स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By Santosh DeshpandeArtsBooks
Download on the App Store

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum episodes

  • 119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!!

    मराठी श्रोत्यांना स्टोरीटेल अॅप जितकी भरभरून ऑडिओबुक्सची मेजवानी देतं तितकाच विचार बाळगोपाळांचाही करतं बरं का! त्यामुळे आज १४ नोव्हेंबर, बालदिनानिमित्त आपला स्टोरीटेल कट्टाही बालमय झालाय... स्टोरीटेलवरील बालकुमारांसाठी विशेष साहित्य, व्हॉईस ओव्हर आर्टिस्टकडून खास बालमित्रांसाठी काढलेले आवाज तसेच या छोट्या दोस्तांसाठी उभारलेलं स्टोरीलवरचं सुंदर जग! या सगळ्याबद्दल स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे, प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी तितक्याच लहान होऊन मारलेल्या मजेशीर गप्पा... ऐकायलाच हव्यात...


    छोट्या दोस्तांसाठी स्टोरीटेलचा खास 'Kids Mode' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
    https://www.storytel.com/in/en/categories/1-Children

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    33 min
  • 116: माध्यमांचीच ‘मीडिया ट्रायल’!

    सध्या मीडियाबाबत असं झालंय की, सेलिब्रेटींबाबत गॉसिप चालवल्याशिवाय बातमीच पूर्ण होत नाही. सध्याच्या माध्यमांना झालंय काय, बातमीचा विषय काय असावा, वार्ताहारांची भाषा कशी बदलली आहे, कोणाला किती महत्त्व दिलं जातंय अशा एक ना अनेक प्रश्नांना हात घालत मीडियालाच फैलावर घेणारी ही ‘मीडिया ट्रायल’ नक्की ऐका!   


    'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande

    52 min
  • 117: हेमांगीची हटके ‘आर्टिफिशियल मॉम’

    घरातल्या घरात मजा म्हणून मिमिक्री करता करता अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या मनात विचार आला की आपण ऑडिओबुक्सला उत्तम आवाज देऊ शकतो... आणि त्यामुळे तिने स्टोरीटेलच्या जगात प्रवेश केला आणि एका हटके पुस्तकाला आवाज दिला... ‘आर्टिफिशियल मॉम’ हे अमोल कपोले लिखित भावनामिश्रित साय-फाय हेमांगीच्या आवाजात नुकतंच रिलीज झालंय आणि यानिमित्ताने स्टोरीटेल मराठीची पब्लिशर सई तांबे हिने हेमांगीशी संवाद साधलाय... 


    याशिवाय स्टोरीटेलने या आठवड्यात दिवाळीनिमित्त मौज ही दिवाळी अंक ऑडिओबुकच्या स्वरूपात आणला आहे, त्यासोबतच या आठवड्यात कोणती नवीन पुस्तकं आणि गोष्टी स्टोरीटेलवर ऐकायला मिळणार याविषयी सांगत आहेत प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे.  त्यामुळे या दिवाळीत फराळासोबतच ऑडिओबुक्सची एक खुसखुशीत मेजवानी आपल्या श्रोत्यांना मिळणार आहे... त्यामुळे ऐकायला विसरू नका हा खसा पॉडकास्ट...


    आर्टिफिशियल मॉम  ऐकण्यासाठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/search-artificial+mom

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    24 min
  • 115: बात क्रिकेटची!

    बदलतं क्रिकेट, त्यानुसार बदलत जाणारे प्रेक्षक, बदलत्या नियमांमुळे क्रिकेटचा बदललेला फॉरमॅट, गोलंदाजांची परीक्षा आणि फलंदाजांचा गवगवा, कसोटी की टी-२०? यावर प्रसिद्ध क्रीडा पत्रकार द्वाकानाथ संझगिरी यांच्याशी खुसशुशीत चर्चा... तुमच्या आमच्या मनातली खास अशी ‘बात क्रिकेटची!’ फक्त ऐका स्टोरीटेल अॅपवरील 'Sunday With देशपांडे' या पॉडकास्ट सिरीजमध्ये!


    'बात क्रिकेटची' स्टोरीटेलवर ऐकण्यासठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/2043748-Sunday-with-Deshpande-S01-E01?appRedirect=true 

    36 min
  • 114: 'केस नंबर 001' ओपन होते तेव्हा...

    मर्डर मिस्ट्री म्हणलं की कथेत अनेक पात्रं येतात... त्यात ‘केस नंबर 001’ सारखं ऑडिओबुक असेल तर इतक्या पात्रांचे वेगवेगळ्या ढंगाचे आवाजही काढावे लागतात... हेच शिवधनुष्य पेललं आहे अभिनेत्री स्मिता तांबे हिने. स्टोरीटेल मराठीवर लेखिका सायली केदार आणि स्मिता तांबे द्विवेदी हिचा आवाज असलेली ‘केस नंबर 001’ ही कथा नुकतीच रिलीज झाली आहे. यानिमित्ताने स्टोरीटेल मराठी ओरिजनल्सची पब्लिशर सई तांबे हिने स्मिता व सायली यांच्याशी मारलेल्या या खास गप्पा!

     

    याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांनी या आठवड्यात स्टोरीटेलवर काय काय ऐकायला मिळणार हे सांगितलं आहे, त्यामुळे ऐकायला विसरू नका हा विशेष पॉडकास्ट...

     
     'केस नंबर 001' ऐकण्यासाठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/2037473-Case-Number---001-S01E01

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    42 min
  • 113: ‘अॅडिक्ट’वर मुक्ता मैफल!

    मराठीतील गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने स्टोरीटेलच्या ऑडिओ जगात प्रवेश केलाय आणि वाचलंय भन्नाट ऑडिओबुक ‘अॅडिक्ट’! माणसाला फक्त दारू, सिगरेट, ड्रग्ज यांचंच व्यसन असतं असं वाटत असेल तर तुम्ही ‘अॅडिक्ट’ ऐकायलाच पाहिजे! आणि त्यासोबतच मुक्ताचा ‘अॅडिक्ट’साठी वाचन करतानाच अनुभव कसा होता, हे जाणून घ्या पल्लवी वाघ-केळेकर यांनी घेतलेल्या स्पेशल मुलाखतीतून...


    याशिवाय या आठवड्यात स्टोरीटेलमध्ये कोणती नवीन ऑडिओबुक्स येणार, कोणते नवीन पॉडकास्ट येणार यावर संवाद साधला आहे प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांनी... तेव्हा ऐकायला विसरू नका...


    अॅडिक्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/search-addict

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
    https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

    1 hr 6 min
  • 112: उदाहरणार्थ- कोसला!

    मराठी साहित्यजगतातील मैलाचा दगड असं जिला समजले जाते ती कलाकृती म्हणजे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित लेखक भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला'. या अजरामर साहित्यकृतीचे आता स्टोरीटेल वर आगमन झाले आहे. त्यानिमित्त, आजच्या पॉडकास्ट मध्ये सादर आहे 'कोसला' ज्याच्या आवाजातून आपल्यापर्यंत पोहोचली आहे, ते अभिनेते-लेखक गिरीश कुलकर्णी यांसमवेतची गप्पांची मैफल आणि उत्तरार्धात बोनस म्हणून 'कोसला'च्या पहिल्या प्रकरणातील काही भाग....आवर्जून ऐकावी अशी ही श्रवणीय पर्वणी.


    'कोसला' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/1995185-Kosala

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/marathi

    48 min
  • 111: रोल 'प्ले' करताना...

    स्टोरीटेलवर तुम्हाला एकदम बोल्ड, थ्रिलर आणि डोळ्यासमोर थरारक चित्र उभं करणारी गोष्ट ऐकायला मिळली तर? आणि त्या गोष्टीचे दोन शेवट आहेत, त्यातला तुम्हाला हवा तो निवडायला सांगितला तर? भन्नाट आयडिया आहे ना! लेखक भूषण कोरगांवकर यांची अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी वाचलेली हटके इरोटिक क्राईम थ्रिलर ‘रोल प्ले’ ही कथा ऐकून तुमच्या अंगावर काटा येणार आहे... सेक्स, क्राईम, थ्रिलिंग यांची गुंफण असलेल्या 'रोल प्ले'च्या निर्मितीमागची गोष्ट ऐका भूषण, गीतांजली आणि सई यांच्या गप्पांमधून...


    याशिवाय स्टोरीटेल या आठवड्यात काय घेऊन येणार याची उत्सुकता तुम्हाला असेलच, मग नक्की ऐका हा विशेष पॉडकास्ट!

    'रोल प्ले' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/1975283-Role-Play-S01E01

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/marathi

    41 min
  • 110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री!

    मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाचा ठसा उमटवलेली गुणवान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता ऑडिओबुक्सच्या जगात प्रवेश करत आहे. स्टोरीटेलवर तिने 'हाकामारी' या ऑडिओबुकला आवाज दिलाय. त्यामुळे आता चित्रपट, नाटकांसह ऑडिओबुकचं क्षेत्र गाजवायला सोनाली आता सज्ज झाली आहे. याचनिमित्ताने स्टोरीटेलचे राहुल पाटील यांनी सोनाली कुलर्णींशी साधलेला संवाद नक्की ऐका!


    तसेच, स्टोरीटेलवर या आठवड्यात काय नवीन येतंय याचा वेध घेतलाय संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांनी नक्की ऐका हा विशेष पॉडकास्ट.

    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/marathi

    32 min
  • 109: स्टोरीटेलवर अनुभवा मंगळाची हटके सफर!

    स्टोरीटेलच्या श्रोत्यांनी नुकतीच 'माय लॉर्ड' ऐकून कोर्टाची पायरी चढली... आणि आता स्टोरीटेलचा श्रोतृवर्ग मंगळावर जायला सज्ज झालाय! हो... योगेश शेजवलकर लिखित आणि क्षितीश दाते यांचा आवाज असलेलं 'वाढीव ऑनसाईट Mars Tight' हे ऑडिओबुक नुकतंच रिलीज झालंय आणि या मार्फत जमदग्नीसह तुम्हीही मंगळाची सफर करणार आहात... त्याबरोबरच शेकडो मराठी पुस्तकं ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्ट मराठी लगेच सबस्क्राईब करा. 


    याशिवाय स्टोरीटेल मराठीवर या आठवड्यात काय काय नवीन ऐकायला मिळणार हे सांगताहेत प्रसाद मिरासदार, ऐकायला विसरू नका!

    'वाढीव ऑनसाईट Mars Tight' ऑडिओबुक ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/874258-Vadhiv-Onsight-Mars-Tight---S01E01

    स्टोरीटेल सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/marathi

    36 min

About स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

From the publisher's feed

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.