
Sign up to save your podcasts
Or


स्टोरीटेलवरील पुस्तकं जशी विलक्षण तशीच ती ऐकण्याचा मनमुराद आनंद लुटणारे चोखंदळ वाचकही खासच. अशा खास स्टोरीटेल वाचकांचं प्रतिनिधी म्हणून उद्योजक श्रीहरी नाईक यांच्याशी रंगलेल्या या गप्पा. अगदी आरंभीपासून स्टोरीटेलचे सभासद असलेले श्री नाईक सांगताहेत त्यांचा येथील आजवरचा अनुभव, जो वाचकांना नक्कीच काही देऊन जातो.
https://www.storytel.in/search-making+of+classic
अभिजात चित्रपटांच्या निर्मितीमागच्या रंजक आठवणींची उलगड करणारी स्टोरीटेलची ताजी टवटवीत ओरिजनल सिरीज म्हणजे ' मेकिंग अॉफ क्लासिक्स'! प्रसाद नामजोशी यांच्या लेखणीतून व आर.जे. राहुल यांच्या आवाजातून साकारलेली ही सिरीज रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवते. प्रसाद व राहुल यांच्याशी सई तांबे यांनी साधलेल्या या दिलखुलास गप्पांतून 'मेकिंग अॉफ क्लासिक्स' विषयी ऐकणं हा देखील झकास अनुभव ठरावा!
प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांच्या लेखणीतून साकारलेली आणि आशितोष गायकवाड यांच्या आवाजातून फुललेली स्पेस ब्राहो म्हणजे ऑडिओ बुक माध्यमासाठी निर्मित पहिले सायन्स फिक्शन ठरावे.
भारताच्या स्पेस मिशनचा सुपर हिरो - ब्राव्हो याला मारण्याचा कट दोन ठिकाणी आखला जातोय , ब्राव्हो त्यातून वाचू शकेल ?
सन २०५० मध्ये भारत ही महासत्ता आहे आणि अमेरिका, चीन, रशिया यांसारख्या महासत्तांना अंतराळयुद्धात पुरून उरतो आणि या अफलातून संघर्षाला लाभलेली मानवी भावभावनांची, शह-काटशहांची जोड आणि त्यातून फुललेली ही थरारक, रोमांचकारी मालिका रसिकांना नक्कीच खिळवून ठेवते.
या मालिकेच्या आगमनार्थ लेखक संजय सोनवणी यांच्याशी झालेला हा संवाद.
https://www.storytel.in/search-space+bravo
प्रसिद्ध कवी, लेखक व ऋतुरंग चे संपादक अरुण शेेवते यांनी बदलती वाचनसंस्कृती व त्या अनुषंगाने लेखक, संपादक यांसमोरील आव्हाने यांबाबत स्टोरीटेल कट्ट्यावरील गप्पांमधून केलेले सहजसुंदर विश्लेषण.
अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांची स्टोरीटेल कट्ट्यावरील या गप्पा म्हणजे एक सुरेल मैफलच. साहित्य-संवादाचे बदलते स्वरुप, माध्यमांतर, त्याचा साहित्यावर झालेला परिणाम आणि यातून पुढे येत असलेली रसिकांची नवी पिढी यावर डॉ. माधवी यांनी साधलेला संवाद नक्कीच विचारांना दिशा देऊन जातो.
स्टोरीटेल ओरिजिनल सिरीज इप्सिता ने वाचक-श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे. नव्या दमाचा लेखक तुषार गुंजाळ यांच्या सहज शैलीतून साकारलेली आणि यशपालने आपल्या आवाजातून ताकदीने श्रोत्यांच्या नजरेपुढे उभी केलेली ही आजच्या काळाचं प्रतिनिधित्व करणारी रोमहर्षक गोष्ट. अशा या इप्सिताच्या निर्मितीमागची गोष्टही तितकीच रंजक आहे. स्टोरीटेल कट्ट्यावर सुकीर्तसोबत तुषार आणि यशपालच्या रंगलेल्या गप्पांमधून पाहा ती कशी उलगडते.
स्टोरीटेल कट्ट्यावर मेघना एरंडे नामक आवाजाची किमयागार दिलखुलास बोलते आणि बोलक्या पुस्तकांशी, श्राव्य माध्यमाशी असणारं आपलं नातं तिच्या शैलीतून सई सोबतच्या गप्पांमधून व्यक्त करते! ऐकायलाच हवा असा हा पाॅडकास्ट स्टोरीटेल च्या तमाम चाहत्यांसाठी सस्नेह सादर!
पंढरीच्या वारीची ओढ प्रत्येक मराठी मनाला असतेच. युगानुयुगे विटेवर उभ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी पंढरीला जाणाऱ्या वारीमध्ये सहभागी होण्यात, वारकरी होण्यात एक आगळा दडलेला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ असणाऱ्या नरेंद्र गणपुले या तरुण कार्पोरेट व्यक्तीला या वारीची ओढ लागली आणि त्यात तो सहभागी झाला. तेथे प्रत्यक्ष आलेले अनुभव त्याच्या लेखी अमृतानुभव ठरले, त्याला आणखी समृद्ध करुन गेले. तर अशा या आगळ्या-वेगळ्या वारीचे अनुभव त्याच्याच शब्दांत ऐकणं म्हणजे जणू आपणही पंढरीच्या वारीत सहभागी होणं!
मराठी विनोदी साहित्यातील अजरामर ठरलेली पात्रं म्हणजे चिमणराव आणि गुंड्याभाऊ. चिं.वि. जोशी यांच्या मिश्कील शैलीतून उगडत जाणारे चिमणराव आणि त्यांचे किस्से आजही पोट धरुन हसायला लावतात. चिमणरावांचे पात्र पडद्यावर ज्यांनी लोकप्रिय केलं त्या दिलीप प्रभावळकरांसारख्या दिग्गज कलाकाराच्या आवाजात चिमणरावांच्या गोष्टी ऐकणं हा एक अनुभव आहे. स्टोरीटेलवर उपलब्ध असलेल्या निवडक चिमणराव संग्रहातून घेतलेला हा निवडक अंश...
आजचा आघाडीचा हरहुन्नरी प्रतिभावंत मराठी कवी संदीप खरे स्टोरीटेल कट्ट्यावर श्री. संतोष देशपांडे यांच्याशी दिलखुलास बोलता झाला. वाचनाचे आपल्यावर झालेले संस्कार सांगतानाच श्राव्य माध्यमातून उदयास येणारी नवी वाचनसंस्कृती, तो करीत असलेले प्रयोग आदींविषयी त्याचे सहजसुंदर भाष्य ऐकणं हा देखील एक अनुभवच.
From the publisher's feed