स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By Santosh DeshpandeArtsBooks
Download on the App Store

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum episodes

  • 108: श्रवणीय 'पर्व'णी!

    डॉ. एस. एल. भैरप्पा लिखित ‘पर्व’ ही अत्यंत गाजलेली साहित्यकृती आता मराठीमध्ये स्टोरीटेल वर आली आहे. ती श्राव्य स्वरुपात रसिकांपुढे घेऊन आले आहेत हरहुन्नरी गायक, संगीतकार मिलिंद इंगळे. त्यांच्याशी राहुल पाटील यांसमवेत रंगलेली गप्पांची खास मैफल. तसेच, स्टोरीटेलवर या आठवड्यात काय नवं येतं आहे, याचा घेतलेला वेध... सारं ऐका, या एकाच पॉडकास्ट मध्ये! 


    सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/marathi

    'पर्व' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/1678891-Parv

    36 min
  • 107: माय लॉर्ड : कायद्याचं ‘ऐका’!

    स्टोरीटेल कट्ट्याच्या दणदणीत शंभरीनंतर आता श्रोत्यांना कट्टा नव्या स्वरूपात ऐकायला मिळणार आहे. स्टोरीटेल आता प्रत्येक आठवड्याला मराठीतील दर्जेदार साहित्य घेऊन ऑडिओबुकप्रेमींना भेटणार आहे आणि याचीच झलक तुम्हाला स्टोरीटेल कट्ट्यावर ऐकायला मिळणार आहे. मराठी श्रोत्यांसाठी स्टोरीटेलने 'सिलेक्ट मराठी' हे नवीन फिचर आणलं आहे, ज्यावर तुम्ही शेकडो मराठी ऑडिओबुक्स ऐकू शकता.

    आजच अच्युत गोडबोले आणि अॅड. माधुरी काजवे लिखित ‘माय लॉर्ड’ हे ऑडिओबुक स्टोरीटेलमध्ये दाखल झालंय. यानिमित्ताने प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांनी या पुस्तकात नक्की काय आहे, याबाबत संवाद साधला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ऐकायला मिळणार आहे ‘माय लॉर्ड’ ऑडिओबुकची छोटीशी झलक! 

     ‘माय लॉर्ड’ ऑडिओबुक ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/1945960-My-Lord

    स्टोरीटेल सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/marathi

    37 min
  • 106: स्टोरीटेल कट्टा : बहरताना... बदलताना!

    असं म्हणतात की, 'The Only Constant Is Change' असाच काहीसा इंटरेस्टींग बदल आता स्टोरीटेल कट्ट्यावर होणार आहे... याच नवीन बदलांबाबत आणि संकल्पनांबाबत स्टोरीटेल इंडियाचे मुख्य व्यवस्थापक योगेश दशरथ यांना बोलते केले आहे संतोष देशपांडे यांनी. श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभलेला 'स्टोरीटेल कट्टा' आता आपल्याला नव्या आणि खास स्वरूपात ऐकायला मिळेल त्याची उलगड करणारा हा पॉडकास्ट ऐकायला विसरू नका हा विशेष पॉडकास्ट...


    स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी https://bit.ly/2yjmdV0 या लिंकवर क्लिक करा. 

    27 min
  • 105: राज-ए-विराजस!

    लहानपणापासूनच अभिनय, लेखन, साहित्याची परंपरा असलेल्या कुटुंबात तो मोठा झाला... सगळ्यांनाच अभिनेता व्हायचं असतं, याला मात्र लेखन, दिग्दर्शनात रस... आई-वडिलांनी लावलेली वाचनाची सवय, आजोबांचा दर्जेदार अभिनय, आजोळी पणजोबांच्या समृद्ध साहित्याचं गारूड, आजी-आजोबांचं भाषाज्ञान या सर्व गोष्टी आत्मसात करून लेखक, दिग्दर्शक, अभिनेता विराजस कुलकर्णी याने सर्जनशीलतेची कास धरत, अथक परिश्रम घेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. एकाच वेळी अनेक प्रांतात स्वतःला सिद्ध करणाऱ्या या प्रतिभावंताच्या कलात्मक जडणघडणीबाबत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत संतोष देशपांडे यांनी... जरूर ऐका!
     
     विराजस कुलकर्णीचा आवाज लाभलेली 'रूमाली रहस्य' आणि 'कृष्णवेध' ही ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
     https://www.storytel.com/in/en/search-Virajas+Kulkarni

    स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी https://bit.ly/2yjmdV0 या लिंकवर क्लिक करा.

    30 min
  • 104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या!

    झगमगीत चित्रपट, मसालेदार वेबसिरीजच्या जगात श्राव्य माध्यमातील पॉडकास्टदेखील आता लोकप्रिय झाले आहेत. या पॉडकास्टिंग क्षेत्राचा वेध आम्ही घेतलाय थेट पॉडकास्टमधूनच... या विषयावर मनमोकळ्या आणि इंटरेस्टींग गप्पा मारल्या आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या म्हणजेच कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी! एकूण श्राव्य माध्यमाशी त्यांचं जुळलेलं आणि फुललेलं नातं, पॉडकास्ट ऐकण्याची आवड, त्यातील त्यांची निरीक्षणे यांचा वेध घेणारा हा पॉडकास्ट तुम्हालाही नक्कीच आवडेल, दिशा देईल.

    -----
    स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी https://bit.ly/2yjmdV0 या लिंकवर क्लिक करा. 

    39 min
  • 103: अग्निपंखी 'गरुडझेप'!

    पदोपदी अपयशाशी गाठ पडत असतानाही जिद्द, चिकाटी अन् संयमाने ध्येय कसं गाठता येतं, हा थक्क करणारा प्रवास आहे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी श्री. भरत आंधळे यांचा. त्यांनी लिहिलेली बेस्टसेलर पुस्तकं 'गरुडझेप - एक ध्येयवेडा प्रवास' तसेच 'गावकुसातील जितराबं' आता स्टोरीटेलवर रसिकांसाठी उपलब्ध झाली आहेत. या निमित्ताने, खुद्द त्यांच्याशी रंगलेला हा पॉडकास्ट ऐकणं चुकूनही चुकवू नये, असाच.


    'गरुडझेप - एक ध्येयवेडा प्रवास' वाचण्यासाठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/1843933-Garudjhep

    'गावकुसातील जितराबं' वाचण्यासाठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/books/1843929-Gavkusatil-Jitrab

    स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी https://bit.ly/2yjmdV0 या लिंकवर क्लिक करा.

    44 min
  • 102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!

    महाराष्ट्राचे राजकारण हल्ली ज्या काही मोजक्या नेत्यांच्या भोवती केंद्रित असते त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे खा. संजय राऊत. मुळात एक हाडाचा पत्रकार, लेखक, संपादक असणारे संजय राऊत हे आपल्या लिखाणातील रोखठोक शैलीसाठी आपले वेगळेपण टिकवून आहेत. त्यांच्या या शैलीचा आणि एकूणच त्यांच्या शैलीवर प्रभाव टाकणार्‍या गोष्टी कोणत्या? भाषा, वृत्तपत्रे यांची आजची स्थिती याबाबत त्यांच्या मनात नेमके काय चालू आहे, या बाबत खुद्द त्यांनाच बोलतं केलं आहे संतोष देशपांडे यांनी....स्टोरीटेल कट्ट्याच्या शंभराव्या पॉडकास्ट च्या निमित्ताने...आणि हो, शेवटचा 'रॅपिड फायर राऊंड' ऐकायला विसरू नका!


    स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी https://bit.ly/2yjmdV0 या लिंकवर क्लिक करा.

    30 min
  • 101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी!

    सध्या लॉकडाऊनमुळे बाहेर जाणं, आवडत्या व्यक्तिंना भेटणं तसं दुर्मिळच झालंय... पण काळजी नको... स्टोरीटेलवर उत्तम मराठी पुस्तकं तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. तसेच ऑगस्टमध्ये तुमच्या कानांची आतुरता वाढवण्यासाठी आणखी काही छान ऑडिओबुक्स आणि शॉर्टस्टोरीजची भर स्टोरीटेलमध्ये पडणार आहे... कोणती आहेत ती पुस्तकं, काय एक्सायटिंग ऐकायला मिळणार आहे या महिन्यात, जाणून घेण्यासाठी ऐका उर्मिला-सुकीर्तच्या या गप्पा...


    स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी https://bit.ly/2yjmdV0 या लिंकवर क्लिक करा.

    25 min
  • 100: रंग लेखनाचे, `फिरंग`ल्या क्षणांचे!

    विविध माध्यमांमध्ये आपल्या लेखणीचा ठसा उमटवित स्टोरीटेलच्या माध्यमातून श्राव्य माध्यमाला आपलंसं करते, तिथे दर्जेदार ओरिजनल सिरीज लिहिते, त्यांना रसिक श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभतो अन् मग सुरु होतो त्या लेखिकेचा श्राव्यलेखनाचा आगळा प्रवास. होय....गौरी पटवर्धन. स्टोरीटेलची आघाडीची लेखिका. बालमित्रांसाठी ‘मिशन हिमालय’, ‘अळी आणि कोळी’, ‘डॉल हाऊस’ या ऑडिओ बुक्सचा खजिना घेऊन आल्यानंतर गौरी यांनी ‘फिरंग’, ‘फिरंग २’, ‘तो ती आणि तिचा तो’ ही वेगळ्या धाटणीची पुस्तकं आपल्यासमोर आणली... आपला आजवरचा लेखनप्रवास, त्यात लाभलेले यश आणि त्यात दडलेलं सिक्रेट वगैरे खुद्द गौरीकडून ऐका उर्मिलासोबत रंगलेल्या या पॉडकास्टमधून.

    35 min
  • 99: ‘अजातशत्रू’मागचे गूढ उकलते तेव्हा...

    इतिहासातील एक विस्मरणात गेलेला योद्धा अजातशत्रू... अनेक लोकांसाठी तसा तो अज्ञातच राहिला... पण स्टोरीटेलमध्ये ‘अजातशत्रू’वर प्रकाशझोत टाकण्यात आला आणि बघता बघता अजातशत्रू या ऑडिओ बुकचा दुसरा सिझन स्टोरीटेलवर आला... या पराक्रमी अजातशत्रूला आपल्या समोर आणणारा लेखक सुमेधकुमार इंगळे आणि अजातशत्रूला साजेसा असा खणखणीत आवाज दिलेला अभिनेता अंबरिश देशपांडे यांच्याशी उर्मिलला निंबाळकरने दिलखुलास गप्पा मारल्या... हा रंगतदार पॉडकास्ट नक्की ऐका!


    स्टोरीटेलवर 'अजातशत्रू'चे दोन्ही सिझन ऐकण्यासाठी क्लिक करा -
    https://www.storytel.com/in/en/search-ajatshatru

    स्टोरीटेलवरील गोष्टींचा आस्वाद ३० दिवस निःशुल्क घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन साइन-अप करा.
    https://bit.ly/3hog9vY

    53 min

About स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

From the publisher's feed

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.