
Sign up to save your podcasts
Or


उत्तम अभिनय आणि त्यास खणखणीत आवाजाची जोड यामुळे स्वानंदी टिकेकर रसिकांची नेहमीच दाद घेऊन जाते. आईबाबांकडून लाभलेला कलेचा वारसा पुढे घेऊन जात असतानाच त्यात आपल्या आनंदाच्या नवनव्या वाटा शोधणारी स्वानंदी स्टोरीटेल कट्ट्यावर उर्मिलापाशी आपलं मन मोकळं करते, तेव्हा तिला ऐकण्याची ही संधी का सोडावी?
बघता बघता जुलै आला.... लॉकडाऊनमध्ये अडकलेलं बाहेरचं आणि आतलं जग पावसासंगे जरासं बाहेर जाऊ पाहतंय. खमंग भजी साद घालताहेत आणि त्याच बरोबर मूड टिपणारं खास काही ऐकावसं वाटणार आहे. अशा सर्व रसिकांसाठी हा जुलै अविस्मरणीय ठरणार आहे. कसा? सुकीर्त आणि उर्मिलाच्या या गप्पा ऐका आणि जाणून घ्या...
‘हिडन कॅमेरा’ या स्टोरीटेलवर गाजत असलेल्या ओरिजनलचा लेखक नीरज शिरवईकर म्हणजे एक कलंदर, मनस्वी व्यक्तिमत्व. आपल्या शब्दांच्या सामर्थ्यानं प्रभावी कथानक डोळ्यांपुढं उभं करण्याची कला कशी विकसित केली, या तरुण लेखकाचा आपल्या कलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे हे सारं त्याच्याशी रंगलेल्या या गप्पांमधून उलगडत जातं. तेव्हा ऐकायला विसरु नये, असा हा पॉडकास्ट श्रोतेहो, खास तुमच्यासाठी....
स्टोरीटेल वर हिडन कॅमेरा ऐकण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा...
स्टोरीटेलवरील गोष्टींचा आस्वाद ३० दिवस निःशुल्क घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन साइन-अप करा.
पावसासोबतच जून महिना स्टोरीटेलवर अनेक गोष्टीही घेऊन येत आहे. त्या काय आहेत, त्या ऐकण्यात काय गंमत असणार आहे, यावर सुकीर्त आणि उर्मिला यांच्यात रंगलेल्या गप्पा...
From the publisher's feed