स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By Santosh DeshpandeArtsBooks
Download on the App Store

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum episodes

  • 67: बेडटाईम स्टोरीज...दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठी

    दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठीचा विशेष विसावा... बेडटाईम स्टोरीज...


    काय आहे या पॉडकास्टमध्ये?

    पब्लिशर सई तांबे आणि व्हॉईस-ओव्हर आर्टिस्ट नेहा अष्टपुत्रे सांगत आहेत, बेडटाईम स्टोरीजचे धमाल किस्से आणि त्यांची गरज! आणि नेहमीप्रमाणे त्यांना बोलते करत आहे आपली होस्ट आणि दोस्त उर्मिला!


    तर ऐका आणि आम्हांलाही कळवा, हा पॉडकास्ट कसा वाटला ते?


    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    37 min
  • 66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का?

    तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? मग तर तुम्ही हा पॉडकास्ट ऐकायलाच हवा.

    ऑडिओबुक माध्यमासाठी लिहायची तयारी, त्याची प्रक्रिया आणि लेखन आणि कथानक निर्मितीमागची असणारी मेहनत आणि त्याचे मिळणारे गोमटे फळ...
    या सर्व गोष्टींबद्दल उर्मिला बोलते करत आहे सई आणि सुकीर्त या पब्लिशर्स जोडगोळीला. तर हा पॉडकास्ट ऐकायला विसरू नका...आणि  हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    56 min
  • 65: स्टोरीटेल: डिसेंबर स्पेशल

    सध्या उत्सुकता आहे नवीन वर्षाच्या आगमनाची. त्यातही हळूहळू गुलाबी थंडी मनावर ताबा घेत आहे.

    अश्यातच त्याला जोड मिळाली रहस्य आणि रोमान्सची तर?

    या डिसेंबर मध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्यातीलही नवीकोरी ऑडिओबुक्स स्टोरीटेलच्या ताफ्यात दाखल होत आहेत. तर ही यादी काय आहे? हे जाणून घ्या.

    त्यासाठी उर्मिला बोलते करत आहे स्टोरीटेलच्या सई तांबे आणि सुकीर्त गुमास्ते ह्या पब्लिशर्सच्या जोडगोळीला!

    तर ऐकायला विसरू नका...आणि  हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    19 min
  • 64: आवाजाच्या किमयागाराची ‘झेप’

    ह्यावेळी स्टोरीटेल कट्ट्यावर हजेरी लावली आहे, अभिनेता ‘प्रमोद पवार’ यांनी आणि निमित्त आहे ना.सं. इनामदार यांच्या ‘झेप’चे आणि शिवाजी सावंत यांच्या ‘युगंधर’चे!


    आणि सोबत उर्मिला आहेच! तर काय काय बोलणे झाले आहे आणि कुठल्या कुठल्या विषयांना छेडले आहे दोघांनी, हे ऐका प्रत्यक्ष पॉडकास्टमध्ये!


    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    47 min
  • 63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?

    तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट बनायचं आहे?

    मग तर तुम्ही हा पॉडकास्ट जरूर ऐकला पाहिजे.

    कसे होता येते व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट? काय मेहनत घ्यावी लागते? याबद्दल जाणून घ्या स्टोरीटेलच्या या नव्याकोर्‍या पॉडकास्टमध्ये, ज्यात उर्मिला बोलतं करत आहे ‘स्टोरीटेल’च्या प्रॉडक्शन मॅनेजर ‘राहूल पाटील’ यांना!

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    59 min
  • 62: श्रवणालाही पंख फुटतात तेव्हा...

    श्रवणालाही पंख फुटतात तेव्हा...


    कविता, सुनिताबाई आणि डॉ. अरूणा ढेरे....!
    काय होते यांचे नाते? जाणून घ्या स्टोरीटेलच्या नव्याकोर्‍या पॉडकास्ट मध्ये!

    ‘प्रिय जी.ए.’  ऐकण्यासाठी  येथे क्लिक करा.
    ‘आहे मनोहर तरी’ ऐकण्यासाठी  येथे क्लिक करा.
    ‘सोयरे सकळ’ ऐकण्यासाठी  येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    51 min
  • 61: ‘अ‍ॅडम’ आणि विक्रम गायकवाड

    ह्यावेळी स्टोरीटेल कट्ट्यावर हजेरी लावली आहे, अभिनेता विक्रम गायकवाड यांनी आणि निमित्त आहे रत्नाकर मतकरी यांच्या ‘अ‍ॅडम’चे!


    अ‍ॅडम ही एका सामान्य माणसाची कथा! वरद नावाच्या तरुणाभोवती फिरणारी...त्याच्या तारुण्याभोवतीसुद्धा फिरणारी!
    यात शोध आहे तो माणसांमधील आदिम प्रवृत्तीचा! ‘अ‍ॅड्म आणि इव्ह’ यांच्या अनादी काळापासून चालत आलेल्या गोष्टींचा!

    रत्नाकर मतकरींची ह्या वेगळ्या प्रवाहातील कादंबरीला आवाज देताना असलेले आव्हान, कलाकृतीचा आकृतीबंध आणि इतर सगळ्या गोष्टी यावर विक्रम भरभरून बोलले आहेत आणि त्यांना बोलते केले आहे अर्थातच उर्मिला निंबाळकर यांनी!

    तर काय काय बोलणे झाले आहे आणि कुठल्या कुठल्या विषयांना छेडले आहे दोघांनी, हे ऐका प्रत्यक्ष पॉडकास्टमध्ये.

    आजचा पॉडकास्ट न चुकता ऐका आणि आम्हांलाही त्याबद्दल आपले मत नक्की कळवा.

    ‘अ‍ॅडम’ ऐकण्यासाठी  येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    28 min
  • 60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल

    दिवाळीच्या सुट्ट्या नुकत्याच संपलेल्या आहेत आणि वेध लागले आहेत चालू वर्ष सरायचे! त्याला अजून पूर्ण नोव्हेंबर आणि डिसेंबर जाणार व त्यानंतर होणार नवीन वर्षाचे आगमन!


    तोपर्यंत करायचे काय?

    काळजी नको! स्टोरीटेलतर्फे नोव्हेंबर महिन्यात भला मोठा ऑडिओबुक्सचा खजिना येत आहे रसिकांच्या भेटीला.

    हे वर्ष जन्मशताब्दींचे वर्ष! मग त्यात ग.दि.मा, अण्णा भाऊ साठे, सुधीर फडके, सरोजिनी बाबर आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे अशी दिग्गज नावं आहेत.

    तर पुल जन्मशताब्दीच्या सांगतेला खास पुल आणि सुनीताबाईंची पुस्तकं येत आहेत ऑडिओबुक स्वरुपात रसिकांच्या भेटीला, ते ही दिलीप प्रभावळकर, अरूणा ढेरे, चिन्मय मांडलेकर आणि इतरांच्या आवाजात!

    त्यात ‘स्टोरीटेल ओरिजिनल’ची संजय सोनावणी लिखीत  ‘पावनखिंड ३०३’ ही नवीकोरी भेट येत आहे. स्टोरीटेलतर्फे मल्टी व्हॉईस आणि संपूर्ण पार्श्वसंगीतासह भव्य दिव्य नाट्यमय स्वरूपात.

    त्याबरोबरच गोनिदांचे कृष्णवेध, रूमाली रहस्य... सु.शिं.ची दास्तान आणि काही नवीन शॉर्टस्टोरीजही येत आहेत.

    याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी साहित्यातीलही नवीकोरी ऑडिओबुक्स स्टोरीटेलच्या ताफ्यात दाखल होत आहेत. तर ही यादी काय आहे? हे जाणून घ्या.
    त्यासाठी उर्मिला बोलते करत आहे स्टोरीटेलच्या प्रसाद मिरासदार आणि सुकीर्त गुमास्ते ह्या पब्लिशर्सच्या जोडगोळीला!

    तर ऐकायला विसरू नका...आणि  हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    31 min
  • 59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना...

    दिवाळी स्पेशल डिस्काऊंट असतो... दिवाळी स्पेशल फराळ असतो... दिवाळी स्पेशल अंकदेखील असतो...

    मग दिवाळी स्पेशल पॉडकास्ट पण हवाच!

    स्टोरीटेल मराठीची खरी सुरूवात गेल्या दिवाळी पासून सुरू झाली. ह्या दिवाळीपर्यंत स्टोरीटेल मराठीने खूप मोठी मजल मारली आहे.
    मुळात ऑडिओबुक काय असते आणि त्याचा उपयोग काय ह्या प्राथमिक प्रश्नापासून झालेली सुरूवात... आणि तिथून पुढे, मराठी साहित्यातील दिग्गज आणि नामवंत लेखक-प्रकाशकांची पुस्तके मिळवून, स्वत:ची ‘स्टोरीटेल ओरिजिनल’ सिरीजची सुरूवात आणि त्याची वाटचाल, मराठी रसिकांचे ऑडिओबुक बद्दल सुरूवातीचे असलेले मत आणि नंतर त्यांची ह्या साहित्यप्रकारबद्दल बदललेली भूमिका आणि वाढलेली जवळीक... ह्या सर्वांचा लेखाजोखा म्हणजे हा पॉडकास्ट!

    सुरूवातीच्या अडथळ्यांपासून आत्तापर्यंतची वाटचाल आणि पुढील येत्या वर्षांत असलेले आव्हान... ना.सं. इनामदार, शिवाजी सावंत, विजय तेंडुलकर यांच्या अभिजात कलाकृतींपासून ‘स्टोरीटेल ओरिजिनल’च्या अजातशत्रू ह्या मधयुगीन कालखंडावर असलेल्या ऑडिओबुकचा सिक्वल, स्टोरीटेलचा पहिला- पावनखिंडीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बेतलेला, संजय सोनावणी लिखित ड्रामा ही ठळक वैशिष्टपूर्ण कलाकृती आणि बर्‍याच काही गोष्टींवर उर्मिला बोलते करत आहे स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ, स्टोरीटेलचे पब्लिशर्स प्रसाद मिरासदार आणि सुकीर्त गुमास्ते आणि व्हॉईस ओव्हर आटिस्ट कास्टिंगचे राहूल यांना! हे पडद्यामागचे कलाकार आपले अनुभव, आलेल्या अडचणी आणि त्यांनंतर झालेले बदल आणि स्वत:ची ऑडिओबुकमधील आवडती कलाकृती याबद्दल भरभरून बोलणार आहेत.
    तर तयार व्हा ह्या दिवाळी स्पेशल पॉडकास्टसाठी!
    आणि आम्हांला जरूर कळवा, कसा वाटला हा पॉडकास्ट!

    आणि तमाम रसिक श्रोत्यांना स्टोरीटेलतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    27 min
  • 58: असे रंगतात निवडणुकीचे रंग....अर्थात, निवडणूक विश्लेषणाचे विश्लेषण!

    महाराष्ट्रातील 2019 मधील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मुंबई व मुंबई उपनगरे, पुणे-पिंपरी चिंचवड, ठाणे, नागपूर आणि मराठी मुलखातील प्रत्येक भागातील राजकारणाचा, नेत्यांचा आणि प्रश्नांचा घेतलेला आढावा नुकताच स्टोरीटेलवर ‘निवडणूक रंग’ ह्या ५ भागांच्या सिरीजमधून आलेला आहे.

    त्या निमित्ताने ‘मिडियानेक्स्ट’चे संचालक अभय कुलकर्णी यांच्याबरोबर उर्मिला निंबाळकर यांनी येत्या निवडणूकीच्या दृष्टीने तरूणाईच्या आणि एकंदर तमाम जनतेच्या दृष्टीने या निवडणूकीचा असलेला कल आणि त्यातून उभे राहिलेले राजकीय चित्रण याचे केलेले विश्लेषण आपल्या सहज ओघवत्या शैलीत मांडले आहे.
    निवडणूकीला जाण्याअगोदर आणि आपले मत कुठल्याही पक्षाला देण्याअगोदर हा पॉडकास्ट ऐकणे अगदी जरूरी आहे. आणि त्याच बरोबर ‘निवडणूक रंग’ देखील ऐकणे तितकेच आवश्यक!

    तर आजचा पॉडकास्ट न चुकता ऐका आणि आम्हांलाही त्याबद्दल आपले मत नक्की कळवा.

    ‘निवडणूक रंग’ ऐकण्यासाठी  येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    43 min

About स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

From the publisher's feed

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.