स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By Santosh DeshpandeArtsBooks
Download on the App Store

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum episodes

  • 47: तो, ती आणि तिचा तो- भाग २- झलक

    जान्हवीचे नको त्या अवस्थेतले फोटो विक्रांतकडे होते. तिने तिच्या नवऱ्याला विश्वासात घेतलं होतं पण विक्रांत त्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी कुठवर जाऊ शकतो हे तिला माहिती नव्हतं.

    आणि जेव्हा समजलं तेव्हा तिच्या हातातून परिस्थिती निसटून गेली होती...

    ऐका स्टोरीटेल ओरिजिनलची नव्या प्रस्तुतीची झलक....‘तो ती आणि तिचा तो-भाग २’!

    तो ती आणि तिचा तो-भाग २: गौरी पटवर्धन
    सह: स्वप्नाली पाटील


    ‘तो, ती आणि तिचा तो-भाग २’ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    Update Description




    12 min
  • 46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....!

    स्टोरीटेल ओरिजनल मध्ये आलेली `करसाळ` म्हणजे एक वेगळ्या पठडीतील गूढकथा. ती जिच्या लेखणीतून साकारली त्या माधवी वागेश्वरी या नव्या पिढीतील आश्वासक लेखिकेसमवेत उर्मिलाची रंगलेली ही गप्पांची मैफल. पावसाळी दिवसात करसाळ ऐकणं हा एक विलक्षण अनुभव... म्हणूनच, बाहेर पाऊस चालू असताना, गरम चहाचा आस्वाद घेत स्टोरीटेल कट्ट्यावर रंगलेल्या या गप्पा लेखिकेच्या मनातील अनेक कप्पे उलगडून दाखवतात. 


    ‘करसाळ’ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    43 min
  • 45: झंझावात- झलक

    खडकीच्या रानात मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा तळ पडला होता. ऐन रात्री भर पावसाळ्यात दौलतराव शिंदेंच्या फौजेने मल्हारराव होळकरांच्या बेसावध छावणीवर हल्ला करुन मल्हारराव होळकरांच्व्ही हत्या केली. त्यांचे सावत्र बंधू यशवंतराव आणि विठोजीला दोन दिशांना पळून जावे लागले पण या विश्वासघाताचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करुनच! पण एकीकडे पेशवा व दुसरीकडे दौलतराव शिंद्यांची पाशवी शक्ती विरोधात असतांना हे ते कसे साध्य करणार होते?


    ऐका संजय सोनवणी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली आणि त्यांच्यांच आवाजाचा साज चढलेली महाराज यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाची धगधगती शौर्यगाथा ‘झंझावात’ फक्त स्टोरीटेलवर!

    ‘झंझावात’ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    11 min
  • 44: ‘मरडेल मिस्ट्री’ उलगडताना....

    स्टोरीटेल कट्टा With उर्मिला!


    जाणून घ्या मरडेल मागची कहाणी! उर्मिला बोलते करत आहे लेखक नितीन थोरात आणि अभिनेते-व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट यशपाल सारनाथ यांना!
    मरडेलचा जन्म... लेखनामागची प्रेरणा... कथेला आवाज देताना लागणारी माध्यमाची जाणीव... इतर भन्नाट किस्से ...

    प्रत्यक्षात ऐका आणि एन्जॉय करा हा आगळा-वेगळा धमाल पॉडकास्ट, फक्त स्टोरीटेल कट्ट्यावर!

     मरडेल ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    38 min
  • 43: झलक: काळं मांजर

    त्या काळ्या मांजराने माझ्या आयुष्याची वाट लावली होती. त्याला चांगलाच धडा मिळवण्याची मी संधीच पहात होते. त्या दिवशी ती मला मिळाली...


    काय झाले पुढे? ऐका एक विलक्षण थरारकथेची झलक...

    आर्या नाईक लिखित, परी तेलंग यांच्या आवाजात: काळं मांजर

    काळं मांजर- आर्या नाईक
    सह: परी तेलंग

    स्टोरीटेलवर ‘काळं मांजर’ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    8 min
  • 42: घडल्या अशा सुरेख, 'पिल्लू कथा' अनेक!

    राजीव तांबे यांच्या पिल्लू कथांच्या जन्मामागची सुरस कहाणी सांगत आहेत स्वत: राजीव तांबे, पब्लिशर सई तांबे आणि त्यांना बोलते करत आहे मेघना एरंडे!

    मगरु, डुकरू, उंदरी, सुंदरी, डासुली, कुकूच, कुकी आणि इतरही पिल्लू कथांचे धमाल किस्से ऐका ह्या ‘स्टोरीटेल कट्ट्या’च्या स्पेशल पॉडकास्टमध्ये!

    ‘पिल्लू कथा’ ऐकण्यासाठी  येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.  

    33 min
  • 41: इतकं दिलंत, इतकं दिलंत तुम्ही... माणूस केलंत तुम्ही मला…

    वरिष्ठ पत्रकार, ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून टी.व्ही. आणि रेडिओ, या माध्यमांतून आपल्या प्रभावी संवाद कौशल्यामुळे घरोघरी पोहोचलेले आणि लोकप्रिय असलेले व्यासंगी रसिक श्री. राजेंद्र हुंजे यांच्याशी स्टोरीटेल कट्टयावर रंगलेला संवाद.

     ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन मुंबईसारख्या शहरात स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवणारे श्री. राजेंद्र हुंजे सांगत आहेत त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल! आयुष्य समृद्ध करणाऱ्या कितीतरी आठवणी..  प्रा. शिवाजीराव भोसले यांची भाषणं असो, किंवा सवाईची पहाटेची मैफल असो... स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची मुलाखत असो किंवा श्रीनिवास खळे यांची भेट असो... त्यांच्या आठवणींमध्ये रमताना त्यांनी रसिक आणि माणूस म्हणून देखील काय काय कमवले, हे त्यांच्या शब्दात ऐका...

    स्टोरीटेलवरील हजारो पुस्तकांचा आस्वाद ३० दिवस निःशुल्क घेण्यासाठी  येथे क्लिक करा.

    47 min
  • 40: झलक- रत्नाकर मतकरींच्या ‘दुष्ट गोष्ट’ची !

    दुष्ट गोष्ट: रत्नाकर मतकरी


    Do you belive in `Witchcraft'?

    शाळेत जाणार्‍या सुनाम राजवाडे ह्या हुशार आणि वर्गात अव्वल येणार्‍या मुलाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू होतो.
    पूर्ण वर्ग अबोल आणि एका अनामिक भितीने ग्रासलेला असतो.
    सुनाम मेला कसा? त्याच्यावर चेटूक झाले होते, की? .... की अजून काही?
    संशय त्याच्याच वर्गातील रिया नावाच्या मुलीवर येतो.
    नक्की कारण काय? चेटूक की अजून काही?

    रत्नाकर मतकरी यांच्या ओघवत्या शैलीतून साकारलेली... अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात...
    खास ‘स्टोरीटेल ओरिजनल’ गूढकथा...
    दुष्ट गोष्ट

    स्टोरीटेलवर ‘दुष्ट गोष्ट’ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    11 min
  • 39: `सोंग` ते `मरडेल`, व्हाया `मोरपीस`!

    नितीन थोरात. आपल्या निरनिराळ्या कथानकांमधून संवेदनशीलता जपत मार्मिक भाष्य करणारा हा नव्या दमाचा शैलीदार लेखक. `स्टोरीटेल`वर गाजत असलेल्या `सोंग`, `पेटलेलं मोरपीस`, `मरडेल`, `आय लब यु`  तसेच नुकत्याच दाखल झालेल्या मुलांसाठीच्या बेडटाइम स्टोरीज् यांतून नितीन थोरात यांनी आपलं निराळं स्थान निर्माण केलं आहे. `स्टोरीटेल कट्ट्या`वर त्यांच्या आजवरच्या प्रवासाविषयी, त्यांच्या विविध कथांच्या निर्मितीविषयी आणि एकूणच लेखक म्हणून विकसित झालेला दृष्टिकोन यांबाबत रंगलेल्या गप्पांची मैफल.


    मरडेल ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
    आय लब यु ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

    स्टोरीटेलवरील हजारो पुस्तकांचा आस्वाद ३० दिवस निःशुल्क घेण्यासाठी  येथे क्लिक करा.

    19 min
  • 38: `स्टोरीटेल`वरील उन्हाळी गोष्टींची बेगमी

    उन्हाळा संपायच्या आत स्टोरीटेलवर काय ऐकाल?

    स्टोरीटेलवर खास सुट्टीच्या निमित्ताने एकाहून एक धमाल गोष्टी, कथा, कादंबऱ्या आलेल्या आहेत. विनोदी, क्लासिक्स, ऐतिहासिक, रहस्य कथांपासून बच्चेकंपनीला हरखून टाकणारं `स्टोरीटेल`वरचं गजबजगलेलं जग काय आहे....याचा घेतलेला वेध.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

    11 min

About स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

From the publisher's feed

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.