स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By Santosh DeshpandeArtsBooks
Download on the App Store

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum episodes

  • 138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे....

    पॉडकास्ट म्हणजे नक्की काय, पॉडकास्टच्या माध्यमातून आपण श्रोत्यांपर्यंत कसे पोहोचू शकतो, मराठीमध्ये पॉडकास्टिंगला काय भविष्य आहे या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत मराठीतील आघाडीचे पॉडकास्टर संतोष देशपांडे, उर्मिला निंबाळकर आणि विनायक पाचलग यांनी. हा `पॉडकास्टर्सचा पॉडकास्ट` स्टोरीटेलचे पब्लिशर सुकीर्त गुमास्ते यांनी आपल्या खुमासदार प्रश्नांनी मस्त खुलवला आहे. 


    याशिवाय प्रसाद मिरासदार यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार!

    'Sunday With देशपांडे' हा पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande

    'द उर्मिला शो' हा पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/series/54792-The-Urmila-Show

    विनायक पाचलग यांचे पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -https://www.storytel.com/in/en/narrators/248046-Vinayak-Pachlag

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans 

    49 min
  • 137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...

    स्टोरीटेलवरील ‘मर्डर केस’ या क्राईम थ्रिलर ओरिजिनलला आपल्या धारदाज आवाजाने चार चाँद लावलेला हरहुन्नरी अभिनेता आस्ताद काळे याचा खास प्रवास ऐका स्टोरीटेल कट्ट्यावर... त्याला बोलतं केलं आहे पब्लिशर सई तांबे हिने. स्टोरीटेलवर क्राईम थ्रिलर गोष्टींना प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि अशीच एक हटके गोष्ट श्रीपाद जोशी आणि जयेश मेस्त्री यांनी लिहिली आहे. आस्तादचा या ‘मर्डर केस’ला आवाज देण्यापासून ते आजवरचा कलाप्रवास कसा होता हे त्याने या गप्पांमध्ये उलगडले आहे.   


    याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार!

    ‘मर्डर केस’ ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/2119395-Murder-Case-S01E01

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans 

    1 hr 14 min
  • 136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी!

    धोका, स्पेस ब्राव्हो, झंझावात, देव दानव आणि मानव, फराओचा संदेश अशा इंटरेस्टींग स्टोरीटेल ऑरिजिनल सिरीजचे लेखक, तसेच बिजिंग कॉन्स्पिरसी, थेंब थेंब मृत्यू, ब्लॅकमेल, क्लिओपात्रा, यशोवर्मन, कल्की या स्टोरीटेलवरील लोकप्रिय कादंबऱ्यांचे लेखक संजय सोनवणी यांचा आजवरचा साहित्यिक श्रवणीय प्रवास ऐका या स्टोरीटेल कट्ट्यावर. या विशेष भागात संजय सोनवणींना बोलतं केलं आहे संतोष देशपांडे यांनी.  


    याशिवाय प्रसाद मिरासदार यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार!


    संजय सोनवणी यांची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/search-sanjay+sonawani

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans 

    50 min
  • 135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!

    भारतीय इंग्रजी साहित्याला जागतिक प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देणारे महान लेखक म्हणजे आर.के. नारायण. `द गाइड` ही कादंबरी, 'मालगुडी डेज', 'स्वामी' या मालिकांमुळे सर्वांच्या मनामनांत रूजलेल्या नारायण यांची आणखी एक गाजलेली कादंबरी म्हणजे 'द इंग्लिश टीचर'. हीच कादंबरी स्टोरीटेल घेऊन येत आहे अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या भारदस्त आवाजात... ही कादंबरी अतुल कुलकर्णींच्या आवाजात ऐकणं हे आपल्या श्रोतृवर्गासाठी एक अविस्मरणीय पर्वणी असणार आहे. या कादंबरीच्या अभिवाचनाचा अतुल कुलकर्णी यांचा अनुभव कसा होता, यावर त्यांनी चर्चा केली आहे स्टोरीटेलचे राहुल पाटील यांच्याशी.


    या रविवारी म्हणजेच उद्या स्टोरीटेल 'ऐकू आनंदे दिन' साजरा करत आहे. यानिमित्ताने सकाळी ७.३० पासूनच विविध मान्यवरांचे विचार, मतं, मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना स्टोरीटेलच्या युट्यूब पेजवर बघता येतील. याशिवाय या आठवड्यात कोणती पुस्तकं तुमच्या भेटीस येणार आहेत यावर चर्चा केली आहे संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांनी.

    ऐकू आनंदे बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.youtube.com/channel/UC8oZT0ZLQalcvst62oq79SA 

    'द इंग्लिश टीचर' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/2122261-The-English-Teacher

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans  

    49 min
  • 134: स्वप्नालीची अनोखी 'चित्रकथा'!

    स्टोरीटेलवरील अनेक दर्जेदार पुस्तकांना आपल्या दमदार आवाजाने जिने 'चार चाँद' लावले त्या स्वप्नाली पाटीलचं आणखी एक खास ऑरिजिनल स्टोरीटेलवर नुकतंच रिलीज झालंय. सायली केदार लिखित 'चित्रकथा'या स्टोरीटेल ऑरिजिनल शॉर्टस्टोरीला अभिनेत्री स्वप्नाली पाटील आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी आवाज दिलाय. स्वप्नाली अगदी सुरुवातीपासून स्टोरीटेलसोबत काम करतीय, ऑडिओबुकला आवाज देण्याचा तिचा अनुभव आणि स्टोरीटेलसोबतचा प्रवास स्वप्नालीने नुकताच पब्लिशर सई तांबेसोबत शेअर केलाय... त्यामुळे स्टोरीटेल कट्ट्यावरील हा खास पॉडकास्ट ऐकायला अजिबात विसरू नका...


    याशिवाय स्टोरीटेलवर २०२१ची सुरवात कशी झाली आणि या आठवड्यात श्रोत्यांना काय ऐकायला मिळणार यावर चर्चा केली आहे प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी!

    चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!

    https://audioboom.com/posts/7763237-

    'चित्रकथा' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/2113226-Chitrakatha

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans   

    34 min
  • 132: सिक्स्थ सेन्सचं गूढ!

    `सिक्स्थ सेन्स`बद्दल नेहमी सगळ्यांना कुतुहल असतं. सिक्स्थ सेन्स अर्थात अतिंद्रिय शक्ती म्हणजे नेमकं काय, ती प्रत्येक व्यक्तीकडे असते का, अध्यात्म आणि विज्ञानाचा कसा संबंध आहे, या सगळ्या गोष्टी एकमेकांवर कशा अवलंबून आहेत, त्यातील खरेपणा किती आणि अंधश्रद्धा किती अशा वेगळ्याच विषयांवरील थेट संवाद पॉडकास्टमध्ये आपल्याला ऐकायला मिळतो. या विषयामध्ये अभ्यासक आणि साधक म्हणून कार्यरत असणारे धवल आपटे यांच्याकडून हा विषय उलगडणारा हा विशेष पॉडकास्ट! 


    'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    45 min
  • 133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!

    २०२१ ची फ्रेश सुरुवात... स्टोरीटेलची वर्षातली पहिलीच ओरिजिनल शॉर्टस्टोरी... नवा विषय आणि नवा आवाज... अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि स्वप्नाली पाटील यांच्या आवाजात 'चित्रकथा' ही लव्हस्टोरी ८ डिसेंबरला ऐककायला मिळणार आहे... लेखिका सायली केदारने नेहमीप्रमाणेच आपल्या लेखणीची जादू दाखवली आहे... तसेच यावेळी स्टोरीटेल कट्ट्यावर सिद्धार्थ चांदेकरचा शॉर्टस्टोरी रेकोर्डिंगचा अनुभव आपल्याला ऐकायला मिळणार आहे... तेव्हा ऐकायला विसरू नका हा खास पॉडकास्ट...


    याशिवाय स्टोरीटेलवर २०२० मध्ये सर्वांत जास्त काय ऐकलं गेलं आणि स्टोरीटेलसाठी हे वर्षं कसं होतं यावर चर्चा केली आहे प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी!

    'चित्रकथा' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/2113226-Chitrakatha

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans 

    25 min
  • 131: श्रीमंत कसं व्हावं?

    श्रीमंत कोणाला व्हायचं नसतं? पण श्रीमंत कसं व्हावं, त्यासाठी मार्ग काय काय आहेत, नोकरदार व व्यावसायिकांनी कशी बचत करावी, जास्त उत्पन्न असलेला माणूस श्रीमंत असतो, की जास्त बचत करणारा, बचत व गुंतवणूक करताना प्राधान्यक्रम काय असावा, जोखीम घ्यावी की न घ्यावी या व अशा तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गुंतवणूक मार्गदर्शक भरत फाटक यांच्या 'श्रीमंत कसं व्हावं?' या पॉडकास्टमध्ये मिळतील.


    'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    43 min
  • 130: 'हिंदू' साकारताना...!

    ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांची सर्वात जास्त गाजलेली 'हिंदू' ही कादंबरी आता स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. ही कादंबरीला आवाज लाभला आहे प्रसिद्ध अभिनेते अतुल पेठे यांचा! नुकत्याच रिलीज झालेल्या 'हिंदू'चे विवेचन आणि रसग्रहण अतुल पेठे यांनी केलंय. तसेच हिंदू कशी घडली याचे सविस्तर वर्णनही केलं आहे. अशी श्रवणीय पर्वणी आम्ही स्टोरीटेल कट्ट्यावर आणली आहे, ऐकायला अजिबात विसरू नका!


    याशिवाय स्टोरीटेलवर वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या पुस्तकांवर गप्पा मारल्या आहेत प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी!

    हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/2083357-Hindu--Jagnyachi-Samruddha-Adgal

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans 

    1 hr 14 min
  • 128: सूत्रांच्या माहितीनुसार...

    राजकारण महाराष्ट्रातलं असो किंवा देशपातळीवरचं, त्याबद्दल माहिती बातमीदारापर्यंत पोहोचवतो 'तो' सूत्र कोण आहे, यावर त्या बातमीची आणि बातमीदाराची भिस्त असते. मधल्या काळात महाराष्ट्राने सूत्रांची 'पॉवर' चांगलीच अनुभवली... वृत्तवाहिन्यांवर दिसणाऱ्या अनेक बातम्यांमध्ये 'सूत्रांच्या माहितीनुसार...' हा शब्द कॉमन होता. याच पार्श्वभूमीवर, सूत्र कसा निर्माण करावा, तो कसा टिकवावा, आपल्याला हवी ती माहिती कशी मिळवावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत!


    'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    43 min

About स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

From the publisher's feed

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.