
Sign up to save your podcasts
Or


आजपर्यंत कोणीच अनुभवला नाही असा भयंकर व्हायरस स्टोरीटेलच्या जगात येतोय... त्या व्हायरसने ९९% लोकांचा जीव जाणार आहे. फक्त १% लोक जिवंत राहणार आहेत... तुम्ही कशात येता? इन्फेक्टेड लोकांमध्ये की अनइन्फेक्टेड लोकांमध्ये? लगेच ठरवा आणि ऐका स्टोरीटेवरचं थरारक 'व्हायरस पुणे'!
मिड लाईफ आणि करिअरमध्ये होणारा बदल म्हणजे अनेकांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट तर काहींच्या दृष्टीने डोकेदुखी असलेली बाब... मिड लाईफमध्ये म्हणजेच मध्यम वयात करिअर बदलण्याची वेळ आली तर ती परिस्थिती कशी हाताळावी, करिअरचं स्वरूप बदलताना कोणत्या नवीन गोष्टी शिकायला हव्यात, आत्मसात करायला हव्यात, करिअरबाबतचे निर्णय कसे घ्यावेत या सगळ्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करणारा ह्युमन रिसोर्स आणि व्यवस्थापनतज्ज्ञ विनोद बिडवाईक यांचा खास पॉडकास्ट!
अट्टल गुन्हेगारांनी एखादा गुन्हा तर आपल्याला काही नवल वाटणार नाही, पण कल्पना करा एखादं भयंकर गुन्हा एखाद्या साध्या-सरळ माणसाच्या हातून घडला तर? आयुष्यात आलेल्या एका वाईट प्रसंगामुळे किंवा घटनेमुळे सभ्य माणूस निर्दयी कृत्य करतो, गुन्हा करतो आणि मग येतो विपरीत बुद्धीमुळे आलेला विनाशकाल! निरंजन मेढेकर यांनी लिहिलेली 'विनाशकाले' अशाच काही अपरिचित गुन्ह्यांचा उलगडा करते. भारतीय दंडविधान कायद्याच्या कलमांनुसार वेगवेगळे गुन्हे घडतात आणि अभिनेता नचिकेत पूर्णपात्रेच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजात रंगत जाते विनाशकाले ही क्राईम थ्रिलर... याच विनाशकालेमधील एक भाग आज आपण स्टोरीटेल कट्ट्यावर ऐकणार आहोत.
झोप... झोपेशिवाय प्रत्येकाचं आयुष्य अपूर्ण! झोपेमुळे माणूस ताजातवाना होतो, झोप नाही लागली तर अस्वस्थ होतो... पण हीच ‘झोप’ कशी येते, झोप येणं म्हणजे नेमकं काय, स्वप्नं कशी पडतात, शरिराइतकीच मनालाही झोपेची किती आवश्यकता असते, निद्रानाश म्हणजे काय अशा आपल्या मनातल्या असंख्य प्रश्नांची अगदी सोप्या भाषेत उत्तरं दिली आहेत प्रख्यात फिजिशियन डॉ. शिशिर जोशी यांनी ‘झोप का हो येत नाही...?’ या स्पेशल पॉडकास्टमध्ये!
स्टोरीटेलवर लिहायचं कसं, कोणत्या प्रकारच्या लेखनाला स्टोरीटेलमध्ये प्राधान्य आहे, ज्यांनी यापूर्वीच कथा लिहिल्या आहेत त्यांनी त्या स्टोरीटेलपर्यंत त्या कशा पोहोचवायच्या, स्टोरीटेल ऑरिजनल्स कशा लिहायच्या या व अशा लेखकांच्या दृष्टीने सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत थेट स्टोरीटेल इंडियाचे मुख्य व्यवस्थापक योगेश दशरथ यांनी...
विनोद ऐकणं जसं आनंददायी असतं, त्याहीपेक्षा कठीण तो विनोद घडणं, घडवणं असतं... अशातच विनोद सादर करायचा असेल तर त्या सादरीकरणासाठी काय तयारी लागते, प्रेक्षकांना त्यांच्या सगळ्या चिंता दूर करून हसतं कसं करायचं हे कलाकाराच्या विनोदात असतं... आणि याच विषयावर ‘Sunday With देशपांडे’मध्ये आपल्याला हसवायला आणि विनोदामागची गोष्ट सांगायला आले आहेत हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे!
पृथ्वीबाहेर जीवसृष्टी आहे का, असेल तर कशी असेल, एलियन्स खरोखर असतात का, मंगळावर पाणी आहे तर तिथे जीवसृष्टीची शक्यता किती, भारतात या विषयावर शोधकार्य सुरू आहे, त्यात शास्त्रज्ञांना काय आढळून आले, अशा इंटरेस्टिंग आणि रहस्यमयी प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरं सायकास्ट सिरीजमध्ये आपल्याला मिळणार आहेत... शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे आपल्याला याची उत्तरं देणार आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलेला आहे पत्रकार मयुरेश प्रभुणे यांनी...
कवी पूर्णवेळ कवी म्हणून त्याचं करिअर घडवू शकतो का, अनेक कवींना त्यांचा छंद जोपासताना उपजीविकेसाठी अन्य नोकरी, व्यवसायाचा आधार का घ्यावा लागतो? त्यामुळे फक्त कला जोपासणं, त्यालाच आपलं करिअर बनवणं आणि त्यावरच आपला उदरनिर्वाह चालवणं हे कवींना खरंच शक्य असतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐका या पॉडकास्टमधून... आपल्या सर्वांचा लाडका कवी संदीप खरे याच्याकडून!
कोरोना आला कोठून, पसरला कसा, त्याची रचना कशी आहे, त्यावर उपचार सापडतील का, लस कशी असेल, हा लढा कुठपर्यंत चालणार अशा अनेक प्रश्नांवर भटनागर पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ प्रा. संजीव गलांडे यांच्याशी गप्पा मारल्या आहेत पत्रकार मयुरेश प्रभुणे यांनी ‘सायकास्ट’ या स्टोरीटेलवरील नव्या पॉडकास्टमध्ये...
याशिवाय येत्या आठवड्यात स्टोरीटेलवर काय ऐकायला मिळणार यावर चर्चा केली आहे प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी...
काही लोक आयुष्यात झटकन निर्णय घेऊन मोकळे होतात, तर काहींची लहान-सहान गोष्टींबाबत निर्णय घेतानाही द्विधा मनःस्थिती होते. महत्त्वाच्या निर्णयांबरोबरच दैनंदिन जीवनातले निर्णय घेणं ही तशी साधी वाटणारी गोष्ट, मात्र हीच गोष्ट अनेकांना धर्मसंकटात टाकते. याच निर्णयक्षमतेवर भाष्य करणारा ‘निर्णय घ्यावा की न घ्यावा?’ हा मॅनेजमेंट-गुरू एस. बी. मंत्री यांचा हा विशेष पॉडकास्ट!
From the publisher's feed