स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By Santosh DeshpandeArtsBooks
Download on the App Store

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum episodes

  • 77: फारच Unique, एकदम भन्नाट, याआधी जगात, आयुष्यात कधीच झालं नाही असं काहीतरी

    फारच Unique, एकदम भन्नाट, याआधी जगात, आयुष्यात कधीच झालं नाही असं काहीतरी आलंय!   


    काय आहे?

    ‘फोर स्क्वेअर’ या स्टोरीटेल ओरिजिनलच्या नव्याकोर्‍या ऑडिओबुकचा लेखक ‘आदित्य भगत’ आणि नरेटर ‘आलोक राजवाडे’ यांच्याकडून ... तुम्हीच जाणून घ्या.

    मदतीला उर्मिला आहेच, तर, तुम्हाला या 'Unique, एकदम भन्नाट, याआधी जगात, आयुष्यात कधीच झाल्या नाही' अशा गप्पा कशा वाटल्या, हे आम्हाला कळवा.

    ‘फोर स्क्वेअर’ ऐकण्यासाठी: येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.  





    48 min
  • 76: भयाच्या अस्पर्शी वाटा धुंडाळताना

    भय केवळ भूतांमध्ये नसते. वेळोवेळी दिसणार्‍या, घडणार्‍या, जाणवणार्‍या- न जाणवणार्‍या घटनांमध्ये, माणसांच्या मनामध्ये देखील असते.

    त्याला केवळ व्यक्त व्हायला मार्ग मोकळा करून द्यावा लागतो.

    अश्या भयाच्या अनेक पदरी अस्पर्शी वाटा धुंडाळणारे आणि ‘स्टोरीटेल’वरील ‘मृत्योपनिषद’ या ऑडिओबुकचे लेखक ‘हृषिकेश गुप्ते’ यांना बोलते करत आहे उर्मिला!

    तुम्हाला या गप्पा कशा वाटल्या, हे आम्हाला कळवा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.  

    38 min
  • 75: शायर... की सिरियल किलर?

    ‘सुखन’ फेम, हजारों दिलों की धडकन... शायर नचिकेत देवस्थळी ‘सिरियल किलर’ होतो तेव्हा...

    नाही नाही, घाबरू नका!
    नचिकेतने आवाज दिला आहे स्टोरीटेल ओरिजिनलच्या ‘सिरियल किलर’ या ऑडिओबुकला!
    होय तेच ऑडिओबुक, जे अंजनाबाई गावित यांच्या खूनसत्रांवर आधारित आहे.
    होय तेच ऑडिओबुक, जे निरंजन मेढेकर यांनी लिहिले आहे.

    तर जाणून घ्या या स्टोरीटेल ओरिजिनलचा प्रवास, ते लिहिण्याची प्रेरणा, त्यामागची मेहनत आणि सोबत इतरही रंजक गोष्टी!
    उर्मिलासोबत आहेत या वेळेस सुकीर्त, निरंजन आणि नचिकेत गप्पा रंगवण्यासाठी!

    तर हा पॉडकास्ट नक्की ऐका, आणि आम्हांलाही कळवा तो कसा झाला आहे ते!


    'सिरियल किलर’ ऐकण्यासाठी: येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.  

    35 min
  • 74: स्टोरीटेल: फेब्रुवारी (व्हॅलेंटाईन) स्पेशल

    फेब्रुवारी महिना नुसता थंडीचा नसतो तर गुलाबी गुलाबी थंडी सोबत साजरी करायचा असतो. तर या प्रेमाच्या महिन्यात स्टोरीटेलने आपल्या रसिक चाहत्यांसाठी काय व्हॅलेंटाईन स्पेशल गिफ्टस आणल्या आहेत, हे जाणून घेत आहे उर्मिला स्टोरीटेलच्या सुकीर्त आणि प्रसाद या पब्लिशर्सकडून!

    व्हॅलेंटाईन डेच्या गुलाबांच्या फुलांपासून ते अगदी मुलांपर्यंत... क्राईम, प्रेम, विनोद यांसोबत अगदी संगीत नाटकांपर्यंत, या फेब्रुवारीत काय येत आहे, हे जाणून घ्या आजच्या पॉडकास्टमधून!

    तर पॉडकास्ट ऐकाआणि हो,  आम्हांलाही कळवा, हा पॉडकास्ट कसा वाटला ते ?

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    30 min
  • 73: वेगवेगळ्या भूमिका जगताना...

    लेझिम खेळणारी पोरं ते स्टोरीटेलवर ‘क्राईम रिपोर्टर’ व्हाया ‘माझ्या नवर्‍याची बायको’ हा  भिन्न भिन्न माध्यमांमधून प्रयोग केलेले अभिजीत झुंझारराव सांगत आहेत आपला अभिनेता- दिग्दर्शक ते अभिवाचक हा प्रवास. सोबत त्यांच्या अनुभवांची शिदोरी उलगडून देत आहेत रसिक श्रोत्यांना. केलेले स्ट्रगल, नाटकांची रेलचेल आणि त्यातच नॅशनल असोशिएशन फॉर ब्लाईंड या संस्थेच्या मुलांसमोर सादर केलेला प्रयोग ते स्टोरीटेलसाठी केलेल्या ‘क्राईम रिपोर्टर’चा प्रवास सांगताना, या आणि अशा अनेक अंगावर काटा येणार्‍या आणि सुखावून सोडणार्‍या आठवणींबद्दल त्यांना बोलते करत आहे उर्मिला.


    तर नक्की ऐका आणि आम्हांलाही कळवा, हा पॉडकास्ट कसा आहे ते?

    ‘क्राईम रिपोर्टर’ ऐकण्यासाठी: येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.  

    38 min
  • 72: फर्जंद, पु.ल. आणि दिग्पाल लांजेकर

    निनाद बेडेकर, आनंद मोडक, गोनिदा, संत तुकाराम... या आणि अशाच पूर्वासुरींचा मिळालेला संचिताचा ठेवा!


    अभ्यासोनी प्रकटावे। नाही तरी झाकोनी असावे। प्रकटोनी नसावे| हे बरे नोहे|| या समर्थ उक्तींना प्रमाण मांडून दिग्पाल लांजेकर या खेळियाने एक भव्य इतिहासकालीन पट सादर केला स्टोरीटेलवर! सोबत पुलंच्या ‘एक शून्य मी’ आणि ‘आपुलकी’मधील काही लेखांचे अभिवाचन देखील!
    कसे काय जमवले हे सगळे त्यानी? काय काय मेहनत घ्यावी लागली ? हे सगळे त्याच्याकडून जाणून घेत आहे उर्मिला!

    तर या वेळेसचा पॉडकास्ट नक्की ऐका आणि जाणून घ्या पॉडकास्टमधील सुरेख आठवणींचा ठेवा!

    फर्जंद’ ऐकण्यासाठी: येथे क्लिक करा. 

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.  

    51 min
  • 71: ‘टॅबू’ विषयाला स्पर्श करताना...

    ‘टॅबू’ विषयाला स्पर्श करताना...


    ‘एरॉटिका’ तसा संवेदनशील विषय... आणि त्याबद्दल ३ स्त्रिया बोलत असतील तर? सायली , सई तांबे  उर्मिला यांनी गप्पा मारल्या आहेत ‘एरॉटिका’... त्याचे प्रकार... त्याची साहित्यातील गरज आणि त्याबद्दल ‘स्त्रियांचा दृष्टीकोन... आणि त्या लिहितानाची प्राक्रिया... सोबत इतरही विषय त्या बोलता बोलता स्पर्श करून जातात...
    काय आहे, हे तुम्हीच जाणून घ्या...

    हा पॉडकास्ट नक्की ऐका, आणि तुमच्या या ‘टॅबू’ विषयाबद्दल या पॉडकास्टनंतरची भूमिका आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तर तुमची मनमोकळी मतेही कळवा.

    ‘Desperate Husband’ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.  

    48 min
  • 70: स्टोरीटेल स्पॉटलाइट: सौ. माया पार्डीकर

    खरं तर प्रत्येक रसिक असतो एक अव्यक्त साहित्यिक. तो शब्दांना आपल्या आपल्या कवेत घेऊ पाहतो अन् भावनांची गलबते त्या शब्दसागरी विहरत असतात. अशाच रसिक मात्र काहीशा अव्यक्त साहित्यिकांसाठी स्टोरीटेल घेऊन येत आहे खास हक्काचं व्यासपीठ...स्टोरीटेल स्पॉटलाईट. या मालिकेअंतर्गत आपण महाराष्ट्रातील अनेक प्रतिभावंत मात्र फारसे प्रसिद्धीझोतात न आलेल्या साहित्यिक, कवींना संवादाचे व्यासपीठ देत आहोत.

    आपल्या आसपासच्या, परिचयातील गुणी, प्रतिभावंतांची नावं आपण यासाठी सूचवू शकता.
    या उपक्रमात पहिला पॉडकास्ट सादर करीत आहोत नांदेड येथील सौ. मायाताई संजयराव पार्डीकर यांचा. गृहिणी म्हणून काम करतानाच स्वत:च्या स्वयंसेवी संस्थेमार्फत त्यांनी महिलांसाठी मोठं काम उभारलेेलं आहे. हे करीत असताना लहानपणापासून जोपासलेली कवितांची आवड त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगळपण अधोरेखित करते. चला ऐकूया त्यांच्याशी रंगलेल्या या छोटेखानी गप्पांची मैफल...

    ‘स्टोरीटेल स्पॉटलाइट’ मध्ये झळकण्यासाठी लिहा [email protected] या इमेलवर! आपल्यातले काही भाग्यवान येतील या ‘स्पॉटलाईट’ मध्ये!

    आजचा पॉडकास्ट न चुकता ऐका आणि आम्हांलाही त्याबद्दल आपले मत नक्की कळवा.

     स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.  

    26 min
  • 69: स्टोरीटेल: जानेवारी २०२० स्पेशल

    नवीन वर्षाची सुरूवात आणि संकल्प याचे एक अतूट नाते आहे. असाच एक संकल्प स्टोरीटेल घेऊन आहेत रसिक वाचक-श्रोत्यांसाठी!

    नवीन वर्षाची सुरूवात कुठल्या ऑडिओबुकने करणार? नवीन वर्षात स्टोरीटेलच्या संग्रहात कुठली ऑडिओबुक दाखल होत आहेत? कुठले नवे दालन स्टोरीटेल रसिकांच्या समोर आणत आहे, हे जाणून घ्या स्टोरीटेलच्या पब्लिशर्स सुकीर्त गुमास्ते आणि प्रसाद मिरासदार यांच्याकडून. अर्थात त्यांना बोलते करायला आणि नवनवीन गोष्टी जाणून घ्यायला उर्मिला आहेच.
    तर तुम्ही कुठली ऑडिओबुक्स या नवीन वर्षात ऐकणार आहात आणि आपले जाणीवांचे विश्व समृद्ध करण्याच्या दिशेने पाऊल उचलणार आहेत?
    तर पॉडकास्ट ऐकाआणि हो,  आम्हांलाही कळवा, हा पॉडकास्ट कसा वाटला ते आणि तुमची यादी देखील!

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    21 min
  • 68: मस्तानीचा ‘बाजीराव’ ते ‘माझ्या बायकोचा बॉयफ्रेंड’

    मस्तानीचा ‘बाजीराव’ ते ‘माझ्या बायकोचा बॉयफ्रेंड’ हा प्रवास करणारा अंगद म्हसकर सांगत आहे स्वत:च्या या प्रवासातल्या गंमतीजमती! निमित्त आहे ‘स्टोरीटेल ओरिजिनल’ ‘माझ्या बायकोचा बॉयफ्रेंड’चे!

    त्याला बोलती करायला सोबत उर्मिला आहेच!
    तर ऐका  या सुरेख पॉडकास्टच्या दिलखुलास गप्पा... आणि हो,  आम्हांलाही कळवा, हा पॉडकास्ट कसा वाटला ते?

    स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. 

    41 min

About स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

From the publisher's feed

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.