स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By Santosh DeshpandeArtsBooks
Download on the App Store

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum episodes

  • 37: झलक- ओसाडवाडीचे देव

    ओसाडवाडीचे देव... दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात

    पुणे सातारा मार्गावरचे एक काल्पनिक गाव. एके काळी शहर असावे असे वाटण्याइतके असलेली विविध देवळे पीर देखील हजर! तिथले गुरव नमस्काराला गेले की रंगात येऊन ओसाडवाडीची कहाणी सांगतात. म्हणजेच तिथल्या देवांची! असे देव की जे विशेषत: रात्री मंदिरातून बाहेर पडतात, हिंडतात, फिरतात. नैवेद्य खातात अन्‌ बोलतातही.

    ह्या गावाच्या गोष्टी लिहल्या आहेत चिं.वि जोशी यांनी. १०-१५ वयोगटांसाठीच्या मुलामुलींकरता लिहिलेल्या गोष्टींनी त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी लिहलेल्या गोष्टी स्टोरीटेलने खास स्वत:च्या अनोख्या शैलीत आणल्या आहेत आणि त्या पण दिलीप प्रभावळकर यासारख्या दिग्गज व्यक्तीमत्त्वाच्या आवाजात!

    ओसाडवाडीतील लोकांची देवलोकीची सफर असो, किंवा वाई विरुद्ध सातारा ह्या क्रिकेटमॅचमध्ये गणपती आणि मारुतीने उडवलेली धमाल असो. नवलाईने अचंब्याने तोंडात बोट घातलेले असो किंवा बेरकी आणि साध्याभोळ्या लोकांचा स्वभाव असो. हे सगळे बारकावे प्रभावळकर स्वत:च्या खुमासदार अंदाजात आणि आवाजात जिवंत करतात.

    चिं.विं.नी साध्या सोप्या शब्दांत मांडलेला खेळ प्रभावळकर यांच्या आवाजात ऐकण्याची मजा एकदा नक्की अनुभवण्यासारखी आहे.

    ओसाडवाडीचे देव: चिं. वि. जोशी

    सह: दिलीप प्रभावळकर

    स्टोरीटेलवर ‘ओसाडवाडीचे देव’ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    7 min
  • 36: भन्नाट स्टोरींमागच्या भन्नाट गोष्टीज्

    खास सुट्टीच्या दिवसांमध्ये बच्चेकंपनीसाठी स्टोरीटेलनं आपला खजिना खुला केला आहे, तो म्हणजे बेडटाइम स्टोरीज्. अगदी गाव, जंगल ते थेट भविष्यातलं रोबोटिक शहर इथपर्यंत कल्पनारम्य धमाल गोष्टी आणि त्यातली एकाहून एक झकास पात्र मुलांना भेटायला येत आहेत. अशा या आगळ्या बेडटाईम स्टोरीज् ज्यांच्या लेखणीतून साकारल्या त्या योगेश शेजवलकर, डॉ. सुनेत्रा तावडे आणि ऐश्वर्या कुमठेकर यांचा सई तांबे यांच्याशी रंगलेल्या गप्पांची ही मैफल. 

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी: storytel.com/marathi

    47 min
  • 35: झलक- मरडेल

    मरडेल- ‘स्टोरीटेल ओरिजिनल’

    सवत हा प्रकारच भयंकर, आणि त्यात सख्खी बहीणंच सवत असल्यावर काय सांगणार. इतकी धुसमूस होते मनात की थेट ‘मरडेल’ करायचा विचार येतो मनात.  

    पण कोणाचा? बहीणच सवत आहे, मग?

    नव-याचा करायचा ‘मरडेल’... की लग्न ठरवणा-याचा... बहीणीचा का थेट…?

    पण ते तसं सोप्पं काम नसतं. मरडेल करनं जसं सोप्पं नसतं तसं तो शोधनं बी लै अवघड असतं.

    शेवटी किती झालं तरी ते नातंच असं असतं, हडळीसारखं हसणारं….

    काय आहे हे ‘मरडेल’?

    अशा या मरडेलच्या पहिल्या भागातील हा छोटा अंश. 

    नितीन थोरात  यांनी लिहिलेल्या या कलाकृतीस आवाज लाभलेला आहे यशपाल सारनाथ यांचा.  

     मरडेल ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

    स्टोरीटेलवरील हजारो पुस्तकांचा आस्वाद ३० दिवस निःशुल्क घेण्यासाठी येथे क्लिक करा.

    10 min
  • 34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून

    रोमांस हा रसिकांच्या आवडीचा खास प्रांत. स्टोरीटेल वर रोमॅंटिक साहित्याच्या चाहत्यांसाठी मोठ्ठा खजिना उपलब्ध आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर लेखिका गौरी पटवर्धन लिखित  तो, ती आणि तिचा तो ही एक रंगतदार रोमॅंटिक कृती. या साहित्यप्रकाराचा वेध घेण्यासाठी सई तांबे जेव्हा गौरी पटवर्धन यांच्याशी संवाद साधतात, तेव्हा रोमॅंटिक साहित्याकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते. 

    तो, ती आणि तिचा तो ऐकण्यासाठी  इथं क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी इथं क्लिक करा.

    37 min
  • 33: झलक- अजातशत्रू

    स्टोरीटेल ओरिजिनल म्हणून अलीकडेच दाखल झालेली अजातशत्रू रसिकांची मने जिंकते आहे. 

    अडीच हजार वर्षांपूर्वीच्या भारतवर्षात एक खूप विचित्र घटना घडली. मगध राज्याला ‘साम्राज्य’ बनवणाऱ्या सम्राट बिम्बिसाराचा त्याच्या स्वतःच्या पुत्राने खून केला. त्या पुत्राचे नाव ‘अजातशत्रू’! त्यानंतर अजातशत्रूच्या मुलाने सिंहासन बळकावण्यासाठी त्याचा जीव घेतला. नंतर अजातशत्रूचा वंश संपेपर्यंत प्रत्येक राजपुत्र स्वतःच्या पित्याचा बळी देऊन सम्राट होत राहिला.. त्या प्रत्येकाला आपल्या बापाचा खून का करावासा वाटला असेल..? ह्या शापाची सुरुवात कशी झाली ह्याची ही वैचित्र्यपूर्ण कहाणी..!

    अशा या अजातशत्रूच्या पहिल्या भागातील हा छोटा अंश. सुमेधकुमार इंगळे यांनी लिहिलेल्या या कलाकृतीस आवाज लाभलेला आहे गजानन परांजपे यांचा. 

     अजातशत्रू ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    स्टोरीटेलवरील हजारो पुस्तकांचा आस्वाद ३० दिवस निःशुल्क घेण्यासाठी   येथे क्लिक करा.

    6 min
  • 32: माझ्या वाचनाची गोष्ट : महेश म्हात्रे

    मराठीतील ज्येष्ठ पत्रकार, संपादक महेश म्हात्रे हे स्वतः उत्तम संवादक देखील आहेत. लेखणी आणि वाणी अशा दोन्ही माध्यमांतून त्यांचा व्यासंग प्रतिबिंबित होत असतो. त्यांच्या आजवरच्या जडणघडणीमध्ये अर्थातच पुस्तकं, वाचन आणि चिंतन यांचा मोठा वाटा आहे. त्याविषयी जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. 

    मराठी रसिकांसाठी खास ऑफर- 

    स्टोरीटेलवरील हजारो पुस्तकांचा आस्वाद घ्या. ३० दिवस मोफत. 

     इथं क्लिक करा, साईन अप करा आणि ऐका हवी तितकी पुस्तकं अगदी मनमुराद.

    52 min
  • 31: ... म्हणून `माया महा ठगनी..` ची रसिकांना भुरळ!

    आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित मराठीतील पहिले ऑडिओबुक माया महा ठगनी.. स्टोरीटेलवर धुमाकूळ घालते आहे. मराठी रसिकांना हा विषय, त्यातली पात्रं, त्यात दडलेलं रहस्य का आकर्षित करीत आहे, हे जाणून घेण्यासाठी स्टोरीटेल कट्ट्यावर एक झकास मैफल रंगली. त्यात सहभागी झाले माया महा ठगनीचे लेखक संवेद गळेगावकर, ज्यांच्या आवाजातून ही कथा रसिकांपुढे आली त्या अभिनेत्री लीना भागवत आणि तरुण वाचक-श्रोत्यांचा प्रतिनिधी प्रसाद फाटक. या उत्स्फूर्त गप्पांमधून पुढे येतात  या श्राव्य साहित्यकृतीत दडलेले अनेक पैलू आणि त्यांच्यामागच्या रंजक आठवणी. 

    आपण स्टोरीटेलवर ही गोष्ट ऐकली नसेल तर आजच ऐका माया महा ठगनी. 

    मराठी रसिकांसाठी स्टोरीटेलची खास ऑफर. आता पुढील लिंकवर क्लिक करुन साईन-अप व्हा आणि स्टोरीटेलवरील हजारो गोष्टींचा अमर्यादित आस्वाद घ्या...३० दिवस अगदी मोफत. स्टोरीटेल मराठी ऑफर

    49 min
  • 30: `ती` मृणाल आणि `ती`ची स्मृतिचित्रे!

    मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री व प्रतिभावंत दिग्दर्शिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मृणाल कुलकर्णींची ओळख एक उत्तम वाचक व भाषा अभ्यासक म्हणूनही आहे. आपल्यातील कलागुणांना साहित्याने कसा आकार दिला इथपासून ते पुढच्या पिढीवर वाचनाचे संस्कार कसे घडविले हे त्यांच्याकडून ऐकणे म्हणजे पर्वणीच. स्टोरीटेलवर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लक्ष्मीबाई टिळक यांची स्मृतिचित्रे ही अजरामर साहित्यकृती मृणाल कुलकर्णींनी आपल्या अभिवाचनातून रसिक श्रोत्यांसाठी सादर केली आहे. या व अशा अनेक गोष्टींवर मृणाल कुलकर्णी यांच्याशी स्टोरीटेल कट्ट्यावर झालेल्या या मनमोकळ्या गप्पा.

    स्मृतिचित्रे ऐकण्यासाठी - स्मृतिचित्रे येथे क्लिक करा

    स्टोरीटेल ३० दिवस मोफत ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

    42 min
  • 29: शोध फराओचा... मराठीतील पहिल्या ऑडिओबुक सिक्वेलची उलगड

    स्टोरीटेलवर गाजलेल्या संजय सोनवणी लिखित फराओचा संदेश या ओरिजनल मालिकेचा सिक्वेल म्हणून शोध फराओचा ही मालिका आता वाचक-श्रोत्यांसाठी स्टोरीटेलवर दाखल झाली आहे. प्राचीन सिंध व ईजिप्त संस्कृतींचा मिलाफ, तत्कालीन राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक व्यक्तिमत्वांचा वेध आणि सत्तेसाठीचा लढा यांचा अत्यंत उत्कटपणे घेतलेला वेध हे सारं काही श्रोत्यांच्या नजरेपुढं उभं करणारं हे कथानक. लेखक संजय सोनवणी यांच्याशी अजिंक्य विश्वास यांनी याबाबत साधलेला संवाद. 

    स्टोरीटेलवर  शोध फराओचा नक्की ऐका. 

    खास मराठी रसिकांसाठी स्टोरीटेलची ऑफर- स्टोरीटेलवर आता १४ दिवसांऐवजी ३० दिवस मोफत ऐका...हजारो गोष्टी. त्यासाठी पुढील लिंक वापरुन साईन-अप करा. 

    storytel.com/marathi

    23 min
  • 28: श्री ठाणेदारांचा `सक्सेस कोड`

    अमेरिकेत स्थायिक प्रसिद्ध उद्योजक आणि लेखक श्रीनिवास ऊर्फ श्री ठाणेदार यांची प्रेरक यशोगाथा ऐका त्यांच्यात शब्दांत. स्टोरीटेल बिझनेस मध्ये सक्सेस कोड मालिकेमध्ये रंगलेल्या गप्पांमधून श्री ठाणेदार, त्यांचा प्रवास, त्यांचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तरुणांसाठीचा संदेश असं खूप काही उलगडतं. चुकवू नये अशा या मुलाखतीचा हा संक्षिप्त भाग. 

    संपूर्ण मुलाखत ऐकण्यासाठी पुढील लिंक वापरा- https://bit.ly/2GBB9QQ

    खास मराठी रसिकांसाठी स्टोरीटेलची ऑफर- १४ दिवसांऐवजी मिळवा ३० दिवस मोफत ऐकण्याची संधी. पुढील लिंक वापरुन साईन अप करा आणि आनंद लुटा हजारो गोष्टी मनमुराद ऐकण्याचा.  http://storytel.com/marathi

    16 min

About स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

From the publisher's feed

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.