जाणून घेतला आहे... त्यामुळे नक्की ऐका हा विशेष पॉडकास्ट.
From the publisher's feed