स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By Santosh DeshpandeArtsBooks
Download on the App Store

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum episodes

  • 88: लॉकडाउनचा काळ पण स्टोरीटेलवर धमाल (मे स्पेशल)

    कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. आपल्याकडे त्यात वाढही झालेली आहे. आता प्रश्न येतो...सतत घरी बसून करायचं तरी काय? सतत टीव्ही आणि मोबाईलवर चित्रपटही पाहून झालेत. मग आता काय करावं? तेव्हा पर्याय समोर येतो, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या ऑडिओबुक्सच्या खजिन्याचा. स्टोरीटेल टीमने खास लॉकडाऊन काळात आपल्याकरिता आणलेल्या खास गोष्टींची थोडक्यात ओळख करुन घेऊया उर्मिला आणि सुकीर्त यांच्यात रंगलेल्या या गप्पांमधून.

    स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी  क्लिक करा.. 

    35 min
  • 87: ‘युगंधर’ श्रीकृष्णाला आवाजातून मूर्तिमंत उभा करणारा जादूगार

    लॉकडाऊनमुळे त्रस्त आहात? चिंतीत आहात?

    मग तर तुम्ही हा पॉडकास्ट ऐकायलाच हवा.
    आजच्या पॉडकास्टमध्ये आले आहेत ‘अनिरुद्ध दडके’- ज्यांनी आपल्या आवाजातून ‘स्टोरीटेल’वर ‘मृत्युंजय’ आणि ‘युगंधर’मधील श्रीकृष्णाला अक्षरश: जिवंत केले आहे. ज्यांचा आवाज ऐकताना सगळ्या शंका-कुशंका लोप पावतात आणि आतमध्ये एक धीरगंभीर, शांत ॐकार घुमत आहे असे वाटते, असे अनिरुद्ध दडके सांगत आहेत, त्यांच्या व्हॉईस ओव्हर करियरची सुरूवात आणि त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास. सोबत अनेक गंमती-जमती  आहेत, ज्यात विक्रम गोखले यांबद्दलचा किस्सा असो, वाचनातून उमजलेला यशवंत देवांचा सल्ला असो. या सर्व प्रवासाबद्दल त्यांना बोलते करत आहे उर्मिला.

    तर हा पॉडकास्ट जरूर ऐका आम्हांलाही कळवा हा पॉडकास्ट कसा वाटला ते!



    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    49 min
  • 86: लहान मुलांना असलेला धोका: गेम्स आणि मोबाईलचा विळखा

    आजच्या पॉडकास्टमधे एक गंभीर विषयावर चर्चा आहे. ८ ते ११ वयोगटांतील मुले आणि त्यांच्या असलेला पॉर्नोग्राफी आणि मोबाईल गेमिंगचा धोका!

    यासाठी आज कट्ट्यावर आल्या आहेत मुक्ता चैतन्य. त्यांचा या विषयावर अभ्यास आहे आणि त्यांनी तो वेळोवेळी इतर माध्यमांतून सादर केला आहे.
    तर जाणून घ्या त्या काय सांगत आहेत, आणि उर्मिला त्यांना कुठल्या-कुठल्या विषयांवर बोलते करत आहे, या पॉडकास्टमधून!

    हा पॉडकास्ट  जरूर ऐका आणि इतर पालकांनाही ऐकवा !


    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    33 min
  • 85: जरी असला चावट, तरी ‘सेक्स’चाच आहे वट!

    सेक्सवर बोल बिनधास्त या पॉडकास्टच्या पहिल्या सिझनच्या अभूतपूर्व यशानंतर डॉ. प्रसन्न गद्रे आणि निरंजन मेढेकर यांनी आणला आहे, सेक्सवर बोल बिनधास्तचा दुसरा सिझन!

    काय आहे या सिझनमध्ये? तुम्हीच जाणून घ्या, ऐका उर्मिलासोबत डॉ. प्रसन्न गद्रे आणि निरंजन मेढेकर यांच्या मनमोकळा संवाद!

    हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा.

    सेक्सवर बोल बिनधास्त-२ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    45 min
  • 83: स्टोरीटेल: क्वारंटाईन केअर (एप्रिल स्पेशल)

    सध्या कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. सर्व देशांमध्ये त्याची दहशत पसरली आहे. त्यापासून सुरक्षेसाठी भारताने २१ दिवसांचा लॉकडाऊनचा कालावधी चालू केला आहे.

    तर या काळजीच्या दिवसात केवळ घरात बसून कंटाळा येऊ नये, नियमांचे पालन करताना कुठेही दगदग होऊ नये म्हणून प्रत्येकजण कसली ना कसली कामं करण्यात गुंतले आहेत. काही जण २१ दिवसांसाठी पुस्तकांच्या याद्या, चित्रपटांच्या याद्या आणि अशा बर्‍याच गोष्टी शेअर करत आहेत. तर मग यात स्टोरीटेल कसा मागे राहिल बरे?
    या २१ विदसात काय ऐकावे, कुठले जॉनर ऐकावेत हे उर्मिला जाणून घेत आहे सुकीर्त गुमास्ते या स्टोरीटेलच्या पब्लिशरकडून!
    काय आहे यादी? तुम्हीच पॉडकास्ट ऐकून ठरवा, तुमची स्टोरीटेलची यादी!

    आणि हो, तुमची स्टोरीटेलची स्वत:ची यादी देखील कॉमेंटस्‌मध्ये सांगायला विसरू नका!

    हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    39 min
  • 82: पावनखिंड ३०३ आणि संजय सोनवणी

    स्टोरीटेलवर पहिला ध्वनीपट आला आहे. ‘पावनखिंड ३०३’ ऐतिहासिक पार्श्वभूमीवर असलेल्या या काल्पनिक पटाचे लेखक आहेत संजय सोनवणी. त्यानिमित्ताने उर्मिलाने त्यांच्याशी साधलेला संवाद, जाणून घेतलेल्या खूप गंमती-जंमती या पॉडकास्टमध्ये आपल्याला ऐकता येतील.

     
    तर हा पॉडकास्ट जरूर ऐका, आणि आम्हांलाही कळवा हा पॉडकास्ट कसा वाटला ते!

    ‘पावनखिंड ३०३’ ऐकण्यासाठी: येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    50 min
  • 81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं?

    कोरोना व्हायरस नक्की कसा आला?  कोरोनाबद्दल भीती का आहे? हा आजार बरा होतो का? हा आजार कसा पसरतो? नक्की खरं काय आणि खोटं काय? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याबाबत *आपण काय करायला हवं?*


    कोरोनाबद्दल सर्व काही माहिती देणारे राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांचे विश्लेषण..

    पहा... शेअर करा... भीती नको पण काळजी घ्या...

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    22 min
  • 80: ‘सोंग’ ते ‘पुढचं सोंग’- एक प्रवास

    सोंग आणि पुढचं सोंग या स्टोरीटेल ओरिजिनल ऑडिओबुक्सचे लेखक नितिन थोरात आणि पब्लिशर सुकीर्त गुमास्ते यांच्या बरोबर ‘सोंग’ या ऑडिओबुकच्या पुस्तक प्रकाशन या सोहळ्याच्या निमित्ताने उर्मिलाने साधलेला संवाद.


    नेहमीप्रमाणे आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीतून आपले मत मांडणार्‍या नितीनची खुमासदार बोली आणि सुकीर्तची त्याबरोबर जमलेली जोडी.त्यातून जमून आलेली ही गप्पांची फर्मास मैफल जरूर ऐका.

    ‘सोंग’ ऐकण्यासाठी: येथे क्लिक करा.

    ‘पुढचं सोंग’ ऐकण्यासाठी: येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.  

    38 min
  • 79: इसलिए राह संघर्ष की हम चुनें (महिला दिन विशेष)

    इसलिए राह संघर्ष की हम चुनें

    जिंदगी आंसुओं से नहाई ना हो।
    शाम सहमी न हो, रात हो ना डरी,
    भोर की आँख फिर डबडबाई ना हो।
    इसलिए... इसलिए... इसलिए...

    या महिला दिन विशेष पॉडकास्ट मध्ये आज आपल्या सोबत आहेत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व - दीपा देशमुख! लेखिका, समन्वयक, अनुवादक, संपादक,  शिक्षण विभाग प्रमुख या आणि अशा अनेक स्तरांवर आपली मोलाची कामगिरी बजावत त्यांनी समाजकार्यात देखील आपले योगदान दिले आहे.
    महिला दिनानिमित्त या प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाशी संवाद साधला आहे उर्मिला निंबाळकर यांनी!

    काय आहे, ते प्रत्यक्ष जाणून घ्या पॉडकास्टमध्ये, आणि हा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हांला जरूर कळवा.

    महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    43 min
  • 78: स्टोरीटेल: मार्च स्पेशल

    हळूहळू उन्हाळा सुरू होत आहे, गुलाबी थंडी मनावर ताबा घेत असतानाच नाहीशी होत आहे.


    मग या उन्हाळातली ही तगमग कशी शांत करायची?

    त्यासाठी उर्मिला बोलते करत आहे स्टोरीटेलच्या सई तांबे आणि सुकीर्त गुमास्ते ह्या पब्लिशर्सच्या जोडगोळीला!

    या मार्च मध्ये  नवीकोरी ऑडिओबुक्स स्टोरीटेलच्या ताफ्यात दाखल होत आहेत. तर ही यादी काय आहे? हे जाणून घ्या.

    तर ऐकायला विसरू नका...आणि  हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    28 min

About स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

From the publisher's feed

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.