
Sign up to save your podcasts
Or


डॉ. अनिल अवचट म्हणजे माणसावर नितांत प्रेम करणारे बहुपैलू व्यक्तिमत्व. वाचनाचे आपले स्वतःवर झालेले संस्कार उलगडून दाखवतानाच वाचनसंस्कृतीबाबत निरीक्षणंही ते स्टोरीटेल कट्ट्यावर सागर गोखलेंसमवेत झालेल्या या गप्पांमधून उलगडतात. ऐकायलाच हवा असा संवाद प्रत्येकाला नक्कीच अंतर्मुख करुन जातो.
जगभरातील मराठी साहित्य संस्कृती जतनासाठी कार्यरत असणारे तरुण व्यक्तिमत्व म्हणजे जागतिक मराठी अकादमीचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर.
एक कल्पक, कुशल संघटक म्हणून सचिन ईटकर यांचा लौकीक निर्माण झाला आहे. मराठी तरुणाईला नवी दिशा देण्यासाठी स्टोरीटेलच्या सहकार्यातून त्यांनी एक संकल्प सोडला आहे. त्याविषयी....
ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला स्टोरीटेलवर येणारी ईत्र ही गोष्ट म्हणावी तर तुमच्या-आमच्यातलीच. पण त्यात दडलेले भावनिक कंगोरे, सामाजिक आशय आणि नव्या पिढीतील नात्यांमधले बदलते संदर्भ या कथानकाला खोली देतात. गंध पेरण्याची अव्यक्त आस असणाऱ्या अत्तराची कुपिच जणू.
अशा या ईत्रच्या लेखिका हीनाकौसर खान आणि ज्याच्या आवाजातून ही कथा फुलली आहे, तो अभिनेता क्षितिश दाते यांच्याशी स्टोरीटेल पब्लिशर सुकीर्त गुमास्ते यांनी स्टोरीटेल कट्ट्यावर साधलेला हा दिलखुलास संवाद.
https://www.storytel.com/in/en/authors/166133-Heena-Khan
स्टोरीटेलवरील पुस्तकांचा आनंद ३० दिवस अमर्यादित लुटण्यासाठी खालील लिंक वापरा. ही ऑफर फक्त ३१ डिसेंबरपर्यंत मर्यादित आहे.
www.storytel.in/pune
ऐकावंच असं काही…
आपली गुणवत्ता, आत्मविश्वास, प्रयत्न आणि धाडस यांच्या बळावर भरत गीते या तरुणाने अल्युमिनियम कास्टिंग हे क्षेत्र निवडून त्यात उत्तुंग भरारी घेतली आहे. युरोपातील आघाडीच्या समूहाला सोबत घेऊन त्यांच्या टॉरल इंडियाने भारतात भव्य प्रकल्प उभारला. मेक इन इंडिया अंतर्गत साकारलेल्या या प्रकल्पाने या क्षेत्राला नवी दिशा दिली आहे.
स्टोरीटेल बिझनेस- सक्सेस कोड या सिरिजमध्ये श्री. भरत गीते यांची आजवरची वाटचाल, त्यांचा उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांनी सांगितलेली यशाची सूत्रं अत्यंत महत्त्वाची आहेत. ऐकायलाच हवी अशा या मुलाखतीचा हा निवडक भाग.
संपूर्ण मुलाखत ऐकण्यासाठी-
https://www.storytel.com/in/en/books/679529-Success-Code---Casting-the-Future-E2
स्टोरीटेल ३० दिवसांसाठी मोफत व अमर्याद ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि साईन-अप करा.
www.storytel.in/pune
नवी पिढी वाचत नाही असं म्हणतात. पण असे अनेक जण आहेत जे पुस्तकं आवडीनं वाचतात आणि ऐकतात देखील. अशातलाच एक म्हणजे अमोघ वैद्य. पुस्तकी किडा म्हणून मित्रांमध्ये आणि सोशल मिडियात लोकप्रिय असणाऱ्या अमोघचं वाचनाशी असणारं नातं त्याच्यातील वाचक, लेखकही समृद्ध करुन जातं. स्टोरीटेल आयुष्यात आल्यापासून त्याचं पुस्तकांशी असणारं नातं आणखी बहरतं आहे. स्टोरीटेल कट्ट्यावर साक्षीसोबत अमोघच्या या गप्पांमधून नव्या पिढीतील वाचन-विचार सहजपणे उलगडत जातो.
--
स्टोरीटेल ३० दिवसांसाठी मोफत ऐकण्यासाठी पुढील लिंक वापरा व आस्वाद घ्या येथील हजारो पुस्तकांचा…अगदी अमर्यादित. त्वरा करा. ही ॲाफर केवळ ३१ डिसेंबरपर्यंतच.
www.storytel.in/pune
मराठीतील प्रतिभावंत अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्याशी स्टोरीटेल कट्ट्यावर रंगलेला हा संवाद. ना.सं. इनामदार यांची अत्यंत गाजलेली शिकस्त ही कादंबरी प्रतीक्षा लोणकर यांच्या आवाजात लवकरच श्रोत्यांपर्यंत पोहोचणार आहे. त्यानिमित्ताने त्यांचा संतोष देशपांडे यांच्याशी झालेला हा संवाद.
स्टोरीटेल पॉडकास्ट पार्टनर म्हणून संलग्न असणारा एक सांगायचंय... हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेता के.के. मेननचे प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत आगमन झाले. प्रसिद्ध कलाकार व लेखक लोकेश गुप्ते यांचाही दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. तारुण्याच्या उंबरठ्यावर असणारे मुले आणि त्यांच्या पालकांमधील हरवत चाललेल्या सुसंवादावर संवेदनशील भाष्य करणारा हा चित्रपट प्रत्येकाच्या मनाचा कोपरा हळवा करुन जातो. अशा या चित्रपटाच्या निर्मितीमागील भूमिका, प्रत्यक्ष चित्रिकरणातील अनुभव या व अशा अनेक गोष्टींची उलगड करण्यासाठी के.के. मेनन आणि लोकेश गुप्ते यांच्याशी तारांगणचे संपादक मंदार जोशी यांनी साधलेला हा संवाद.
आजच्या पिढीतील सर्जनशील प्रतिभावंत कवी-गीतकार म्हणून लोकप्रिय असलेला मंदार चोळकर स्टोरीटेल कट्ट्यावर आला आणि त्याचं शब्दमय आयुष्य सहजसंवादातून अलगद फुलून आलं... मंदार जोशी यांच्याशी त्याचा झालेला हा संवाद रसिकांसाठी नक्कीच पर्वणी ठरावी.
विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध या संकल्पनेचे प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या या विषयावरील स्टोरीटेल हेल्थ वर रंगलेल्या संवादाचा हा अंश.
सविस्तर ऐकण्यासाठी....
https://www.storytel.in/books/633929-Vinasayas-Weight-Loss-Ani-Madhumeh-Pratibandh---Bhag--1
स्टोरीटेलवर गाजत असलेल्या मृत्योपनिषद या ओरिजिनल कादंबरीचे लेखक हृषीकेश गुप्ते आणि त्यास आवाजाच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचविणारे प्रसिद्ध अभिनेता, कलाकार किशोर कदम यांच्याशी रंगलेली ही गप्पांची मैफल. एका रहस्यमय कादंबरीच्या निर्मितीचा वेध घेणारा संवाद तितकाच उत्कंठावर्धक होय.
From the publisher's feed